उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
अनिस आणि होमिओपथी आणि पर्यायी-चिकित्सा
युयुत्सू
June 3, 2008 - 12:20 pm
अनिसचे होमिओपथी आणि पर्यायी-चिकित्सा या विषयी धोरण आहे हे जाणून् घेण्यास मी उत्सुक आहे. यावर् अनिसचे अधिकृत धोरण जाहिर असल्यास ते कळविण्याची व्यवस्था करावी.
दुवे:
Comments
पर्यायी चिकित्सा
अंनिस वार्तापत्रात यावर अनेक लेख येउन गेले आहेत. संपादकीय मंडळतील श्री टी बी खिलारे हे होमिओपाथि व पर्यायी चिकित्सा याला नेहमी च झोडपुन काढतात. मी व्यक्तिशः अशा झोडपण्याशी सहमत नाही. याबाबत अंनिसचे धोरण फक्त शोषणाबाबत आहे. वार्तापत्राची आतापर्यंतच्या अंकांची सीडी तयार करताहेत असे ऐकले आहे. त्यात समग्र माहिती मिळेल अधिक माहिती http://antisuperstition.org येथे मिळेल
प्रकाश घाटपांडे
होमिओपथी
थोडस्स अवांतर, पण स्वानुभवः-
मी मागल्या ३ साडेतीन वर्षांपासुन घेउन र्हायलोय.
अजुन तरी काहीच उपयोग झालेला नाहिये.
तिथं येणार्या इतर् जेव्हढ्या सह्-रुग्णांना विचारलं की "बाबा रे काय उपयोग झाला का तुला?"
तर उत्तर नकारार्थिच मिळतं. औरंगाबाद ते पुणे सर्वत्र हीच बोंबाबोंब आहे.
काही प्रथितयश आणि तथाकथित नामांकित, आंतरराष्ट्रिय दर्जाच्या म्हणवल्या जाणार्या होमिओपथी चिकित्सेची ही
अवस्था आहे. इतरांचं विचारायलाच नको.
(एक स्पष्ट करतो, मी स्वतः ह्यांची पथ्यं काटेकोर पाळतोय,पण् उपयोग शुन्य.)
ना धड कुणाचं तिथं आल्यानं वजन हल्कं झालं(खिशाचं सोडुन), ना काही गळणं थांबलं (केस वगैरे,
पण खिशाला गळती लागली ती कायमचीच).
हे लोक नक्की फोटो लावतात तरी कुणाचा(बरे झालेले रुग्ण म्हणुन) ह्याचा शोध घ्यायचाय आता.
कळत् नाहिये हे सगळं काय आहे ते.
त्यात् पुन्हा ६ वर्षात मिळुन जवळपास पन्नास हजाराच्या घरात खर्च.
आणि वर "यापुढे ट्रीटमेंट घेत राहिलात तरच उपयोग" अशी आशा दाखवली जाते.
(नाय तर् जावरची ट्रीट्मेंट् गेली पाण्यात)
पुर्वीचे झालेला अफाट खर्च वसुल करण्यासाठी का असेना माणुस पुढे आणखी खर्च करतो आणि चक्र चालुच राहतं.
जन सामान्यांचे मन
भंकस प्रस्ताव!
या सुक्ष्मातल्या लेखांनी/चर्चाप्रस्तावांनी वैताग आणला आहे नुसता.
कोणीही उठतो आणि एक ओळ खरडतो.. झाला प्रस्ताव !!!! ना काहि स्वतःचा अभ्यास ना काहि स्वतःचे विचार, ना काहि स्वतःची मते
(सुक्ष्मातील लेखकांना वैतागलेला)ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे
हेच
१००% सहमत आहे रे बाबा तुझ्याशी!
ना काही स्वतःचा अभ्यास नाही काही विचार. नुसतेच फालतुचे पोकळ वाद!
मी ही कंटाळलोय!!
संपादक २५ शब्दांची मर्यादा एक पुज्य वाढवून २५० करतील काय?
तसेच पाक कृती मध्ये जसे जिन्नस, कृती असे तयार टप्पे दिलेले असतात, तसेच येथेही लेखनासाठीही द्यावेत. लेखन ही पण एक पाककृतीच असते. जमली नाही तर विचारांची चव बिघडते हे ही ध्यानात असु द्या!
म्हणजे काही तरी यात सुधारणा होण्याची शक्यता आहे... अन्यथा चांगले अभ्यासक येथून रजा घेतील की काय, असे वाटायला लागले आहे.
आपला
गुंडोपंत
हे सदर्
हे सदर चर्चेकरता आहे ले़ख लिहिण्या करता नाही.
हे काय
तुम्हाला हे उपक्रम काय
अनिस चे मुखपत्र वाटते काय?
आपला
गुंडोपंत
हो
आता असे खरच वाटायला लागले आहे...
या प्रस्तावाचे प्रयोजन्
अनिस ही एक दूटप्पी आणी बनेल चळवळ आहे आणी ते मी लो़कांच्या समोर आणल्या शिवाय राहणार् नाही...
होमिओपथी हे पण थोतांड असेल तर ज्योतिषांच्या मागे ते जसे लागले आहेत तसे होमिओपथीच्या मागे लागलेले दिसत नाहीत. होमिओपथिला तर विद्यापीठात् शिकवले जाते.
ओक्के
अनिस ही एक दूटप्पी आणी बनेल चळवळ आहे आणी ते मी लो़कांच्या समोर आणल्या शिवाय राहणार् नाही...
ओक्के! हे तुम्हाला वाटते.
पण अनिस नेच अनेक चांगली कामे ही केली आहेत हे विसरू नका.
जसे ते जोतिषाला १०० नाकारताहेत व आत्मघात करून घेत आहेत, तसेच त्यांना १००% नाकारून जोतिषीही आत्मघातच करून घेतील असे माझे प्रांजाळ मत आहे!
होमिओपथी हे पण थोतांड असेल तर ज्योतिषांच्या मागे ते जसे लागले आहेत तसे होमिओपथीच्या मागे लागलेले दिसत नाहीत. होमिओपथिला तर विद्यापीठात् शिकवले जाते.
हं! मुद्दा विचार करण्या जोगा आहे बॉ!
तसे त्यांनी अनेक दर्गे आणि तसेच मदर तेरेसाच्या संतपदाच्या चमत्कारालाही आव्हान दिल्याचे माझ्या ऐकिवात नाही.
येथे मऊ दिसले म्हणून हिंदु खणायचे हा त्यांचा भामटेपणा दिसून येतोच यात शंका नाही.
इतकीच समाजाच्या मत परिवर्तनाची चाड असेल तर द्या ना पोप ला आणि मुल्ला मौलवींनाही आव्हाने!!! तिथे बरी शेपुट घालता?
का ख्रिश्चन आणि मुस्लीम अनिस च्या समाजाच्या व्याख्येत बसत नाहीत?
सर्व धर्माना सारखी वागणूक देत नाहीत या मुद्यावर अनिस संघटनेवर बंदीच घातली पाहिजे!
(अरे! हे तर मी मागेही म्हणालो आहेच.)
आपला
गुंडोपंत
(जोतिषाबद्दल ची एक चीनी म्हण: ज्याला जे माहिती झालेले असते ते दुसर्याला सांगत नाहीत, आणि जे त्याबद्दल बडबडत असतात त्यांना ते माहितच नसते!)
अंनिस : एक हिदुत्ववादी संघटना
खरेतर हे विधान थोडे(?) धाडसी वाटेल. परंतु एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले असता अंधश्रद्धा निर्मूलन समिती ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक चळवळ , गाडगेबाबा आणि सावरकर यांचेच हिंदू धर्म स्वच्छतेचे कार्य पुढे चालू ठेवत आहे असे वाटते.
'लोका सांगे ब्रह्मज्ञान| आपण कोरडे पाषाण' ही परिस्थिती आज हिंदू धर्माला येऊन धर्मग्लानी झालेली आहे. ज्या धर्मपंडितांनी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि आजच्या जगाशी त्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्यांनाही मध्ययुगात हिंदू धर्मात झालेल्या वैचारिक भेसळीचा वीट आलेला आहे हे स्पष्ट दिसते. विवेकानंदांपासून ते बाबा रामदेवांपर्यंत कोणताही हिंदू धर्म प्रसारक/प्रचारक वेदान्त-ज्ञानमार्ग - भक्तीमार्ग - कर्ममार्ग यांचाच उदोउदो करताना दिसतो. (हिंदू धर्मातील वाईट रुढींबाबत जागतिक प्रेक्षकवर्गासमोर ते कोणतेही समर्थन करताना दिसत नाहीत. प्राणायामाऐवजी / योगाभ्यासाऐवजी मरीआईच्या जत्रेत पाठीला हुक आडकवून लटकण्याचा सल्ला कोणत्याही बाबांनी चीन/अमेरिका/ऑस्ट्रेलिया येथील विदेशी मुमुक्षुंना दिलेला दिसत नाही.)
'वेदांग ज्योतिष' - ज्याला अस्सल हिंदू म्हणता येईल - ज्याला वेदांचा आधार आहे ते - केवळ खगोलशास्त्र आहे.
फलज्योतिष/होराशास्त्र - ज्यात भविष्यकाळात घडणार्या घटनांसंबंधीताअडाखे बांधले जातात - हे ऐतिहासिक दृष्ट्या हिंदू धर्माचा भाग वेदान्त कालानंतर (इ.स. २०० नंतर) ग्रीक आक्रमकांकडून हिंदू संस्कृतीत आले. म्हणजेच हा प्रकार शास्त्रोक्त नाही.
मग जर तो आर्वाचिन भौतिकीच्या निकषांवर खरा ठरत नसेल तर तो हिंदू धर्म शुद्धीकरणात काढून टाकला पाहिजे.
तसेच अनेक अंधश्रद्धांबाबत.
अंनिस फक्त हिंदू धर्मावर हल्ला चढवते असा आरोप हिंदुत्ववाद्यांकडून होतो. हे जरी क्षणभर खरे मानले तरी 'अंनिस' हिंदू हिताचेच काम करत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही काय?हिंदुत्ववादी संघटनांना हिंदू धर्मातील या अंधश्रद्धा मान्य आहेत असा त्यांच्या 'अंनिस'विरोधाचा अर्थ घ्यायचा काय? असे असेल तर पदोपदी व्यास, शंकराचार्य, विवेकानंद, सावरकर यांचे दाखले देण्याचा त्यांना काय अधिकार? या सर्वांनी तर हिंदू धर्मातली जळमटे काढून त्याला वेळोवेळी उजाळा देण्याचा प्रयत्न केला होता.
उलट अंनिसबरोबर चर्चा करून त्यांना खटकणार्या बाबींबाबत चर्चा करून/ शहानिशा करून त्या गोष्टी हिंदू धर्मातून अधिकृतरित्या धर्मबाह्य ठरवल्या गेल्या तर 'अंनिस' इतर धर्मांमधील अंधश्रद्धा दूर करण्यास रिकामी होईल.
अहो
आपले मुद्दे बरेचसे पटले
पण
उलट अंनिसबरोबर चर्चा करून त्यांना खटकणार्या बाबींबाबत चर्चा करून/ शहानिशा करून त्या गोष्टी हिंदू धर्मातून अधिकृतरित्या धर्मबाह्य ठरवल्या गेल्या तर 'अंनिस' इतर धर्मांमधील अंधश्रद्धा दूर करण्यास रिकामी होईल.
हा मुद्दा पटणे शक्य नाही. अंधश्रद्धा या अंधश्रद्धा आहेत त्या कोणत्याही धर्मातील
असल्या तरी दूर करायला रिकाम पण कशाला हवे?
जशी जोतिषावर एक वार्ताहर परिषद घेता येते तशीच
मदर तेरेसांचे संतपदातील चमत्कार सिद्ध करावा असे पोप ला आव्हान द्यायचे आहे!
याची पत्रकार परिषद कधी घेत आहेत याची तारिख जाहिर करा. म्हणजे आमच्या सारख्यंची तोंडे बंद होतील.
इतक्या साध्या गोष्टीसाठी रिकामपण कशाला हवे हे कळले नाही?
तोच प्रकार कोणत्याही पीर आणि दर्ग्या बाबत! हे काम तितक्याच तडफेने अनिस ने का करू नये?
लोकं धर-धरून हाणतील म्हणून?
हिंदु पुळचट आहेत... बोलतील पण धरून हाणतीलच असे नाही म्हणून की काय?
दर्ग्याला तर नुसता एक बोल लावून दाखवा म्हणा...
नाही यांना मुल्ला मौलवींनी "स्वर्ग" दाखवला तर पहा मग...
नाना,
यांना जागृती करायचीच आहे ना, मग ती सगळीकडे सारखीच करा.
नाय तर उगाच एकालाच धरून बोंब मारू नका, गपचूप बसा!
आपला
गुंडोपंत
वेगळ्या दृष्टीकोनातून पहा -
आपल्या धर्मातील वाईट गोष्टी एकदा नाहीशा झाल्या की इतर धर्म कसे 'मागास' आहेत, जुनाट आहेत हे सिद्ध करता नाही का येणार?
कदाचित मग तरी हिदू धर्माला नावे ठेवायला कुणाला जागाच उरणार नाही. मग 'गर्व से कहो हम हिंदू है|'
मग आपल्या 'वसुधैव कुटुंबकम्' धर्माचा जागतिक प्रसार करायला कोण आडवू शकेल? बिन्धास्त करू शकतो. पण तसे होण्या अगोदरच जर इतर धर्म सावध झाले आणि त्यांनी त्यांचे धर्म 'नीट' केले तर आपल्याला हा फायदा मिळणार नाही.
काय गुंडोपंत, बरोबर आहे ना? अंनिस हिंदू धर्माला ही इष्टापत्ती आहे.
इष्टापत्ती
खर आहे पण त्याचा वापर पुरोगामी हिंदुत्ववाद्यांनी चलाखीने केला तर . आम्हीच खरे धर्मश्रद्ध इति दाभोलकर
प्रकाश घाटपांडे
हा लेख -
'आम्हीच खरे धर्मश्रद्ध - इति दाभोलकर' वाचल्यावर तर माझी खात्रीच पटू लागली आहे.
नव्या चर्चेच्या प्रकाशात लेख पाहिला तर दाभोलकरांना आपण 'हिंदू धर्म' साफ करत आहोत असे म्हणायचे असावे असे वाटले. श्री. घाटपांडे त्यांना जवळून ओळखतात. खरेखोटे तेच जाणोत. ;) परंतु त्यांचे इतरत्र प्रसिद्ध झालेले विचार वेगळे आहेत हेही नमूद करावेसे वाटते.
बाकी फाफटपसारा कशाला
तुम्ही लोक सगळे ज्ञानी आहात.
त्यामुळे मला तरी तुमच्या सारखे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता नाही येत बॉ.
मला निट आणि सरळ दिसते ते असे की.
धर्मातल्या गोष्टी सुधारणेच्या मार्गावर चालतच आहेत. आपणच सुधारकांची मोठी यादी दिली आहे.
म्हणजे ही सुधारणा चालूच आहे. अनिस नव्हती तेंव्हाही सुरु होतीच असेही तुमच्याच लेखनावरून दिसून येते नाही का? मग माझे म्हणणे इतकेच आहे की.
ही सुधारणा कधी पासून हिंदु धर्मातच चालू आहे!!!
आता आपण ज्या समाजात राहतो त्यातला एक मोठा भाग अंधश्रद्ध ठेवून बाकिच्यांना पुढे नेणे आणि नेतच राहणे कितपत योग्य आहे?
का इतर धर्माचे लोक आपल्या देशातझातच नाहीत ?
इतर धर्मांचाही विकास तितकाच आवश्यक आहे की नाही?
बाकी राहिला धर्माचा जागतिक प्रसार! तो व्हायचा तसा होईल. पण आत्ता तरी अनिस ने त्याला काही उत्तेजन देण्याचे कारण मला दिसत नाही.
असो,
माझा मुद्दा वेळे विषयी होता. त्याला तुम्ही तुमच्या विद्वत्ताप्रचूर वेगळ्या दृष्टीकोनातून निट बगल देत आहात इतकेच प्रतिसादावरून कळले.
माझे म्हणणे साधे नि सोपे आहे. सहज कळेल अशा सामान्य भाषेत!
तेरेसांच्या संतपदाच्या अंधश्रद्धे बद्दल पोपला आव्हान देता की नाही
इतकेच बोला.
बाकी फाफटपसारा कशाला लावता साहेब?
देत असलात आव्हान तर तारिख जाहिर करा येत्या महिन्याची... काय म्हणता?
आपला
गुंडोपंत
प्राधान्यक्रम
मुळात इतर धर्मातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून हिंदू धर्मातील अंधश्रद्धा दूर करण्याच्या प्रयत्नांना विरोध करणे याला काहीच अर्थ नाही. विचार करून पाहा.
मदर तेरेसा, गाडगेबाबा, बाबा आमटे यांनाही संत मानणे आणि (स्वार्थी आणि आत्मकेंद्रित जगात) त्यांच्या कृतीला चमत्कार कोणी मानले तर समजण्यासारखे आहे. मदर तेरेसा यांनी प्रत्यक्ष चमत्कार केला (कोणातरी बाईच्या पोटातली गाठ नाहीशी केली वगैरे) ही अंधश्रद्धा आहे हे निश्चितच. आता या अंधश्रद्धेमुळे समाजाचे काय नुकसान होते? "मदर तेरेसा या संत होत्या आणि चमत्काराने रोग बरे करण्याची त्यांची शक्ती होती असे अंधश्रद्ध ख्रिश्चनांना वाटू शकते". पण मग असा दावा करणारे (मदर तेरेसांनी असा दावा केला नव्हता) शेकडो हाय-प्रोफाइल बाबा लोक सध्या हिंदूधर्मात सापडतील. असो. (ही चर्चा मदर तेरेसांचे कर्तृत्व/टीका वगैरे विषयावर भटकू नये)
महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा?
ज्या अंधश्रद्धेमुळे सामान्य लोकांची फसवणूक, पिळवणू़क होते त्या अंधश्रद्धांना दूर करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मांत्रिक/तांत्रिक/ज्योतिषी यांच्या अवैज्ञानिक उपायांनी सामान्य लोकांना नुकसान, त्रास, फसवणूक, पिळवणूक इ. चा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा ज्योतिषादी अंधश्रद्धांवर अंनिसवाले लक्ष केंद्रित करत असतील तर ते योग्यच आहे.
अपेक्षा
इथे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनात् सर्वधर्मसमभावाची अपेक्षा आहे...
कारण
"हिंदू धर्मातील अंधश्रद्धा दूर करण्याच्या प्रयत्नांना विरोध" या कृतीचे "इतर धर्मातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून" हे कारण होऊ शकत नाही. हे सोपे लॉजिक आहे.
"मीच का" सिन्ड्रोम
विनातिकिट प्रवास करणार्या प्रवाशास पकडले गेले असता, त्याने तिकिट तपासनिसाशी "इतरही विनातिकिट प्रवासी आहेत मग मलाच का पकडले" असा वाद घालणे जितके मूर्खपणाचे आहे तितकेच "फक्त हिन्दू धर्मच का" हा युक्तीवाददेखिल!
अनिसचे आक्षेप टाळण्याची ती एक पळवाट आहे इतकेच.
दुसरे असे की, राजा राममोहन रॉय यांच्या पासून ते सावरकरांपर्यंत सर्व हिंदू समाज सुधारकांनी हिंदू धर्मातीलच अनिष्ट प्रथांवर हल्ला चढविला. तेव्हा त्यांना कोणी इतरांवर का नाही असा प्रश्न केला नव्हता!
टीपः अनिसने काही दर्ग्यात चालणार्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवला आहे असे वाचले आहे. अधिक माहिती सध्यातरी माझ्याकडे नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
वेगळा प्रस्ताव
हा खर तर वेगळा प्रस्ताव करता येईल. उपक्रमपंतांना वेगळा चर्चेचा प्रस्तावात वर्ग करण्यास विनंती.
प्रकाश घाटपांडे
अभ्यासपूर्ण प्रतिसाद
अभ्यासपूर्ण, सोदाहरण आणि तर्कसंगत प्रतिसाद!
सहमत आहे.
अगदी बरोबर! फलज्योतिषाचा संबंध हिंदू संस्कृतीशी (प्रचलित अर्थाने हिंदू धर्माशी) लावण्यामुळे मोठाच गोंधळ झाला आहे. या एका मोठ्या गैरसमजाच्या बळावर आजवर हे असले प्रकार चालत आले आहेत. या माहितीचा प्रसार करून जनजागृती होणे आवश्यक आहे.
सहमत आहे.
हवं तर
मदर तेरेसांचे संतपदातील चमत्कार सिद्ध करावा असे पोप ला आव्हान द्यायचे आहे!
असं सरळ पोप ला आव्हान देणे झेपत नसेल (तेव्हढा दम यांच्यात नसेल तर) तर भारतातल्या चर्चला/आर्च बिशप्स ना हे आव्हान द्यावे.
त्यांनी संतपदाचा चमत्कार सिद्ध केला तर मदर तेरेसाचे संतपद कायम ठेवावे.
जर सिद्ध करू शकले नाहीत तर भारतातल्या चर्चेसनी पोप ने दिलेले मदर तेरेसांचे संतपद अंधश्रद्धेने मान्य करू नये.
थॉमस डाबरे, फ्रांसीस दिब्रीटो आदींनाही हे आव्हान जाहीरपणे देता येईल.
आपला
गुंडोपंत
मदर तेरेसा यांचे चमत्कार आणि अंनिस
हल्लीच महाराष्ट्र अंनिसच्या संकेतस्थळाला भेट दिली.
त्यांच्या Thought and Action जुलै २००७ च्या अंकात (पीडीएफ दुवा) मदर तेरेसा यांच्या अंधशरद्धेमुळे समाजाला घातक ठरलेल्या विचारांवर एक लेख आहे. शिवाय मदर तेरेसा यांच्या मरणोत्तर ज्या स्त्रीने चमत्काराची साक्ष दिली होती, त्या स्त्रीने साक्ष पलटल्याचा उल्लेख आहे. याचा बोलबाला बंगालातील अंनिस-शैलीच्या "रॅशनलिस्ट असोसिएशन"ने केला आहे.
अंनिसने आपल्या मुखपत्रातून त्या चमत्काराच्या पर्दाफाशाला अनुमोदन दिले, म्हणजे त्याविषयी आपले मत स्पष्ट केले आहे. आता पोपला आव्हान देण्याने नेमके काय साध्य होते ते कळत नाही. गुंडोपंतांचा 'आव्हानच दिले पाहिजे' हा मुद्दा लक्षात येत नाही. आव्हान देणे न देणे म्हणजे केवळ "टॅक्टिक"(कामचलाऊ तात्कालिक धोरणे) असतात. मर्यादित निधीचा आणि मनुष्यबळाचा सर्वात कार्यशील विनिमय कसा करावा, ते ती-ती संस्था ठरवेल. "रॅशनलिस्ट असोसिएशन"ने मदर तेरेसा चमत्काराकडे लक्ष दिले त्याचे कारण हे असू शकेल की मदर तेरेसा यांचे प्रस्थ कोलकात्यात अधिक आहे. ते काम तिथे आपोआप होत असताना, महाराष्ट्र अंनिसने आव्हान प्रसिद्ध करून मर्यादित निधी का घालवावा? पाठिंबा दाखवला तर मतही प्रदर्शित होते, पैशांचा विनिमयही कार्यक्षम होतो.
अंनिसच्या Thought and Action जानेवारी २००८ च्या अंकात (दुवा) महाराष्ट्रातील एका बुवाबाज मुसलमान पीराचा अंनिसने पर्दाफाश केल्याची घटना आहे. शिवाय काही नवबौद्धांमध्ये बाळंतपणात मेलेल्या स्त्रीच्या डोक्यात खिळे ठोकून प्रेताची विटंबना करायची प्रथा आहे, तिच्याविरुद्ध अंनिसने केलेल्या कारवाईचा वृत्तांत आहे.
महाराष्ट्रात हे अन्यधार्मिक लोक ज्या प्रमाणात आहेत, त्या प्रमाणात त्यांच्या विक्षिप्त प्रथांच्या घटना घडतात. बहुसंख्य समाजात घटनांचे प्रमाण लोकसंख्येच्या मानाने अधिक असणारच. मग त्याच्याविरोधी कारवायाही त्याच कमी-अधिक प्रमाणात दिसणार ना?
हे मुखपत्र, शिवाय अंनिसचे मराठी वार्तापत्र गुंडोपंत वाचत असल्यास, हिंदू समाजातल्या प्रथांविरुद्ध किती कारवाया होतात, आणि अन्य समाजातल्या प्रथांविरुद्ध किती कारवाया होतात, ती आकडेवारी देऊ शकतील. पण अन्य समाजातील प्रथांविरुद्ध अंनिस शून्य कारवाया करते, हे सत्य नाही.
सहमत आहे
सहमत आहे. प्रबोधनाच्या चळवळीत आव्हान पेक्षा आवाहन महत्वाचे. ज्या लोकांसाठी हे करायचे आहे त्या लोकांना जोडून घेण्यासाठी आवाहन हे उपयोगाचे ठरते. चळवळीच्या काही बाबींसाठी मात्र आव्हान लोकांना आकर्षित करते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3033323.cms
मटाच्या बातमीत सुद्धा शिर्षकात आव्हान शब्द वापरण्याचा मोह बातमीदाराला झालाच.
प्रकाश घाटपांडे
प्राधान्यक्रम
"विवेकानंदांपासून ते बाबा रामदेवांपर्यंत कोणताही हिंदू धर्म प्रसारक/प्रचारक वेदान्त-ज्ञानमार्ग - भक्तीमार्ग - कर्ममार्ग यांचाच उदोउदो करताना दिसतो. (हिंदू धर्मातील वाईट रुढींबाबत जागतिक प्रेक्षकवर्गासमोर ते कोणतेही समर्थन करताना दिसत नाहीत. प्राणायामाऐवजी / योगाभ्यासाऐवजी मरीआईच्या जत्रेत पाठीला हुक आडकवून लटकण्याचा सल्ला कोणत्याही बाबांनी चीन/अमेरिका/ऑस्ट्रेलिया येथील विदेशी मुमुक्षुंना दिलेला दिसत नाही.)" ह्या युक्तिवादाला काय म्हणावे? बाबा रामदेवांची मुलाखत मी अलिकडेच एका टी. व्ही. चॅनेलवर बघितली होती. त्यात ते जे सांगत होते ते धर्मातीत होते-- ते देशाबद्दल जे जे काही केले पाहिजे त्याबद्दल पोटतिडीकेने बोलत होते. ते 'धर्मगुरू' आहेत असा त्यांनी काही दावा केल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. पण तसे जरी असले तरी मग त्यांनी धर्माच्या सर्व परिअंगाबद्दल सर्वत्र बोललेच पाहिजे, त्यातील रूढी-समजुतींबद्दलही त्यांनी काहीतरी चळवळ उभारली पाहिजे असे का असावे? निदान असे जर कुणी करत असेल तर त्याविरूद्ध ते काही बोलले तर नाहीत ना? किंवा त्यांनी कुठे काही रुढी- समजूती उचलून धरल्या नाहीत ना? (जसे इतर काही धर्मगुरू करतात-- हिंदू तसेच इतरधर्मियही).
"महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा?"
हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ज्या अंधश्रध्दांमुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडते व त्याहीपुढे जाऊन देशाचे सामाजिक व आर्थिक नुकसान होते त्यांना अग्रहक्क देण्यात यावा. ह्यासाठी हवे तर काही सांख्यिक निकष लावता येतील. उदा. (अ) पोलियोची लस आमच्या धर्माच्या मुलांना टोचली की त्यांचा धर्म भ्रष्ट होतो आणि (ब) ज्योतिषाच्या आहारी गेल्याने होणारे वैयक्तिक दु:षपरिणाम ह्या दोघात सामाजिक व देशाच्या दृष्टिने अधिक हानीकारक कोणते?
अंनिसच्या मिशनमध्ये "Opposing all superstitions that lead to exploitation of the ignorant and gullible people" असे आहे. ('ऑल'ला अधोरेखित मी केले आहे). त्यानुसार हिंदू धर्म सोडून त्यांनी आतापर्यंत काय कार्य केले आहे, ह्याची येथे थोडक्यात माहिती कुणी दिली अथवा दुवा दिला, तर ते ह्या चर्चेच्या अनुषंगाने उपयुक्त ठरेल.
"उलट अंनिसबरोबर चर्चा करून त्यांना खटकणार्या बाबींबाबत चर्चा करून/ शहानिशा करून त्या गोष्टी हिंदू धर्मातून अधिकृतरित्या धर्मबाह्य ठरवल्या गेल्या तर 'अंनिस' इतर धर्मांमधील अंधश्रद्धा दूर करण्यास रिकामी होईल. "
अशी चर्चा हिंदू धर्माच्या वतीने कोण करणार? इतर काही धर्मात हे तात्विकदृष्ट्या शक्य आहे, कारण तेथे एकाअर्थी एकाधिकार असतो, हिंदू धर्माचे तसे नाही हे ठाऊक असतांना असा सल्ला देणे हे विलक्षण म्हटले पाहिजे.
हिंदू धर्मातील रूढी दूर करणे, हिंदू समाजाला विज्ञानाभिमूख बनवण्याचा अथक प्रयत्न करत रहाणे ह्याबद्दल काही आक्षेप नाही. पण ह्या प्रयत्नांतील प्राधान्यक्रमाबद्दल काही मतभेद आहेत.
प्राधान्यक्रम
खर आहे.
१) अंधश्रद्धा कशाला म्हणायचे?
२) अंधश्रद्धांचे संकलन
३) अधश्रद्धांची शोषणेच्या तीव्रते नुसार वर्गवारी
४) तीव्रते नुसार प्राधान्यक्रम
५) सोडवणुकीची व्यवहार्यता
६) सोडवणुकीचा प्राधान्यक्रम
या बाबींवर एकमत होत नाही तरी कार्य चालू राह्ते. समाजातील सूज्ञ लोक आपापल्या परीने अंधश्रद्धांच निर्मुलन करतच असतात. भले त्याची नोंद अंनिस कडे नसु द्यात.
प्रकाश घाटपांडे
हेच! आणि असेच काही!
- प्रदीप
असे मला मुळीच म्हणायचे नाही. माझे म्हणणे इतकेच आहे की हिंदू धर्मातील महानुभाव / हिंदू धर्म प्रसारक / हिंदू संस्कृती अभिमानी यांपैकी जे कोणी जागतिक प्रेक्षकसमुहापुढे जातात तेंव्हा ते हिंदू धर्मातील 'एकात्मता / शांती / समत्व / विश्वबंधुत्व' या उदात्त संकल्पना मांडतात.याचाच अर्थ असा की हिंदू धर्मातील संकुचित संकल्पनांबद्दल (अंधश्रद्धा इ.) त्यांच्या मनात किंतू आहे. त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला या संकुचित कल्पना पटत नाहीत. नाहीतर अशा संकल्पना त्यांनी छातीठोकपणे जगासमोर मांडल्या असत्या. या कल्पनांना विरोध करणे हे त्यांच्याकडून अपेक्षित नाही. याला कारण आहे ते म्हणजे अजूनही अशा गोष्टींचा हिंदू समाजावर असलेला पगडा. (नंगा साधू, तांत्रिक साधना इ.) हिंदू शाक्तपंथाचा एक मोठा भाग तंत्र, मंत्र, जारण, मारण, उच्चाटन यासारख्या अघोर क्रियांचे समर्थन करतो. योग साधनेचा हा आदिम भाग आहे. परंतु अशा प्रकारची योगसाधना बाबा रामदेवांनी जगापुढे मांडली नाही यातच सारे काही आले.(इतर धर्मात असे काही आहे का? याची चर्चा या मुद्द्यावर अप्रस्तुत आहे.)
एकीकडे 'ब्रह्मम् सत्यं जगन्मिथ्या|' आणि 'वसुधैव कुटुम्बकम्|' असे सांगणारे उदात्त विचार आणि दुसरीकडे भानामती, मूठ मारणे, मानव बळी देणे इ. अघोरी कृत्ये यांची सांगड घालता घालता हिदू धर्मालाच नाकी नऊ आलेले आहेत. शिवाय चातुर्वर्ण्यातून निर्माण झालेल्या जातीपाती आणि अस्पृश्यता यामुळे मूळ उदात्त विचारांची पायमल्ली झाली आहे हे मान्य केलेच पाहिजे. यातले काय शिल्लक ठेवायचे आणि काय काढून टाकायचे याचा विचार आता हिंदूधर्मीयांनी केला पाहिजे.
-प्रदीप
विश्व हिंदू परिषद ही एक सर्वसमावेशक संघटना आहे (असे वाटते). सर्व धर्ममार्तंडांनी विधायक विचार केला तर कदाचित हे शक्य होईल.