जैव तंत्रात संशोधनाची दिशा

जैवतंत्रज्ञान.
हा विषय तसा बराच परिचित आहे.

हा तसा प्राचीन अभ्यासाचा विषय आहे. जशी मानवाने शेतीची सुरुवात केली तसा या विषयाचा अभ्यास होत गेला. पिकांची वाढ चांगली करण्या करता, उत्पादन वाढवण्या करता जैवतंत्रज्ञान फार उपयोगी आहे. हे आपण पीढ्यां पीढ्या पाहत आलो आहोत.
यातले नावीन्य म्हणजे बायोडिझेल! ब्राझिल मध्ये याचा हल्ली सर्रस उपयोग होतो असे ऐकुन आहे.
यात सुद्धा बरेच संशोधन चालले आहे.
जैवतंत्रज्ञान म्हणजे जिवितांचा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपयोग करुन घेणे असेही म्हणता येईल.
विविध प्रकारच्या लसी, औषधे,प्राण्यांचे व वनस्पती उति संवर्धन शास्त्र (ट्शु कल्चर),जेनेटिक्स् आणि टेस्ट्युब बेबी सुद्धा यात येते.
काळानुरूप या विषयात संशोधने चालली आहेत.

एकेकाळी फक्त अनुभवाच्या रूपात शेतकर्‍यांकडेच असणार्‍या या विषयाला अभ्यासक्रमाच्या रूपाने चांगले बांधणीचे स्वरूप आले आहे.
बी एस्सी इन् बायो टेक्नॉलॉजी असे विषय आज अनेक अभ्यासक्रमात आहेत.

या लेखाचा उद्देश या क्षेत्रात असलेल्या माझ्या सारख्या
विद्यार्थ्यांना संशोधासाठी नक्की काय /दिशाविषय घ्यावा असा आहे.
माझी खात्री आहे की येथे अनेक जाणकार लोक आहेत ते मदत करतील.

तसेच देशा आणि परदेशात उच्चशिक्षणासाठी कुठे काय काय संधी यातून मिळू शकतील,
याविषयीही कुणी मार्गदर्शन केले तर आवडेल.

शुद्ध लेखनाच्या चुका खुपच आहेत पण आपण सांभाळून घ्या ही विनंती

नम्र
पूका

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला

अरे तिच्या... इतका जूना आहे होय हा विषय?
मला वाटायचं की जरा नवीनच भानगड आहे

यातल्या बायोडिझेल या विषयावर अजून वाचायला आवडेल.
मला वाटते की हा महत्वाचा विषय आहे. कारण आजच्या पेट्रोलच्या किमती पाहता बायोडिझेल ला पर्याय दिसत नाही.
पण त्यामुळे पेट्रोल/डिझेल विकणार्‍या देशांना दारिद्र्यच यायचे!
ते बाजारात येवू नये म्हणूनही एखादी लॉबी कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर अजून चर्चा आवडेल.

या शिवाय, जागतिक तापमान वाढ हा ही एक चांगला शंशोध विषय आहे असे वाटते. पण अर्थातच त्यातले नक्की कोणते भाग संशोधनाला घ्यायचे ते मात्र जाणकारच सूचवू शकतील असे वाटते.

आपला
गुंडोपंत

माहिती

ही लिंक पहा

आणि इथेही काही महत्वाची माहिती असेल असे वाटते.
या फाईल्स डाउनलोड कराव्या लागतील.

या शिवाय बायो टेक्नॉलॉजी मधील स्कॉलरशीपची येथे माहिती आहे.

-निनाद

अजून

युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडची ही स्कॉलरशिप खास इंडियन स्टुडंट्ससाठी आहे.

हे पहा

-निनाद

अजून :)

युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडची ही स्कॉलरशिप खास इंडियन स्टुडंट्ससाठी आहे.

"क्वीन्सलँड युनिवर्सिटीची शिष्यवृत्ती खास भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहे" असे तुम्हाला म्हणायचे आहे का?:)

जलपर्णी

नद्यांमध्ये अफाट वाढणार्‍या जलपर्णींचा उपयोग करून ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते का? हा संशोधनाचा विषय घेऊन पहा.





चांगला विचार

नद्यांमध्ये अफाट वाढणार्‍या जलपर्णींचा उपयोग करून ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते का? हा संशोधनाचा विषय घेऊन पहा.

विचार चांगला आहे. बट ऑन द सेकंड थॉट, जर हा प्रयोग यशस्वी झाला तर जलपर्णींची शेती करावी लागेल ती कुठे करणार याचे उत्तर शोधावे लागेल.

ह्म्म्

विचार चांगला आहे. बट ऑन द सेकंड थॉट, जर हा प्रयोग यशस्वी झाला तर जलपर्णींची शेती करावी लागेल ती कुठे करणार याचे उत्तर शोधावे लागेल.
इथेच तर आम्ही मार खातो ना. अशी शेती न करता काय करता येइल? अथवा सांडपाण्याची तळी तयार करून त्यामध्ये अशी शेती करता येईल का असा विचार सुद्धा करता येईल.





चांगली कल्पना

कल्पना चांगली आहे. फक्त व्यावसायिक फायद्यासाठी पुढे नैसर्गिक आणि इतर संसाधनांचा अंधाधुंद वापर सुरू होतो, जसा मका आणि सोयाबीन च्या बाबतीत झाला. तसे होऊ नये म्हणून आधीच विचार करणे चांगले. या विषयावर अधिक काही माहिती आहे का? भारतात करंजाच्या झाडापासून बायोडिझेल बनवण्याचे प्रयत्न झाले होते ना?

जुने संशोधन

जलपर्णीपासून बायोगॅस कसा करावा आणि त्या टाकाऊ वनस्पतीचे फायदे काय आहेत यावर बरेच संशोधन झालेले आहे.
आपल्या नोबेल पारितोषिक विजेता पचौरींनी ('टेरी'ने) एक असला प्लँटही तयार केलाय.
या प्लँटमध्ये जलपर्णीपासून बायोगॅस अणि पशू/ मत्स्यखाद्य तयार करता येईल.
बाकीच्या बातम्या :
१. सायन्स डायरेक्ट
२.हिंदू
या विषयावर चाणक्यांनी एक वेगळा लेख लिहिला तर बरे होईल.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

आर तिच्या

प्राचीन म्हणजे येकदमच प्राचीन दिसतेय हे जैवतंत्र.
आमच्या विसुनानांनी पुराणातली साखर शोधून तर त्याला पार अडीच हजार वर्ष मागे नेवून ठेवलय हो!

आपला
गुंडोपंत

मग रेशीम

मग रेशीम उद्योग,
मध गोळा करणे वगैरे पण त्यातच मोडत असणार का?

आणि झाडाला बंडींग करणे वगैरे तर येणार म्हणा!

आपला
गुंडोपंत

बायोटेक

हो तर,
बायोटेक हे फिल्ड खुप मोठे आहे.
आपल्या ऋषी मुनिंनी बरेच संशोधन केली होती असे विसुनाना यांनी दिलेल्या प्रतिसादांवरून म्हणावेसे वाटते.

चाणक्य, जलपर्णीची कल्पना आवडली,याचा खरच उपयोग होइल.
प्रदुषण पण कमी होइल असे वाटते. पण यावर आधीही संशोधन झालेले आहेच.

नविन, फक्त व्यावसायिक फायद्यासाठी पुढे नैसर्गिक आणि
इतर संसाधनांचा अंधाधुंद वापर सुरू होतो,हे खरे आहे,पण जलपर्णी सर्रास आढळते.
पाण्याचे काही प्रमाणात प्रदुषण करते. असा उपयोग केला तर कदाचित मार्गी तरी लागेल.
पण तो प्रकल्प सहजतेने उभारता यायला हवा असेही वाटते.

गुंडोपंत, तापमान हा विषय महत्वाचा आहे.बायोडिझेल् वर नक्की चर्चा करु.

निनाद, साइटमधुन बरीच माहिती मिळाली. Thank you.

प्रकल्प

या विषयांवर विस्ताराने संशोधन होइल तेंव्हाच तर व्यवहार्य प्रकल्प सत्यात येतील. पुण्यात कचर्‍या पासून खत तयार करून बागा फुलवणारे अनेकजण आहेत. दै. सकाळमध्ये या संबंधीची माहिती नक्कीच कळेल. पुर्वी मनोगतावर बायोडिझेलवर एक सुंदर अभ्यासपूर्ण लेख वाचला होता. मला आत्ता सापडला नाही. तुम्हाला मिळतो का ते पहा.





लेख्..

मनोगतचे माहीत नाही, परंतू मायबोलीवर बायोडिझेलवरचा हा लेख सापडला.. तुम्हाला हाच् अभिप्रेत होता का?बायोडिझेल क्रांतीची कामधेनू

वा!

वा, मस्त दुवा दिलात.
अतिशय माहितीपूर्ण आहे तो लेख.
शिवाय त्यात अनेक दुवेही आहेत.
हे सर्व सहकारी तत्वावर उभे करण्याची कल्पना फारच आवडून गेली आहे.
अशा मनोरम चित्रातून जमीनीवर येवून काही गोष्टींची माहिती मिलवणे जरूरीचे वाटते.

मला वाटते की या पुढचा लेख त्याचे क्रमवार ऍप्लिकेशन म्हणजे,
टप्प्या ट्प्प्याने, काय काय करत गेले,
तर बायोडिझेलचे संयंत्र उभे करता येईल
हे कुठे तरी मिळावे.

या मध्ये

  • कोणकोणत्या परवानग्या आणि नोंदण्या आवश्यक आहेत?
  • तसेच त्या साधारणपणे कुठे होतील हे कळले पाहिजे.
  • असे डिझेल प्लँट्स सध्या कोठे आहेत? (पथदर्शक प्रकल्प)
  • त्यांना भेटी देण्याची सोय काय?
  • डिझेल प्लँट्स उभारणी करणार्‍या संस्था
  • डिझेल प्लँट्स च्या देखभालीची/ट्रेनींगची व्यवस्था
  • या दोन्हीचा अंदाजित खर्च
  • वितरण व्यवस्था
  • विक्रीतून कसा नफा होवू शकतो हे दाखवणारा ताळेबंद.

ही जर त्या लेखाला जोडले तर एक उत्तम बिझनेस प्रपोझल बनु शकेल.
किंवा कुणी वेगळी दिली तरी सुद्धा उपयोगी पडेल असे वाटते.

आपला
गुंडोपंत

होय हाच

होय हाच.





लेख

भाग्यश्री
लेख माहितीपुर्ण आहे.
बारिच माहिती मिळली.अजुन अशा लिंकस वाचायला आवडतील.

गुंडोपंताण्चे म्हणणे विचार करण्यासारखे आहे.
संशोधनाचे अजुन विषय सुचवल्यास आवडतिल.

पूका.

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत आणि उपलब्ध स्त्रोत यांचा मेळ घालून काही जमतं का पहा.





दर

एक आहे,
बायोडिझेल चा भाव जास्त असतो.
आणि लोकांना परवडत नाही.
यावर उपाय?
पूका.

बायोडिझेलचा भाव जास्त

ही एक सापेक्ष संकल्पना आहे. क्रूड ऑईल (खनिज तेल) ५० डॉलर प्रति पिंप असताना बायोडिझेल उत्पादन महाग वाटू शकते. परंतु तेच खनिज तेल जर १२५ डॉलर प्रति पिंप झाले (झाले आहेच!) तर त्यामानाने बायो डिझेल स्वस्त पडेल.

परंतु करंज/ जत्रोफा तेलापासून तयार केलेले डिझेल हे सर्वस्वी खनिज डिझेलला पर्याय बनू शकत नाही. त्याचीही काही मर्यादा आहे. आधुनिक तंत्राच्या गुंतागुंतीच्या वाहन इंजिनांमध्ये ते (चिकटपणामुळे/ काजळीमुळे) खराबी निर्माण करू शकते. त्यामुळे अशा तेलावर सुटसुटीत जुन्या पद्धतीची डिझेल इंजने - विद्युत जनित्रे चालवून त्यातून विद्युत निर्मिती करणे हा उत्तम उपाय आहे.

नवी व जूनी इंजिने

नव्या आणि जुन्या डिझेल इंजिनात
असा नक्की काय फरक असतो?
माझ्या (त्रोटक) माहिती प्रमाणे
सगळीकडे डिझेल हे दाब देवूनच 'फोडले' जाते...

कदाचित डिझेल इंजिने कशी चालतात यावरच वेगळा लेख दिलात तरी चालेल.
(तुम्ही तो दिलात तर मी कोळश्याच्या इंजिनावर (अर्धवटमाहितीवर आधारीत )लिहायला तयार आहे ;)) )
आपला
गुंडोपंत

बायो डिझेल ला विरोध

तेलाचा भाव वाढतच चालला आहे आणि तो चक्क $१३० ला पोहोचला असे रेडियोवर ऐकले.
सोबतच हे ही ऐकले की आफ्रिकेतील देश हे बायोफ्युएल्स ना विरोध करत आहेत.
कारण त्यासाठी मक्याचा वापर केला जातो आहे. अर्थात हे आक्षेप अमेरिका खंडा विषयी असणार असे मला वाटले. कारण मी इतर कुठे आशियात वगैरे असे मोठ्या प्रमाणात असलेले प्रकल्प ऐकले नाहीयेत.

आफ्रिकेचे अनेक नेते असे म्हणतात की आमच्या देशातील जनता
अन्नाअभावी भूकेने मरत आहे आणि काही मस्तवाल देशांनी केवळ 'इथुन तेथे' जाण्यासाठी अन्नधान्याची नासाडी करावी हे योग्य नाही.
ते धान्य आम्हाला द्या आमची माणसे तरी जगतील.
कोणत्याही सूज्ञ माणसाला पटावेत असेच हे आक्षेप आहेत असे मला वाटले.

या सर्व पार्श्वभूमीवर जत्रोपाचे महत्व अजूनच वाटले/जाणवले.

आपला
गुंडोपंत

 
^ वर