यदा यदा हि धर्मस्य...........

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

वरील श्रीकृष्णाच्या तोंडचे गीतेंतील श्लोक (अध्याय ४, श्लोक ७ व ८) आपणांपैकी बहुतेकांना ठाऊक असतील. त्यांत जगांत अधर्माचरण (पाप?) जेव्हा वाढते तेव्हा परमेश्वर स्वत: अवतार घेऊन ते नाहीसे करतो असे सूचित केले आहे.

पण पुण्य ज्यास्त झाले तर ते कमी करण्याचीही परमेश्वरी योजना असते हे कदाचित आपणांस ठाऊक नसेल. त्यासाठी रुद्राध्यायांतील (शिवलीलामृत, अध्याय ११) खालील ओव्या पहा:

शिवमहिमा वाढला फार। ओस पडले भानुपुत्रनगर।
पाश सोडूनि यमकिंकर। रिते हिंडो लागले॥
मग यमे विधीलागी पुसोन। अभक्तिकृत्या निर्मिली दारूण।
तिणे कुतर्कवादी भेदी लक्षून। त्यांच्या हृदयी संचरली॥
त्यांसी मत्सर वाढविला विशेष। वाटे करावा शिवद्वेष।
तेणे ते जावोनी यमपुरीस। महानरकी पडले सदा॥

पहिल्या ओवींत पुण्य (शिवभक्ति) वाढल्यामुळे यमपुरी ओसाड पडली, यमदूत बेकार झाले असे वर्णन आहे. पुढील ओव्यांत, त्यावर उपाय म्हणून यमाने ब्रह्मदेवाला विचारून (अधिकार-पत्र घेऊन?) 'अभक्ति' कृत्या (एक प्रकारची राक्षसी) निर्माण केली, तिने कुतर्कवादी ('अश्रद्ध', नास्तिक, बुद्धिप्रामाण्यवादी?) हेरून त्यांच्या हृदयांत प्रवेश केला, त्यांच्यांतून शिवद्वेषी निर्माण झाले व ओसाड झालेली यमपुरी पुन्हा गजबजली असे म्हंटले आहे.

आता बोला.

लेखनविषय: दुवे:

Comments

रोचक

हा हा हा.. मस्त!! निरिक्षण आवडले :)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

छान्

आवडले,
असे अजुन वाचायला आवडेल.
पूका.

इशारा!!

कुतर्कवादी यांना गर्भीत इशारा!!

धन्यवाद कोर्डेसाहेब वाचुन गंमत वाटली. :-)

हाहा

विरंगुळा+

("कुतर्कवादी" म्हणजे शिवाच्या महिम्याला कुतर्कांनी कमी लेखणारे वैष्णव का?)

असेच म्हणतो-

शिवाय आम्ही कोण? तर्कवादी की कुतर्कवादी? याचाही विचार करत आहोत... ;)

छानच

ही माहीती एकदम आवडली....

यात माझ्यासकट सर्व उपक्रमी कुठे मोडतात त्याचा विचार करतोय! - तर्कवादी की कुतर्कवादी?

मस्त

निरीक्षण लै आवडले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर