उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र टीका १
ध्रुव
May 23, 2008 - 1:39 pm
नमस्कार मंडळी,
छायाचित्र टीका व उपक्रम सुरु करुयात.
खालील छायाचित्र मी गंगोत्री - गोमुख या ट्रेकदरम्यान काढले आहे. हा पक्षी म्हणजे, घराघरातून आपल्याला नेहमी दिसणार्या चिमणीची हुबेहूब लाल आवृत्ती. हे छायाचित्र अजून कसे सुधारता आले असते ते जरा जाणकारांनी सांगावे.
EXIF
Camera: Nikon D40
Exposure: 0.01 sec (1/100)
Aperture: f/11
Focal Length: 200 mm
ISO Speed: 200
Exposure Bias: -4/3 EV
Exposure Program: Shutter priority
Metering Mode: Spot
छायाचित्राची अजून काही माहिती हवी असल्यास जरूर सांगा.
-
ध्रुव
दुवे:
Comments
माझ्या सुचवण्या
हा उपक्रम आवडला.
लालभडक पक्षी हिरव्या गर्द पार्श्वभुमीवर खूपच छान रंगसंगती असणारे चित्र.
काही सुचवण्या:
१) चित्र थोडे अंडर एक्स्पोज्ड् वाटते.
२)पक्षी रुल ऑफ थर्ड्स् च्या सुचनांप्रमाणे नसुन बरोबर मध्यात आहे.
३) चित्र उभे काढले असते तर अजुन चांगला परिणाम साधता आला असता (अजुनही क्रॉप करता येईल)
४)पक्ष्यावर आणखी झूम करुन (हे आऊट डोअर चित्रकारीत दरवेळेस शक्य असतेच असे नाही आणि तसेही लेन्स २०० वर आहे हे माहित असुन..) थोडे बारकावे दिले असते तर अजुन छान दिसले असते.
५) ऍपर्चर पूर्ण उघडे ठेवले ठेवले असते तर पार्श्वभूमी आणखी ब्लर करुन पक्षी अधिक शार्प करता आला असता.
सुचवण्या ह्या वैयक्तिक आवडी निवडी नुसार दिलेल्या आहेत त्या प्रकाशचित्रकाराला पटल्याच पाहिजेत असे नाही.
उत्तर१
धन्यवाद. काही उत्तरे
१) चित्र थोडे अंडर एक्स्पोज्ड् वाटते.
-आवड. मी सहसा चित्रे १ स्टॉप एक्सपोजर खाली काढतो. तसेच स्पॉट मिटरींगमुळेही कधीकधी अंडर एक्स्पोज्ड् वाटते.
२)पक्षी रुल ऑफ थर्ड्स् च्या सुचनांप्रमाणे नसुन बरोबर मध्यात आहे.
- बरोबर. ब्रेक द रुल ऑफ थर्ड नियम :). पक्षी एक क्षणभरच त्या झुडपावर बसला होता त्यामुळे कॅमेरा सेटींग बदलायला वेळही मिळाला नाही व नंतर क्रॉप करणेही (क्रॉप करून नियमात बसवणे)मला फार आवडत नाही.
३) चित्र उभे काढले असते तर अजुन चांगला परिणाम साधता आला असता (अजुनही क्रॉप करता येईल)
- आधीच थोडे केले अहे क्रॉप. अजून केले तर नीट दिसणार नाही. चित्र उभे काढले असते तर मागची बाजू जस्त दिसली असती पण त्यामुळे प्रेक्षकाचे लक्ष विचलीत झालं असतं की चित्र छान दिसल असत हे आत्ता कळत नाहीये.
४)पक्ष्यावर आणखी झूम करुन (हे आऊट डोअर चित्रकारीत दरवेळेस शक्य असतेच असे नाही आणि तसेही लेन्स २०० वर आहे हे माहित असुन..) थोडे बारकावे दिले असते तर अजुन छान दिसले असते.
- हे मात्र त्रिवार चुकले आहे हे मला मान्य आहे. पक्ष्याच्या अजून डिटेल्स् दिसल्या असत्या तर चित्र अधिक खुलले असते.
५) ऍपर्चर पूर्ण उघडे ठेवले ठेवले असते तर पार्श्वभूमी आणखी ब्लर करुन पक्षी अधिक शार्प करता आला असता
- पुढच्या वेळेला याचा नक्की प्रयत्न करेन.
ध्रुव
प्र का टा आ
प्र का टा आ
छान उपक्रम
मस्त उपक्रम.
१.पक्ष्यांचे चित्र काढताना अनेक वेळा चटकन फोटो काढणे आणि नंतर सुधारणे असे करावे लागते. त्यामुळे हे चित्र चांगले आहे.
२. पक्षी चित्राच्या मानाने फारच लहान आहे. चित्र प्रदर्शनीय (प्रदर्शनात मांडण्याजोगे) वाटत नाही. तो जवळून मिळाला असता तर प्रदर्शनीय झाले असते.
३. प्रकाश फारसा अनुकूल नाही पण पक्ष्याच्या डोळ्यात प्रकाशबिंदू दिसतो आहे..हे बरे झाले.
४. पक्ष्याच्या उजवीकडे मागे लक्षवेधक भाग आहे. तो टळला असता तर बरे. कारण पक्ष्याकडे पाहिले की नजर लगेच मागे उजवीकडे जात आहे. (पण हिमालयात अनेकदा वाट ठराविक असल्याने आपली जागा बदलून चित्र घेता येत नाही. झूम करून तो भाग टाळणे इतकेच आपल्या हातात.)
५. पक्षाच्या मागचा भाग फोटोशॉप मध्ये ब्लर केला आहे का?
कोलबेर म्हणतात त्या प्रमाणे रूल ईफ थर्ड चा इथे काही संबंध आहे, असे मला वाटत नाही. माझ्या मते त्याचा चित्रातला आकार पाहता तो मधे आहे ते ठिकच आहे.
वरील मुद्दे या सूचना नाहित..मला जे वाटले ते लिहिले...
--लिखाळ.
धन्यवाद
धन्यवाद लिखाळ,
काही उत्तरे
२. पक्षी चित्राच्या मानाने फारच लहान आहे. चित्र प्रदर्शनीय (प्रदर्शनात मांडण्याजोगे) वाटत नाही. तो जवळून मिळाला असता तर प्रदर्शनीय झाले असते.
मान्य
४. पक्ष्याच्या उजवीकडे मागे लक्षवेधक भाग आहे. तो टळला असता तर बरे. कारण पक्ष्याकडे पाहिले की नजर लगेच मागे उजवीकडे जात आहे. (पण हिमालयात अनेकदा वाट ठराविक असल्याने आपली जागा बदलून चित्र घेता येत नाही. झूम करून तो भाग टाळणे इतकेच आपल्या हातात.)
- बरोबर आहे. उजवीकदचा मागचा भाग लक्ष वेधतो आहे काहीकारन नसताना.मला जागा बदलायला जागा होती पन पक्षी एका जागेवर स्वस्थ बसत नव्हता.
५. पक्षाच्या मागचा भाग फोटोशॉप मध्ये ब्लर केला आहे का?
- नाही, फोटोशॉपमध्ये काहीच केलेले नाहीये या फोटोचे
क्रॉपींग केलं आहे,
धृवरावांचं चित्र आम्ही क्रॉप केलं आहे व त्याचं एक्सपोजरही वाढवलं आहे.
हे धृवरावांचे मूळ चित्र -
आणि हा आमचा पराक्रम! :)
असो,
आपला,
(फोटोशॉपचा विद्यार्थी) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
वा!
वा तात्या!
मला नवा फोटु जास्त आवडला :)
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
वा तात्या!
वा तात्या! ह्या उपक्रमात अगदी असाच सहभाग अपेक्षीत आहे!!
हे घ्या मी माझ्या आवडीनुसार केलेले क्रॉपींग.
पक्षी आता रुल ऑफ थर्ड्स् च्या नियमात (ढोबळ मानाने) बसवल्याने चित्रात काही फरक वाटतो का ते कळवा.
वाटला
फरक वाटला. तात्यांचीही चौकटही आवडली. तुमच्या चित्रासारखी काळी किनार त्यांच्या चौकटीला नाही. पण तुमच्या चित्रात तात्यांच्या चित्रापेक्षा उजवीकडचा भाग कमी झाला आहे. त्यामुळे लक्ष पक्ष्यावर जास्त जाते असे वाटते.
एकंदरीत चांगला उपक्रम. आमच्यासारख्यांना बर्याच गोष्टी कळतील म्हणायचे.
बाकी तुम्हा सर्व छायाचित्रकारांना प्रश्न - फोटो काढताना प्रत्येक फोटोचे नंतर विश्लेषण करण्याइतपत माहिती प्रत्येक वेळी साठवून ठेवता का? आणि ती कशी?
माहिती
फोटोच्या फाइलवर राइट क्लिक करुन त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये गेल्यावर 'समरी' ह्या टॅब मध्ये सहसा EXIF माहिती साठवलेली असते. बहुतेक सर्व डिजीटल कॅमेरे फोटो कढताना ही माहिती त्या फोटो मध्ये भरुन ठेवतात.
फरक
फरक नक्की वाटला. चित्र जास्त छान दिसयला लागले आहे हे नक्कीच.
मला स्वतःला चित्र शक्यतो क्रॉप न करणेच पसंत आहे. जे आपण कॅमेर्यावर पकडतो तेच खरे छायाचित्र असे माझे मत आहे. चित्र फोटोशॉपच्या मदतीने सुधारणे ही एक कला आहे , मला त्या कलेचा आदर आहे. पण तरीही क्रॉप करणे मला फारसे आवडत नाही. कदाचित या बदललेल्या चित्रानंतर मला फोटोशॉप अथवा तत्सम सॉफ्टवेअरस् आवडायलाही लागतील :)
-
ध्रुव
नवे चित्र आवडले
नवे चित्र आवडले तात्या.
-
ध्रुव
एक्स्पोजर
एक्स्पोजर म्हणजे काय रे भाऊ??????????
अनिरुद्ध दातार
एक्स्पोजर
कॅमेर्यातील फिल्म एका छिद्राद्वारे बाहेरील प्रकाशाला 'एक्सपोज' केली जाते. हे छिद्र जितका वेळ उघडे राहणार तितका अधिक प्रकाश फिल्मवर सांडतो. अचुक बारकावे टीपण्यासाठी हा प्रकाश जास्तही सांडून चालत नाही की कमीही. जास्त प्रकाश सांडल्यास (म्हणजेच छिद्र जास्त वेळ उघडे राहिल्यास) चित्र ओव्हर एक्स्पोज्ड होते कमी सांडल्यास तेच अंडर एक्स्पोज्ड होते. म्हणजेच फिल्म प्रकाशाला जास्त एक्स्पोजही होऊन द्यायची नाही आणि कमी एक्स्पोजही. फिल्म विशिष्ठ प्रमाणात एक्स्पोज झाली तरच चित्र अधिक खुलुन दिसते.
सुंदर
ध्रुव, सर्वात पहिले तुझे अभिनंदन. चांगला उपक्रम सुरू केलास. जाणकारांनी आपली छायाचित्रे सुद्धा या उपक्रमांतर्गत येथे दाखवावीत हि विनंती.
फोटो सुंदर आहे. मला कोलबेर यांनी दिलेली सुधारीत आवृत्ती जास्त आवडली.
अवांतरः EXIF माहितीवर कोणी लेख लिहिणार आहे का? माझ्या सारख्या उपक्रमींचे थोडे फोटो शिक्षण होईल. तसेच त्यामधे जो विदा आहे, त्याच्या व्याख्या समजावून सांगेल काय?
या उपक्रमास मनापासून शुभेच्छा. :)