ई.टीव्ही.मराठी वरील 'हास्यदरबार'चा होत असलेला तमाशा

गेल्या अनेक दिवसापासून ई.टीव्ही.मराठी वरील 'हास्यदरबार'चा होत असलेला कार्यक्रम आता तमाशा सारखा वाटायला लागला असून त्यातील विडंबन कविता मारुन मुटकून केल्यासारख्या वाटतात.त्यातील विडंबन कवीतांमुळे विडंबन कवितांचा दर्जा घसरू लागला आहे असे कुणाला वाटता नाही काय?'हास्यदरबार' ची तुलना तमाशा शी करून तमाशाला कमी लेखण्याचा माझा हेतू नाही.

Comments

किमान शब्दमर्यादा

उपक्रमावरील लेखनाची किमान शब्दमर्यादा वाढवावी असे आजकाल फार वाटू लागले आहे. तुम्हाला काय वाटते?

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

ताणून

ओढून ताणून केलेल्या विनोदांचे काय होणार?
हे केवळ बक्षिसा साठी केलेले विनोद आहेत.

पण त्याच सोबत आपण चांगला विनोद म्हणजे काय व तो कसा असावा असे आपल्याला वाटते हे पण लिहिले असते तर अजून आवडले असते.
असो, आपले पहिलेच लेखन आहे, काही हरकत नाही.

अजूनही प्रतिसादात हे देता येईलच.

आपला
गुंडोपंत

 
^ वर