दहशतखोरांना काय मिळते?

जयपूर सरख्या सुंदर शहरातही काल भीषण स्फोट झाले. गेल्या वर्षभरात दर ३-४ महिन्यांनी भारतात कुठे न कुठेतरी असे स्फोट होऊन अनेक लोक मेले आहेत. सी एन् एन् च्या म्हणण्यानुसार गेल्या बारा महिन्यात भारतात दहशती घटनांमध्ये २३०० हून अधिक लोक मेले आहेत (पण ह्या संख्येत त्यांनी नक्षलवादी कृत्ये पण धरली आहेत.)

काय विचार असेल ह्या मागच्या लोकांचा? दर स्फोटानंतरच्या पोलिसाच्या तपासात पाकिस्तानी हात सिद्ध झाल्याचं जाहिर होतं त्यानंतर मात्र केंद्र सरकार कधीकधी ह्या विधानाला दुजोरा देत नाही. जरी समजा आपण असं गृहित धरलं की हे देशी नाहितर पाकिस्तानी इस्लामी बंडखोर आहेत, तरी अशा दर काही महिन्यांनंतरच्या स्फोटांनी त्यांचं केवळ शक्तिप्रदर्शन होत असेल. त्यातुन तरुण पिढीतून त्यांना अधिक भरती करता येत असावी.

इतर उपक्रमींचे काय तर्क आहेत?

लेखनविषय: दुवे:

Comments

दहशतखोरांना काय मिळते?

दहशतखोरांना काय मिळते?
जन्नत !! (?)
-- (खिन्न) लिखाळ.

'उत्तर' खरे तर असणार नाही नां?

खिन्नपणे का होईना, पण लिखाळ आपण उत्तर -जन्नत - स्वर्ग असे कसे दिले?
ते सहजपणे दिले कि विचार करून? मी आपणाला ईथे दोष देत नाही आहे.

मला स्वतःलाच अनेक प्रश्न पडतात. कि जगाची मानवसंख्या अफाट वाढत जातेय. निसर्ग नियमानुसार 'अति तिथं माती' होते. नव्या औषधांमुळे साथीचे रोग नष्ट होऊन मानवी मृत्युचे प्रमाण दिवसें दिवस कमी होत जात आहे. महायुद्ध, लढाया व्हाव्यात असं माझं म्हणंण नाही आहे. पण तसे अनेक वर्षांमध्ये न झाल्याने कसलातरी असमतोल होतोय असं हि वाटत राहतंय. जीवना बरोबर मृत्यु हि सोबत असतो. मग हेच निसर्गाचे विध्वंसाचे काम माथेफिरू मंडळी (वर म्हटल्या प्रमाणे) अशा प्रकारे करून धरणीमातेला मानवी रक्त पाजून तीची तहान भागवत तर नाही आहेत नां?

हि मंडळि आपण 'अल्लाह' चेच काम करतोय ह्या भावनेनं करीत असतात.

मग त्यांना खरंच -जन्नत नसीब तर नाही होणार?

दहशतवाद निपटण्यासाठी काय हवे ?

दहशतवाद निपटण्यासाठी काय हवे ? सशक्‍त कायदे कि राज्यकर्त्यांची इच्छाशक्‍ती ?
वरील प्रश्‍नांची उत्तरे जनतेला शोधायची आहेत. पहिल्या प्रश्‍नाचे उत्तर दुसर्‍या प्रश्‍नात लपलेले आहे व दुसर्‍या प्रश्‍नाची खर्‍या अर्थाने मीमांसा गरजेची आहे. भाजपने दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी `टाडा' व `पोटा' या कायद्यांची निर्मिती केली. मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेसने हे कायदे रद्दबातल केले. या एकूण कालावधीत दहशतवाद थांबला नाहीच, तर तो फोफावण्याचा वेग कायम राहिला. `टाडा' व `पोटा' रद्द केल्याने हा दहशतवाद फोफावला, असा केंद्रातील विरोधकांचा आक्षेप
आहे, तर प्रचलित कायदे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सशक्‍त आहेत, असे देशाच्या नेभळट पंतप्रधानांचे मत आहे. हा निरर्थक वादंग थांबायला तयार नाही. `पोटा' व `टाडा' रद्द झाल्याने दहशतवादी आणखी मोकाट झाले, असे म्हणण्यात थोडे तथ्य आहे; पण भाजपच्या कारकीर्दीतही सदर दोन कायदे अस्तित्वात असतांना संसद व अक्षरधाम मंदिर येथे दहशतवादी हल्ले झाले. प्रचलित कायदे सशक्‍त आहेत, असे आहे, तर `दहशतवाद थांबत का नाही', हा काँग्रेसवाल्यांना आमचा प्रश्‍न.सांगायचे तात्पर्य देशात कायदे अस्तित्वात असले, तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी करणारी राजकीय इच्छाशक्‍ती देशात नाही. जे वाजपेयींच्या कारकीर्दीत घडले, तेच मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीत घडत आहे. दहशतवाद निपटण्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव, हा दोष राज्यकर्त्यांचा आहे. दहशतवादी कोण असतात, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना ज्ञात आहे. त्यांच्या `व्होट बँका' राज्यकर्त्यांना जपायच्या आहेत. मग ते पाकिस्तानातील असो, बांगलादेशातील असो कि देशातील असो.

जनतेलाच तोडगा काढायचा आहे !
भ्रष्ट व अकार्यक्षम व्यवस्था, दिशाहीन व सत्तालोलूप सर्वपक्षीय राज्यकर्ते, कूर्मगतीने चालणारी व कोट्यवधी खटले प्रलंबित ठेवणारी न्याययंत्रणा आणि विकलेली पत्रकारिता या लोकशाहीच्या चार खांबांची दूरवस्था लक्षात घेता `भारतीय लोकशाही निरर्थक ठरली आहे', हे प्रतिपादन समर्थनीय आहे. अशी लोकशाही दहशतवाद संपवण्यास अपात्र आहे ! जिहादी दहशतवादाच्या भस्मासुराने धारण केलेले अक्राळ-विक्राळ स्वरूप लक्षात घेता, येत्या काही वर्षांत आणखी काही कोटी नागरिक दहशतवादाचे बळी ठरतील, हे नि:शंक ! प्रत्येकाच्या घरातील एक माणूस दहशतवादाचा बळी ठरला की, मग जनतेला जाग येईल. जोपर्यंत संतप्‍त जनतेचा उद्रेक होत नाही, तोपर्यंत देशातील प्रचलित लोकशाही व्यवस्था बदलण्याची क्रांती होऊ शकत नाही, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. दहशतवादाच्या समस्येविषयी उदासीन राहून काही कोट्यवधी नागरिक ठार होऊ द्यायचे कि दहशतवाद संपवण्यासाठी नाकर्त्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना हटवायचे, हे जनतेला ठरवायचे आहे !

थिंक अलाइक? | मजेशीर तोडगा

तुमचे आणि यांचे विचार शब्दशः जुळतात. याला ग्रेट मेन थिंक अलाइक म्हणावे का? हे असे इतर संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे चिकटवणे उपक्रमाच्या धोरणात बसत नाही असे वाटते.

प्रचलित कायदे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सशक्‍त आहेत, असे देशाच्या नेभळट पंतप्रधानांचे मत आहे.

नेभळट? हा हा हा! खरेच. याबद्दल त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे. ८ दिवस जेवणात सरसोदा साग खाऊ नये आणि १० दिवस मक्के-दी-रोटी खाऊ नये. दोन दिवस सकाळचा चहा आणि संध्याकाळची कॉफी घेऊ नये. आणि याबद्दलची माहिती इथे सरकारी खर्चाने प्रकाशित करावी.

पण भाजपच्या कारकीर्दीतही सदर दोन कायदे अस्तित्वात असतांना संसद व अक्षरधाम मंदिर येथे दहशतवादी हल्ले झाले.

हो ना! पण त्यात त्या बिचार्‍यांची काही चूक नाही हो. आणि हो कंदाहरला जे झाले तेही. ईश्वरी इच्छेशिवाय पानही हालत नाही तर विमान कसे हलेल? नाही का?

`भारतीय लोकशाही निरर्थक ठरली आहे', हे प्रतिपादन समर्थनीय आहे.

हाहाहाहा, हे सर्वात विनोदी वाक्य! सुदैवाने सुबुद्ध भारतीयांना तसे वाटत नाही.

जोपर्यंत संतप्‍त जनतेचा उद्रेक होत नाही, तोपर्यंत देशातील प्रचलित लोकशाही व्यवस्था बदलण्याची क्रांती होऊ शकत नाही

लोकशाही व्यवस्था बदलणारी क्रांती? अरेरे. देशाच्या शत्रूंनाही भारताची अशी दुरवस्था होईल असे वाटत नाही.

प्रकाटाआ

प्रकाटाआ

स्वर्गाच्या दाराची चावी

दहशतखोरांना काय मिळते?

स्वर्गाच्या दाराची (प्लास्टिकची ;-)) चावी

आत्मघातकी हल्ले नाहित

लिखाळ, प्रियाली,

इस्राईल्, इराक, अमेरिका सारख्या ठिकाणी आपण आत्मघातकी हल्ले बघतो, त्या बाबतीत "जन्नत ची किल्ली" इत्यादी तर्क ठीक आहेत, पण भारतात होणारे बरेच हल्ले आत्मघातकी नसतात. तेंव्हा ह्यातून (लगेचतरी) स्वर्गप्राप्तीचं कारण असेल असं वाटत नाही.

गोळ्या घातल्या पाहिजे

खिरे साहेब,
दहशतवाद यावर विचारवंत विचार करुन थकले आहेत. त्यांची स्वतःची काय मागणी असते,त्यांचे अंतिम ध्येय कोणते, त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांचे जे हल्ले असतील किंवा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी दहशतवाद्यांनी जो मार्ग निवडला आहे तो अत्यंत क्रुर असाच आहे, दहशतवाद ही जागतिक समस्या आहे, जयपूरच नव्हे जिथे जिथे अशा हल्ल्यांमधे सामान्य माणसांचे जीव जातात त्यामुळे आम्हाला दहशतवाद्यांची प्रचंड चीड येते. संशयी अतिरेकी सापडला ना त्याला भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे आणि ज्याने अशा कृत्यात सहभाग घेतला आहे, त्याला भररस्त्यात पेटवतांना,जळतांना जगभरातील दुरचित्रवाहिन्यावरुन लाइव्ह दाखवून त्याचे पुन्हा पुन्हा प्रक्षेपण केले पाहिजे.

सध्या काहीच तर्क सुचत नाही.

-दिलीप बिरुटे
(गुलाबी शहरातील दहशतवादी हल्ल्याने भडकलेला.)

प्रत्येक वेळी तेच

वेगवेगळ्या शहरांमधील दहशतवादी कृत्यांमुळे मारल्या गेलेल्या निरपराध लोकांबद्दल वाईट वाटणे आणि विचार येणे थांबत नाही. जयपूरमधली ताजी घटना अशीच अस्वस्थ करणारी. त्यावरूनच वाटले -तुम्ही विचारताय काय विचार असेल ह्या मागच्या लोकांचा?
याचे उत्तर कदाचित - जनतेला अस्वस्थ आणि दबलेल्या स्थितीत ठेवणे. अविश्वासाचे वातावरण तयार करणे. भिती दाखवणे. अशा भितीग्रस्त लोकांना काबूत करणे सोपे जात असावे. तसेच असंतुष्टांना हाती धरून कामे परस्पर उरकल्यास शक्तिप्रदर्शन आपोआप होतेच.

हे करणारे तरूण दहशतवादी अशी अमानुष कामे करण्यासाठी कसे उद्युक्त केले जातात हे अनेक बातम्यांतून कळत असते. ही मुलाखत एका दहशतवादी कँपमध्ये सहभागी झालेल्या माणसाची. त्यावरून आधीच अस्वस्थ झालेल्या लोकांना या मार्गाकडे कसे वळवले जाते याची थोडी झलक मिळेल.

दुव्यासाठी धन्यवाद

फ्रंटलाईन हा कार्यक्रम मला खूपच आवडतो. हा इंटर्व्यू मी बघितला नव्हता, तेंव्हा ह्या दुव्यासाठी धन्यवाद.

भारतातून तयार झालेल्या अतिरेक्याबद्दल असा काही इंटर्व्यू किंवा व्यक्तिरेखा आहे का?

दहशदवाद असाच संपवावा लागतो !

दहशदवाद असाच संपवावा लागतो !

शेक्स्पीयरचं ऑथेल्लो

आपण वाचलय् किंवा त्याबद्दल ऐकलय का?
कारण साधारणतः त्यातल्या कित्येकांची आणी "शायलॉक"ची उद्दिष्टे दहशत वाद्यांसारखीच असतात.
त्यांना काहिच "मिळवायच" नाहिये.(निदान, ह्या भोउतिक जगातल्या उपलब्ध वस्तुपैकी.)
त्यांना फक्त दुसर्‍याचा घास नष्ट करायचाय.(गम्मत म्हणजे त्यांना स्वतःलाही तो नकोय.)
त्यामुळे ती माणसं म्हणतील :- "दहशतखोरांना काय मिळते?" हे शीर्षकच चुकीचं आहे.

जन सामान्यांचे मन

सूड?

काय विचार असेल ह्या मागच्या लोकांचा?

आपल्यावर, आपल्या समाजावर/देशावर अन्याय झाल्याची भावना तीव्र झाल्याने तथाकथित अन्यायकर्त्यांवर किंवा त्यांच्या प्रतीकांवर हल्ला करून सूड घेणे अशी भावना असावी असे वाटते. त्यामुळेच "एकाचा आतंकवादी म्हणजे दुसर्‍याचा स्वातंत्र्यवीर" हे खरेच मग ते काश्मीरी असोत, ईशान्येकडील असोत, नक्षलवादी असोत, तिबेटमधील बुद्धधर्मीय असोत (चीनी सरकारच्या दृष्टीने ते आतंकवादीच) किंवा श्रीलंकेतील तमिळ असोत.

पण आतंकवादी संपवणे हा आतंकवाद संपवण्याचा योग्य मार्ग नाही!

पण आतंकवादी संपवणे हा आतंकवाद संपवण्याचा योग्य मार्ग नाही!

पण आतंकवादी संपवणे हा आतंकवाद संपवण्याचा योग्य मार्ग नाही!

मग काय करावे ते पण लिहा की

हे सहजच येथे चिटकवले आहे :)

काय करावे

मग काय करावे ते पण लिहा की

आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे "आपल्यावर, आपल्या समाजावर/देशावर अन्याय झाल्याची भावना तीव्र झाल्याने तथाकथित अन्यायकर्त्यांवर किंवा त्यांच्या प्रतीकांवर हल्ला करून सूड घेणे अशी भावना" हे मुख्यतः आतंकवादामागील कारण असते. ही भावना नाहीशी करण्याचा प्रयत्न करणे हाच योग्य उपाय आहे. बळाचा वापर करून आतंकवादी संपवण्याचा प्रयत्न केल्यास काही काळासाठी समस्या सुटली असे वाटेल पण प्रश्न पुन्हा पुन्हा डोके वर काढेल. याची अनेक उदाहरणे जगभर दिसतील. त्यामुळे जगभरात वाटाघाटींच्या माध्यमातून प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते योग्य आहे असे वाटते. भारत सरकारही पाकिस्तानशी चर्चा करते आहे हे योग्यच आहे. पाकिस्तानलाही अंतर्गत दहशतवादाची झळ पोचते आहेच.

पण तुम्ही वर लिहिलेला (म्हणजे दुसर्‍या संकेतस्थळावरून चिकटवलेला) मजेशीर तोडगा "देशातील प्रचलित लोकशाही व्यवस्था बदलण्याची क्रांती " वगैरे पाहता तुम्हाला हे कितपत पटेल सांगता येत नाही.

हे सहजच येथे चिटकवले आहे :)

मागेही तुम्ही काही फिल्मी व्हिडिओ दिला होता ते आठवले.

देशाच्या सीमा सुरक्शित आहेत पण....

देशाच्या सीमेवर सैनिक जिवाची बाजी लावून लढतात आपल्याला सुरक्षित ठेवण्यसाठी.
काश्मीरला जाउन तेथील परिस्थिती पाहिली की अन्गावर काटा येतो. पण देशातलेच काही लोक दहशतवाद्याशी हातमिळवणी करतात आणि निरपराध लोकाना मारतात तेव्हा खरेच कसला सूड घेत असतात? त्यान्ना कडक शि़क्षा झाली पाहिजे असे वाटते.
नुकतेच ब्लाक फ्रायडे हे पुस्तक वाचले आणि डोके सुन्न झाले.

 
^ वर