माडावर कोळीरोग

मालवण किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरात, विशेषकरून आचरे, देवबाग येथे, माडांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

या परिसरातील माडांना ’कोळी’रोगाने ग्रासले आहे. हे कोळी अत्यंत सुक्ष्म असून सहजासहजी दिसत नाहीत. नारळाच्या देठापासून ते नारळ खरवडायला सुरूवात करतात. त्यामुळे नारळावर तपकिरी रंगाचे चट्टे पडतात.

फळाची वाढ खुंटते आणि नारळ बेढब दिसतो. या कोळी रोगामुळे कोकणातले अनेक बागायतदार ह्वालदिल झाले आहेत.

या रोगावर ’ऍझाडिरेक्टीन’ औषधाची फवारणी लवकरात लवकर करून घ्यावी असे आम्ही सुचवित आहोत.

हे औषध ग्रामपंचायतीत आणि जिल्हा परिषदेत पन्नास टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. या अनुदानाचा लाभ कोकणातील बागायतदार बंधूंनी घ्यावा.

आपला,
(नारळवाला) धोंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

वा पंत

वा पंत,

चांगला उपक्रम सुरू केला आहात.

सुदैवाने अजून आमच्याकडे या कोळीरोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. दापोली, हर्णै, केळशी, आंजर्ल्याचे माड अजूनतरी शाबूत आहेत.

तुमच्या कोकण समुदायाचे सदस्य कसे व्हायचे ते कळत नाही. तो समुदाय कुठेच दिसत नाही आहे.

बापू

बापू

बापू,

आम्हालाही तोच प्रश्न पडला आहे. उपक्रमरावांना निरोप पाठवून विचारणा करतो.

तुम्ही दापोलीचे म्हणजे आपल्या कोकण समुदायात असायलाच पाहिजे.

आपला,
(कोकणवासी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

जिव्हाळ्याचा विषय

धोंडोपंत, अगदी जिव्हाळ्याचा विषय निवडलात हो.
"सारी खुदाई एकतरफ आणि आमचं कोंकण एकतरफ"

देवबागचा समुद्र्!
खूप दिवस झाले जाऊन.
एकदा सगळ्या उपक्रमींची सहल नेऊया आपल्या कोंकणात!
--साती

सातीताई

सातीताई,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण उपक्रमींची कोकण सहल नक्कीच काढू. आमच्या खळ्यात एक झकास जेवण आमच्यातर्फे जाहीर करतो.

काय आहे की आमच्या घरात कोंबडीवडे, सागुती, सोलकढी आणि बांगडो-भात हा बेत चालणार नाही म्हणून खळं झकास.

आपला,
(निसर्गप्रेमी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

 
^ वर