उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
समजून उमजून वाचन
शरद
May 6, 2008 - 2:20 pm
आपण बरेच वेळी पाठांतर करतांना शब्दांकडे लक्ष देतोंच असे नाही. तोच प्रकार वाग्प्रचार किंवा म्हणींचा उपयोग करतांना "असे कां म्हटले आहे?" य़ाचा विचार करतोच असे नाही. वाचतांना एखादा शब्द अडला तर मुसंडी मारून पुढे जाणे योग्यच असले तरी संदर्भासहित अर्थ कळणे जास्त फायदेशीर.मी आज दोन उदाहरणॆ देत आहे.प्रतिसाद मिळाले तर आणखी भर घालता येईल.
१] मनोजवम् मारुततुल्य वेगं ... मध्यें मारुतीला "बुध्दिमतां वरिष्ट्म्" कां म्हटले आहे ?
२} " बाबा वाक्यं प्रमाणं " मधले ’बाबा’ कोण?
शरद [समित्पाणी]
दुवे:
Comments
उत्तरे
आता स्तोत्र म्हणले की स्तुती आलीच . त्यात सर्वगुण संपन्न असे म्हणणे आलेच. मारुती हे शक्ति दैवत असल्याने तिथे बुद्धी कमी पडेल की काय असा संभ्रम होउ नये म्हणून अगोदरच दक्षता घेतलेली बरी.
बाबा -बुवा मधले हे बाबा असणार. समुहशरणागततेसाठी काही तरी प्रमाण पाहिजे ना?
प्रकाश घाटपांडे
लिहिणारा लिहीतो >>
वाचणारा वाचतो.
लिहीणारा आणि वाचणारा यांचे अभिप्रेत अर्थ कधी नीट फोकस होतात (बालकवी) आणि
कधी त्याचा मायनस अनादी अनाकल्नीया पासुन प्लस अनंत अनाकलनीया पर्यंत स्पेक्ट्र्म असतो.(बा.सी.)
बहुतांशी स्वस्तात पुण्य पदरी पाडून् घेणारे फौलोअर्स अर्था च्या नव्हे तर आस्थेच्या नशेत
तर्र्रर् असतात.
अखील मानव जात कुठ्ल्याना कुठल्या तरी नशेत जिवन झोकणारी आहे.
१.शब्द रचनांची गेयता, सोपेपणा,आणि दुर्बोधता सुदधा आनंद दायक करायची असेल् , तर समीक्षकी बुद्द्धीला वेसण घालायला हरकत नसावी.
२.बौध्दीक पातळीवर मजा मारायचीच असेल तर् ,केसाच्यासुद्धा खिलच्या पाडुन मजा घेता येते.!!
जो जे ..
असो..
खंत >
"गण गण गणांत बोते" चा अर्थ अजुनही परब्र्म्हाच्या मेंदुत साकार् व्हायचा आहे.. पण.. या प्रकारच्या नशेबाजीचा गलका गल्लोगल्ली ऐकू येतो.
जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.
गण गण गणांत बोते
गण गण गणांत बोते = गं गणपतये चा अपभ्रंश?
आपला
गुंडोपंत
बाबा वाक्यं
शरद
बुद्धिमतां वरिष्टम् ...
अयोध्येत आल्यानंतर श्रीरामांनी एके दिवशी अगस्त्य ऋषींना हनुमानाबद्दल विचारले असतांना त्यांनी हनूमान सूर्याला गिळावयाला जातो तेंव्हाची गोष्ट सांगितली.ब्रह्मदेवाच्या
सांगण्यावरून देवांनी मारुतीला वर दिले.सूर्याने आपल्या तेजाचा शंभरावा भाग दिला व
हा मोठा झाल्यावर शास्त्र शिकवण्याचे कबूल केले. तरूण मारूती सुर्योदयाबरोबर आकशांत उड्डान करून सुर्यास्तापर्यंत सुर्याच्या रथामागे हिंडत असे व सुर्याकडून द्य्नान मिळवत असे.
व्याकरण,सूत्रे,सूत्रवृत्ति,वार्तिक,आणि संग्रह या सर्वांचे अध्ययन करूनइतर शास्त्रांमध्येही
तो प्रवीण झाला.विद्वत्ता,शास्त्र व वेदांतनिर्णय ह्यामध्ये याची बरोबरी करणारा कोणी झाला नाही.सर्व विद्या व तपश्चर्या ह्यांमध्ये हा देवगुरु बृहस्पतीचीच स्पर्धा करणारा आहे.
[उत्तरकांड,सर्ग :३६-३७,४३-४६ ]हनूमानाच्या ह्या अभ्यासाचा पडताळा श्रीरामाला मारूतीच्या पहिल्या भेटीतच आला.मारुतीने सुग्रीवाचा निरोप संगितल्यावर श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले "हे ,या सुग्रीवमंन्त्र्याशी तू मधूर शब्दांनी बोल .ज्याने ऋग्वेदाचा अभ्यास केला नाही,यजुर्वेद धारण केला नाही आणि जो सामवेद जाणत नाही त्याला असे. भाषण करता य़ॆणे शक्यनाही.खरोखर संपूर्ण व्याकरण याने अनेक वेळा ऐकलेले आहे.......श्रीराम आणि अगस्त्य प्रशंसित हा हनुमान खरेच "बुध्दिमतां वरिष्टं " होता
बाबा वाक्यं प्रमाणं .....
दुर्दैवाने मराठी माणसे मराठी विद्वानांना विसरतात किंवा त्यांची ओळख करून घेत नाहीत. ज्यांचे वाक्य धर्मशास्त्रा त हिन्दुस्तानभर "प्रमाण " मानले जात होते ते बाबा कोणी बुवा किंवा महाराज नव्हते.
काशीनाथ अनंत पाध्ये [बाबा] हे पंढरपूरचे सदाचरणी, विद्वान ब्राह्मण.त्यांनी "धर्मसिंधू " नावाचा ग्रंथ रचला धर्मशास्त्रीय विषयांचा विचार या ग्रंथात मांडला असूनकाशीपसून रामेश्वरपर्यंत तो अधिकृत मानला जातो.मूळ संस्कृत ग्रंथाची अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत.जेंव्हा जेंव्हाधर्म शास्त्र संबंधांत विवाद निर्माण होतात तेंव्हा तेंव्हा अंतिम निर्णय म्हणून "बाबा वाक्यं" सर्व हिन्दुस्तानात प्रमाण मानले जाते
समित्पाणी शरद
.