मराठी अभ्यास परिषद संकेतस्थळ

  • मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.
  • लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.
  • ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
  • मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे

या उद्दिष्टांसाठी काम करीत असलेल्या 'मराठी अभ्यास परिषदेच्या' संकेतस्थळाचे काल मंगल महाराष्ट्रदिनी उद्घाटन झाले. सन्माननीय उपक्रम सदस्य श्री. चित्तरंजन यांनी या संकेतस्थळाची रचना केलेली आहे.

संकेतस्थळाचा दुवा: http://www.marathiabhyasparishad.com/

आंतरजालावर मराठी भाषेच्या प्रचाराच्या व प्रसाराच्या दृष्टीने हे आणखी एक नवे पाऊल ठरावे असे वाटते!

परिषदेतर्फे 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका : भाषा आणि जीवन' त्रैमासिक १९८३ पासून नियमितपणे प्रकाशित होते.
ह्या नियतकालिकाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (१९९५) प्राप्त झाला आहे. मराठी ज्ञानक्षेत्रात प्रतिष्ठा लाभलेल्या हे त्रैमासिक भाषेला वाहिलेले एकमेव नियतकालिक आहे.
भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा, भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य यासोबतच अनेक चुरचुरीत सदरे मासिकात वाचायला मिळतात.

संकेतस्थळाच्या माध्यमातून मासिकात पूर्वप्रसिद्धी मिळालेले काही निवडक लेख पुनर्प्रकाशित करण्यात येतील.

या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. आपल्या मित्रमंडळींनाही अवश्य सांगावे.
काही सूचना, प्रतिक्रिया, अभिप्राय असल्यास अवश्य कळवावेत. ही विनंती.

Comments

धन्यवाद

या संकेतस्थळाची माहिती दिल्याबद्दल अनेक आभार. संकेतस्थळ देखणे आणि वाचनीय आहेच, पण आर एस एस फीड आणि 'ह्या लेखाच्या जवळपासचे' ह्यासारख्या सुविधांमुळे संगणकावर वाचायला आणि नवीन अंकांचा/लेखांचा माग ठेवायलाही उपयुक्त आहे.

धावत्या वाचनात डॉ. केळकरांचा लेख आवडला. त्यातले 'जीवनाचा अनुभव घेण्याची ज्याची त्याची लकबच अखेर एक भाषिक लकब असते', हे वाक्य आणि त्याआधीचा परिच्छेद विशेष आवडला. 'भाषा आणि जीवन'चे अंक परदेशात मागवण्याची सोय उपलब्ध आहे का? संपर्क साधा/सहकार्य कराल या दुव्यांखाली त्याबद्दल काही आढळले नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कल्पना नाही

परदेशात अंक मागवण्याच्या सोयीबाबत कल्पना नाही. मात्र चौकशी करून ही माहिती मिळवता येईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कार्यक्रम खुपच छान झाला.

एकंदरीतच कार्यक्रम खुपच छान झाला. विशेषतः अनिल अवचट यांचे भाषण आम्हाला फार आवडले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वार्षिकांक स्पर्धा आणि त्याबाबत परिक्षकांचे चे विवेचन आवडले.

फक्त एकच खंत जाणवली की कार्यक्रमात ८५% उपस्थिती ही ६० वर्षावरील लोकांची होती आणि काही ठोस कार्यक्रमाची आपल्या भाषेला गरज आहे. अजूनही आपणसर्व चाचपडत आहोत हे काही चांगले चिन्ह नाही.

असो. चित्त आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन.

खंत

फक्त एकच खंत जाणवली की कार्यक्रमात ८५% उपस्थिती ही ६० वर्षावरील लोकांची होती ...

मराठी अभ्यास परिषदेच्या कार्यांत तरुण मंडळींचा सहभाग वाढावा, असे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाही वाटते. ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून हा सहभाग थोडाबहुत वाढावा आणि 'भाषा आणि जीवन' ह्या मराठी अभ्यास परिषदेच्या त्रैमासिकाला नवे लेखक मिळावेत, अशी अपेक्षा आहे.

शुभेच्छा!

मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.

म्हणजे नक्की काय करणे? कारण माझ्या मते मराठी भाषा ही विकसितच भाषा आहे. (इथे आपल्याला 'मराठी माणसाचा विकास' असे म्हणावयाचे नसून 'मराठी भाषेचा विकास' असेच म्हणायचे आहे असे गृहीत धरतो. हां, 'मराठी माणसाचा विकास' असे म्हणावयाचे असते तर गोष्ट वेगळी, कारण मराठी माणसाचा विकास करण्यास अजून बराच वाव आहे असं माझं मत आहे!)

लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.

इतर ठिकाणांबद्दल मला फारशी कल्पना नाही, परंतु महाराष्ट्राच्या राजधानीत तरी माझ्या पाहणी आणि अनुभवाप्रमाणे बराचसा लोकव्यवहार हा हिंदीतूनच चालतो. १९८३ सालापासून मराठी अभ्यास परिषदेने मुंबई आणि अन्य ठिकाणी लोकव्यवहारात मराठीचा वापर/प्रचार होण्यासाठी नक्की काय प्रयत्न केले आहेत, हे सदर संस्थळावर मला कुठेच आढळले/सापडले नाही. कृपया दुवा द्यावा...

ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे

हम्म! हे दोन्ही विचार स्पृहणीय आहेत, अनेकोत्तम शुभेच्छा!

असो, सदर संस्थळाबद्दल जुने मनोगती सदस्य श्री चित्त आणि संबंधितांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

आपला,
(मराठी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अभिनंदन! / सुरेख संकेतस्थळ

नव्या तंत्राचा अंगिकार करण्याच्या म. अ. परिषदेच्या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन! अतिशय सुबक आणि सुरेख संकेतस्थळ निर्माण केल्याबद्दल चित्तरंजन यांचे आणि या कामात बहुमूल्य मदत करणार्‍या योगेश यांचे हार्दिक अभिनंदन!

द्वारकानाथ यांनी म्हटल्याप्रमाणे कार्यक्रम चांगला झाला. अवचटांचे भाषण छान होते. (आम्हाला तेवढेच भाषण ऐकता आले.) विशेषतः मराठी माध्यमातून (मातृभाषेतून) शिकण्यामुळे (जाणते-अजाणतेपणी) व्यक्तिमत्त्वाचा होणारा विकास, एक संस्कृती पूर्ण आत्मसात केली की इतर संस्कॄती समजणे आणि अंगिकारणे सहज होते, मुलांवरील 'अभ्यासा'च्या वाढत्या ताणामुळे इतर बाबींकडे होणारे दुर्लक्ष हे मुद्दे त्यांनी सोदाहरण आणि चांगले मांडले.

सकाळमधील बातमी

शशांक ह्यांचेदेखील धन्यवाद!

चित्तरंजन यांचे आणि या कामात बहुमूल्य मदत करणार्‍या योगेश यांचे हार्दिक अभिनंदन!

धन्यवाद. कार्यक्रमासाठी संकेतस्थळ तयार करीत असताना काही अनपेक्षित अडचणी आल्या. त्यावेळी शशांक ह्यांनी योगेश ह्यांच्या साथीने थंड डोक्याने त्या दूर केल्या, त्यासाठी त्यांचे धन्यवाद!

अभिनंदन

चित्त आणि योगेश दोघांचेही अभिनंदन. चित्तांनी काही महिन्यांपूर्वी या कल्पनेबद्दल सांगितल्याचे आठवते पण ती इतक्या लवकर मूर्त स्वरूपात येईल असे वाटले नव्हते.

सदर संकेतस्थळावर ऑनलाईन चर्चा इ. विभाग टाकले जाणार आहेत का की संस्थळाचे स्वरूप वाचनमात्र असेल?

हळूहळू होईल

सदर संकेतस्थळावर ऑनलाईन चर्चा इ. विभाग टाकले जाणार आहेत का की संस्थळाचे स्वरूप वाचनमात्र असेल?

मराठी अभ्यास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ऑनलाइन चर्चा इ. विभाग टाकण्यात येणार आहेत. हळूहळू संकेतस्थळाची वाचनमात्रता कमी होईल, अशी अपेक्षा आहे. १ मे औचित्य साधायचे असल्याने अनेक सोयीसुविधा संकेतस्थळावर देता आल्या नाहीत.

एक सुचवणी

मराठी अभ्यास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ऑनलाइन चर्चा इ. विभाग टाकण्यात येणार आहेत.

काही मंचांवर प्रश्नोत्तरांची चर्चा होते. जसे वाचक प्रश्न विचारून तज्ज्ञ त्यांची उत्तरे किंवा स्पष्टीकरण देतात. अशाप्रकारच्या चर्चा ठेवण्यात आल्यातर उत्तम होईल असे वाटते.

हे मनात होतेच

काही मंचांवर प्रश्नोत्तरांची चर्चा होते. जसे वाचक प्रश्न विचारून तज्ज्ञ त्यांची उत्तरे किंवा स्पष्टीकरण देतात. अशाप्रकारच्या चर्चा ठेवण्यात आल्यातर उत्तम होईल असे वाटते.

हे मनात होतेच. १-२ दिवसांत ह्याबाबत परिषदेच्या लोकांशी बोलून अशी चर्चा ठेवता येईल. फक्त इतर संकेतस्थळांसारखी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरणे लगेच मिळण्यात काही अडचणी आहेत. ह्या विषयातले तज्ज्ञ २४ गुणिले ७ उपलब्ध असू शकत नाहीत. त्यांच्याजवळ तेवढा वेळ असेलच असे नाही आणि ते नेटपटू, संगणकचतुर असतीलच असे नाही. ह्या अडचणी आहेत.

उत्सुक आहे...

काही मंचांवर प्रश्नोत्तरांची चर्चा होते. जसे वाचक प्रश्न विचारून तज्ज्ञ त्यांची उत्तरे किंवा स्पष्टीकरण देतात. अशाप्रकारच्या चर्चा ठेवण्यात आल्यातर उत्तम होईल असे वाटते.

अरे वा! ही तर फारच छान कल्पना आहे आणि माझीही यास पूर्ण सहमती आहे!

ही प्रश्नोत्तरांची चर्चा वाचून आमच्यासारख्या काही सामान्य मराठी लोकांच्या ज्ञानातही काही अंशी भर पडेल असा विश्वास वाटतो. शिवाय मध्येच आमच्याही काही शंकाकुशंका तज्ञांना विचारायची संधी आम्हाला मिळू शकेल, याचादेखील आनंद वाटतो!

खास करून मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या शहरात,

लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.

या बाबतीत अभ्यास परिषदेमधल्या तज्ञ मंडळींचं काय म्हणणं आहे आणि त्याबाबत त्यांनी कोणत्या उपाय योजना गेल्या काही वर्षात केल्या आहेत/करणार आहेत, हे जाणून घ्यायला मी व्यक्तिश: उत्सुक आहे! केल्या असतील तर त्या उपाय योजनांना कितपत यश मिळालं, कितपत नाही, हेही जाणून घ्यायला मी उत्सुक आहे!

असो..

लवकरच 'लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.' या बाबतीत तज्ञ मंडळींच्या विचारांची देवघेव सदर संस्थळावर वाचायला मिळेल अशी आशा करतो!

आपला,
(मुंबईकर मराठी!) तात्या.

शिवाय, आज आम मराठी लोकांच्या (उदा- कोळी, आगरी, भंडारी इत्यादी) वापरातलं जे मराठी आहे या बाबतीत मराठी अभ्यास परिषदेचे काय विचार आहेत हेदेखील समजून घ्यायला आवडेल!

आपला,
(बहुजनसमाजातला एक सामान्य मराठी भाषिक!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

ज्याचा कंटाळा... त्याचाच वानवळा

जाऊ द्या तात्या. मराठी भाषा, व्याकरण, व भाषातज्ज्ञ यांच्याबाबतची तुमची मते सर्वांनाच माहिती आहेत.

प्रत्येक वेळी उगीच 'केसभर गजरा... आणि गावभर नजरा...' असे करू नका बॉ.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मूळ मुद्दा..

जाऊ द्या तात्या. मराठी भाषा, व्याकरण, व भाषातज्ज्ञ यांच्याबाबतची तुमची मते सर्वांनाच माहिती आहेत.
प्रत्येक वेळी उगीच 'केसभर गजरा... आणि गावभर नजरा...' असे करू नका बॉ.

हो, परंतु त्याचा इथे काय संबंध? माझ्या मते, हे माझ्या प्रतिसादाचे उत्तर नाही!

माझ्या पहिल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे,

१९८३ सालापासून मराठी अभ्यास परिषदेने मुंबई आणि अन्य ठिकाणी लोकव्यवहारात मराठीचा वापर/प्रचार होण्यासाठी नक्की काय प्रयत्न केले आहेत, हे सदर संस्थळावर मला कुठेच आढळले/सापडले नाही. कृपया दुवा द्यावा...

यासंदर्भात आपण किंवा संबंधितांनी काही खुलासा केल्यास बरे होईल!

अ) एकतर आपल्याला किंवा संबंधितांना या संदर्भात खुलासा करण्याजोगी काही माहितीच नसेल,

किंवा ब) आपल्याला खुलासा करण्याची इच्छा नसेल

किंवा क) मअपने त्यांच्या 'लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे' या उद्दिष्टाखातर ग्राऊंड लेव्हलला उतरून काहीच ठोस कार्यच केले नसेल!

की अन्य काही चवथे कारण आहे, हेदेखील जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. जमल्यास नेमका याच संदर्भात काय तो खुलासा करावा हे विनंती!

परंतु,

जाऊ द्या तात्या. मराठी भाषा, व्याकरण, व भाषातज्ज्ञ यांच्याबाबतची तुमची मते सर्वांनाच माहिती आहेत.
प्रत्येक वेळी उगीच 'केसभर गजरा... आणि गावभर नजरा...' असे करू नका बॉ.

हे किंचित वैयक्तिक स्तरावरचे विधान आपण करत असून मूळ मुद्द्याला बगल देत आहात असे वाटते! मूळ मुद्द्याबद्दल काही ठोस माहिती नसली की काही वेळेला अशी वैयक्तिकतेकडे झुकणारी पळवाट काढली जाते असे वाटते!

असो, मी पुन्हा एकदा माझ्या मूळ मुद्द्याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. आपण किंवा अन्य संबंधितांनी जमल्यास/इच्छा असल्यास केवळ त्याच मुद्द्यावर भाष्य करणारा काही खुलासा करावा, ही नम्र व कळकळीची विनंती!

तर माझा मूळ मुद्दा असा होता -

इतर ठिकाणांबद्दल मला फारशी कल्पना नाही, परंतु महाराष्ट्राच्या राजधानीत तरी माझ्या पाहणी आणि अनुभवाप्रमाणे बराचसा लोकव्यवहार हा हिंदीतूनच चालतो. १९८३ सालापासून मराठी अभ्यास परिषदेने मुंबई आणि अन्य ठिकाणी लोकव्यवहारात मराठीचा वापर/प्रचार होण्यासाठी नक्की काय प्रयत्न केले आहेत, हे सदर संस्थळावर मला कुठेच आढळले/सापडले नाही. कृपया दुवा द्यावा...

धन्यवाद...

आपला,
(मराठी अभ्यास परिषदेने ग्राऊंड लेव्हलला उतरून केलेल्या कार्याविषयी/अभ्यासाविषयी/सामान्यजनात, लोकव्यवहारात मराठी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या काही कार्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असणारा!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अभिनंदन..

चित्त,योगेश,शशांक आणि त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन!संस्थळाला धावती भेट दिली,देखणे आणि वाचनीय संस्थळ!
स्वाती

असेच म्हणतो

चित्त,योगेश,शशांक आणि त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन!संस्थळाला धावती भेट दिली,देखणे आणि वाचनीय संस्थळ!

अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन / कौतुक

चित्त,योगेश (आ.कर्ण) ,शशांक तुमचे मनापासुन अभिनंदन.
आपापले व्याप सांभाळुन असे कार्य करणे खुप कौतुकास्पद आहे,
त्रिवार अभिनंदन !

अभिनंदन

+१
सर्वांस अभिनंदन.

अभिनंदन आणि सुचवण्या

चित्त, योगेश आणि शशांक यांच्या सोबत या संकेतस्थळासाठी श्रम घेणार्‍या सर्वांचे मनापासून अभिनंदन. नुसत्याच चर्चा आणि त्या चर्चांमधुन तेच तेच मुद्दे काढून, अथवा फक्त वल्गना करण्यापेक्षा अशा कृती करण्याचे श्रेय तुम्हास जाते. या बद्दल जास्त न लिहिता काही सुचवण्या देतो आहे. शक्य असल्यास त्यावर विचार करावा.

संकेतस्थळाच्या हेडरमध्ये जो लोगो आहे तो छोटाकरून ड्रुपलचा जो लोगो आहे तिथे सुद्धा वापरता येईल का?
संकेतस्थळावर गमभनचा दुवा देता येइल का? मराठीच्या प्रसारासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल.
संकेतस्थळ सुधारणासांठी अथवा तांत्रिक तक्रारींसाठी काही सोय करता येईल काय?

पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन.





सूंदर् संकेतस्थळ

संकेतस्थळ फारच छान झाले आहे. सर्वांचे अभिनंदन!
या स्थळावर मराठी शिक्षकांसाठी विभाग सूरू करावा. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्याकरण सोप्या पद्धतीने कसे शिकविता येईल किंवा त्यांच्यामध्ये भाषेची गोडी कशी निर्माण करता येईल यासंबंधी मार्गदर्शन असावे.
जयेश

हेच,

ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्याकरण सोप्या पद्धतीने कसे शिकविता येईल किंवा त्यांच्यामध्ये भाषेची गोडी कशी निर्माण करता येईल यासंबंधी मार्गदर्शन असावे.

हो हो! मीही हेच म्हणतो! बाय द वे, मअप च्या उद्दिष्टांत 'खास विद्यार्थ्यांकरता' असे कुठले विशेष उद्दिष्ट त्यांच्या संस्थळावर दिसत नाही! (असो, चूभूदेघे!)

आपला,
(विद्यार्थी) तात्या.

बाय द वे, व्याकरण आणि तेही सोप्या पद्धतीने?! हम्म!

असो, या निमित्ताने 'सुंदर' हा शब्द लिहिताना सु दीर्घ असून र चा पाय मोडतात ही नवीनच गोष्ट कळली! :)

आपला,
(व्याकरणाचा विद्यार्थी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

टंकलेखनातील चूक

फायरफॉक्समध्ये विषयाच्या चौकटीत टंकित शब्दांचा खालील भाग नीट दिसत नव्हता. प्रतिसाद संपादित करण्याचा पर्याय दिसत नाही. संपादकांनी कृपया जमल्यास सुधार करावा.

बाय द वे, व्याकरण सोप्या पद्धतीने शिकविल्यास किमान नवीन पिढीमध्ये तरी प्रमाण भाषेबद्दल अढी राहणार नाही :)
जयेश

:)

बाय द वे, व्याकरण सोप्या पद्धतीने शिकविल्यास किमान नवीन पिढीमध्ये तरी प्रमाण भाषेबद्दल अढी राहणार नाही :)

हीहाहाहाहाहा :))

सहमत आहे.. :)

आपला,
(प्रमाणित) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सुंदर

बरेच दिवस चित्त, योगेश, शशांक वगैरेंची धडपड पहात होतो. संकेतस्थळ एकदम झकास बनले आहे.

मराठी साहीत्य परिषदेच्या कार्याला या संकेतस्थळामुळे नक्कीच हातभार लागेल.

अभिजित...

सहभाग

एक दुरुस्ती - या संकेतस्थळाच्या निर्मितीमध्ये चित्तरंजन आणि योगेश यांचाच सहभाग होता. इच्छा असूनही मला व्यक्तिशः फारसे योगदान करता आले नाही. शेवटच्या दिवशी काही छोट्या तांत्रिक अडचणींवर जुजबी इलाज इतकाच माझा प्रत्यक्ष सहभाग म्हणता येईल.

'भाषा आणि जीवन'ला लेखन हवे आहे

मराठी साहित्य परिषद ह्या संस्थेच्या भाषा आणि जीवन ह्या त्रैमासिक पत्रिकेला पुढील विषयासंबंधीचे  लेखनला हवे आहे :

मराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील), भाषिक व भाषाशिक्षणविषयक संशोधन, परिभाषा, भाषिक वर्तन, भाषाविषयक शैक्षणिक व शासकीय धोरणे, पुस्तक-परीक्षणे, पानपूरके, पत्रिकेतील प्रकाशित मजकुराबद्दल प्रतिक्रिया, आपली भाषिक प्रचीती, मराठीच्या प्रादेशिक, व्यवसायविशिष्ट, वयोगटविशिष्ट, लिंगविशिष्ट बोलींची वैशिष्ट्ये, मराठी भाषेवरील इतर भाषांचा परिणाम, कवितांचे शैलीवैज्ञानिक विश्लेषण, कवितेची भाषा, साहित्याची भाषा, परिभाषाकोशांचा परिचय/ परीक्षणे.

मूळ दुवा :लेखन हवे आहे

चांगली कल्पना.

पूर्वप्रसिद्धी आणि सकंलित असलेले लेख चालतील का? माझ्या कडे डॉ. अ वा वर्टी यांचा एक लेख होता. लेखाची प्रसिद्धी १९८० च्या पूर्वीची असावी.

 
^ वर