फेटयाचा हेतू काय?

नमस्कार मंडळी,
जळगावला माझ्या मित्राच्या लग्नामाध्ये त्याच्या वडिलांनी फेटा घालून वरातीत नाचण्याचा फारच आग्रह केला. माझ्या मित्रांपैकी ज्यांना ज्यांना व्यवस्थित डो़की होती त्या सर्वानीच फेटे घातले. ( म्हणजे डोकी सर्वानाच होती हो. पण तयार फेटे असल्यामुळे फेटयांचा आकार आणि डोक्यांचा आकार यांचं गणित जुळावं लागलं.)
मग मनात एक प्रश्न आला.
काय हेतु असावा बरं फेटा घालाण्यामागे ?
फक्त उनापासून सौरक्षण की अ़जून काही ?

लेखनविषय: दुवे:

Comments

गरज हीच शोधाची जननी आहे

नमस्कार,
फक्त फेटाच काय तर आपली वस्त्रे आणि रोजच्या वापरातील अनेक पारंपरिक वस्तुंची निर्मीती आणि वापर गरजेपोटीच केला गेला. पुढे ह्या गोष्टी सरावाच्या - सवयीच्या झाल्यानंतर आणि त्यांच्या वापरामुळे जी गैरसोय टाळल्या जायची ती आपसुकच टाळल्या गेल्यामुळे त्या वस्तुचा वापर कुठल्या कारणामुळे सुरु झाला हे मागे पडते , ती वस्तु आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनते आणि सहजच त्यात सुंदरता आणि सुबकता येते.

फेट्याच्या बाबतीत वरील घटना पाहूया. रानावनात भटकतांना, शेती करतांना, उन्हात पायी प्रवास करतांना आपल्या डोक्याला झालेला आघात हा जीवघेणा असतो याची प्रचिती आल्यावर डोक्याभोवती काहीतरी मऊ मात्र धक्का सहन करील असं आवरण घातल्या जाऊ लागलं. हा फेट्याचा जागतीक मुळ उद्देश.

पुढील काळात स्थैर्य प्राप्त झाल्यावर त्याफेट्यासोबत मान, मरातब, दर्जा आदी जोडल्या गेला. विवीध प्रांतातील वेगवेगळे फेटे त्यांच्या वेगवेगळ्या रचना पाहणे हा एक मनोरंजक अनुभव आहे.
फेट्यावरून मानसाचा दर्जाही कळायचा. कुणाचा फेटा असे तर कुणाचे मुंडासे. राजस्थान, सौराष्ट्र येथे फेट्याचा उपयोग ऊन आणि रेतीपासून सौरक्षण असा होता म्हणून तो फेटा मोठा आणि कापड लांब असायचे.
आता आपल्याला फेटा म्हटलं तर पंजाबी पगडी नजरेसमोर येते. खरं तर पंजाबी लोकांना म्हणजे शिखांना त्यांचे नवने गुरु गोविंदसिंहांनी पाच 'क' धारण करायला सांगीतले होते त्यातील एक म्हणजे केश . हे लांब केश निट सांभाळण्यासाठी ते पंजाबी फेटा घालतात ज्याला ते पगडी म्हणतात.

नीलकांत

फेटा फाशी घेंण्यासाठी.?तर नाही ना.

आपले पुर्वज फार हुशार् होते,त्यांना माहीत् होते,की भविष्यकाळात् शेती करणे एक् आव्हान असणार आहे,जो कूणी शेती करेल्.त्याला पीकांसाठी विविध् प्रकारचा खर्च् करावा लागेल. Bank चे कर्ज् घ्यावे लागेल्. आणि ते कर्ज् न् फेडता आले की,मग व्यसन् लागेल्.आणि सर्वात् फेट्याचा महत्वाचा फायदा म्हणजे आंब्याच्या झाडाला लोंबकळतांना गळ्याभोवती फास घेतांना मानेला त्रास हो उ नये,त्यासाठीचा तलम पणा,नरमपणा, सहजपणे फाशी घेता यावी, त्यासाठी पुर्वी कार्यक्रमात फेटा देत असतील असेल असे वाटते.?

शेतक-यांच्या आत्महत्याच्या बातम्या वाचुन अस्वस्थ असलेला
एक फेटेधारी.

??

छान बिरुटे साहेब,
हे एकदम रंग दे बसंती सारखं आहे. एकदम ट्विस्ट् दिलात तुम्ही विषयाला !!.

 
^ वर