उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मराठीचा झेंडा जग्भरात गाडू या चला
पुष्कर जोशी
April 19, 2008 - 9:16 pm
Ubuntu या लोकप्रिय लिनक्स operating system ला मराठी बनवू या चला
आपण सर्वांनी ठरवले तर हे त्वरीत शक्य आहे
दुवे:
Ubuntu या लोकप्रिय लिनक्स operating system ला मराठी बनवू या चला
आपण सर्वांनी ठरवले तर हे त्वरीत शक्य आहे
Comments
स्वतः पासून सुरुवात करावी
"Ubuntu या लोकप्रिय लिनक्स operating system ला मराठी बनवू या चला"...............
स्वतः पासून सुरुवात करावी आपण.
"...त्वरीत शक्य आहे " म्हणताय,मग आपण स्वतः किती केलेत आता पर्यंत?
जन सामान्यांचे मन
मराठी
तुम्हाला झेंडा "रोवू" या असे म्हणायचे आहे का? "गाडू या" म्हणण्याने भलताच अर्थ निघतो आहे :-)
शिवाय मराठीकरण का करावे कळले नाही. या Ubuntu मध्ये काय चांगले आहे तेही लिहील्यास बरे होईल.
हेच
या Ubuntu मध्ये काय चांगले आहे तेही लिहील्यास बरे होईल.
हेच म्हणतोय हो मी पण.
या सूक्ष्मात गेलेल्या लोकांनी वात आणलाय नुसता.
अरे बाबांनो, जरा घासा की तुमची बोटं की बोर्डाला.
काही झिजत नाही तो.
मी तर म्हणेन की वरचा लेख काढूनच टाकला पाहिजे, कारण तो "माहितीपूर्ण" नाही.
मी म्हणतो गाडू या हा लेख!
आपला
गुंडोपंत
हेच
हेच
सहमत!
ज्या मराठीच्या पुरस्कर्त्याला रोवणे, उभारणे, गाडणे यांतला भेद समजत नाही त्याला उबंटू ही (आफ्रिकन?) भाषा छान समजते हा दैवदुर्विलास आहे! --वाचक्नवी
भावनाओं को समझो | मराठीकरण
गाडू म्हणण्याने भलताच अर्थ निघू शकतो (असे असूनही लेखकाला नेमके काय अभिप्रेत आहे हे आपणा सर्वांना कळलेच आहे) पण भावनाओं को समझो :)
>> शिवाय मराठीकरण का करावे कळले नाही.
मराठीकरण का करावे याचे सोपे उत्तर आहे ज्यांना इंग्रजी समजत नाही अश्या संगणक वापरकर्त्यांसाठी (!) ही भावना चांगली असली तरी ती व्यावहारिक नाही असे माझे व्यक्तिगत मत आहे. मराठी प्रणाली वापरणार्या व्यक्तीच्या प्रगतीचा पुढचा टप्पा काय? समजा ही प्रणाली (अजून फारसे चांगले इंग्रजी न येणार्या) शालेय विद्यार्थ्यांना शिकवली (आजकाल शहरी/निमशहरी भागातील लहान मुलांना 'संगणकीय' इंग्रजी चांगले समजते) पण पुढे जेव्हा इंग्रजी संगणक वापरावा लागेल (उच्चशिक्षणासाठी/नोकरीसाठी) तेव्हा अगदी मूलभूत गोष्टी जसे file, edit, view, options वगैरेना मराठीत काय म्हणतात आणि इंग्रजीत काय म्हणतात असा विचार करत बसावा लागेल. त्याने कार्यक्षमता/आत्मविश्वास कमी होईल.
म्हणून मला असे वाटते की भारतीयांनी (थोडे अधिक कष्ट घेऊन का होईना) इंग्रजीतून नवे तंत्रज्ञान शिकावे आणि त्यात प्राविण्य मिळवावे.
उबंटू
उबंटू ही लिनक्स या मुक्तस्त्रोत चालणाप्रणालीवर आधारीत नवीन आवृत्ती आहे.
लिनक्सची ही आवृत्ती वापरायला अतिशय सोपी आहे. याची चाचणी घ्यायची असेल तर ती संगणकावर स्थापीत करण्याची गरज नाही. उबंटूची सिडी टाकून संगणक सिडीवर सुरू करा. थोडं थांबा आणि तुमच्या संगणकावर तुम्ही उबंटू चालू झालेलं बघाल.
या अश्या सिडीच्या प्रकाराला लाईव्ह सिडी असं म्हणतात. तुमच्या रॅमचा वापर करून ती चालणाप्रणाली सुरू करता येते. मात्र लिनक्स आधारीत अश्या अनेक लाईव्ह सिडीज आहेत, जसं नोपिक्स आदी. मग उबंटूचं वैशिष्ट्य काय?
तर उबंटू आपल्या संगणकारव स्थापीत करायला अगदी सोपी आहे.
एकूण सात टप्प्यांत ती आपल्या संगणकावर स्थापीत करता येते.
उबंटूचा चेहरा-मोहरा सुबक, सुटसुटीत आणि काहिसा विन्डोज सारखा असल्यामुळे नवीन लोकांना उबंटू वापरायला सोपं जातं.
इन्टरनेट जोडणी असेल तर उबंटूचे अपडेट्स ताबडतोब जोडता येतात.
उबंटू ही कायम मोफत आणि मुक्तस्त्रोत राहील , याची ग्वाही त्याचे प्रवर्तक देतात.
उबंटूची नवी आवृत्ती तुम्हाला मोफत आणि घरपोच कुरीअर ने मिळेल. जगात कुठेही.
उबंटू ही मोफत आणि मुक्तस्त्रोत आधारित असल्यामुळे काही व्यवसाईक कोडॅक्स ते मुळ आवृत्तीत देत नाहीत.
उबंटू वापरायला काही अडचण आल्यास एक मोठा समुदाय तुमच्या पाठीशी असतो. त्यामुळे तुमचे प्रश्न सहज सोडवल्या जातात. भारतात आता उबंटूच्या व्यवसाईक सेवा सुध्दा पुरवल्या जातात.
लिनक्स वापरणारे लोक, लिनक्स ही चळवळ आहे असं मानतात आणि त्यामुळे त्यांचे संघटीत गट असतात. प्रत्येक मोठ्या शहरात हे असे गट कार्यांन्वयीत आहेत, जसे पुण्यात पुणे लिनक्स युजर ग्रुप ( प्लग ) आहे.
उबंटू वापरतांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे. जवळपास इतर लिनक्स ला सुध्दा ही बाब लागू होते, ती म्हणजे यात एमपी३ आणि काही व्हिडीओ फॉरमॅट मुळ आवृत्तीत चालत नाहीत. इन्टरनेट जोडणी असेल तर लागलीच हे ऑडीओ आणि व्हिडीओ कोडॅक तुम्ही उतरवून स्थापित करू शकता. मात्र जर का इन्टरनेट जोडणी नसेल तर मग मात्र कठीण आहे. :(
यावर उपाय म्हणजे मिंट लिनक्स.
मिंट लिनक्स ही उबंटूवर आधारित आवृत्ती आहे, मात्र यात सगळे कोडॅक्स जोडलेले आहेत. ज्या संगणकांना इन्टरनेट जोडणी नाही किंवा खुप मंद जोडणी आहे अश्यांसाठी ही मिंट आवृत्ती खुप छान आहे.
ह्या अश्या सध्या लोकप्रिय झालेल्या लिनक्स आवृत्तीला जर का आपण मराठीत आणलं तर ग्रामिण भागात याचा प्रसार चांगला होईल. पायरसीला आळा घालता येईल. आणि मायक्रोसॉफ्ट चे विन्डोज म्हणजेच केवळ संगणक ही समजुत सुध्दा दूर करता येईल. आदी फायदे उबंटूला मराठी केल्यास मिळतील.
उबंटू .कॉम - उबंटूचे आधिकारीक संकेतस्थळ.
उबंटू फोरम्स.ऑर्ग उबंटू समुदाय.
मिन्ट लिनक्स
पुणे लिनक्स युजर ग्रुप
नीलकांत
वा!
वा नीलकांत,
हा प्रतिसादच मूळ लेख आहे, असे वाटावे इतका छान लेख आहे.
लिनक्सची ही आवृत्ती वापरायला अतिशय सोपी आहे.
मान्य वापरून पाहिले अतिशय सोपे आहे.
तर उबंटू आपल्या संगणकारव स्थापीत करायला अगदी सोपी आहे.
खरं आहे! सिडि टाकली आणि संगणक मुकाट काम करायला लागला हो, त्वरित!
उबंटूचा चेहरा-मोहरा सुबक, सुटसुटीत आणि काहिसा विन्डोज सारखा
अगदी मनातले बोललात नीलकांतराव!. म्हणूनच मला हे आवडले बरं का.
उबंटूची नवी आवृत्ती तुम्हाला मोफत आणि घरपोच कुरीअर ने मिळेल. जगात कुठेही.
हे माहिती नव्हते. चांगलीच सेवा आहे ही.
ह्या अश्या सध्या लोकप्रिय झालेल्या लिनक्स आवृत्तीला जर का आपण मराठीत आणलं तर ग्रामिण भागात याचा प्रसार चांगला होईल. पायरसीला आळा घालता येईल. आणि मायक्रोसॉफ्ट चे विन्डोज म्हणजेच केवळ संगणक ही समजुत सुध्दा दूर करता येईल. आदी फायदे उबंटूला मराठी केल्यास मिळतील.
हे मान्य आहे. कोणतीही एकच प्रणाली नकोच. अनेक प्रणाल्या हव्यात. किमान २ तरी हव्यातच.
मराठीत आणता आले तर वापरायला अतिशय आवडेल.
मला संगणकातले काही कळत नाही त्यामुळे मी माझ्या कडून 'वापरणे व प्रचार करणे' ही मदत नक्की करेन.
या शिवाय काही करण्यासारखे असेल तर कळवा.
आपला
गुंडोपंत
धन्यवाद
हा प्रतिसादच मूळ लेख आहे, असे वाटावे इतका छान लेख आहे.
+१
नीलकांतराव, फारच माहितीपूर्ण लेख!
गुंडोपंत म्हणतात त्या प्रमाणे "उबंटूची नवी आवृत्ती तुम्हाला मोफत आणि घरपोच कुरीअर ने मिळेल. जगात कुठेही." हे माहित नव्हते. इतक्या सुंदर माहिती बद्दल अनेक धन्यवाद
-ऋषिकेश
+१
बरीच माहिती कळली.
धन्यवाद.
माहिती
नीलकांत, छान माहिती...
कोणी तज्ञ उबंटूचे मराठी करण कसे केले जाते या बद्दल माहिती देइल काय?
भाषांतर कसे करायचे?
मी उबंटूच्या स्थळावर जाऊन पाहिले पण
भाषांतर कसे करायचे हे काही कळले नाही.
भाषांतर कसे करायचे?
फाईल उतरवून घ्याची आहे का?
आणि मग परत चढवायची असे काही आहे का?
आपला
गुंडोपंत
झेंडा 'फडकवण्यासाठी' असतो, 'गाडण्यासाठी' नसतो.
तुमच्या विषयाचं नांव वाचून छातीत कळ गेली.
मराठी भाषेत 'झेंडा फडकविणं' असा वाक्प्रचार आहे. उदा.- 'मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकविले'.
आपल्या जिभेवर मावशीचे म्हणजे 'हिंदी' चे जास्त शब्द खेळत असावेत. कारण हिंदी मध्येच 'झंडा गाडना' हा वाक्प्रचार आहे.
'शूद्धलेखानाकडे' एक वेळ दुर्लक्ष करता लेते. पण मुळ गाभाचा बदलून कसे चालेले. तेच तर 'अस्तित्व' असतं नां?
या पुढे, क्रुपया आपण लिहीताना काळजी घ्यावी ही विनंती!
धन्यवाद
मला शुद्ध भाषा बोलायची आहे नक्किच
मदत केल्या बद्दल धन्यवाद
आपला,
( भाषा सुधरविण्यास उत्सुक) पुष्कर
काही शंका
माझ्या संगणकावर बरीच वर्षे मी रेड हॅट ही लिनक्सच्या मॅन्ड्रेक्सची आवृत्ती ठेवली होती. पुस्तके वाचून मी बर्याच नोट्स लिहून काढल्या होत्या. पण त्यातल्या आज्ञावली संख्येने इतक्या अधिक होत्या की त्या सर्वच्या सर्व लक्षात ठेवणे महाकठीण होते. शेवटी मी संगणकावरून रेड हॅट उतरवली. त्यामुळे उबंटूबद्दलसुद्धा मी जरा साशंक आहे.
सोर्स ओपन असणे म्हणजे काय? याचा सामान्य संगणक वापरणार्याला काय फायदा होतो? उबंटू सोपी आहे म्हणजे काय? विन्डोजमध्ये काय अवघड आहे? उबंटूचे मराठीकरण करणे म्हणजे काय़? कशाचे भाषांतर करायचे? भाषांतराने उबंटू सोपीच राहील की अवजड मराठी शब्द वापरल्याने अधिकच दुष्कर होईल. संगणकाला लागेल इतपत इंग्रजी भाषा शिकणे सोपे का मराठीकरण केलेली उबंटू शिकणे? वगैरे वगैरे अनेक शंका आहेत. कुणी निरसन करू शकेल काय?--वाचक्नवी
काही उत्तरे
(अतिसामान्यीकरण, सोपेकरण(?) यांचा दोष पत्करून...) संगणक आज्ञावल्या लिहिताना त्या मुख्यत्वे माणसांना समजू शकणार्या भाषांमध्ये (उदा. सी) लिहिल्या जातात. त्यांचे संगणकाला (प्रोसेसरला) समजणार्या भाषेत (बायनरी किंवा एक्झिक्यूटेबल स्वरूपात) रूपांतर करण्यासाठी आज्ञावल्या कंपाइल करायला लागतात. मुक्त नसलेल्या प्रणाल्या (उदा. मासॉ विंडोज़/ऑफिस/इंटरनेट एक्स्प्लोरर, फोटोशॉप इ.) या बायनरी स्वरूपात मिळतात त्यांचा 'कोड' (माणसांना समजणार्या भाषेतला) आपल्याला उपलब्ध नसतो. ओपन-सोर्स प्रणाल्यांचा माणसांना-समजणार्या-भाषेतला कोड आपल्याला उपलब्ध असतो.
(अतिसामान्यीकरण, सोपेकरण(?) यांचा दोष पत्करून...) सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यात कोणत्याही कंपनीचे (उघडउघड तरी) व्यावसायिक हितसंबंध नसल्याने नफेखोरीला वाव नाही. मुक्तस्रोत प्रणाल्या सर्वसाधारणपणे नि:शुल्क असतात (नि:शुल्कच असतात असे नाही)
मा-स-भा कोड उपलब्ध असल्याने अश्या प्रणाल्यांमध्ये काही त्रुटी आढळल्या तर (वापरकर्त्याकडे आवश्यक कौशल्ये असल्यास) वापरकर्त्याला त्या दुरुस्त करता येतात.
अश्या प्रणाल्या अनेक संगणक तज्ञांच्या योगदानातून बनलेल्या असतात. कोड सर्वांना उपलब्ध असल्याने साहजिकच त्याचे चांगले परीक्षण (रिव्ह्यू) होते. नजरेस आलेल्या त्रुटी (कोड उपलब्ध असल्याने) आवश्यक कौशल्ये असलेले संगणक तज्ञ लगेच दुरुस्त करू शकतात. (याउलट 'प्रोप्रायटरी' प्रणाल्यांमध्ये दोष आढळून आले तर वापरकर्त्यांना सर्वस्वी ती प्रणाली विकणार्या कंपनीवर अवलंबून राहावे लागते.)
याशिवायही इतर अनेक फायदे आहेत वेळ मिळाल्यास इथे देण्याचा प्रयत्न करेन.
लिनक्स आणि इतर मुक्तस्रोत प्रणाल्या या प्रामुख्याने संगणककुशल लोकांसाठी आहेत असा समज होता/आहे. या प्रणाल्या स्थापित करणे आणि वापरणे यासाठी (इतर 'प्रोप्रायटरी' प्रणाल्यांपेक्षा) अधिक कौशल्य लागते असा (बर्याच अंशी योग्य) समज होता. उंबुंटू आणि सध्याचे इतर लिनक्स डिस्ट्रोज़ यांनी यावर अधिक कष्ट घेऊन तुलनेने कमी संगणक ज्ञान असलेल्या लोकांनाही वापरणे सहज व्हावे असे बदल केले आहेत.
उबुंटूचे (किंवा कोणत्याही लिनक्स डिस्ट्रिब्यूशनचे, ऍप्लिकेशनचे) मराठीकरण म्हणजे त्याच्या दर्शनी भागाचे (युज़र इंटरफेसचे) मराठीकरण. उपक्रम, मनोगत सारखी संकेतस्थळे तयार करताना साधारण असेच मराठीकरण केले जाते. जसे की Create content साठी 'लेखन करा', Search साठी 'शोधा' असे.
दर्शनी भागात असलेल्या इंग्रजी शब्दांचे, वाक्यांचे मराठीकरण करायचे. उदा. Save साठी 'सुरक्षित (संग्रहित?) करा', Edit साठी 'संपादन' इ.
हा कळीचा प्रश्न आहे. भाषांतराने वापर सोपा होईल असे पाहणे हे भाषांतरकारांसाठी आव्हान आहे.
यावर दोन्ही बाजूंनी मते असणारे प्रवाह आहेत. भाषांतराची गरज आहेही आणि नाहीही. जसे इंग्रजी शिकून इंग्रजी पुस्तके वाचणे शक्य असूनही लोकप्रिय पुस्तकांची मराठीत भाषांतरे होत असतात. काही देशात इंग्रजी अधिक प्रमाणात बोलली जात नाही उदा. जर्मनी, फ्रान्स, जपान तिथे स्थानिकीकरण (Localization) केलेल्या प्रणाल्या वापरणे आवश्यक असते.
सामान्य संगणक वापरकर्ता
सामान्य संगणक वापरकर्त्याला ओपनसोर्स चा तसा काही विशेष फायदा आहे असं मला वाटत नाही. जाणकार प्रकाश टाकतील.
मात्र ओपनसोर्स असल्यामुळे उबंटू मराठी करण्यासाठी आणि जे मराठी डेव्हलपर असतील त्यांना ते सोईचं जाईल.
फक्त भाषांतरापेक्षा जेव्हा मराठी विकास समोर जाईल तेव्हा हा ओपनसोर्सचा फायदा आहे.
उबंटू हे सामान्य वापरकर्त्याला आवश्यक असलेल्या सर्व सोई पुरवतं. मागे रेड हॅट वापरल्याचा उल्लेख तुम्ही केला. मात्र मला खात्री आहे की उबंटू तुम्हाला त्या पेक्षा सोपी वाटेल. इन्टरनेट जोडणी असेल तर उबंटू जरूर वापरून पहावी. यात अधीकाधीत जीयुआय आहे. म्हणजे तुम्हाला शेल ला जाण्याची तेवढी गरज पडत नाही.
जोडणी नसेल तर मग मात्र ऑडीओ-व्हीडीओ चा मनसोक्त लाभ घेता येत नाही.
भाषांतर करणे म्हणजे युजर इन्टरफेसचे भाषांतर. आपण जसे शब्द वापरू तशी त्याची काठीण्य पातळी असेल.
शेवटी संगणक चालवायला म्हणजे, गाणे वाजवणे, ऑफीस सुट मधे काम करणे आणि इतर कामे करायला इंग्रजीच आले पाहीजे असं नाही. सवयीनं आपण नंतर ते वाचतही नाही. संगणक मराठीत सोपा का इंग्रजीत हे मात्र ज्याचं त्यानं ठरवावं.
शंका
नीलकांत,
आपण उबंटु बद्दल दिलेली माहिती मह्त्त्वाची वाटते आहे.
या बद्दल काही शंका आहेत.
१.समजा माझ्या संगणकाच्या हार्डडिस्क मध्ये काही समस्या आल्याने माझा संगणक सुरुच होत नसेल (विंन्डोज खराब झाल्याने कदाचित) तर अश्या समयी मला उबंटु च्या सहाय्याने तो सुरु करता येतो का?
२. जर तो अश्या रितीने सुरु झाला तर मला इतर ड्राईवज् वापरता येतील का? .. म्हणजे काही काळ उबंटू च्या सहाय्याने मी माझे काम करत राहू शकेन का?
(माझ्या कडे जाल जोडणी आहे.)
माझ्या शंकांचे कृपया समाधान करावे ही विनंती.
-- लिखाळ.
नादुरुस्त विंडोज आणि उबुंटू
हो. उबुंटू किंवा कोणतीही लिनक्स लाइव सीडी सीडी-ड्राइव मध्ये टाकून सीडीवरून संगणक सुरू (बूट) करता येतो. त्यासाठी बायॉस बूट क्रमात सीडी-ड्राइव हार्ड डिस्कच्या आधी असावा.
हो. विंडोजचे ड्राइव्ज (हार्डडिस्क निकामी झाली नसेल तर) वाचनमात्र सहज वापरता येतात. शिवाय उबुंटू मध्ये दैनंदिन गरजेच्या बहुतेक सर्व प्रणाल्या असल्याने कामात विशेष अडचण यायला नको.
संगणका विषयी माहिती हवी आहे ही चर्चा यासंदर्भात उपयोगी ठरू शकेल.
आभार
शशांक,
त्वरित प्रतिसादाबद्दल आणि शंकानिरसनाबद्दल अनेक आभार. दुव्यात दाखवलेली चर्चा सुद्धा उपयोगीच आहे.
आभारी,
-- लिखाळ.
धन्यवाद!
श्री. शशांक आणि श्री. नीलकांत यांनी दिलेल्या माहितीवरून एक नक्की समजले. ज्याला घड्याळ्याच्या तबकडीवरचे, टेलिफोनच्या कळफलकावरचे किंवा गणकयंत्रावरचे आकडे आणि एबीसीडी वाचता येत नाहीत, परंतु कखगघ आदी वाचता येते अशा, म्हणजे अगदी लहान वयाच्या मुलांसाठी उबन्टू मराठीत आणायला हरकत नाही . मी अशा मुलांमध्ये मोडत नसल्याने उबन्टूचा माझ्यासारख्या सामान्य माणसाला काही फायदा नाही. मला एवढे शहाणे करून सोडल्याबद्दल मनापासून आभार! --वाचक्नवी
:)
हे काहीसे मराठी वर्तमानपत्रासारखे आहे. बातम्या सारख्या असल्या, इंग्रजी चांगले समजत असले तरी सर्व वयोगटातील बरेच लोक मराठी वर्तमानपत्रे वाचतात. व्यक्तिगत आवडनिवड, कंफर्ट अशी कारणे असावीत. इंग्रजी न येणार्या किंवा इंग्रजीबद्दल तितकासा आत्मविश्वास नसणार्या वयस्करांनाही मराठी उबुंटू उपयोगी ठरेल असे वाटते.
मराठी नको असेल तर इंग्रजी उबुंटू वापरा :)
अवांतर - Ubuntu चा उच्चार "oo-BOON-too" (उबुंटू/उबूंटू) असा आहे. (दुवा)
उबुंटू आणि मराठी उबुंटू
(मराठी वा इंग्लिश) उबुंटूचा खरा उपयोग प्रामाणिक सामान्य माणसालाच आहे. ज्याला पायरेटेड सॉफ्टवेअर घेणे आवडत नाही मात्र इच्छा असूनही महागडे सॉफ्टवेअर विकत घेऊ शकत नाही असा माणूस मुक्त व मोफत उपलब्ध असलेले उबुंटू वापरेल.
मराठीमध्ये उबुंटू असावे की नको हा ज्याचा त्याचा प्रश्न. इथल्या सगळ्यांना इंग्लिश येतेच पण तरीही आपण मराठीमध्ये चर्चा करण्यासाठी आवर्जून इथे येतो. :)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
उबंटु आले!!!!
मागवल्यानंतर अक्षरशः विनामुल्य रुपात कालच उबंटू ची तबकडी पोस्टाने घरी आली :)
फक्त माझ्या (ज्याने मला वात आणला आहे अश्या) विस्टावाल्या संगणकामधे जर सीडी टाकली तर पुढच्या वेळी सीडी काढून संगणक चालु केल्यास परत विस्टाच सुरु होईल ना? का विदयाचा बॅकअप घेऊ?
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे
उबुंटू लाइव्ह
उबुंटू सीडीवरून (किंवा कोणत्याही लाइव्ह लिनक्स डिस्ट्रीब्यूशनवरून) बूट केल्याने संगणकाच्या संरचनेत काही बदल होत नाही. उबुंटू सुरू झाल्यावर 'इंस्टॉल उबुंटू' किंवा तसे काहीसे आयकॉन डेस्कटॉपवर दिसेल ते वापरून (इंस्टॉल करायचे झाल्यास) इंस्टॉलेशन सुरु करता येते. जोपर्यंत तुम्ही ते सुरु करणार नाही तोपर्यंत तुमच्या संगणकाच्या आहे-त्या संरचनेत काही बदल होणार नाही. (इंस्टॉलेशन सुरू झाले तरी संगणक संरचनेत प्रत्यक्षात बदल होण्याआधीच्या पायरीपासून पुन्हा मागे फिरता येते. पण 'अनलेस यू नो व्हॉट यू आर डूइंग', न केलेले चांगले :))