उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मराठी विराम् चिन्हे मराठी आहेत् का?
मन
April 19, 2008 - 5:33 pm
शीर्षक वाचून थोडे विचित्र वाटत असेल पण मला सदैव पडणारा हा प्रश्न आहे.
१.मराठी आणि इंग्लिश विराम चिन्हे "शेम टु शेम" कशी?(जसे कि पुर्ण् विराम(.),स्वल्प विराम(,) उद्गार चिन्हे (!) वगैरे.)
२.माझ्या (ऐकीव्) माहिती प्रमाणे हि चिन्हे तीनेक शतकांपूर्वि अस्तित्वात नव्हती.
२.१मग त्यंचा वापर नक्की सुरु झाला तरी कधी?कोणि तो (सर्व प्रथम) सुरु केला?
२.२ त्या पूर्वी मराठीत् विराम चिन्हे कोणती होती?
२.३ ती रद्द् करण्याचे कारण काय?
माझ्या ह्या ज्ञानात कोणि भर घालु शकेल काय?
दुवे:
Comments
इंग्रजीतून घेतली.
मराठीतील विरामचिन्हे ही इंग्रजीतून घेतलेली आहेत.
एका इंग्रज अधिकार्याने ती मराठीला जोडली. मी त्या अधिकार्याचे नाव विसरतो आहे. आठवले की सांगतो. भारतात ख्रिस्त धर्म प्रसारासाठी मराठी मुद्रण सुरू केल्या नंतर इंग्रजांनी हे केले असावे.
शक्य झाल्यास या बद्दल सविस्तर माहिती देईन.
नीलकांत
वाहवा...विस्ताराने जाणून घेण्यास नक्किच आवडेल
म्हणजे " ! , ; . ' " ही विराम चिन्हे मूळ मराठीत नव्हती तर!
मग होती तरी कुठली बुवा?(दंड | सोडुन,तो संस्क्रुत मधून जसाच्या तसा आला असावा असे वाटते. )
की त्यवेळेस ह्याची गरज वाटली नाही लिहिताना?
विस्ताराने जाणून घेण्यास नक्किच आवडेल....
आपल्या विस्तार पूर्वक प्रतिसादाच्या प्रतिक्षेतील
जन सामान्यांचे मन
विरामचिह्ने जवळजवळ सर्व पाश्चात्त्य
वर नीलकांत म्हणतात तसे.
अपवाद : दोन विरामचिह्ने पूर्वीची आहेत
। ॥
एक सोयीचे विरामचिह्न आहे शब्दांमधील मोकळी जागा. हे विरामचिह्नही पाश्चात्त्य आहे. मूळ देवनागरीत शब्द जोडून लिहीत. (हीच वाक्ये खाली जुन्या पद्धतीने देत आहे.)
एकसोयीचेविरामचिह्नआहेशब्दांमधीलमोकळीजागा।हेविरामचिह्न-
हीपाश्चात्त्यआहे।जुन्यादेवनागरीतशब्दजोडूनलिहीत॥
येथे एक जुना शीलालेख बघावा :
प्रत्येक अक्षर मोकळे लिहिले आहे, पण दोन शब्दांमध्ये जास्त मोकळी जागा नाही :
श्री चा वुं ड रा जें क र वि य लें
श्री गं ग रा जें सु त्ता लें क र वि य लें
(मोकळी जागा कुठल्याच लिपीत सोडत नसत. चित्रात शेजारच्या लिपी दिसत आहेत.)
म ग प्र श्न चि न्ह (?) आ णि उ द्गा र चि न्ह (!) ..........
म्ह ण जे पे श वा ई प र्य न्त चे ले ख न पा हि ले त र ते स र्व अ से च ,"जो डू न लि हि ल्या प्र मा णे " अ स णा र का?
म्हणजे समजून घ्यायला केवढा त्रास!
म्हणूनच त्या काळी "ध" चा "मा" झाला असावा..:- ) :- )
नि दा न प्र श्न चि न्ह (?) आ णि उ द्गा र चि न्ह (!) त री त्या जु न्या ष्टा यी ल च्या भा षे त अ सा य ला ह वे.
ना ही त र बो ल ण्या ती ल भा व क ळ णा र क से?
अवांतरः-
कालच सकाळ मध्ये एक बातमी वाचण्यात आली,ज्यानुसारः-
श्रवण बेळगोळ येथील(उपरोल्लेखित) लेख हा "आद्य" मराठी शिला लेख नसून खरा "आद्य" लेख(म्हणजे त्यापूर्विचा)
हा सोलापुर जिल्ह्यात कुठे तरि आहे.
तर हा मत प्रवाह सध्या अधिक्रुत रित्या मान्य करण्यात आलाय का?
ज न सा मा न्यां चे म न
विरामचिन्हे
मराठीत विरामचिन्हे मेजर थोमस कॅन्डी याने सुरू केली. हा पुणेस्थित सैन्यात अधिकारी होता. त्यानेच मराठी लिपीत लिहिलेला पहिला शब्दकोश संपादन केला. यापूर्वीचा कोश मोडी लिपीत होता. हा मराठी-इंग्रजी शब्दकोश आजही मिळतो, आणि याच्याइतका चांगला कोश दुसरा नाही. त्यानेच संपादिलेला इंग्रजी-मराठी कोश मात्र दुर्मीळ आहे. मराठी भाषेचे आज जे नीटनीटके स्वरूप आहे, त्याला कॅन्डीची हुकुमशाही कारणीभूत आहे. कॅन्डीपूर्व मराठी अत्यंत भोंगळ होती.--वाचक्नवी