उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मराठी शाळा यासाठी वाचवायच्या...
द्वारकानाथ
April 17, 2008 - 7:13 am
आजच्या म टा मधील लेख वाचुन बरे वाटले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2957541.cms
या कामासाठी कोणी व्यक्तिगत पातळीवर, संस्थात्माक कार्य करणार असेल तर त्याला माझ्याकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल याची खात्री बाळगावी.
लेख चांगलाच आहे आणि मराठीने इंग्रजीच्या विश्व-आक्रमणाला प्रतिबंध घातलाच पाहिजे.
असो, संवेदनशील उपक्रमी यावर विचार करतीलच अशी अपेक्षा आहे.
दुवे:
Comments
ढोबळ
आपला दुवा वाचला.
विचार पटले तरी लेख फार ढोबळ वाटला.
काही पक्के विचार आढळलेच नाही, आणि काय करायचे हे न सांगताच लेख संपला.
काही काँक्रीट गोष्टी यात याव्यात असे मला वाटले होते.
(म्हणजे 'दुकानांच्या पाट्या मराठी' सारख्या बाजारू नव्हेत!)
मराठीला मोक्याच्या ठिकाणी आणले व त्यातून फायदा दिसु लागला, की लगेच मराठीचे व्यवहारातील महत्व वाढेल.
जसे मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात ही आशा अनेकांना मराठी शिकायला प्रवृत्त करू शकली असती. पण त्या ऐवजी मुर्ख भाषा पंडितांनी "असे कदापि शक्य नाही म्हणून भाषेत पैकीच्या पैकी मिळणारच नाहीत" अशी भूमिका घेतली.
आता मरा! कुणी मराठीच घेत नाही... घेवून बसा तुमची शुद्ध आणि कधीच पैकीच्या पैकी मार्क न देणारी मराठी!
अरे दहावीची परिक्षा (पुर्वीची) ही काय भाषाप्रभु असण्याची परिक्षा होती का?
सामान्यांसाठी ती निव्वळ एक मार्क कमावण्याची संधी होती.
पण नको तिथे घाण केली या पंडितांनी. त्यामुळे मराठीला इतरभाषक काय मराठी माणसेच नको म्हणू लागली.
आत हेच धोरण मराठी आवडती करायलाही कामाचे ठरले नसते का? सामान्य माणसाला ज्यात फायदा दिसतो ते आवडतेच.
जिथे त्रासच होतो ते कशाला आवडेल? मग मराठीचा शाळेत त्रासच झाला असेल तर लहानपणापासूनच अढी नाही का तयार होणार? याची या मुर्ख मराठी पंडितांनी दखलच घेतली नाही.
असो आता परिस्थितीच बदलली आहे. भाषा सगळ्याच कचर्यात गेल्या आहेत.
आता बसा बोंबलत अशी वेळ आली.
असो, हे एक उदाहरण दिले की आपल्याच जाणत्या व शहाण्या लोकांनी नको तिथे ताठरता दाखवून कसा र्हास मांडला.
चतुराईने काळची पावले न ओळखून आपलाच व माराठीचाही घात करून घेतला.
तर या किंवा अशा धोरणी विषयावरही या निमित्ताने काही ठोस चर्चा उपक्रमावर व्हावे असे वाटते.
यात चातुर्यानेच मार्ग काढणे इष्ट आहे. तोडून-फोडून काही साध्य होणार नाही हे तितकेच खरे!
आज मुळच्या चिनी मुलांनाच काय जगातल्या कोणत्याही माणसाला चिनी शिकायची असेल, त्याला चिनी सरकार शिष्यवृत्ती देते असे म्हणतात. हा किती योग्य धोरणीपणा आहे. जगात सिंप्लिफाइड मँडरिन चीनी शिकायची लाट काय उगाच पसरली की काय? फायदा दिसतो आहे म्हणून पसरली... (बाकी इतर प्रांतीय चीनी भाषा शिस्तशिरपणे, मराठी सारख्याच कत्तल केल्या जात आहेत.)
इंग्रजी काही लोकांना आवडते म्हणून लोक बोलत नाहीत, त्यात फायदा आहे म्हणून बोलतात.
या फायद्या विषयी चर्चा व्हावी.
हा फायदा आज आपल्या भाषेत, कोणत्याही भारतीय भाषेत कसा आणता येईल याची चर्चा व्हावी ही अपेक्षा
आपला
गुंडोपंत
सहमत
आपले बरेच मुद्दे पटले. आता आपण सर्वसामान्य माणसे काय करु शकतो हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाला आपल्या सर्वांना उत्तर द्यायचे आहे. शेवटी भाषा टिकवायची जबाबदारी आपणासर्वावर आहे. बरोबर ना?
अरे!
अरे!
इथे मी इतका मोठा प्रतिसाद लिहिला आहे हे मीच विसरून गेलो होतो.
आत्ता द्वारकानाथजींनी प्रतिसाद दिल्याव पाहिले तर मीच लिहिलेले आधी...
पण कुणी प्रतिसाद दिला नाही... जाऊ देत!
सगळे आपापले इंग्रजी अनुदिन्या सांभाळण्यात व्यस्त असावेत ;)
आपला
गुंडोपंत
मराठी वाचेल काय?
शिक्षण मराठीतून दिल्याने मराठी वाचेल असे वाटत नाही. कारण ती जगाची ज्ञानभाषा नाही ही वस्तुस्थिती आहे.
मराठी महाराष्ट्राची ज्ञानभाषा होण्यासाठी कोणतेच विशेष प्रयत्न होत नाहीत आणि होण्याची शक्यता कमी. कारण इंग्रजीचा
(पक्षी इंग्रजांचा) ऐतिहासिक वारसा.
त्यापेक्षा 'मराठी' या अभ्यास विषयाची व्याप्ती वाढवून तो बारावीपर्यंत (सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये) अनिवार्य करावा.
या व्याप्तीत मराठी भाषेचा इतिहास आणि भूगोल, प्राचीन आणि अर्वाचीन साहित्य, मराठी भाषेची विविध अंगे ( शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार,जुने ग्रंथ, कथासंग्रह, कादंबर्या, कविता लेखकांची/कवींची चरित्रे,इतरभाषीय आणि मराठी साहित्याचा तौलनिक अभ्यास, मराठीच्या विविध बोली) यांचा सखोल अभ्यास टप्प्याटप्प्याने प्रत्येक ईयत्तेत समाविष्ट करावेत. फक्त धडे आणि प्रश्नोत्तरे (बाल/कुमार/युवक भारती) यांपुरता हा विषय मर्यादित न ठेवता दरवर्षी बदलणारी (ग्रंथालयात उपलब्ध होणारी) मराठीतील पुस्तके वयोगटाप्रमाणे अभ्यासासाठी ठेवावीत. मराठी विषयाच्या गाईड्स वर बंदी घालावी. महाराष्ट्रातील सर्व (वैद्यकीय, अभियांत्रिकी इ.) प्रवेश परीक्षांना 'मराठी भाषा' हा विषय असावा.त्यात उत्तीर्ण होणे गरजेचे करावे.
असे केल्याने विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढेल हे तात्पुरते खरे असले तरी हळूहळू मराठी विषयाची गोडी वाढेल.
फक्त मराठी माध्यमाच्या शाळा वाचवून फारसे काही साध्य होईल असे वाटत नाही. कारण मराठी माध्यमाच्या शाळेतही मराठी फक्त शिक्षणाचे माध्यम असते. तिच्याकडे एक 'भाषा' म्हणून पाहिले जात नाही. भाषा टिकवण्यासाठी याचा फारसा उपयोग होईलसे वाटत नाही.
एक राहिलेच!
मराठी चित्रपट आणि नाटके 'पहाणे', मराठी गझल/काव्यवाचनाच्या कार्यक्रमास उपस्थित रहाणे असेही उपक्रम शालेय अभ्यासात अंतर्भूत करावेत.
अनेक प्रश्न...
इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे काय ? ( जपान, इटली, जर्मनी, रशिया, भारतातही बहुसंख्य इत्यादी देशात आपापल्या भाषेतच शिक्षण दिले जाते / जात होते. )
मराठी ही एका प्रांताची भाषा आहे आणि सध्या तिचे अस्तित्वच धोक्यात असल्यामुळे ती ज्ञान भाषा होऊ शकेल काय? ( असा विचार करायला हरकत नाही. मराठी हे ज्ञानाची भाषेचे माध्यम होऊ शकेल.)
मराठीचे शिक्षण मात्र अनिवार्य असावे यात संदेह नाही. अथवा संस्कृतप्रमाणे हीसुद्धा एक मृतभाषा होईल.
...जरी आज ही राजभाषा असे!
...जरी आज ही राजभाषा असे!
हा मटाचा अग्रलेख वाचा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
फारच त्रोटक
हा अग्रलेख फारच त्रोटक आणि कोणतेही उपाय न देणारा आहे.हल्ली वृत्तपत्रसंपादकही केवळ पाट्या टाकू लागले आहेत हे स्पष्ट होते.
शिवाय अमुक तमुक नेत्याची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात म्हणून त्याचे मातृभाषाप्रेम लंगडे आहे अशी दिशाभूल करणारी विधाने त्यात आहेत.
केवळ इंग्रजी माध्यमाच्या भाषेत शिकले म्हणजे मातृभाषेवरील माया पातळ होते असे नाही. आपल्याकडे याच संकेतस्थळावर लिहिणारे अनेक इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत, तरीही त्यांचे मातृभाषाप्रेम जाज्वल्य आहे हे निश्चित!
ठोस उपाय.
विसुनाना,
आपल्याला काही ठोस उपाय हवेत आणि जेणेकरुन मराठी भाषा वर्धिष्णु होईल. बाकी इतर उखाळ्या पाखाळ्याचा वापर शुन्य आहे.
आजच सकाळमध्ये मराठी विभाग बंद पडल्याची वार्ता आहे. हा मे आणि जून महिन्यामध्ये सध्या वर्तमानपत्र वाचणे म्हणजे दिव्य असते, अमूक अमूक तुकड्या बंद झाल्या, अमूक अमूक महाविद्यालयाला मराठी विद्यार्थी नाही असे वाचणे म्हणजे मरणप्राय असते.
असो.
(चिंतातूर)द्वारकानाथ
मराठीला विद्यार्थी मिळत नाही ?
मराठी विषयासाठी विद्यार्थी मिळत नाही त्याची वेगवेगळी कारणे आहेत. एकतर मराठी विषयी इतके गैरसमज पसरवून ठेवले आहेत की विचारु नका.मराठीच्या विद्यार्थांना इतर भाषेच्या तुलनेत कमी गुण पडतात. त्यामुळे विद्यार्थी मराठी विषय घेत नाही. शुद्धलेखन, व्याकरणाचा इतका धसका विद्यार्थांनी घेतलेला असतो की विचारु नका. महाविद्यालयीन विद्यार्थी जेव्हा १२ वी उत्तीर्ण होऊन पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी येतो तेव्हा त्याला जाहिरातदार जसे माल खपवतात म्हणुन पटवतात तसे त्यांना मराठी चे फायदे सांगावे लागतात.तेव्हा कुठे विद्यार्थी मराठी भाषा (द्वितीय ) घेतो. अरे, कविता, कथा, असलेल्या पुस्तकांचा तर अभ्यासक्रम आहे असे सांगावे लागते. तेव्हा कुठे भाषा विषयास विद्यार्थी मिळतात.
आणखी एक कारण प्राध्यापकानी वर्गावर जाऊन उत्तम शिकवणे, ( उपक्रमवर पडीक राहिले तर विद्यार्थ्यांचे कसे होणार :) )विद्यार्थ्यांची रुची वाढावी असा प्रयत्न करणे, गुणदान करतांना सढळ हाताने प्राध्यापकांनी गुणदान करावे, अभ्यासक्रमात सुटसुटीतपणा आणने,उपयोजित मराठीचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात केला तर तुकड्या बंद होणार नाही असे वाटते.