महाभारतातील विज्ञान् आणि जैव-तंत्र-ज्ञान !

महाभारतातील विज्ञान् आणि जैव-तंत्र-ज्ञान ! काय खरचं आपले ज्ञान त्या काळी ईतके प्रगल्भ होते ?
खाली काही ऊदाहरणे दिली आहेत, ज्या वरुन हे स्पष्ट होते.
मला फार लहान पणा पासून या गोष्टीची जिज्ञासा होती. महाभारतातील शाप आणि वरदान या पुस्तकाने तर जास्तच वाढीस लागली आहे. आपल्या पैकी कोणी यावर अधिक प्रकाष टाकू शकेल काय ?
संक्षिप्त महाभारत पुर्वकथानक................पुढील प्रमाणे

१) दुष्यंत-शकुंतला - दुष्यंताला न पहाता दुर्वासांनी, दुष्यंत-शकुंतलेल विसरेल अशा शाप दिला.
ऐखाद्याची मती / मेमरी अशी स्कीप करता येते का?
२) दुष्यंत आकाष मार्गाने भ्रमण करीत असे.
वैक्तीक विमानं होती ?
३) सुधन्वा राजाने आपली पत्नी रजस्वला झाल्या वर आपले विर्य ऐका पक्षा कर्वी पाठवले. पण ते न पोचता माशाने गिळले आणि यातुनच मत्स्यरा़ज आणि मत्स्यगंधा जन्माला आले. ........काय हे जैव - तंत्रज्ञान........
४) पराशर-मत्स्यगंधा (सत्यवती) यांचा पुत्र व्यास / द्वैपायन. व्यास जन्मानंतरही सत्यवती कुमारीका होती.
५) महाराजा प्रतीप यांचा मुलगा शन्तनु . शन्तनु-गंगा पुत्र देवव्रत् - भिष्म
६) सत्यवती - शान्तनु पुनःविवाह भिष्माला ईच्छा मरणाचा वर मिळाला शन्तनु कडुन.
७) सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य नावाचे दोन पुत्र झाले.
८) चित्रांगद गंधर्वांबरोबर युद्धात मारला गेला.
९) विचित्रवीर्य चा विवाह् अम्बा, अम्बिका आणि अम्बालिका या बरोबर भिष्मांनी लाऊन दिला.
१०) भिष्मांनी लग्नाला नकार दिल्याने अम्बा परशुरामांकडे जाते.
११) भिष्म-परशुराम युद्ध करुनही प्रश्ण न सुटल्याने अम्बा वनात जाते.
१२) सत्यवती, भिष्माला अम्बिका आणि अम्बालिका पासुन पुत्र उत्पन्न करण्याची विनंती करते.
१३) भिष्मांनी नकार दिल्याने, सत्यवती तिचा जेष्ठ पुत्र व्यासांना पाचारण करते
१४) गर्भ धारणे वेळीच व्यास मुलांचे भवितव्य सांगतात. अम्बा ला जन्मांध धृतराष्ट्र, अम्बालिका ला पाण्डु रोगने ग्रसित पाण्डु आणी दासी पासून विदुर.
१५) यदुवंशी राजा शूरसेनाची कन्या कुन्तीला दुर्वासांनी ऐक मंत्र दिला ज्यायोगे ती देव पुत्र प्राप्त करु शकेल
१६) मंत्राची सत्यता पडताळण्या साठी कुंती सुर्य आवाहन् करते. त्यापासुन तिला पुत्र होतो.
१७) लाजेनं ती त्याला पाण्यात सोडुन देते, पुढे धृतराष्ट्र सारथी त्याचा सांभाळ करतो.
१८) पाण्डू राजाचा विवाह कुन्ती आणि माद्री बरोबर् होतो.
१९) शिकार करताना प्रणय करणारे हरीण मारल्याने हरीण रुपातील ॠषी पन्डु ला शाप देतात.
२०) पाण्डु च्या आदेशा वरुन धर्मा पासुन युधिष्ठिर, वायुदेव तथा इन्द्रा पासुन भीम आणि अर्जुन
२१) तत्पश्चात् कुन्ती माद्री ला मन्त्र दीक्षा देते.माद्रीला अश्वनीकुमारां पासून नकुल - सहदेव होतात्.
२२) माद्री बरोबर समागम करताना पान्डु चा मृत्यू होतो.
२३) गांधारीला दिवस गेल्यावरही २ वर्ष आपत्य होत नाही यावर चिडून ती गर्भावर प्रहार करते.
२४) व्यास तुपाच्या मडक्यात हे १०० तुकडे ठेवतात आणि जवळ पास १ वर्षानंतर यातून मुले ऊत्पन्न होतात.
२५ ) ९९ मुले, १ मुलगी (दुश्शला) आणि धृतराष्ट्राला दासी पासुन १ मुलगा (युयुत्सु) होतो.
२६) गौतम ऋषि पुत्र - शरद्वान यांचा जन्म बाणांसह झाला. याना घाबरुन ईन्द्राने नामपदी नामक एका देवकन्येला त्यांचा कडे पाठवले. तीला पाहून् विर्य स्खलन होते.ते विर्य ऐका भांड्यात पडते त्याचे दोन तुकडे होवून कृप आणि कृपी यांचा जन्म झाला.....पुढे हेच गुरु कृपाचार्य.........
२७)भरद्वाज मुनि गंगा स्नान करताना घृतार्ची नामक एक अप्सरा स्नान करताना दिसली, त्या अप्सरेला बघून् काम वासना जागृत होऊन् त्यांचे वीर्य स्खलित झाले. ते ऐका यज्ञ पात्र ठेवली गेले आणि त्यातूनच द्रोणाचार्यांची उत्पत्ति झाली.
२८ ) यांनी पुढे परशुरामांकडुन ज्ञान प्राप्त केले. आणि विवाह कृपी बरोबर झाला.
२९ ) द्रुपद राजाने यज्ञ करुन याज्ञसेन आणि याज्ञसेनी (द्रौपदी) प्रात्प केले.
३०) विमानात बसून आकाष मार्गाने अर्जुन अमरावतीला गेला होता.

या पुढील भाग तर आपणाला माहीतच आहे...................महाभारताच्या युद्धाने ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची फार मोठी हानी झाली आहे.

Comments

माझं मत

महर्षी व्यास हे ज्यूल्स वर्नपेक्षाही हजारपट चांगले लेखक (कवी) होते.

सहमत आहे

>> महर्षी व्यास हे ज्यूल्स वर्नपेक्षाही हजारपट चांगले लेखक (कवी) होते.

सहमत आहे. कदाचित या गोष्टी पूर्वी असतीलही, युद्धांमुळे अथावा इतर प्रकारे त्यांच्याविषयीची माहिती लोप पावली पण त्यांच्या उल्लेखाव्यतिरिक्त कोणताही जाहीर पुरावा सध्या उपलब्ध नाही. कदाचित हे असले काही नसेल आणि तो केवळ व्यासांच्या कल्पनेचा खेळ असेल पण त्या स्थितीत व्यासांच्या कल्पनाशक्तीला खरोखर सलाम केला पाहिजे.

आणखी एक उल्लेख! शिखंडी

महाभारतातच
द्रुपद पुत्र शिखंडी ने लिंग बदल केल्याचा उल्लेख आहे.
ती लिंग बदल शस्त्रक्रिया आहे की काय असे वाटते .(किंवा अधिक स्पष्ट विचार केल्यास "लिंग (प्रत्या)रोपण" वा " लिंग दान")
(म्हनजे लिंग बदल म्हणजे आजच्या सारखी "लिंगाचे बदल " करण्यासाठी केलेलि नसून प्रत्यक्षात त्याने
लिंग देवाण घेवाणीत एका यक्षाला दीले.(बदल चा अर्थ येथे केवळ "change" नसून "exchange" असा घेतला
तर जास्त योग्य वाटतो.) )
त्याने आपले स्त्री त्व चित्रांगद नावाच्या यक्षाला देउन त्याचे पुरुषत्व घेतले.

(अर्थात त्याचे पुरुषत्व भीष्मांनी मान्य केले नाहिच, हा भाग वेगळा, आणि मुद्द्याला सोडून् होइल. )

जन सामान्यांचे मन

बृहन्नडापण

>>>द्रुपद पुत्र शिखंडी ने लिंग बदल केल्याचा उल्लेख आहे.

अर्जून - ब्रूहन्नडा - अर्जून हा पण प्रवास असाच आहे. गंमत म्हणजे गेल्या जन्मात स्त्री होती म्हणून भिष्मांनी शिकंडीशी यूद्ध करणे नाकारले. पण एकाच जन्मात पुरूष-स्त्री-पुरूष असा प्रवास करणार्‍या अर्जुनाबरोबर युद्ध करण्यास मात्र त्यांना हरकत नव्हती!

संक्षिप्त महाभारत पुर्वकथानक

संक्षिप्त महाभारत पुर्वकथानक चांगले, माहितीपुर्ण !

पण "महाभारताच्या युद्धाने ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची फार मोठी हानी झाली आहे. " हे कसे काय बुवा ? ते कळ्ळे नाही !

जैवतंत्रज्ञान

वरील सर्व प्रसंगांचा आणि जैवतंत्रज्ञानाचा सुतराम संबंध नाही. जैवतंत्रज्ञान गेल्या तीस वर्षांत विकसित झाले आहे. या प्रसंगांच्या काळात जैवतंत्रज्ञान उपलब्ध होते यावर माझा विश्वास नाही.
सन्जोप राव

जैवतंत्रज्ञान

मा. मो.
अहो हे न्युटनी सांगीतल्या प्रमाणे आहे. - तुम्ही गुरुत्वाकर्षण-शक्ति वर विश्वास ठेवा अथवा नको, हा तुमचा वैयक्तीक प्रश्ण आहे. पण् हे बल होते - आहे आणि असेच कार्य करीत राहणार आहे.
याच प्रमाण ऐखाद्या गोष्टी चा आता शोध लागला म्हणजे ती आता पासुन असत्तित्वात आली असे नाही. ती गोष्ट होतीच आपल्या ती नव्याने आज ऊमगली........

हे कसे काय बुवा ? ते कळ्ळे नाही !

महाभारत युद्ध प्रसंगी अति संहारक शस्त्र्-अस्त्र वापर्ली गेली होती याचा परीणाम स्वरुप
१) फार मोठी मानवी जीवत हानी झाली, युद्धात सर्व स्तरातील लोक सहभागी झाले होते, अनेक जमाती नष्ट झाल्या- त्या योगे ज्ञानाची ही. (अधार ........पुर्वी गुरु- शिष्य परंपरेने ज्ञान प्रसार होत. फार् मोठ्या प्रमाणात लेखान/ मुद्रण होत नव्हते)
२) पुढील काही पिढ्या अशक्त- व्यंग -अपंग निर्माण झाल्या.......(आधार.........युद्धा नंतर पांडवांचा गर्भातील वंश नष्ट करण्या करीता अश्वथाम्याने ब्रम्हास्त्र सोडले होते, युद्धा नंतर पांडवांच्या मुलांची झोपेत हत्या केली गेली, १८ दिवसाच्या मुख्य युद्धा नंतरही बराच काळ युद्ध चलू होते.)
३) यातुन सावरायला बराच काळ गेला.
४) हा विधवंस पाहून - शस्त्र्-अस्त्र , युद्ध कला आणि त्या बरोबर ज्ञान भांडार ही नष्ट केले गेल्याचे पुरावे आहेत.(कृष्णाने यादव सेना, द्वारका आणि यदू कुलाचा ही पाण्यात बुडवूवन नाश केल्याचा ऊल्लेख आहे.)
५) हि आणि अशीच बरीच कारणे आहेत.................ते तंत्रज्ञान काळाच्या पडद्याआड जाण्याचे

जैवतंत्रज्ञान आणि बल

अहो हे न्युटनी सांगीतल्या प्रमाणे आहे. - तुम्ही गुरुत्वाकर्षण-शक्ति वर विश्वास ठेवा अथवा नको, हा तुमचा वैयक्तीक प्रश्ण आहे. पण् हे बल होते - आहे आणि असेच कार्य करीत राहणार आहे.

खरे आहे. अगदी मान्य, पण तंत्रज्ञानासाठी आवश्यक उर्जा त्याकाळी कोणती होती? का आकाशवाणी, धनुष्याचे टणत्कार होताना दाखवली जाणारी वीज हीच सर्व तंत्रज्ञानासाठी वापरली जायची? कृपया, प्रकाश टाकावा. ;-)

अहो

अहो तपोबल असणार... दुसरे काय! ;)))

मी म्हणतो अवघा महाराष्ट्र एक दिवस जरी तपाला बसला तरी विजेचा प्रश्न सुटावा. :)
आपला
गुंडोपंत

पटले!

कृपया याच बरोबर पुढील प्रश्नही इच्छुकांनी सोडवावेतः
१) ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. ते स्थापत्यशास्त्र लोप पावले का? असल्यास कसे?
२) भिमगोडा (हिमाचल प्रदेश) येथे भीमाच्या गुडघ्याच्या आघाताने सरोवर निर्माण झाले आहे. मल्लशास्त्रातील असे प्रचंड शक्ती देणारे कोणते तंत्र आहे जे आता विसरेले गेले आहे. नाहि म्हणजे ते शोधल्यास २००८ ऑलिंपिकला एक सुवर्ण नक्की ना !
३) तानसेनाच्या दिपरागाने ज्योती प्रकाशमान होत. या संगीतशास्त्रातील रागाचा परिणाम बल्बवरही होतो का? असल्यास महाराष्ट्रात त्याचा फायदा कसा करून घेता येईल?
४) विमानच शोध प्राचीनच असावा. परंतु तो तर तुकारामापर्यंत माहित होता. मग मधे असे काय झाले की माणूस विमान बनवायला विसरला? तुकाराम महाराजां आधी भारतात अनेक विदेशी पर्यटक येऊन गेले त्यांनी कोणीही भारतातील विमानांचा उल्लेख केलेला दिसत कसा नाहि? (बहुतेक ती खूप उंचावरून उडत असल्याने दिसत नसावीत )

बापरे असे बरेच प्रश्न आहेत. पण हे मात्र पटले की जैव तंत्रज्ञानच काय पण स्थापत्य, क्रिडा, संगीतशास्त्र,उड्डयनशास्त्र अश्या अनेक शास्त्रात माणसाला उत्तम (आताच्या युगात मानवाला आहे त्यापेक्षा कैकपटीने अधिक)गती होती त्याने जाणीवपूर्वक त्याचा त्याग केला कारण त्याचे दुष्परीणाम दिसू लागले होते!

काय् बरोबर ना?

- (स्तिमित)ऋषिकेश

जिव्हाळ्याचा प्रश्न

तानसेनाच्या दिपरागाने ज्योती प्रकाशमान होत. या संगीतशास्त्रातील रागाचा परिणाम बल्बवरही होतो का? असल्यास महाराष्ट्रात त्याचा फायदा कसा करून घेता येईल?

हाहा! जिव्हाळ्याचा प्रश्न!

 
^ वर