उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
"अनुवाद" हा मौलिक मानला जातो का?
सुरेश चिपलूनकर
April 14, 2008 - 11:30 am
किंबहुना ह्या विषयावर आधी चर्चा झाली असावी (असल्यास दुवे द्यावेत), तरी काही प्रश्न विचारावेसे वाटतात -
(1) अनुवाद (भाषांतर) ह्याला मौलिक रचना म्हणता येईल काय?
(2) समजा मूळ लेखका ची परवानगी न घेता भाषांतर केले गेले, तर मूळ लेखक कॉपीराइट मुद्द्या वर खटला दाखल करू शकतो का?
(3) आणि मूळ लेखकाची परवानगी घेतली असल्यास "अनुवादावर" कुणाचे हक्क राहील? मूळ लेखका चे कि भाषांतरकाराचे?
(4) मूळ लेखा मधून काहीच भाग भाषांतर करून वापरल्या गेल्यावर, पण जिथे वापरला तिथे मूळ लेखकाचे नाव दिल्याने कॉपीराइट चे उल्लंघन होते काय?
सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com
दुवे:
Comments
काही उत्तरे
(1) अनुवाद (भाषांतर) ह्याला मौलिक रचना म्हणता येईल काय?
होय.
(2) समजा मूळ लेखका ची परवानगी न घेता भाषांतर केले गेले, तर मूळ लेखक कॉपीराइट मुद्द्या वर खटला दाखल करू शकतो का?
होय, मूळ लेखक कॉपीराइट मुद्द्या वर खटला दाखल करू शकतो.
(3) आणि मूळ लेखकाची परवानगी घेतली असल्यास "अनुवादावर" कुणाचे हक्क राहील? मूळ लेखका चे कि भाषांतरकाराचे?
त्यातील मजकुराच्या "अर्थावर" मूळ लेखकाचा हक्क. भाषांतरित पाठ्यावर भाषांतरकाराचा. उदा: तुमच्या मूळ मराठी निबंधासाठी मी तुमची अनुमती घेतली, त्याचे इंग्रजी भाषांतर केले. माझ्या भाषांतराचे पुन्हा कन्नड भाषांतर माझा मित्र आजानुबाहू याला करायचे आहे. आजानुबाहूला तुमची अनुमती घ्यावी लागेल. (आणि माझी अनुमती घ्यावी लागेल.)
(4) मूळ लेखा मधून काहीच भाग भाषांतर करून वापरल्या गेल्यावर, पण जिथे वापरला तिथे मूळ लेखकाचे नाव दिल्याने कॉपीराइट चे उल्लंघन होते काय?
"काही भाग" म्हणजे किती यावर अवलंबून आहे. "योग्य वापर" म्हणजे कितपत याविषयी मूळ कायदा केवळ तात्विक मार्गदर्शक आहे. पण प्रत्यक्ष, नेमके नियम कोर्टांनी दिलेल्या वेगवेगळ्या निर्णयांतून शोधावे लागतात.
तुमचे लेखन जर मूळ लेखकावर "भाष्य" असेल, किंवा "विडंबन" असेल, किंवा "टीका" असेल समजा. तुम्ही उद्धृत केलेला भाग तुमचा नवीन लिहिलेला भाग समजण्यासाठी महत्त्वाचा आहे. अगदी जसा-च्या-तसा असणे महत्त्वाचे आहे, गोषवारा चालणार नाही. तर उद्धरणावर कॉपीराईटचे बंधन येत नाही.
व्यावहारिक उत्तरे
१) अनुवादापेक्षा भावानुवाद अधिक मौलिक म्हणता येईल.
२) खटला दाखल करता येईल. पण त्याचा हयातीत निकाल लागेल का? अहो जिंदा सुखाला फाशी द्यायला किती वर्ष लागली? त्यामानाने ही गोष्ट चिल्लर
३) , ४)मुंबई वरुन एक प्रवासी टॅक्सीत बसून पुण्याला येत असतो. त्याला सिगारेट ओढायची हुक्की येते. तो चालकाला विचारतो. चालक "धुम्रपान निषिद्ध" या पाटीकडे बोट दाखवतो. घाटात गाडी येते. पुन्हा प्रवासी विचारतो . चालक पुन्हा तीच कृती करतो. लोणावळा येते. पुन्हा तेच. मग पुणे आल्यावर प्रवासी चिडतो आणी म्हणतो ही थोटके इथे दिसताहेत त्याच काय? चालक शांतपणे म्हणतो , " त्यांनी विचारल नव्हतं"
प्रकाश घाटपांडे
हा हा
>>" त्यांनी विचारल नव्हतं"
:):):)
हयातीत निकाल नाही - हाल गरिबाचे
खटल्याचा निकाल हयातीत लागणार नाही हे खरे. पण कोर्टाच्या वार्या करायला दोन्ही बाजूंना वकील ठेवावे लागतील. अशा परिस्थितीत वादी-प्रतिवादीपैकी जो गरीब, तो जेरीस येतो. कारण हा भुर्दंड हयातीतच भरावा लागतो.
मूळ लेखक किंवा प्रकाशक तुमच्यापेक्षा श्रीमंत असेल तर खटला भरेल. मोठे प्रकाशकाचा वकिलाशी आधीच कंत्राट करून ठेवतात. त्यामुळे वरकड खर्च थोडाच येतो.