भारतरत्नाची जयंती

आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती .त्या निमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली
जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा !

मला असे लिहावेसे वाटते की मिसळपाव ,उपक्रम,मनोगत या मराठी संकेतस्थळापैकी एकाही संकेतस्थळाने जयंती निमित्त शुभेच्छा अथवा त्यांच्या विचारांचा योग्य तो संदेश मुखपृष्ठावर लिहायला हवा होता तो त्यांनी लिहीला नाही असे का? एरवी त्या त्या सणांच्या शुभेच्छा मुखपृष्ठावर लिहीतातच ना .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी होते. हिंदूधर्मसुधारक होते. त्यांचे कार्य सर्वांना माहीत असावे असे या संकेतस्थळ चालवणार्‍यांना का वाटले नाही.

आपला
कॉ.विकि

लेखनविषय: दुवे:

Comments

१००% सहमत

आज सकाळीच मी एका उपक्रमीशी यावर बोललो की आज अजुन कोणी कसे डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल लिहले नाही.

असो तरीही मला वाटते की ह्या निमीत्ताने नुस्ती आदरांजली वाहण्या पेक्षा काही तरी वेगळ्या पद्धतीने चर्चा झालेली उत्तम नाही का?

लहानपणापासुन शिक्षणाची कास धरली, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी येथे उच्चशिक्षण प्राप्त केले. भारतात B.A. अमेरिकेत Ph.D , इकोनॉमिक्स व कायद्याचा गाढा अभ्यास. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, त्यांच्या अध्यक्षते खाली समितीने भारताची घटना बनवली.
डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात हिंदु धर्मातील बर्‍याच अयोग्य चालिरीतींना प्रतिबंध व्हावा, तळागाळातील लोकांचे भले व्हावे याकरता संघर्ष केला. १४ ऑक्टो १९५६ रोजी आंबेडकर यांनी आयुष्यात् शेवटी बुद्ध धर्म स्विकारला. अवघ्या दोन महिन्यातच ६ डिसें १९५६ मधे त्यांचे निधन झाले. त्यांचे शिक्षण, सामाजीक चळवळ, घटना समीतीचे अध्यक्षपद याशिवाय अजुन डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल कोणी काही वेगळी माहीती / महती द्यावी. कृपया डॉ. आंबेडकर व त्यांच्या इतर कार्याबद्दल माहीती, विचार, "तुम्हाला समजलेले आंबेडकर" लोकांनी मांडावेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, लेखन याची झलक इथे मिळु शकेल.

त्यांचे "बुद्ध आणी त्याचा धम्म" हे एक वाचनीय पुस्तक आहे.

लेख

त्यांच्या विचारांचा योग्य तो संदेश मुखपृष्ठावर लिहायला हवा होता तो त्यांनी लिहीला नाही असे का?

त्यांनी असे का नाही केले हे विचारणे मला फार आवडते. कारण तेंव्हा मी त्या जबाबदारीतून मुक्त झाल्याच्या थाटात इकडे तिकडे पाहु शकतो ना...!
नाही तर मलाच एक लिहावा लागणार एक लेख...
कुणी सांगितले हे?

  • त्यासाठी माहिती काढा,
  • नक्की विषय समजून घ्या,
  • त्याचा आढावा घ्या,
  • आपली मते पक्की करा व ती लिहुन काढा,
  • एकदा परत वाचा.
  • मग टाका....

छे! काहीतरी बावळटपणा!

तो नीलकांत आहे हो एक... उगाच आपले काही तरी अभ्यासपूर्ण खरडत असतो.
आणि अगदी कमालच केली त्याने.
महात्मा फुल्यांवर लेख
. शिवाय नंतरही
विचार करायला लावणारे लिखाण
दोन भागात.

छे! काहीच्या काहीच!!

त्यापेक्षा मि.पा. हे कसे महात्मा फुल्यांचे चित्र 'वर' लावत नाही यासाठी तरी भांडायचे...

जय भीम!

आपला
गुंडोपंत

सहमत..पण

पण ही सर्व संकेतस्थळे ही तेथे असलेल्या वाचक व लेखकांनी घडवली असल्याने दोष असेल तर तो फक्त संकेतस्थळ मालकांचा/प्रशासकांचा नाही. त्यांनी असा लेख/चर्चा सुरु करायला मनाई केलेली नसावी.

आंबेडकरांनी भारतातील कोट्यावधी जनतेला आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. वर्षानुवर्षाच्या अन्यायाविरुद्ध काय करावे असा प्रश्न पडलेल्या बहुजन समाजाला धर्मांतराची वाट दाखवली.

निळे झेंडे आणि आंबेडकरांचा निळ्या सुटातला फोटो लावून दारू पिऊन कर्कश्श गाण्यांवर हिडीस नाच करणार्‍या ढोंगी अनुयायांना आंबेडकरांच्या कार्याची महती कितपत पटली असेल देव जाणे.

अभिजित...

हेच तर

निळे झेंडे आणि आंबेडकरांचा निळ्या सुटातला फोटो लावून दारू पिऊन कर्कश्श गाण्यांवर हिडीस नाच करणार्‍या ढोंगी अनुयायांना आंबेडकरांच्या कार्याची महती कितपत पटली असेल देव जाणे.

आणि त्यासाठी पैसे तळागाळातल्या लोकांकडूनच गोळा केले जावेत?

हेच तर दुर्दैव आहे हो!

आपला
विषण्ण
गुंडोपंत

सहमत पण


निळे झेंडे आणि आंबेडकरांचा निळ्या सुटातला फोटो लावून दारू पिऊन कर्कश्श गाण्यांवर हिडीस नाच करणार्‍या ढोंगी अनुयायांना आंबेडकरांच्या कार्याची महती कितपत पटली असेल देव जाणे.


मी एकदा पुण्यात लक्ष्मी रोडला आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ट्रकवर आंबेडकरांवर एक पोवाडा गायन चालू होते. खड्या आवाजात. पोवाड्याचा आशय होता आंबेडकरांच्या प्रतिमेचा वापर करुन त्यांच्या विचारांशी विसंगत वर्तन करणारे हे खरे अनुयायी नव्हेतच. मी त्या पोवाड्याला सलाम ठोकला.
प्रकाश घाटपांडे

सलाम

माझाही सलाम. ही जाणीव असणारे आणि उघड बोलून दाखवणारे लोक समाजात आहेत. चांगली गोष्ट आहे.

अभिजित...

विसंगती

मला असे वाटते की घाटपांडे जेव्हा या देखाव्याला "सलाम ठोकतात" तेव्हा त्या सलामाचे स्वरूप उपहासाचे आणि वैषम्याचे असावे. पोवाड्याचे शब्द "आंबेडकरांच्या प्रतिमेचा वापर करुन त्यांच्या विचारांशी विसंगत वर्तन करणारे हे खरे अनुयायी नव्हेतच" या अर्थाचे होते. आणि पोवाडा गाणारे उभे होते रस्ता अडवणार्‍या ट्रकमधे , आंबेडकर जयंतीला , त्यांच्या प्रतिमेसमोर. या सगळ्यातल्या विसंगतीचा परिणाम म्हणजे पाडगावकरांच्या "सलामा"च्या जातीचा सलाम.

का बरे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी होते. हिंदूधर्मसुधारक होते. त्यांचे कार्य सर्वांना माहीत असावे असे या संकेतस्थळ चालवणार्‍यांना का वाटले नाही.

आंबेडकर मराठी, धर्मसूधारक इत्यादी पेक्षा मोठे होते असे नाही का वाटत? एका मोठ्या समाजाला प्रेरणा देणारे नेतृत्व, आधुनिक भारताला घटना देणे आणि अनेक वेगवेगळ्या विषयावर मुलगामी विचार मांडणे हे सर्वच अद्वितीय होते.

त्याच बरोबर त्यांच्या अनुयायी म्हणवणार्‍यांनी त्यांची विचारसरणी धूळीस मिळवली असे म्हणले तर्....

अढी

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत आणि काहीतरी त्यांच्यासंदर्भात भरीव लिहीण्या ऐवजी असल्या लेखाला (सकाळी सकाळी) प्रतिसाद द्यावा लागत असलेली खंत वाटत उरलेला प्रतिसाद.

कॉ. विकी राव,

बर्‍याच दिवसांनी आपण उपक्रमावर प्रकट झालात तेंव्हा सर्वप्रथम स्वागत. आपल्या लेखातील मजकूर वाचून जरा आश्चर्य वाटले - कारण इतकेच की आजपर्यत आपण केवळ या (उपक्रम/मि.पा.) संकेतस्थळावरील सदस्यांकडे केवळ "हिंदू" म्हणून बघायचात. आपण स्वतःला कॉम्रेड म्हणत असल्याने आपल्याला "हिंदू" या शब्दाबद्दल आकस असणे साहजीक आहे (बाकीच्या धर्मियांबद्दल पण असे आहे का ते माहीत नाही), पण आता आपण जातींचे पण चष्मे घालून हिंडतात का असा प्रश्न पडला.

सर्वप्रथम उपक्रमाचा एक सर्वसाधारण सदस्य म्हणून जे काही माहीत आहे त्याप्रमाणे येथे शुभेच्छा वगैरे पहील्यापानावर लिहील्या जात नाहीत. मिसळपाववर जरी लिहील्या गेल्या तरी जसे कोणी तात्या/निलकांतना पाठवतात तसे ते ठेवतात - हा अनुभव आहे. बरं आता जर पाहीले तर दशरथ पुजारींना श्रद्धांजली ठेवली आहे. त्या व्यतिरिक्त मनोगत/उपक्रम/मिपा सर्वत्र कुठल्यान् कुठल्या संदर्भात आंबेडकरांवर लिहीले गेले आहे. किंबहूना आपणच आपला गेल्या वर्षीचा उपक्रमावरील लेख पाहीला तर समजेल की आपण स्वतः आंबेडकरांपेक्षा तो लेख रिपब्लिकन पक्षाबद्दल लिहीण्यातच धन्यता मानलीत. आपण स्वतः का नाही चार चांगले शब्द/आठवणी लिहील्या कोणी आडवले होते का? बरं चांगले लिहायचे नसले तर निदान वाईट आणि तेही इतरांवर आरोप होतील असले तरी लिहीण्यात आपला आणि आमचा वाचण्यात/पिंकण्यात वेळ घालवू नका. काल घरी बोलताना समजले की काल रामदासांचा ४०० वा जन्मदिवस होता, म्हणून त्यावर लिहावेसे वाटले आणि लिहीले. त्याच पद्धतीत निलकांतच्या लेखाचा उल्लेख गुंडोपंतांनी वर केला आहेच. असे अनेक अनेकांचे लेख मिळतील. व्यक्तिगत म्हणाल तर आज मी माझ्या सकाळी लिहीण्याचा आंबेडकरांवर पण लिहीण्याचा विचार केलेला होता. पण असले काही तरी आपले वाचले आणि निराशा झाली....

थोर माणसांचा पराभव कोण करतो तर अर्थातच त्यांचे अनुयायी, अथवा तसे स्वतःला समजणारी माणसे. आपले आजचे वक्तव्य त्याच पद्धतीचे वाटले... एकतर कुठल्या चर्चेत भाग घेत नाही (या तरी चर्चेत भाग घेणार का ते माहीत नाही) वर केजिबी सारखे येथे गस्त घालून कोण काय लिहीते याची टिपण्णी करत नंतर त्यावरचे असले जातीय वाटतील असे निष्कर्ष काढायचे. माफ करा पण आज सर्वात जास्त जातीय चष्मे कोण ठेवते माहीत आहे? तर ती कम्यूनिस्ट विचारसरणी. कारण तेव्हढा एकच काय या बुडत्याला काडीचा आधार राहीला आहे. आपल्याला म्हणूनच विनंती की कम्यूनिझम डोक्यातून काढा!

आदरांक


थोर माणसांचा पराभव कोण करतो तर अर्थातच त्यांचे अनुयायी, अथवा तसे स्वतःला समजणारी माणसे

.
थोरमाणसे ही माणसेच होती. माणुस म्हणुन असणारे गुणदोष हे अपरिहार्य आहेत. त्याच्या मुल्यमापनातूनच द्वेषोपनिषदे, अपौरुषेय, अपरिवर्तनीय आदि ग्रह तयार होतात. समजा थोर पुरुषांना 'आदरांक' देण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली आणि तुम्ही दिलेला 'आदरांक ' हा माझ्या आदरांकापेक्षा कमी असेल तर तुम्ही माझे विरोधक. किमान तुमच्याविषयी मनात अढी तरी.
न जाणो उद्या टिआरपी रेटिंग सारखे 'आदरांक' वापरुन दखलपात्रतेचा 'प्राधान्यक्रम' आणि 'उंची/खोली' ठरायची.
प्रकाश घाटपांडे

विकास साहेब

चर्चेत भाग खुप घ्यावासा वाटतो पण वेळ मिळत नसल्यामुळे भाग घेता येत नाही. बाबासाहेबांचे विचार तुम्ही उपक्रमावर मांडू शकता आणि सर्वापर्यंत पोहोचवू शकता.
आपला
कॉ.विकि

आदरांजली

भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकरांना आदरांजली.
आज बाबासाहेब असायला हवे होते. फार चांगले झाले असते.

आज मायावतींच्या शासनाने दिलेल्या 'फुल पेज' जाहिराती बघून डोळे भरून आले.
लोकांनी त्यांचाही 'देव' करून टाकलाय.

कॉ. विकी - उपक्रमावर कधी कुणाची प्रतिमा 'मालकांकडून' लागल्याचे स्मरणात नाही.

अवांतर

भारतरत्नाचाच विषय निघाला आहे तर, आदरणीय बाबासाहेब अंबेडकरांखेरीज अजून एकाच मराठी माणसाला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, तो कोण माहित आहे?

इथे पहा.

धन्यवाद

डॉ. पांडुरंग वामन काणे यांना भारतरत्न किताब मिळाल होता हे माहितच नव्हतं.
प्रकाश घाटपांडे

त्या आधी

महर्षी कर्व्यांना पण भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. ही पहा यादी.

आणि त्यानंतर

लताबाईंनाही मिळालेला आहे.

 
^ वर