`श्रीराम' यांच्या जगन्मान्य अस्तित्त्वाचे दाखले

१. श्रीरामाच्या काही नावांचा उगम
२. रामपरिवार व अवतार
३. वैशिष्ट्ये
४. रामायण
५. रामायणातील काही प्रसंगांचा भावार्थ
६. `श्रीराम जय राम जय जय राम' : या मंत्रातील शब्दांचा अर्थ
७. श्रीरामाची उपासना
८. `श्रीरामा'ला प्रिय गोष्टी
९. श्रीरामनवमी
१०. `श्रीराम' यांच्या जगन्मान्य अस्तित्त्वाचे दाखले
११. रामाच्या सत्यतेचे पुरावे देणारे `झी न्यूज'चे उत्कृष्ट संशोधन !
१२. श्रीलंकेत मिळालेल्या राम व रावण यांचे अस्तित्व दर्शवणार्‍या खुणा
१३. राम मुद्रा


साभार श्रीरामनवमी विशेषांक

For English

लेखनविषय: दुवे:

Comments

हं..

हं.. चित्रे दिसायला थोडा वेळ लागला तोपर्यंय हा लेखही "श्री प्रभु रामचंद्र की जय" अशी घोषणा देऊन संपणार असे वाटले.
पण चित्रे मात्र रोचक आहेत. ही चित्रे कुठली आहेत? पहिल्या चित्राचा आणि रामाचा संबंध कळला नाहि

-ऋषिकेश

खालचे

खालचे चित्र कळले. पण वरचे काही कळले नाही.
माझ्या मते

तसेही दुनिया गेली बोंबलत!
जे आपल्याला पटते ते जगन्मान्य कशाला असायला हवे? असल्यास उत्तम पण असावेच असा आटापीटा नाही.
जर तुम्हाला `श्रीराम' यांचे अस्तित्व मान्य आहे तर, बाकी गेले झक मारत...! काय फरक पडतो च्यामारी, या दुनियेला मान्य असो किंवा नसो!
बाकी दुवे वाचतो आरामात!

फक्त रामाच्या सत्यतेचे पुरावे देणारे `झी न्यूज'चे उत्कृष्ट संशोधन !
या विषयी अतिशय साशंक आहे, इतके उथळ चॅनल काय उत्कृष्ठ संशोधन करणार डोंबलाचे?

असो लेख बरा आहे. माहिती आहे पण फारच त्रोटक!
आपण येवढ्यात परमाणु यांना भेटलात का हो?
नाही; त्यांचे लेखनही असेच सूक्ष्मात असते म्हणून विचारले...

आपला
लघु नसून गुरू गोष्टींना जरासे प्राधान्य देणारा
गुंडोपंत

हल्ली

उपक्रमावरचे काही लेख समजून घेणे म्हणजे रोजच्या रोज 'दा विंची कोड' सोडवल्यासारखे वाटते. हा लेख किंवा परमाणूरावांचे लेख, काय चाललय काहीच कळत नाही. हे माझ्या अल्पमतीमुळे होते आहे की सर्वांनाच ही अडचण आहे?

----
"ये तेजा तेजा क्या है? ये तेजा तेजा?"

बाहेरचे दुवे

सदर लेखकाने हे ध्यानात घ्यावे की उपक्रम हे संकेतस्थळ केवळ इतर संकेतस्थळांचे दुवे देण्याचे ठिकाण नव्हे.
लेखकाने आपला विषय स्वतः मांडावा आणि केवळ पुष्ट्यर्थ दुवे द्यावेत.

या ठिकाणी केलेले लेखन समतोल असावे अशी अपेक्षा आहे. आपले मत मांडताना विरोधी मतांचा उहापोह करून
ती कशी चुकीची आहेत याबद्दल साधार लिहावे.
अन्यथा पु.ले.शु. असेही म्हणता येणार नाही.

आणि लेखही

>> सदर लेखकाने हे ध्यानात घ्यावे की उपक्रम हे संकेतस्थळ केवळ इतर संकेतस्थळांचे दुवे देण्याचे ठिकाण नव्हे.

हो आणि बाहेरचे लेख जसेच्या तसे देण्याचेही नाही.

>> लेखकाने आपला विषय स्वतः मांडावा आणि केवळ पुष्ट्यर्थ दुवे द्यावेत. या ठिकाणी केलेले लेखन समतोल असावे अशी अपेक्षा आहे. आपले मत मांडताना
>> विरोधी मतांचा उहापोह करून ती कशी चुकीची आहेत याबद्दल साधार लिहावे.

अक्षरशः सहमत आहे! गुंडोपंत, ऋषिकेश आणि राजेन्द्र यांच्या प्रतिसादांशीही सहमत आहे.

अवांतर - 'जगन्मान्य' अस्तित्वाचे 'दाखले' कोणासाठी? परग्रहवासियांसाठी का? ;)

काय फेकाफेकी आहे ही?

आपण म्हणता की रामाच्या सत्यतेचे पुरावे देणारे `झी न्यूज'चे उत्कृष्ट संशोधन !
प्रत्यक्षात ते आहे,

`इंडिया टी.व्ही.' वृत्त वाहिनीवर दाखवण्यात आलेले `श्रीराम' यांच्या अस्तित्त्वाचे श्रीलंकेने दिलेले पुरावे.

आणि कसला रद्दड शो आहे तो. काहीच पुरावे नाहीत. फक्त अधून मधून वाहणारे धबधबे, दोने तिन पॅन होत जाणारे शॉट्स, एक अनाम मुर्तीवर तेल सदृष काही तरी वाहणे आणि कोणत्या तरी गुहेत अंधारे शॉट्स.
अरे? हे काय डोंबलाचे तुमचे संशोधन म्हणे?

सांगणारे लोकही काहीच सांगत नाहीत. फक्त रामायणात काय झाले इतकेच बडबडत राहतात.

  • कसले संशोधन आहे?
  • कुणी केले आहे?
  • विषय काय होता?
  • पुर्वी कुणी संशोधन केले आहे?
  • त्यांचे म्हणणे काय होते?
  • या संशोधनात काय काय सापडले?
  • निष्कर्ष काय?
  • तुलना काय?
  • कुठे आहे हे संशोधन?
  • इथेच का केले?
  • कोणत्या मासिकात/जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले?
  • काय त्याला आधार दिला आहे?
  • कशावरून संदर्भ आले आहेत?

काही कशाचा पत्ता नाही...
मला वाटलेच होते उथळ असणार म्हणून, आणि तसेच निघाले!
असल्या फालतु बातम्या देवून तुम्ही स्वतःची आणि इतरांचीही फसवणूकच करत आहात असे नाही का वाटत?

काढून टाकावा हा लेख उपक्रमा वरून असे आम्हाला वाटते!

चांगले काही असेल तर १० वेळा भांडेन, आणि तसे भांडलोही आहे.
पण हे असले काहीतरी पाणचट इथे यायला तितकाच विरोधही करेन.

नीट काही तरी द्या ना...

आपला
तापलेला
गुंडोपंत

कठीण मागणी

नीट काही तरी द्या ना...

लेखकाचा पुर्वोतिहास बघता फारच कठीण मागणी करताय बॉ गुंडोपंत ;)

-ऋषिकेश

सहमत

सहमत आहे. :-)
----
"ये लो अपना अपना ग्लास"
"अपना अपना?"

कशावरून?

खालच्या चित्रावरून, एक चक्क प्रेग्नंट माकडीण आहे !

कशावरून प्रेग्नंट माकडीण आहे?

तिच्या हातात दगड नाही !

तुम्ही ज्याला 'पोट' समजलात तो 'दगड' नसेल कशावरून? :))

आज राम जर म्यानेजर असता, तर त्याच्याविरुद्ध खटला दाखल झाला असता, सेक्श्युअल डिस्क्रिमिनेशन बद्दल. प्रेग्नंट माकडिणींच्या हातात दगड न देऊन रामाने घोर अपराध केलेला आहे.

तुम्ही म्हणता तसे असेल समजा तर ती प्रेग्नंट माकडीण सुपरव्हायजर असायची शक्यता कशी नाकारता येईल? प्रेग्नन्सीमध्ये जड वस्तू उचलायला नाही सांगतात डॉक्टर ( असे सिनेमांमध्ये दाखवून दाखवून कोरवले गेलेय मनावर ! ) त्यामुळे त्या माकडिणीच्या हातात दगड असता तर झोल झाला असता म्यानेजर रामाला, असे वाटते ! :))

- सर्किट दशरथ सूर्यवंशी

हाहाहाहा... लगे रहो..

 
^ वर