कशावरून असं म्हणताय म्हणे?

अनेक जोरदार चर्चांमध्ये कशावरून असं म्हणताय म्हणे?
हे वाक्य येते, संदर्भ विचारले जातात.

अनेक उपक्रमी परिश्रमपुर्वक आपापले संदर्भग्रंथ तपासून त्याचे उत्तरेही देतांना दिसतात.
या शिवाय सदस्यांच्या खरडवह्या चाळतांना एक मुख्य गोष्ट जाणवते म्हणजे आपण सगळेच पुस्तकांच्या नावांची देवाणघेवाण चांगलीच करतो आहोत. पण ही देवाण-घेवाण त्या त्या खरडवही पुरती मर्यादित राहते आहे.

इकडे तिकडे भोचकपणा करतांना अचानक पणे ही पुस्तके दिसून जातात, आणि मग ती आपल्याकडेही असावीत असे वाटायला लागते.

यामुळे असे सूचले की, उपक्रमावर संदर्भ ग्रंथ सूची असावी.
या संदर्भ ग्रंथ सूची मध्ये ग्रंथ/पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक व मिळण्याची शक्यता असलेले ठिकाण यांचा समावेश असावा.
अनेक पुस्तके संदर्भ म्हणून वापरली जातात त्यामुळे कोणतीही माहितीपर पुस्तके यात येवू शकतील असे वाटते.

या शिवाय जर सदस्यांना एकमेकांकडील दुर्मीळ पुस्तके हवी असतील तर ती छायाचित्रित (फोटोकॉपी) करून (यात फोटोकॉपी व टपालाचा खर्च ज्याला हवी आहेत, त्याने करायचा आहे असे समजून) एकमेकांना देताही येतील. (कृपया प्रताधिकार कायदा यातून तात्पुरता बाजूला ठेवावा. किंवा ज्यांना कायद्याची खूपच खाज आहे त्याने असे करू नये, पण बाकीच्यांना तरी करू द्यावे!)

तेंव्हा गुंडोपंत सदस्यांना विनंती करत आहेत की आपल्या कडील महत्वाच्या माहितीपर पुस्तकांची यादी सदस्य येथे देतील काय?
अर्थात ग्रंथ/पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक व मिळण्याची शक्यता असलेले ठिकाण या सहीत!

आपला
गुंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

माझी काही पुस्तके

माझ्या कडील काही पुस्तके -

१> कुंडलीची भाषा , खंड १,२,३ लेखक -कृष्णराव प्रल्हाद वाईकर, प्रकाशन वर्ष - १९८४, मिळण्याचे ठिकाण ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, गाडगे महाराज कुष्ठधाम, औरंगाबाद रोड, पंचवटी नाशिक -३.

२>भारतीय अर्थकारणाच्या बदलत्या दिशा, (अनेक लेखांचे संकलन - राजीव साने), प्रकाशन वर्ष - १९९७, प्रकाशक- प्रगती अभियान-द्वारा राजीव साने, स्नेह क्लासिक, एरंडवणे, पुणे-४.
(याची प्रस्तावना गोविंद तळवलकरांची आहे व समारोप मधु दंडवते यांनी केला आहे.)

३> निवडक तुकाराम, लेखक - वामन देशपांडे, प्रकाशन वर्ष - १९९७, प्रकाशक- उत्कर्ष प्रकाशन, डेक्कन जिमखाना पुणे.

४>बायोकेमिक पाकेट गाइड (भाषा - हिंदी), लेखक, प्रकाशक वर्ष काहीही माहिती नाही कारण सुरुवातीची व शेवटची पाने गहाळ आहेत. पुस्तक अतिशय जीर्ण झाले आहे पण खूपच उपयुक्त आहे.

५> आम्ही पालक वार्षीक ९५, लेख संकलन सुजाण पालक मंच, (फक्त खाजगी वितरणासाठी) प्रकाशक - सुजाण पालक, ओमकार, गीतांजली सोसायटी, वाघ गुरुजी शाळेसमोर, पंपींग स्टेशन रोड, नाशिक -५

आपला
गुंडोपंत

ग्रंथसूची

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.गुंडोपंत यांची कल्पना स्वागतार्ह आहे.सर्व पुस्तकांची नांवे एकत्र, एकाखाली एक येण्यासाठी "ग्रंथसूची" अथवा अन्य काही समर्पक शीर्षकाचा एक लेख लिहावा. (२०/२५ शब्द). सदस्यांनी त्याखाली प्रतिसाद म्हणून पुस्तकांची नावे इ. माहिती लिहावी. इतर काही नको.सही (मराठी असे आमुची...इ.)सुद्धा नको.
..२/ ग्रंथ, पुस्तके मराठी/संस्कृतच. इंग्रजी नको.

उत्तम

उत्तम कल्पना आहे. इंग्रजी नको हे १००% मान्य! (किंवा त्यासाठी एक स्वतंत्र लेखमालाही करता येईल.)
पण मला असे वाटले या लेखात पुस्तकांच्या याद्या येवू द्याव्यात
व नंतर संपादकांना विनंती करून त्याची तालीका बनवून घेता येईल.

येथे पुस्तके आणि चर्चा दोन्ही आल्यास हरकत नाही असे वाटते.
कारण अनेक सदस्यांना शंकाही असु शकतील त्या कुठे विचारणार असाही प्रश्न होईल.

आपला
गुंडोपंत

काही प्राचीन लेखक व ग्रंथ

काही प्राचीन लेखक व ग्रंथ

'एका' पुस्तकात वाचतांना संस्कृत व प्राचीन ग्रंथकार म्हणून या लेखकांची नावे वाचली -

  • आद्य भरत (ग्रंथ - नाट्य शास्त्र)
  • मध्य दंडी
  • उद्भट
  • रुद्रट
  • रूद्रभट
  • आनंदवर्धन
  • राजशेखर
  • भट्टलोल्लट
  • अभिनवगुप्त (ग्रंथ अभिनव भारती)
  • धनंजय
  • भोज (ग्रंथ शृंगार प्रकाश - रसयोग)
  • मंमट (ग्रंथ - काव्य प्रकाश)
  • जगन्नाथ (ग्रंथ - रसगंगाधर)
  • भट्टतौत (ग्रंथ - काव्य कौतुक)

वरील नावे फक्त त्रोटकपणे संदर्भासाठी आली, पण यातली बरीच नावे कधी वाचली नाहीत.
वरील काही लेखकांनी काय लिहिले आहे हे कळले नाही. ज्यांचे ग्रंथ माहीती आहेत, ते दिले कंसात आहेत.

१. वर उधृत ग्रंथ कुठे मिळू शकतील काय?
२. असल्यास त्यांची मराठीत कुणी फोड केली आहे का?
३. आपल्याकडे या पैकी कोणते ग्रंथ आहेत काय?
४. आपण येवढ्यात विकत घेतले असल्यास, कोठे मिळू शकतील?
५. प्रकाशन थांबले असल्यास असल्यास आपण मला आपल्या कडील प्रतीचे प्रत करून द्याल का? (ट.ख. व फो.कॉ. खर्च माझा! ;) )
६. वरील इतर लेखकांनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत?

आशा आहे आपण माझ्या अगणित झालेल्या शंका मिटवू शकाल :)

आपला
उत्सुक
गुंडोपंत

प्राचीन ग्रंथ

१) पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र (Bhanadarkar Oriental Research Institute)[BORI] Pune 411004 ई मेल bori1@vsnl.net दुरध्वनी ०२०-२५६५६९३२ http://www.bori.ac.in ही वेब साईट अद्याप तयार नाही.
२) दुर्मिळ व जुने ग्रंथ प्रकाशित करणारी वरदा बुक्स , ३९७/१ सेनापती बापट मार्ग , वेताळबाबा चौक पुणे ४११०१६ दुरध्वनी ०२०-२५६५५६५४ विरोप पत्ता अस्तित्वात नाही. यांची पुस्तकसूची असते. माझ्याकडे आहे. ती खुप मोठी आहे. नवीन सूची झाली की जुनी यादी रद्द समजावी असे लिहिले असते.
गुंडोपंतांनी माझ्या स्वप्नाला हात घातलाय. सगळे ग्रंथ डीजीटल स्वरुपात उपलब्ध असावेत. किमान जुने व दुर्मीळ ग्रंथ जे हाताळताना तुकडे पडतात. फोटोस्कॅनिंग करुन त्याचे जतन केले पाहिजे.

प्रकाश घाटपांडे

याचे मूल्य

वरदा बुक्सच्या पत्त्याबद्दल धन्यवाद!

वरदा बुक्सची ही सूची
मागवण्यासाठी काय करावे लागते?

या सूचीचे काही मूल्य असते का?

भा. प्राच्य विद्या ची पण यादी वगैरे आहे का?
त्यांच्याकडे खजिना आहे इतकेच माहिती आहे. पण काय खजिना आहे ते कधी कळलेच नाही...

आपला
गुंडोपंत

आणखी काही

माझ्याकडे असलेली आधुनिक सहजसाध्य परंतू संग्राह्य पुस्तके
१) आकाशाशी जडले नाते: (जयंत नारळीकर , खगोलशास्त्राच्या तोंडओळखीसाठी पर्वणीच :) )
२) रासायनिक मुलद्रव्यांचा शोध : (मुळ लेखक: दमी. त्रीफोनोव आणि व्.त्रीफोनोव, मीर प्रकाशन मॉस्को, अनूवाद: राजेंद्र सहस्त्रबुद्ध, सारांश: यात प्रत्येक मूलद्रव्याची संदर माहिती संकलीत केलेली आहे)
३) डोंगरयात्रा: (लेखकः आनंद पाळंदे. गिरिप्रेमी ग्रंथप्रकाशन् समिती, पुणे. रुपये २४०, सारांशः महाराष्ट्रातील प्रत्येक डोंगर, किल्ले आणि गडाच्या नकाशासहीत मार्गदर्शन. अत्यंत संग्राह्य पुस्तक )
४) शेकोटीपासून अणूभट्टीपर्यंत: (बालवाचकांसाठी उत्तम पुस्तक, मुळलेखक अलेक्सेय क्रिलोव, अनुवादः अनिल हवालदार, मुळ प्रकाशः राअदुगा प्रकाशन्, मॉस्को, भाषांतर : लोकवांड्मय गृह प्रा लि मुंबई)

ही तोंडावर असलेली काहि. बाकी कपाट बघून सांगतो :)

(वाचक) ऋषिकेश

हे

रासायनिक मुलद्रव्यांचा शोध
हे माझ्या कडेही होते पण नंतर हरवले. याला पिवळे मुखपृष्ठ आहे.
या सोबत एक मनोरंजक भौतिकशास्त्र असेही पुस्तक होते. त्याला लाल रंगाचे मुखपृष्ठ होते.
अतिशय छान पुस्तक होते ते.
ते पण हरवले कुठेतरी...

तू दिलेली बाकी वाचायला हवी असे वाटले, डोंगरयात्रा विशेष!

-निनाद

मनोरंजक भौतिकशास्त्र

माझ्याकडे हे पुस्तक आले आहे. मला माझ्या वरिष्ठांनी भेट दिले. त्यांना ते २०-२५ वर्षापूर्वी मिळाले होते म्हणे.
माझ्याकडे मीर प्रकाशनाचे "सापेक्षता म्हणजे काय" (ले. लेव लंदावू) ची स्कॅन कॉपी पण आहे.
मीर प्रकाशनाची हि पुस्तके आता मिळतात का?

उत्तम

छत्रपती शिवाजी, लेखक: सेतुमाधवराव पगडी, सन २००४ सहावी आवृत्ती, प्रकाशकः नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया ए-५ ग्रीन पार्क नवी दिल्ली ११००१६. किंमत रु.४०
(हे पुस्तक मी प्रकाशकांकडून घेतलेले नाही एका पुस्तक प्रदर्शनात घेतले होते.)

याच पुस्तकात खालील संदर्भ दिले आहेत. (हे माझ्याजवळ नाहीत पण महत्वाचे वाटले म्हणून येथे देत आहे.)
संस्कृत
श्री शिवराज्याभिषेक , बेंद्रे वा. सी., सन १९५९, पी पी एच बूक स्टॉल मुंबई.
राज्यव्यवहारकोश, (संपादक) आपटे व दिवेकर, सन १९२५, भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे
परमानंदकाव्य, परमानंद कवींद्र, संपादन गो. स. देसाई, सन १९५२, ओरिएंटल इंस्टीट्युट, बडोदे.

अजून मराठी पण बरेच आहेत पण टंकायचा कंटाळा आलाय. कुणाला हवे असल्यास टंकतो.

-निनाद

टंका ना - कंटाळा नको

कृपया नावे टंकावीत. बरे होईल.

ठीक आहे

ठीक आहे. देतो!
पण हिंदी, उर्दू, फारसी व इंग्रजी अशी आहेत.
चालून जावीत.
(वर मराठी व संस्कृत असे आले आहे म्हणून...)
-निनाद

सेतु माधवराव पगडी यांचे संदर्भ ग्रंथ

सेतु माधवराव पगडी यांचे छत्रपती शिवाजी या पुस्तकातील संदर्भ ग्रंथ -
संस्कृत

परमानंद कवींद्र, शिवभारत सन १९२७, संस्कृत संहीता आणि मराठी भाषांतर (संपादन व प्रकाशन) दिवेकर मुंबई.

पिण्ड्ये जयराम, पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान, संस्कृत संहीता आणि हिंदी भाषांतर, देवी सिंह चौहान, महाराष्ट्र सभा पुणे १९७०.

सकळकळे संकर्षण, शिवकाव्य (संपादन) गोस्वामी, भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे, त्रैमासीक, अंक १ ते ४ १९७४, 'शिवाजीची बिकानेरचा रजपूत राजा राव कर्ण याच्याशी गुप्त सल्लामसलत'.

मराठी
अमात्य/रामचंद्रपंत, आज्ञापत्र (संपादन) डॉ. व्ही. डी. राव, १९५५.

आपटे व दिवाकर , शिवचरित्र, भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे.

आवळसकर, ऐतिहासीक साधने, महाराष्ट्र शासन, १९६३.

आवळसकर, रायगडाची जीवनकथा, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई, १९६२.

बनहट्टी, (संपादन) आज्ञापत्र १९६१. (इतकाच दिलेला संदर्भ आहे)

बेंद्रे वा. सी. , छत्रपती शिवाजी महाराज, मुंबई १९६२.

बेंद्रे वा. सी. , छत्रपती संभाजी महाराज, पुणे १९६०.

---
अजून आहेत, पुढील भागात देतो

-निनाद

माझ्याकडे असलेले छापील शब्दकोश

अभिनव मराठी शब्दकोश - द ह अग्निहोत्री (५ खंड) प्रकाशक: व्हीनस, १९८३ आवृत्ती
इंग्रजी-मराठी शब्दकोश : के बी वीरकर यांचा शब्दकोश "लिटल मॉडर्न डिक्शनरी" प्रकाशक: अनमोल, १९९७ आवृती; आणि र. वा. धोंगडे यांचा ऑस्क्स्फोर्ड मराठी शब्दकोश, प्रकाशक: ऑक्सफोर्ड, १९९७ आवृत्ती
मराठी-इंग्रजी शब्दकोश : अ. उ. चाऊस यांचा "चाऊस डिक्शनरी", प्रकाशक: अल्टिमेट, १९९५ आवृत्ती
(इंग्रजीत अशा कोशाला 'थेसॉरस' म्हणतात): "समानार्थी आणि विरुद्धार्थी मराठी शब्दकोश" द. बा महाजन यांचा, प्रकाशक: नितिन, २००० आवृत्ती
संस्कृत: अमरकोष अमरसिंह-विरचित, त्यावरील भानुजिदीक्षितांच्या "रामाश्रमी" व्याख्येसहित. प्रकाशक: चौखंबा, १९८४ आवृत्ती
उर्दू मराठी शब्दकोश, संपादक - जोशी आणि गोरेकर, प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९८९ आवृत्ती

संस्कृतातला मोनिएर विल्यम्स चा शब्दकोश मी आंतर्जालावरून वापरतो. वेळ मिळाल्यावर त्याची पीडीएफ प्रत उतरवून छापून घ्यायची मनीषा आहे... पण फार वेळ लागेल.

माझ्याकडचे काही कोश

विस्तारित शब्दरत्‍नाकर:मराठी-मराठी कोश:वा.गो.आपटे+ह.अ.भावे:वरदा प्रकाशन :६०५५९ शब्द:रु.२००(अत्यंत स्वस्त).
सरस्वती शब्दकोश:मराठी-मराठी:वि.वा.भिडे+रा.शं.वाळिंबे:दोन खंड,एकूण२०५० पाने:किंमत प्रत्येकी २० रु:आता दुर्मीळ.
मोलिएर विल्यम्स:संस्कृत-इंग्रजी.
गीर्वाणलघुकोश:संस्कृत-मराठी:ज.वि.ओक:पाने ६३८+१७:किंमत २५० रु.(अत्यंत स्वस्त).
दि ट्वेन्टिएथ सेन्चुरी इंग्लिश-मराठी कोश:नी.बा.रानडे:दोन विशाल खंड,पाने एकूण २०००:(फार फार जुना)शुभदा-सारस्वत(दुर्मीळ).
सुलभ हिंदी-मराठी कोश:य.रा.दाते:केशव भिकाजी ढवळे.
दि हॅन्डी इंग्लिश-संस्कृत डिक्शनरी:बी.डी.मुळ्गावकर(दुर्मीळ).
व्यवहारकोश:हिंदी-संस्कृत-मराठी-इंग्रजी:स.ना.कुलकर्णी:(दुर्मीळ).
उर्दू-हिंदी-मराठी शब्दकोश:म.तु.कुलकर्णी+चंद्रशेखर झिंकरे:किंमत २.५० रु(दुर्मीळ).
मराठी-जर्मन:अविनाश बिनीवाले.
याशिवाय फ़्रेन्च-इंग्रजी, इंग्रजी-फ़्रेन्च, कन्नड-मराठी, सिंधी-मराठी, तमिळ-मराठी, मलयालम-मराठी, गुजराथी, बंगाली वगैरे अनेक.
शासकीय व्यवहारकोश, वैज्ञानिक परिभाषाकोश, भौतिक परिभाषाकोश वगैरे वगैरे.
याशिवाय महाभारतातील नावांचा कोश, प्राचीन चरित्रकोश, मोल्सवर्थ-कॅन्डी, नाट्यकोश, वाङ्‌मयकोश(दोन खंड) आणि इतर अनेक.
शब्दानंद:त्रैभाषिक व्यवहारकोश:सत्त्वशीला सामंत.
इंग्रजी उच्चारकोश:मा.का.देशपांडे, डॅनियल जोन्ज़ वगैरे.
अनेक इंग्रजी-इंग्रजी आणि इग्रजी-मराठी कोश आणि थेसॉरस (मोजले नाहीत),. यात समानार्थी-विरुद्धार्थी कोश, उलट शब्दकोश, ऐतिहासिक शब्दकोश ,पाश्चात्य चरित्रकोश, ब्रिटिशकाळातील भारतातील प्रसिद्ध लोकांचा चरित्रकोश , पर्यावरण कोश ,भौगोलिक कोश, भूगर्भज्ञान कोश, इतिहासपूर्व माहितीचा कोश वगैरे वगैरे.
आणखीही असतील, सध्या आठवले तेवढे पुरेत.--वाचक्‍नवी

खजिनाच आहे

मोठाच खजिना आहे आपल्याकडे...

व्यवहारकोश:हिंदी-संस्कृत-मराठी-इंग्रजी:स.ना.कुलकर्णी

महाभारतातील नावांचा कोश, प्राचीन चरित्रकोश, ऐतिहासिक शब्दकोश, भूगर्भज्ञान कोश, इतिहासपूर्व माहितीचा कोश

कन्नड-मराठी, सिंधी-मराठी, तमिळ-मराठी, मलयालम-मराठी

हे खास - जवळ असावेसे वाटले!
त्यात शेवटचे अजूनच वाटले कारण दाक्षिणात्य भाषांशी जवळीक करायला न मिळाल्याची खंतही असावी. (म्हणून आ'कर्णाचे कन्नडबद्दल शिकण्या बद्दल कौतुक वाटते!)

अजून आपल्या खजिन्यात काय काय दडले आहे याचीही उत्सुकता वाटली...

आपला
गुंडोपंत

काही पुस्तके

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
माझ्यापाशी असलेली पुस्तके:
१.अमरकोश (माहेस्वरी टीका): वरदा प्रकाशन ,पुणे .
२.शब्द रत्नाकर (मराठी शब्दकोश.) : वा. गो. आपटे. वरदा प्रकशन
३.विवेकवाद समजून घेताना :(अंडरस्टँडिंग रॅशनॅलिझमः लेखकःडॉ.बंदिष्टे ) या पुस्तकाचा सुमन ओक कृत अनुवाद.
४. अंधश्रद्धा विनाशाय : ले. डॉ. नरेंद्र दाभोळकर. राजहंस प्रकशन.
५. ज्ञानेश्वरीतील लौकिकसृष्टी : म. वा. धोंड. मौज प्रकाशन.
६ .ज्ञानेश्वरी: स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्यः म.वा. धोंड.
७. वेदान्त दर्शन (ब्रह्मसूत्र) : श्री. हरिकृष्णदास गोयंदका. (हिंदी) :गीता प्रेस, गोरखपूर.
८.रसभाव विचारः भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील अध्याय ६ व ७ : भाषांतर : डॉ.र.पं. कंगले.
९.गीर्वाण लघुकोश : ज.वि.ओक.
१०.पतंजलिकृत योगदर्शनः श्री. हरिकृष्णदास गोयंदका: गीता प्रेस.

एक संस्थळ

http://www.vedamu.org/home.asp या संस्थळावर (Learn Sanskrit वर टिचकी मारा) पुढील ग्रंथ वाचता येतील.
अमरकोश
अष्टाध्यायी सूत्रपाठ
संधिचंद्रिका
सारस्वत व्याकरण
व्याकरणमहाभाष्य
अलंकारकौस्तुभ
वृत्तरत्नाकर
ध्वन्यालोक
लघुसिद्धांतकौमुदी
छंदशास्त्र
रघुवंश
कुमारसंभव
अभिज्ञानशाकुंतल
मेघदूत
किरातार्जुनीय
शिशुपालवध
मृच्छकटिक
मालविकाग्निमित्र
मालतिमाधव
काव्यप्रकाश
दशरूपक
कादंबरी
पंचतंत्र
विदुरनीती
अमरुशतक
प्रतिमा
हितोपदेश
आणि इतर काही. याशिवाय संस्कृत शिकू इच्छिणार्‍यांसाठीही काही पुस्तके येथे आहेत.
राधिका

दुवा

धन्यवाद राधिकाताई,
चांगला दुवा आहे.

आता शांतपणे पाहतो.
इंग्रजीतून असल्याने अस्मादिकांना अंमळ वेळच लागेल असे दिसते.

अजून आपण म्हणताय ती पुस्तके तरी दिसली नाहीत पण सापडतील बहुदा...

वा! सत्यसाईबाबांनी हे काम चांगले केले आहे.

आपला
गुंडोपंत

पुस्तकांपर्यंत पोहोचायचा मार्ग

दिलेल्या दुव्यावर गेल्यानंतर स्किप इंट्रो वर टिचकी मारावी. मग एक छायाचित्र येते त्याच्या डाव्या बाजूला 'लर्न संस्कृत' असा एक चौकोन येतो, त्यावर टिचकी मारावी. मग एक पान येईल त्यावर 'प्रायमरी संस्कृत', 'व्याकरण' , 'काव्य' व 'अदर वर्क्स' असे शब्द येतील. त्यातल्या प्रत्येकावर टिचकी मारल्यास त्या त्या प्रकारातील ग्रंथ पाहता येतील. यातल्या बर्‍याचशा ग्रंथांचे स्वरूप संस्कृत संहिता व हिंदी टीका असे आहे, तर काहींचे स्वरूप संस्कृत संहिता- संस्कृत टीका असे आहे.

राधिका

शब्दकोश

माझ्याकडे पुढील शब्दकोश आहेत-

मराठी व्युत्पत्ति कोश- कृ. पां. कुलकर्णी
सुबोध मराठी-इंग्रजी शब्दकोश - कृ. भा. वीरकर (मला वैयक्तिकरीत्या हा शब्दकोश आवडलेला नाही. अधिक चांगल्या शब्दकोशाच्या शोधात आहे, कुणी सुचविल्यास आभारी राहीन.याखेरीज मला एक चांगला मराठी भाषेचा मोनोलिंग्वल, हिस्टॉरिकल शब्दकोश हवा आहे, तोही सुचविल्यास आभारी राहीन.)
संस्कृत-मराठी शब्दकोश- ज.वि.ओक
अमरकोश- पं. हरगोविंदशास्त्री
Oxford इंग्रजी-मराठी शब्दकोश- धोंगडे
Oxford Advanced Learner's Dictionary (मला इंग्रजी भाषेचा चांगला व्युत्पत्तीकोश हवा आहे. सुचविल्यास आभारी राहीन)
Thesauras - Collins
The Student's English- Sanskrit Dictionary - वामन आपटे

याखेरीज लांगेनशाईडचा जर्मन-इंग्रजी व इंग्रजी -जर्मन शब्दकोशही आहे, परंतू त्याची स्थिती फारशी चांगली नसल्याने तो आता फारसा कुणाच्या उपयोगाला पडू शकत नाही. शिवाय, लांगेनशाईडचाच अंगठ्याएवढ्या आकाराचा व चामड्याचे आवेष्टन असलेला जर्मन-इंग्रजी शब्दकोशही आहे (त्याचे नाव लिलिपुट डिक्शनरी असे आहे). ल.गो. विंझे यांचा सुभाषितकोशही आहे.
राधिका

प्राचीन डिजिटल पुस्तके

ही मला गूगलवर सापडतात. हा संस्कृत पुस्तकांसाठी दुवा. पण त्यांत शोध घेण्याचा सोपा मार्ग सापडलेला नाही.
यातील अनेक पुस्तके हार्वर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा ठसा वागवतात. म्हणून या प्रकल्पाबद्दल कळले.

तरी आता भारतातील विद्यापीठांनी, ग्रंथालयांनी, घरोघरांनी हेच स्कॅनिंग केले पाहिजे. पण ते जगभर कोणालाही शोधता यावे, असे कसे करावे? याबाबत संकृतडॉक्युमेन्ट्सचे श्री. नंदू अभ्यंकर यांची मदत घ्यायचा माझा विचार आहे.

("घरोघरांनी": आमच्या घरात एका माळ्यावर मला काही ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती सापडल्या. त्या जीर्ण आहेत. पैकी काही ग्रंथ दुर्मिळ नसावेत. उदा: अनङ्गरंग. ते सहज मिळणारे ग्रंथ स्कॅन करण्यात मी वेळ घालवू नये. पण अन्य काही ग्रंथ दुर्मिळ असतील. ते आधीच कोणी स्कॅन केले आहेत की नाहीत हे मी कसे शोधावे?)

वरदा बुक्स - पुस्तक सूची

ही घ्या पुस्तक सूची . हव ते निवडा.

१. विविध कोश वाङ्मय

१. महाराष्ट्न् शब्दकोश संपादक : दाते कर्वे ८ खंड रु. ४०००.००
२. महाराष्ट्न् वाक्संप्रदाय कोश संपादक : दाते कर्वे २ खंड रु.१०००.००
३. शास्त्रीय परिभाषा कोश संपादक : दाते कर्वे १ खंड रु.------
४. अमरकोश अमरसिंह रु. १५०.००
५. अमरकोषाचा शब्दकोष अनंतशास्त्री तळेकर रु. १५०.००
६. विस्तारित शब्दरत्नाकर वा.गो. आपटे रु. २००.००
७. विस्तारित शब्दरत्नाकर (मोठा आकार) वा.गो. आपटे रु. ४००.००
८. मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी वा.गो. आपटे रु.९०.००
९. इंग्लिश + संस्कृत शब्दकोश वा.गो. आपटे रु. ५००.००
१०. संस्कृत + मराठी शब्दकोश ज. वि. ओक रु. ५००.००
११. शालेय मराठी शब्दकोश वा. शि. आपटे रु. ४५.००
१२. पाठांतर कोश (इं.म.) (प्रकार १) ह.अ. भावे रु. ----
१३. इंग्रजी इ इंग्रजी इ मराठी लघुकोश ह.अ. भावे रु. २५.००
१४. म्हणी वाक्प्रचार व शब्दविचार ह.अ. भावे रु. ५०.००
१५. सार्थ संस्कृत म्हणी आणि
वाक्प्रचार कोश ह.अ. भावे रु. ४००.००
१६. मोल्सवर्थ यांचा मराठी इंग्रजी शब्दकोश ह.अ. भावे रु. १२००.००
१७. संक्षिप्त मोल्सवर्थ कोश बाबा पद्मन्जी रु. ५००.००
१८. मराठी-इंग्रजी शब्दकोश ह.अ. भावे रु. २००.००
१९. वरदा मराठी-इंग्रजी शब्दकोश ह.अ. भावे रु. १००.००
२०. Dictionary of Proverbs ह. अ. भावे रु. ६०.००
२१. Synonyms & Antonyms ह.अ. भावे रु. ----
२२. Dictionary of Thoughts ह.अ. भावे रु. १००.००
२३. Collections of good thoughts ह.अ. भावे रु. ९०.००
२४. शालेय संस्कृत शब्दकोश
(मराठी-इंग्रजी अर्थासह) दंडवते-भावे रु. ८०.००
२५. मराठीतील एकाक्षरी (शब्दांचा) लघुकोश प्रो. भा. म. गोरे रु. ५०.००
२६. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश य. ना. वालावलकर रु. ७०.००
२७. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश य. ना. वालावलकर रु. १००.००
(क्रियापदांसह)
२८. भौगोलिक शब्दकोश र. भा. नाईक रु. २००.००
२९. इं. इं. मराठी वरदा डिक्शनरी ह. अ. भावे रु. १२५.००
३०. फार्शी इ मराठी शब्दकोश मा.त्रिं.पटवर्धन (माधव ज्युलियन) रु. ३००.००
३१. वरदा मराठी शब्दकोश ह. अ. भावे रु. ७५.००
३२. वरदा मराठी शब्दकोश (म्हणींसह) ह. अ. भावे रु. १२०.००
३३. हिंदी इ मराठी शब्दकोश ह. अ. भावे रु. २५०.००
३४. व्युत्पत्ति प्रदीप गोविंद शंकरशास्त्री बापट रु. ८०.००
३५. ज्योतिष-महाशब्दकोश प्रभाकर द. मराठे रु. १००.००
३६. पाचहजार आदर्श सुविचार कोश डॉ. व. वि. कुलकर्णी रु. ५००.००
३७. Practical English
Grammer & Composition डॉ. एम्. जी. काळे रु. ८०.००
३८. इंग्रजी भाषेचा श्री गणेशा डॉ. एम्. जी. काळे रु. ४०.००
३९. रोगविकार महाशब्दकोश प्रभाकर द. मराठे रु. १६०.००
४०. Marathi Grammer in English - A.K.Kher रु. ३००.००
४१. Dictionary Of Difficult words - M.G.Kale रु. २००.००
४२. Seventeen Steps to Lern रु. २००.००
American English

२ .आत्मविकासाची पुस्तके संच -१(एकंदर १४ पुस्तकांचा संच) (संचाची किंमत रु. ५५०.००)

१. अभ्यास कसा करावा? रु. ३०.००
२. स्मरणशक्ती कशी वाढवावी? रु. -----
३. व्यक्तिमत्त्व कसे सुधारावे ? रु. ४०.००
४. मित्र कसे जोडावेत रु. ४०.००
५. सदैव जायचे पुढे रु. ५०.००
६. चिंता का करता? रु. ५०.००
७. नोकरी कशी मिळवावी? रु. २५.००
८. ध्येय कसे गाठाल रु. ४०.००
९. वाचन का व कसे? रु. ४५.००
१०. भाषणे कशी करावीत? रु. ५०.००
११. दुसऱ्यांचा स्वभाव ओळखा रु. ४०.००
१२. प्रश्न : जीवनाचे रु. ४०.००
१३. प्रश्न : शिष्टाचाराचे रु. ३५.००
१४. घरचे हिशेब कसे ठेवावेत ? रु. ३०.००
१५. श्रीमंत कसे व्हावे ? रु. ४५.०

३. `१००' आत्मविकास पुस्तके संच -२

(मूळ लेखक : ओरिसन स्वेट मार्डेन, बट्र्नंड रसेल, सॅम्युएल स्माईल्स)
भावानुवादक : ह. अ. भावे, प्र. रा. अहिरराव, सच्चिदानंद शेवडे व
य. ना. वालावलकर
(रु. २०/- ची २० पुस्तके)
१. विकासाची प्रेरणा रु. २०.००
२. सतत पुढे चला रु. २०.००
३. माझा जन्म यशासाठी रु. २०.००
४. ध्येयनिष्ठा रु. २०.००
५. यशासाठी प्रशिक्षण रु. २०.००
६. व्यवसायाचे सोनेरी नियम रु. २०.००
७. आनंदी जीवन रु. २०.००
८. नव्या शतकाचा मंत्र रु. २०.००
९. विचारांची शक्ती रु. २०.००
१०. शौर्य आणि धैर्य रु. २०.००
११. भयभावनेतून मुक्तता रु. २०.००
१२. मनाचे सामर्थ्य रु. २०.००
१३. ज्ञानकण गोळा करा रु. २०.००
१४. सतत प्रगती करा रु. २०.००
१५. कष्टाविना फळ नाही रु. २०.००
१६. आत्मविकासाची पायाभरणी रु. २०.००
१७. क्रोधावर विजय मिळवा रु. २०.००
१८. कामविकारावर विजय रु. २०.००
१९. एकाग्रता रु. २०.००
२०. आळसावर मात करा रु. २०.००
( रु. ३०/- ची ११ पुस्तके)
२१. समय हीच संपत्ती रु. ३०.००
२२. उत्कृष्ठ तेच करा रु. ३०.००
२३. श्रमदेवतेचे पुजारी व्हा रु. ३०.००
२४. निर्णयशक्ती रु. ३०.००
२५. काटकसर व बचत रु. ३०.००
२६. यशाचा सुलभ मार्ग रु. ३०.००
२७. लोक व्यवहार रु. ३०.००
२८. धनयोग रहस्य रु. ३०.००
२९. प्रत्येक दिवस एक संधीच रु. ३०.००
३०. मैत्रीचा मंत्र रु. ३०.००
३१. मैत्रीतून यशाकडे रु. ३०.००
( रु. ४०/- ची ७ पुस्तके)
३२. आलेली सुसंधी सोडू नका रु. ४०.००
३३. आत्मविश्वासाचा चमत्कार रु. ४०.००
३४. प्रभावशाली व्यक्तिमत्व रु. ४०.००
३५. तूच तुझा शिल्पकार रु. ४०.००
३६. इच्छा तेथे मार्ग रु. ४०.००
३७. इच्छा शक्तीचे बुलंद बुरुज रु. ४०.००
३८. सुविचार कणभर-यश मणभर रु. ४०.००
( रु. ५०/- ची १४ पुस्तके)
३९. मन करा रे प्रसन्न रु. ५०.००
४०. वैभवसंपन्न होण्याचे मार्ग रु. ५०.००
४१. अद्भुत शक्तीचा खजिना रु. ५०.००
४२. आत्मविकासाचा सोपा मार्ग रु. ५०.००
४३. हसत खेळत जगा रु. ५०.००
४४. आरोग्यम धनसंपदा रु. ५०.००
४५. सुखाची साधने रु. ५०.००
४६. स्वावलंबन (मूळ लेखक सॅम्युएल स्माईल्स) भावानुवाद ह. अ. भावे रु. ५०.००
४७. चारित्र्य (मूळ लेखक सॅम्युएल स्माईल्स) भावानुवाद ह. अ. भावे रु. ५०.००
४८. काटकसर (मूळ लेखक सॅम्युएल स्माईल्स) भावानुवाद ह. अ. भावे रु. ५०.००
४९. कर्तव्य (मूळ लेखक सॅम्युएल स्माईल्स) भावानुवाद ह. अ. भावे रु. ५०.००
५०. हे ही दिवस जातील रु. ५०.००
५१. जीवन शैली रु. ५०.००
५२. श्रद्धा ठेवा व यशस्वी व्हा रु. ५०.००
( रु. ६०/- ची १७ पुस्तके)
५३. तुमचे नशीब तुमच्या हाती रु. ६०.००
५४. यशाचे रहस्य रु. ६०.००
५५. तुमचे सामर्थ्य ओळखा रु. ६०.००
५६. या जगण्यावर प्रेम करावे रु. ६०.००
५७. सुखी व समृद्ध जीवनाचा बीजमंत्र रु. ६०.००
५८. मनोकामनांची पूर्तता रु. ६०.००
५९. सुखाचा शोध (ले: बट्र्नंड रसेल) रु. ६०.००
६०. चिंता सोडा सुखाने जगा रु. ६०.००
६१. ध्येयापुढती गगन ठेंगणे रु. ६०.००
६२. तू माझा सांगाती रु. ६०.००
६३. योग्य विचारांचा चमत्कार रु. ६०.००
६४. उद्योग-व्यापारातून समृद्धि रु. ६०.००
६५. चिरंतन आशावाद रु. ६०.००
६६. परिश्रम आणि मेहनत रु. ६०.००
६७. आदर्श विद्यार्थी जीवन रु. ६०.००
६८. आपल्या पायावर उभे रहा रु. ६०.००
६९. घराचे नंदनवन बनवा रु. ६०.००
( रु. ७०/- ते रु. २५०/- ची ३४ पुस्तके)
७०. हाती घ्याल, ते तडीस न्या रु. ७०.००
७१. सौख्याचा मूलमंत्र रु. ७०.००
७२. यत्न तो देव जाणावा रु. ८०.००
७३. जीवनाचे नवे मार्ग रु. ८०.००
७४. प्रयत्नांती परमेश्वर व यश रु. ८०.००
७५. किशोरांचा मित्र रु. ८०.००
७६. व्यक्तिमत्त्व विकासाचा मंत्र रु. ८०.००
७७. यश आले तुमच्या दारी रु. ८०.००
७८. बालक व पालक रु. ८०.००
७९. याला जीवन ऐसे नाव रु. ८०.००
८०. शुभ विचारांची शुभ फळे रु. ८०.००
८१. गगनाला गवसणी घाला रु. ८०.००
८२. हुशार बाळ हवंय ? रु. ९०.००
८३. स्वप्ने साकार करा रु. ९०.००
८४. यशस्वी जीवनाची योजना रु. ९०.००
८५. तू तुझा भाग्यविधाता रु. ९०.००
८६. सद्वर्तन भावानुवाद गोपाळ शंकरशास्त्री बापट रु. ९०.००
८७. संभाषण चातुर्य ले. ह. अ. भावे रु. १००.००
८८. आयुष्य सत्कारणी लावा रु. १००.००
८९. तुमच्यामधील नेता रु. १००.००
९०. सुख आणि शांती रु. १००.००
९१. शंभर धागे सुखाचे रु. १००.००
९२. यशाची द्वारे रु. ११०.००
९३. उत्कर्षाचा राजमार्ग रु. ११०.००
९४. पुढचे पाऊल पुढे टाका रु. १२०.००
९५. जगाला प्रेम अर्पावे रु. १२०.००
९६. व्यवहार चातुर्य ले. ह. अ. भावे रु. १२०.००
९७. जगात कसे वागावे शंभर नियम रु. १२०.००
९८. नराचा नारायण रु. १२०.००
९९. यशाकडे वाटचाल रु. १३०.००
१००. यशशिखराच्या शंभर पायऱ्या रु. १३०.००
९८. यश मिळवून देणारे शंभर नियम रु. १४०.००
९९. तरुणांशी संवाद रु. २००.००
१००. ओरिसन स्वेट मार्डेन यांचे विचार नवनीत रु. २५०.००

४. संदर्भ ग्रंथ व विविध संच

१. प्राचीन महाराष्ट्न् श्री. व्यं. केतकर रु. ५००.००
२. भारतीय समाजशास्त्र श्री. व्यं. केतकर रु. १२०.००
३. प्राचीन भारतवर्षीय भूवर्णन शं. बा. दीक्षित रु. १५०.००
४. भारतीय ज्योति:शास्त्राचा इतिहास शं. बा. दीक्षित रु. ५००.००
५. गुन्हेगार जाती त्रिं. ना. आत्रे रु. ६०.००
६. गावगाडा त्रिं. ना. आत्रे रु. १५०.००
७. मुंबई इलाख्यातील जाती गोविंद मंगेश कालेलकर रु. २००.००
८. सिद्धार्थ जातक दुर्गा भागवत ७ खंड रु. २५००.००
९. बाणाची कादंबरी + रसमयी दुर्गा भागवत रु. ----
१०. कादंबरीसार पां. गो. पारखी रु. ३००.००
११. संपूर्ण शेक्सपिअर भाषांतर : वा. शि. आपटे
(५ खंड किंवा ३७ सुटी नाटके) रु. २०००.००
१२. Mediaeval Hindu India- 3 Vol C.V.Vaidya (Set Price of 3 vol) Rs १२००.००
१३. A Custimised Banker Dr. M.G.Kale Rs. ४५०.००
१४. संपूर्ण आगरकर ३ खंडांचा संच रु. १२००.००
१५. संपूर्ण गडकरी ३ खंडांचा संच रु. ७१०.००
१६. विद्यादेवता सरस्वती प्र. रा. अहिरराव रु. ३००.००
१७. संस्कृत वाङ्मयातील सरस्वती प्र. रा. अहिरराव रु. १००.००
१८. भारतीय मूर्तिपूजेचा इतिहास प्र. रा. अहिरराव रु. ----
१९. भारतीय शिल्पातील प्राणी प्र. रा. अहिरराव रु. २००.००
२०. बृहत्संहिता (भाषां.: कै.ज.ह.आठल्ये) वराहमिहिरकृत रु. ५००.००
२१. India- what can it teach us ? मुळ लेखक : मॅक्स मुल्लर
भारताकडून आम्ही (इंग्लडने) काय शिकावे ?अनु.: ह. अ. भावे रु. ३००.००
२२. नेताजींची सुवचने आणि संदेश संपा. य. ना. वालावकर रु. ४०.००
२३. आत्मकथा (भारतीय यात्री) भावा. : सच्चिदानंद शेवडे रु. ६०.००
२४. तरुणांची स्वप्ने अनु. : ह. अ. भावे रु. १००.००
२५. सर्व धर्मांची मूलभूत एकता ले. भगवान दास :
अनु. ह. अ. भावे रु. १००.००

५. दुर्मिळ व महत्त्वाच्या पुस्तकांची पुनर्मुद्रणे

१. लीलावती पुनर्दर्शन (प्रा. ना. ह. फडके) गणकचूडामणी भास्कराचार्य रु. ३००.००
२. बीजगणित (खानापूरकर शास्त्री) गणकचूडामणी भास्कराचार्य रु. १००.००
३. गणिताध्याय (खानापूरकर शास्त्री) गणकचूडामणी भास्कराचार्य रु. २५०.००
४. राजवाडे लेखसंग्रह (भाग १)
(ऐतिहासिक प्रस्तावना) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे रु. ४००.००
५. राजवाडे लेखसंग्रह (भाग २ व ३ एकत्र)
(संकीर्ण निबंध) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे रु. ४००.००
६. ग्रंथमालेतील संकीर्ण लेखसंग्रह
(संपादक विजापूरकर) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे रु. ३००.००
७. राधामाधवविलासचंपू इतिहासाचार्य वि. का. राजवाडे रु. १५०.००
८. महिकावतीची बखर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे रु. १००.००
९. भारतीय नाटकशास्त्र व नाट्यकला
आणि पौरस्त्य व पाश्चात्त्य रंगभूमी ना. भ. पावगी रु. १७०.००
१०. लग्नविधी व सोहळे नारायण केशव अलोनी रु. ४००.००
११. निबंधमाला (२ खंडांचा संच) विष्णूशास्त्री चिपळूणकर रु. १०००.००
१२. विनोद महदाख्यायिका विष्णूशास्त्री चिपळूणकर रु. ९०.००
१३. सुदाम्याचे निवडलेले पोहे श्री. कृ. कोल्हटकर रु. ----
१४. कौटिलीय अर्थशास्त्र (फक्त भाषांतर) ह. अ. भावे रु. ४००.००
१५. कौटिलीय अर्थशास्त्र
(मूळ संस्कृत + भाषांतर) ब. रा. हिवरगावकर रु. ----
१६. कौटिलीय अर्थशास्त्र प्रदीप गो. गो. टिपणीस रु. ५०.००
१७. राजारामशास्त्री भागवत यांचे
निवडक साहित्य (६ भाग) संपादक : दुर्गा भागवत रु. २३०.००
१८. भुताचा बागुलबुवा य. ना. वालावलकर रु. ५०.००
१९. कालिदासाची सृष्टी माधव दामोदर अळतेकर रु. १८०.००
२०. भारतीय हस्तकला स्वरूप व इतिहास बाळकृष्ण आत्माराम गुप्ते रु. १२०.००
२१. दुर्मिळ अक्षरधन अविनाश सहस्त्रबुद्धे रु. १२०.००
२२. मुंबईचे वर्णन गो. ना. माडगावकर रु. ३००.००
२३. कथासरित्सागर (५ भाग)(पुनर्मुद्रण १ ले) दुर्गा भागवत व ह. अ. भावे रु. १५००.००
२४. प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रसार कृ. वि. वझे रु. १५०.००
२५. मुसलमानपूर्व महाराष्ट्न् (खंड १) वा. कृ. भावे रु. २५०.००
२६. मुसलमानपूर्व महाराष्ट्न् (खंड २) वा. कृ. भावे रु. २५०.००
२७. शिवकालीन महाराष्ट्न् वा. कृ. भावे रु. ४००.००
२८. पेशवेकालीन महाराष्ट्न् वा. कृ. भावे रु. ४५०.००
२९. संस्कृति-संगम प्रा. द. के. केळकर रु. ३००.००
३०. बुद्धिवादाचा ध्रुवतारा प्रा. द. के. केळकर रु. ३००.००

६. चरित्र व आत्मचरित्र

१. लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड) न. चिं. केळकर रु. १२००.००
२. युगकर्ता (टिळक चरित्र) सविता. रा. भावे रु. ---
३. जिंकिले भूमी जल आकाश
(वालचंद हिराचंद चरित्र) सविता. रा. भावे रु. १५०.००
४. दानयोगी विनोबा सविता. रा. भावे रु. १६०.००
५. अक्षरप्रीत सविता. रा. भावे रु. ४०.००
६. माझी प्रकाशवाट संपा. श्री. सविता भावे रु. १५०.००
७. चतुरंग पुरुषार्थ संपा. श्री. सविता भावे रु. १४०.००
८. सम्राट अशोक चरित्र वा.गो. आपटे/ अहिरराव रु. २००.००
९. स्मृतिचित्रे (आ.चौथी) लक्ष्मीबाई टिळक रु. २५०.००
१०. न संपलेली वाट कमल भागवत रु. ८०.००
११. मुक्तयोगी सुधाकर बापट रु. ४०.००
(सेनापती बापट ह्यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी)
१२. घौडदौड संताजीची प्रभाकर भावे रु. ----
१३. मोठ्या माणसांच्या गंमतीदार गोष्टी (दु.आ.) द. पां. खांबेटे रु. ५०.००
१४. जीवनसंग्राम विलास फडके रु. ५०.००
१५. जवाहरलाल नेहरू अरविंद ताटके रु. ---
१६. महात्मा गांधी (९ भागांचा संच) अरविंद ताटके रु. ४५०.००
१७. सरदार पटेल चरित्र मो. वा. (खंडेराव) केळकर रु. १००.००
१८. छत्रपती शिवाजी महाराज कृ. अ. केळूसकर रु. २५०.००
१९. युगप्रवर्तक शिवाजी महाराज यांचे चरित्र वा.कृ.भावे रु. २५०.००
२०. भारतीय गणिती प्रा. ना. ह. फडके रु. ४०.००
२१. गोपाळ गणेश आगरकर (चरित्र) माधव दामोदर अळतेकर रु. ४००.००
२२. लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (संच) प्रा. वा. शि. आपटे
(६ भाग. प्रत्येक भागाची किंमत रु. ३०.०० व ६ भागांचा संचच मिळेल) रु. १८०.००
२३. हिटलर (चरित्र) ३ री आवृत्ती ह. अ. भावे रु. १३०.००
२४. दशकुमार चरित ह. अ. भावे रु. १५०.००
२५. एक गुलाम ओलायुदाह इक्किनो याचे आत्मचरित्र ह. अ. भावे रु. २५०.००
२६. आर्य चाणक्य (मुद्राराक्षस नाटक +
चाणक्यचरित्र + चाणक्यसूत्रे) ह. अ. भावे रु. ५०.००
२७. चाणक्य चरित्र ह. अ. भावे रु. ५.००
२८. एडिसन चरित्र ह. अ. भावे रु. ----
२९. विज्ञानेश्वर - सर एझॅक न्युटन ह. अ. भावे रु. १५०.००
चरित्र व कार्य
३०. डॉ. मारिया माँटेसरी चरित्र व विचार दि. अ. भावे रु. ५५.००
३१. मानवतेचा उपासक - थॉमस पेन दीर्घस्मृती विश्वनाथ रु. ८०.००
३२. चक्रवर्ती नेपोलियन चरित्र वि. ल. भावे रु. ८००.००
३३. झाशीची राणी (चरित्र) द. ब. पारसनीस रु. १८०.००
३४. कंकण बांधलेल्या स्त्रिया सौ. शोभा बोंद्रे रु. ५०.००
३५. माझी जीवनकथा (जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर) डॉ. स. वि. सुंठणकर रु. ५०.००
३६. आमच्या आयुष्यातील काही आठवणी रमाबाई रानडे रु. १५०.००
३७. नाना फडणविसांचे चरित्र वा. वा. खरे रु. १५०.००
३८. कर्मयोगी सौ. सुमती यशवंत लेले रु. ----

७. कांदबऱ्या


१. स्वराज्याचा श्रीगणेशा नाथमाधव रु. १९०.००
२. स्वराज्याची घटना नाथमाधव रु. १९०.००
३. स्वराज्याची स्थापना नाथमाधव रु. २००.००
४. स्वराज्याचा कारभार नाथमाधव रु. २२०.००
५. स्वराज्यावरील संकट नाथमाधव रु. २३०.००
६. स्वराज्याचे परिवर्तन नाथमाधव रु. २५०.००
७. स्वराज्याची दुफळी नाथमाधव रु. २२०.००
८. नयनतारा देसाई (ऐतिहासिक कादंबरिका) रु. १६२.००
(११ कांदबरिकांचा संच खालीलप्रमाणे)
९. ढासळलेला बुरूज, १०. चक्रव्यूह, ११. खेळ आमुचा तलवारीशी, १२. स्वामिनिष्ठ-खंडोबल्लाळ, १३. अग्निचक्र, १४. दर्याचा राजा, १५. क्षिप्रेची लाट, १६. बिहार केसरी,
१७. ब्रह्मावर्तचा फकीर, १८. अभयसौभाग्य, १९. यज्ञ
२०. प्लासीचा रणसंग्राम दि. बा. मोकाशी रु. ४०.००
२१. कामसूत्रकार वात्स्यायन दि. बा. मोकाशी रु. -----
२२. ठगाची जबानी वा. शि. आपटे रु. -----
२३. दादर पुलाकडील मुले नारायण सुर्वे रु. २०.००
२४. वाईकर भटजी धनुर्धारी (श्री. टिकेकर) रु. ८०.००
२५. अनाथ पांडुरंग पां. रा. ढमढेरे रु. ५०.००
२६. मावळचा कान्हा मालती दांडेकर रु. ६०.००
२७. शामभट्ट आणि त्याचा शिष्य बटो चिंतामण मोरेश्वर आपटे रु. २००.००
(डॉन क्विक्झोटच्या धर्तीवर)
२८. चंद्रगुप्त व चाणक्य ह. ना. आपटे रु.-----
२९. म्हैसूरचा वाघ ह. ना. आपटे रु. ५०.००
३०. पानपतची मोहीम ना. वि. बापट रु. १६०.००
३१. पश्चिम आघाडीवर सामसूम स.बा.हुदलीकर रु. १५०.००
गो. ना. दातार यांच्या रहस्यमय १३ कादंबऱ्या (१६ पुस्तके)
(मार्च २००७ मधे प्रसिद्ध होतील. सवलतीची चौकशी करा.)
३२. मोलकरीण पृष्ठे २७४ रु. २४०.००
३३. इंद्रभुवनगुहा पृष्ठे ३४६ रु. ३००.००
३४. विलासमंदिर पृष्ठे ४८८ रु. ४३०.००
३५. रहस्यभेद (पूर्वार्ध) पृष्ठे ७१४ रु. ३००.००
३६. रहस्यभेद (उत्तरार्ध) रु. ३००.००
३७. चतुर माधवराव पृष्ठे २२० रु. २००.००
३८. विश्वनाथ (पूर्वार्ध) पृष्ठे ९१३ रु. ४२०.००
३९. विश्वनाथ (उत्तरार्ध) रु. ३८०.००
४०. मानसिक यातना पृष्ठे ३०८ रु. २५०.००
४१. बंधुद्वेष (पूर्वार्ध) पृष्ठे ७५८ रु. ३४०.००
४२. बंधुद्वेष (उत्तरार्ध) रु. ३४०.००
४३. कालिकामूर्ती पृष्ठे ४६० रु. ४००.००
४४. शालिवाहन शक पृष्ठे ३७६ रु. ३४०.००
४५. शापविमोचन पृष्ठे ४३२ रु. ३८०.००
४६. प्रवालद्वीप पृष्ठे ४९६ रु. ४१०.००
४७. अध:पात पृष्ठे ५२८ रु. ४७०.००
(१३ कादंबऱ्यांची एकंदर छापील किंमत रु. ५,५००=००)

८. बाल व कुमार वाड़्मय

१. पळवलेला पोर वा. शि. आपटे रु. ४०.००
२. अंकलटॉमची केबिन वा. शि. आपटे रु. ४०.००
३. नवजीवन वा. शि. आपटे रु. ४०.००
४. संपूर्ण पंचतंत्र ह. अ. भावे रु. १४०.००
५. मुलांचे पंचतंत्र ह. अ. भावे रु. ----
६. हितोपदेश ह. अ. भावे रु. ७५.००
७. विक्रम आणि वेताळ ह. अ. भावे रु.-----
८. सिंहासन बत्तिशी ह. अ. भावे रु. ५०.००
९. अभ्यासाचे नवे तंत्र ह. अ. भावे रु. ५.००
१०. परिक्षा व अभ्यास ह. अ. भावे रु. ५०.००
११. विज्ञाननिष्ठा आणि संस्कृती ह. अ. भावे रु. २५.००
१२. मोजमापांचा इतिहास व विकास आणि
दशमान पद्धत (मेटि्न्क पद्धत) ह. अ. भावे रु. ५०.००
१३. अतिपूर्वेच्या परिकथा (९ भाग) मालती दांडेकर रु.-----
१४. किती झकास कोडी (६ भाग) (दु. आ.) मालती दांडेकर रु. ८५.००
१५. देशविदेशच्या परिकथा-१० भाग मालती दांडेकर रु.-----
दुर्गा भागवत यांची लोककथा माला (३९ पुस्तके)
(साठा असेपर्यंत मिळतील.)
१६. आसामच्या लोककथा रु.-----
१७. बुंदेलखंडच्या लोककथा रु. २०.००
१८. मध्यप्रदेशाच्या वनकथा (दोन भाग) रु.----
१९. गुजरातच्या लोककथा (दोन भाग) रु. ३०.००
२०. साष्टीच्या गोष्टी (फक्त २ रा भाग) रु. १२.००
२१. बंगालच्या लोककथा (दोन भाग) रु. ४०.००
२२. तामीळच्या लोककथा (तीन भाग) रु. ६०.००
२३. पंजाबी लोककथा (तीन भाग) रु. ६०.००
२४. द:खनच्या लोककथा (तीन भाग) रु. ६०.००
२५. डांगच्या लोककथा (चार भाग) रु. १२०.००
२६. उत्तर प्रदेशच्या लोककथा (पाच भाग) (२ रा भाग नाही) रु. ६७.००
२७. संताळ कथा (चार भाग) रु. ८८.००
२८. काश्मीरच्या लोककथा (पाच भाग) रु. १००.००
(लोककथामालांचा संच येथे संपला)
२९. तुळशीचे लग्न (दु. आ.) दुर्गा भागवत रु. १२.००
३०. लहानी दुर्गा भागवत रु. ८०.००
३१. बालजातक दुर्गा भागवत रु. ३०.००
३२. जातक कथा (१० भाग) दुर्गा भागवत रु. ४००.००
३३. प्रासंगिका दुर्गा भागवत रु. १००.००
३४. आठवले तसे दुर्गा भागवत रु. २००.००
३५. तो तो नव्हताच भालबा केळकर रु. ५०.००
३६. ही रक्तरेषा पुसली जाईल का? भालबा केळकर रु. ५०.००
३७. असा देव असे भक्त भालबा केळकर रु. ५०.००
३८. शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा
(६ भाग) (चौथी आ.) भालबा केळकर रु. ३६०.००
३९. कोडी आणि करमणूक (दुसरी आ.) य. ना. वालावलकर
(१ ते १० भागांचा संच व प्रत्येक भागाची किंमत १०/- रु.) रु. १००.००
४०. सर्वांसाठी कोडी य. ना. वालावलकर रु. ८०.००

९. सामान्य ज्ञान विभाग

१. शून्य ते शंभर आकड्यांच्या हजार मौजा ह. अ. भावे रु. ८०.००
२. विश्वउच्चांक कोश ह. अ. भावे रु. ४०.००
३. जगातील पहिले दहा ह. अ. भावे रु. -----
४. भारतीय उच्चांक ह. अ. भावे रु. २०.००
५. छोटासा ज्ञानकोश संपा. म. श्री. दीक्षित रु. ३०.००
६. साहित्य सागरातील मणिमोती मालती दांडेकर रु. ४०.००

१०. विविध सुविचार आणि सुभाषिते


१. सुविचार संग्रह य. ना. वालावलकर रु. ५०.००
२. रामकृष्णांची बोधवचने रामकृष्ण परमहंस रु. ५०.००
३. लोकमान्य टिळक सूक्ति संग्रह सदाशिव विनायक बापट रु. २००.००
४. पाचशे सुविचार (इं + म) संपादक : ह. अ. भावे रु. ३०.००
५. मराठी बाल सुभाषिते य.ना. वालावलकर रु. १०.००
६. A bunch of 500 Good thoughts
५०० सुविचारांचा गुच्छ (इंग्रजी + मराठी / पाच पुस्तके / भाग १ ते ५)
(प्रत्येक भाग - रु. ३०.००) (संचाची किंमत रु. १५०.००)
७.Gems of 500 Good thoughts
५०० सुविचार रत्ने (इंग्रजी + मराठी / पाच पुस्तके/ भाग ६ ते १०)
(प्रत्येक भाग - रु. ३०.००) (संचाची किंमत रु. १५०.००)
८. Series of 500 Good Thoughts ५०० सुविचार माला (इंग्रजी + मराठी/ पाच पुस्तके / भाग ११ ते १५)
(प्रत्येक भाग - रु. ३०.००) (संचाची किंमत रु. १५०.००)
९. Garland of 500 Good Thoughts
५०० सुविचारांचा हार (इंग्रजी + मराठी/पाच पुस्तके/भाग १६ ते २०)
(प्रत्येक भाग - रु. ३०.००) (संचाची किंमत रु. १५०.००)
१०.Pearls of 500 Good Thoughts
५०० सुविचार मोती (इंग्रजी + मराठी / पाच पुस्तके / भाग २१ ते २५)
(प्रत्येकी भाग - रु.३०.००) (संचाची किंमत रु.१५०.००)
११. Treasure of 500 Good Thoughts
५०० सुविचारांचा खजिना (इंग्रजी + मराठी / पाच पुस्तके / भाग २६ ते ३०)
(प्रत्येक भाग - रु.३०.००) (संचाची किंमत रु.१५०.००)
१२. ५०० सुविचार (फक्त मराठी) भाग १ ते ३० प्रत्येक भागाची किंमत रु.१५/-
(३० भागांच्या संचाची किंमत) (रु.४५०.००)
१३. शंभर सार्थ संस्कृत सुभाषिते दंडवते, भावे रु.१०.००
१४. दीडशे सार्थ संस्कृत सुभाषिते ह.अ. भावे रु.१२.००
१५. दोनशे सार्थ संस्कृत सुभाषिते दंडवते, भावे रु.१५.००
१६. अडीचशे सार्थ संस्कृत सुभाषिते ह.अ. भावे रु.१८.००
१७. तीनशे (एक) सार्थ संस्कृत सुभाषिते दंडवते, भावे रु.२०.००
१८. तीनशे (दोन) सार्थ संस्कृत सुभाषिते दंडवते, भावे रु. २०.००
१९. चारशे सार्थ संस्कृत सुभाषिते दंडवते, भावे रु.३०.००
२०. पाचशे सार्थ संस्कृत सुभाषिते दंडवते, भावे रु.४०.००
२१. सहाशे सार्थ संस्कृत सुभाषिते ओक / भावे रु.४०.००
२२. सातशे सार्थ संस्कृत सुभाषिते दंडवते, भावे रु.५०.००
२३. रामायणातील पाचशे सार्थ
संस्कृत सुभाषिते ह.अ. भावे रु. ५०.००
२४. श्रीमद्भागवतातील पाचशे
सार्थ संस्कृत सुभाषिते ह.अ. भावे रु. ५०.००
२५. योगवासिष्ठातील पाचशे
सार्थ संस्कृत सुभाषिते ह.अ. भावे रु.५०.००
२६. महाभारतातील हजार
सार्थ संस्कृत सुभाषिते ह.अ. भावे रु.८०.००
२७. चाणक्याची सार्थ संस्कृत सुभाषिते ह.अ. भावे (नवी आवृत्ती) रु.५०.००
२८. सुभाषितरत्नखंडमंजुषा ह.अ. भावे रु.६०.००
२९. सार्थ व्यावहारिक सुभाषिते अनुवाद : य. दि. शेंडे रु. ८०.००
३०. शिदोरी : सार्थ सुभाषितांची सरोजा भाटे रु. ८०.००
३१. सार्थ आरोग्य सुभाषिते ह. अ. भावे रु. २२०.००
(१० भाग एकत्र) किंवा (१० भागांचा संच)
३२. सार्थ नीतीशतक भर्तृहरीकृत (शतकत्रय) रु. २५.००
३३. सार्थ शृंगारशतक भर्तृहरीकृत (शतकत्रय) रु.२५.००
३४. सार्थ वैराग्यशतक भर्तृहरीकृत (शतकत्रय) रु.२५.००
३५. सार्थ संस्कृत प्रहेलिका सौ. अलकनंदा इनामदार रु.१५.००
३६. प्रमाणसहस्त्री मधील १००० सुभाषिते संपा. ह. अ. भावे रु.८०.००
३७. अकराशे अकरा सार्थ संस्कृत सुभाषिते संपा. ह. अ. भावे रु.१००.००
(वरील २३ पुस्तके रु. ११८०.००)
३८. सुभाषित कथा ह.अ. भावे रु.३०.००
३९. सुभाषित त्रिशती दामोदर धर्मानंद कोसंबी रु. २००.००
४०. सुभाषित मराठी ना.न.फडणीस रु. १५०.००
४१. नीतीशतक एक अभ्यास ले. ह. अ. भावे रु.१८०.००
४२. चाणक्य नीती संपा. ह. अ. भावे रु. ३०.००
४३. विदुर नीती, नारद नीती ले. ह. अ. भावे रु.३०.००
कणिक नीती, यक्षप्रश्न
४४. यथार्थदीपिका (अठरा अध्यायाय) वामनपंडित रु.१२००.००

११. शोध-शोधक व विज्ञान

१. उत्तर अमेरिकेचा शोध ह.अ. भावे रु. ५०.००
२. दक्षिण अमेरिकेचा शोध ह.अ. भावे रु. ५०.००
३. ऒस्ट्रेलियाचा शोध ह.अ. भावे रु. -----
४. नाईल नदीचा शोध ह.अ. भावे रु. ५०.००
५. आफ्रिकेचा शोध ह.अ. भावे रु. ५०.००
६. कोलंबसाचे चार प्रवास ह.अ. भावे रु. ७०.००
७. मार्कोपोलोचे प्रवास ह.अ. भावे रु. १००.००
८. पहिल्या दोन पृथ्वी प्रदक्षिणा ह. अ. भावे रु. १००.००
९. व्यायाम विज्ञान के. पी. भागवत रु.६०.००
१०. शास्त्रशुद्ध व्यायाम के. पी. भागवत रु.२०.००
११. व्यायाम व शारीरिक क्षमता कशी मोजतात? के. पी. भागवत रु. २०.००
१२. शरीर संपदा के. पी. भागवत रु.७०.००
१३. व्यायाम दिपिका के. पी. भागवत रु.५०.००
१४. नोबेल पारितोषिक विजेते (शरीरविज्ञान) स.वि. सुंठणकर रु. ----
१५. नोबेल पारितोषिक विजेते (भौतिकी) स.वि. सुंठणकर रु.६०.००
१६. नोबेल पारितोषिक विजेते (रसायन) स.वि. सुंठणकर रु.५०.००
१७. नोबेल पारितोषिक विजेते (वाङ्मय) ह.अ. भावे रु. ----
१८. नोबेल पारितोषिक विजेते (शांतता) ह.अ. भावे रु.५०.००
१९. मूलद्रव्यांचा मनोरंजक इतिहास
(३ भाग सुटे किंवा ३ भाग एकत्रित) स.वि. सुंठणकर रु.१५०.००
२०. आधुनिक क्रांतिकारक शास्त्रीय शोध डॉ. स. वि. सुंठणकर रु. ६०.००
२१. नैसर्गिक आहार गोविंद अमृत वैद्य रु.६०.००
२२. औषधाशिवाय आरोग्य अथवा
आरोग्य मार्गप्रदीप गो.म. चिपळूणकर रु.१२०.००
२३. सुलभ योगासने किंवा योग्यांची व्यायामपद्धती गो. म. चिपळूणकर रु.२०.००
२४. सजीव सृष्टीची उत्क्रांती स.ना. दातार रु.१००.००
२५. भावनिक बुद्धिमत्ता डॉ. एम. जी. काळे रु.५०.००
२६. व्यवस्थापनाची मूलतत्त्वे डॉ. एम. जी. काळे रु.१६०.००
इ डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर - यांच्या `महाराष्ट्नीय ज्ञानकोशा' तील
विभाग ५ `विज्ञानेतिहास' मधील ८ उपविभागांची ८ पुस्तके
२७. प्राथमिक विज्ञान रु.३५०.००
२८. प्राचीन विज्ञान रु.१४०.००
२९. वेदविद्या व विज्ञान रु.२३०.००
३०. वैद्यक विज्ञानाचा इतिहास रु.१७०.००
३१. रसायनशास्त्राचा इतिहास रु.१२०.००
३२. भूशास्त्र व जीवशास्त्र यांचा इतिहास रु.१५०.००
३३. खगोलशास्त्राचा इतिहास रु.२१०.००
३४. पदार्थविज्ञान व गणित यांचा इतिहास रु.१७०.००
(वरील ८ पुस्तकांचा संच रु.१५४०.००)
३५. ऋग्वेद एक शोध यात्रा डॉ. श्री. त्रिं. वाटवे रु.५००.००
३६. प्राण्यांचे भावनाविष्कार म.य. ताम्हनकर रु.१००.००
३७. आपले स्वास्थ्य म.य. ताम्हनकर रु.४०.००
३८. आग प्रतिबंध म.य. ताम्हनकर रु. ----
३९. औद्योगिक सुरक्षितता म.य. ताम्हनकर रु.२०.००
४०. पृथ्वीची जडण आणि घडण म.य. ताम्हनकर रु.२५.००
४१. उत्क्रांती वाद म. य. ताम्हनकर रु. ३०.००

१२. इतिहास, राजकारण


१. फ्रेंच राज्यक्रांती न.चिं. केळकर रु. ----
२. प्रतापगड युद्ध प्रभाकर भावे रु.१००.००
शिवरायांचे शिलेदार १० पुस्तके व इतर ऐतिहासिक ८ पुस्तके = (१८ पुस्तके)
३. इ कान्होजी जेधे रु.५०.००
४. इ नेताजी पालकर रु.५०.००
५. इ तानाजी मालुसरे रु.५०.००
६. इ जिवा महाला रु.५०.००
७. इ मुरारबाजी देशपांडे रु.५०.००
८. इ फिरंगोजी नरसाळे रु.५०.००
९. इ बाजी प्रभू देशपांडे रु.५०.००
१०. इ प्रतापराव गुजर रु.५०.००
११. इ मदारी मेहत्तर, रामजी पांगेरा, कोंडाजी फर्जंद रु.५०.००
१२. इ दादोजी कोंडदेव रु.५०.००
१३. इ शनिवार वाडा रु.२०.००
१४. इ सुरतेची स्वारी रु. ५०.००
१५. इ शाइस्ते खान रु.५०.००
१६. इ बाळाजी आवजी चिटणीस रु.५०.००
१७. इ ऐतिहासिक दंतकथा (एक) रु.५०.००
१८. इ ऐतिहासिक दंतकथा (दोन) रु.५०.००
१९. इ राजधानी रायगड रु.१००.००
२०. इ आगऱ्याहून सुटका रु.८०.००
(वरील १८ पुस्तकांचा संच रु. ९५०.००)
२१. मराठी सत्तेचा उत्कर्ष न्या.महादेव गोविंद रानडे रु. १६०.००
२२. आर्यांच्या सणांचा इतिहास ऋग्वेदी रु. ४०.००
२३. हिंदुधर्मदीपिका ऋग्वेदी रु. ४००.००
२४. अभंग गीतांजली ऋग्वेदी रु. १००.००
२५. संस्कृत वाङ्मयाचा इतिहास चिं.वि. वैद्य रु. ५०.००
२६. मानवी संस्कृतीचा इतिहास चिं.ग. कर्वे रु. ५०.००
२७. हिंदी महासागराचा इतिहास ह.अ. भावे रु. ७०.००
२८. सुवेझ कालव्याचा इतिहास ह.अ. भावे रु. ६०.००
२९. सुवर्णाचा इतिहास ह.अ. भावे रु. १००.००

१३. संकीर्ण


१. सत्यं शिवम् सुंदरम् दुर्गा भागवत रु.५०.००
२. अस्वल दुर्गा भागवत रु.१५०.००
३. लोककथा कल्पलता मालती दांडेकर रु.१५०.००
४. वाङ्मय शारदेचे नुपूर मालती दांडेकर रु. ५०.००
५. अलका, तू असं लिही मालती दांडेकर रु.६०.००
६. पश्चिमवारे यशवंत कानिटकर रु.३०.००
७. नावात काय नाही ? ना.ज. जाईल रु.४०.००
८. हास्यमेव जयते ना.ज. जाईल रु.४५.००
९. जगातील वाळवंटे दु.पां. कुलकर्णी रु.८०.००
१०. दहा महान चित्रकार दु.पां. कुलकर्णी रु.८०.००
११. आपलं बाळ (पुनर्मुद्रण ४ थे) प्रा. आपटे, डॉ. सारंगधर
आणि डॉ. पाठक रु.१५०.००
१२. टापटिपीचा संसार त्र्यं. ना. लेले, वा.गो. आपटे रु.२०.००
१३. भाषांतर: शास्त्र की कला म.वि. फाटक रु.३०.००
१४. अजब गजब द.पां. खांबेटे रु.६०.००
१५. आजारपणाचे मानसशास्त्र द.पां. खांबेटे रु.६०.००
१६. गिरीदुर्ग आम्हा सगेसोयरे तु.वि. जाधव रु.८०.००
१७. खंडन-मंडन प्रा.वा.शि. आपटे रु.१२०.००
१८. पाठ्येतर संस्कृत मिलिंद दंडवते रु.-----
१९. अलंकार प्रकाश त्र्यं.ना. लेले रु.२००.००
२०. जीवन प्रवासी प्रा.भा.म. गोरे रु.४०.००
२१. आपली नक्षत्रे ह.अ. भावे रु.२५.००
२२. शिकार ते शेती ह.अ. भावे रु.४००.००
२३. मानवाचे पूर्वज ह.अ. भावे रु.२५०.००
२४. माणूस बोलू लागला ह.अ. भावे रु.१८०.००
२५. माणूस नावाचा प्राणी ह.अ. भावे रु.१८०.००
२६. नाना देशांचे नाना लोक (२० पुस्तके) ह.अ. भावे रु.६००.००
२७. आधीच पुणे गुलजार वि.ना. नातू रु.१००.००
२८. वैवाहिक जीवन के. पी. भागवत रु.१००.००
२९. आई-बाप व मुले के. पी. भागवत रु.१००.००
३०. लोकप्रिय नाट्यगीते संपा. म. श्री. दीक्षित रु. २०.००
१४. कथासंग्रह
१. असा पण एक सामना जयंत देवकुळे रु.५०.००
२. मृदुनि कुसुमादपि जयंत देवकुळे रु.५०.००
३. पाली प्रेमकथा दुर्गा भागवत रु.५०.००

१५. काव्य

१. मेघदूत (मराठी भाषांतर) (दु. आ.) चिंतामणराव देशमुख रु.५०.००
२. द्राक्षकन्या माधव जूलियन रु.१५०.००
(अर्थात उमरखय्याम यांच्या रुबाया)
३. काजळरेषा सौ. सुषमा दाते रु.२५.००
(एजन्सीची पुस्तके)
१. आपापले हितगुज प्रा.श्री.म. माटे रु.३०.००
२. प्रेमिकांना आहेर प्रा.श्री.म. माटे रु.३०.००
(वरील दोन पुस्तकांचा कागद ५० वर्षांचा जुना आहे.)
३. सचित्र लोकरीच्या कलाकृती सौ. इंदुमतीदेवी पटवर्धन रु. ८५.००

१६. विविध धार्मिक ग्रंथ


संपादक : भालबा केळकर
१. वाल्मिकी रामायण ३ खंड + संपूर्ण महाभारत ८ खंड
(अशा ११ खंडांचा संच) रु.२२६०.००
२. ज्ञानेश्वर गाथा संपादक-साखरे महाराज रु. ९०.००
३. नामदेव गाथा संपादक-साखरे महाराज रु. १८०.००
४. तुकाराम गाथा संपादक-साखरे महाराज रु. १५०.००
५. एकनाथ गाथा संपादक-साखरे महाराज रु. २५०.००
६. निळोबा गाथा संपादक-साखरे महाराज रु. ९०.००
७. बहिणाबाईचा गाथा संपादक-साखरे महाराज रु. ४५.००
८. `श्री' संत गाथा (सावतामाळी,
गोराकुंभार, कबीर वगैरे) संपादक-साखरे महाराज रु. ५०.००
९. समग्र तुकाराम गाथा (८४४१ अभंग)
(दोन खंडात किंवा एकत्र) संपा.-तुकारामतात्या पडवळ रु. ८००.००
१०. तुकारामाचे निवडक हजार अभंग गो. गो. टिपणीस रु. ५०.००
११. वेदांत सूर्य कवी श्रीधर रु. ३०.००
१२. पांडुरंग माहात्म्य कवी श्रीधर रु. १०.००
१३. शिवलीलामृत (पुठ्ठा बांधणी) कवी श्रीधर रु.----
१४. शिवलीलामृत (मोठा आकार व टाईप) कवी श्रीधर रु. ५०.००
१५. योगसंग्राम कवी शेख महंमद रु. ४०.००
१६. श्री रामदासांचे समग्र ग्रंथ समर्थ रामदास रु. ३००.००
१७. सार्थ मनाचे श्लोक (मनोबोध) संपा. ल. रा. पांगारकर रु. ४०.००
१८. सार्थ दासबोध (२ रे पुनर्मुद्रण) संपा. ल. रा. पांगारकर रु. २००.००
१९. एकनाथ चरित्र संपा. ल. रा. पांगारकर रु. ४५.००
२०. संत तुकाराम चरित्र संपा. ल. रा. पांगारकर रु.८०.००
२१. भक्तिमणिमाला संपा. ल. रा. पांगारकर रु.-----
२२. नारद भक्तिसूत्रे (मोठे) संपा. ल. रा. पांगारकर रु. ----
२३. नारद भक्तिसूत्रे (लहान) संपा. ल. रा. पांगारकर रु. ८.००
२४. सटीप ज्ञानेश्वरी (दु.आ.) संपादक अण्णा मोरेश्वर कुंटे रु. -----
२५. रामायण कथासार चिं. वि. वैद्य रु. ८०.००
२६. महाभारत कथासार (३ री आवृत्ती) चिं. वि. वैद्य रु. १००.००
२७. श्रीकृष्ण चरित्र चिं. वि. वैद्य रु. १५०.००
२८. साररूप वाल्मिकी रामायण डॉ. श्री. अरविंद दामले रु. २०.००
२९. गणेश उपासना व संकष्टी चतुर्थी व्रतकथा रामसिंग पाटील रु. ३०.००
३०. सार्थ अमृतानुभव + चांगदेवपासष्टी वै. विष्णुबुवा जोग रु. ९०.००
३१. हैबतबाबांची भजनीमालिका रु. १५.००
३२. पाचशे भक्तिगीते आणि अभंग रु. ४५.००
३३. सटीप एकनाथी भागवत संपादक : गो. ना. दातार रु.१२०.००
३४. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे योगवासिष्ठ संपा: गोविंद का. चांदोरकर रु. २०.००
३५. ज्ञानेश्वर चरित्र माधव दामोदर अळतेकर रु. ५०.००
३६. ज्ञानेश्वर चरित्र संपा : तात्या नेमिनाथ पांगळ रु. १०.००
३७. शिर्डीचे श्रीसाईबाबा चरित्र ले. पु.ल.जक्का रु. २०.००
३८. एकादशी माहात्म्य भाषां. ह. अ. भावे रु. ५०.००
(२६ एकादशांच्या २६ कथांसह)
३९. चिरंतन सुखाचे मार्गदर्शक द. पां. खांबेटे रु. -----
४०. संतांनी सांगितलेली सुखाची साधना द. पां. खांबेटे रु. -----
४१. सार्थ उपनिषदे (भाग १) संपा : हरी रघुनाथ भागवत रु. -----
४२. सार्थ उपनिषदे (भाग २) संपा : हरी रघुनाथ भागवत रु. १०.००
४३. सार्थ उपनिषदे (भाग ३) संपा : हरी रघुनाथ भागवत रु. -----
४४. सार्थ उपनिषदे (भाग ४) संपा : हरी रघुनाथ भागवत रु. ४०.००
४५. सार्थ उपनिषदे (भाग ५) संपा : हरी रघुनाथ भागवत रु. ४०.००
(वरील पाच भाग एकत्रित)
४६. दहा सार्थ उपनिषदे संपा : हरी रघुनाथ भागवत रु.----
४७. सार्थ गीता सप्तक (सात प्रकारच्या गीता) संपा : हरी रघुनाथ भागवत रु. १००.००
४८. सान्वय-सार्थ-सटीक श्रीमद्भगवद्गीता कृ. अ. केळूसकर रु. ५००.००
४९. श्रीमद्भगवद्गीता (४ रंगी कार्ड बांधणी) भाषां. : सदाशिवशास्त्री भिडे रु. २१.००
५०. कथारूप भगवद्गीता महात्म्य रा.भी. पाटील रु. १५.००
५१. विश्वकर्मा पुराण भाषां.:कै. सौ. सुमती य. लेले रु. ८०.००
५२. सार्थ पंचरत्न हरिपाठ संपा. अनु. : कै. दंडवते रु. ----
५३. जैमिनी अश्वमेध (फक्त मराठी) विष्णूशास्त्री बापट रु. १००.००
५४. भक्तिमार्गप्रदिप संपा : ल.रा.पांगारकर रु. ३०.००
५५. धार्मिक कथासंग्रह संपा : ना.रा. सोहोनी रु. ४५.००
५६. संत वचन सुधा रु. ६०.००

१७. लहान पोथ्या


१. सटीप मनाचे श्लोक व सटीप करुणाष्टके (प्रकार १) रु. २.५०
२. सटीप मनाचे श्लोक व सटीप करुणाष्टके (प्रकार २) रु. ३.५०
समश्लोकीकरण : डॉ. पंडित आवळीकर
३. सार्थ श्री रामरक्षा (मराठी समश्लोकांसह) रु. -----
४. प्राकृत पंचरत्नगीता + विष्णूनमनस्तोत्र + भीषमस्तवनराज रु. ५.००
५. शारदास्तवन रु. ५.००
६. सरस्वती व्रतकथा संपा.:प्र.रा.अहिरराव रु. ८.००
७. सरस्वती पुराण प्र.रा.अहिरराव रु. २००.००
८. शुभंकरोति आणि परवचा रु. -----
९. साईबाबांचे सांगाती संग्रा. संपा. : म. श्री. दीक्षित रु. १०.००
१०. ओठावरची गाणी संग्रा. संपा. : म. श्री. दीक्षित रु. ३०.००
११. सार्थ स्तोत्र रत्नावली श्री. स. द. रानडे रु. ६०.००
१२. पंढरीमाहात्म्य श्री. विठ्ठल दाजी धारुरकर रु. २०.००
१३. नामजपाचे महत्त्व व माहात्म्य श्री. रा. भी. पाटील रु. ५.००
१४. १०८ प्रासादिक आरत्यांचा परिपूर्ण श्री. मिलिंद दंडवते रु. १०.००
आरती संग्रह
------------------------ यादी समाप्त ---------------------------------------------

प्रकाश घाटपांडे

आभार

गुंडोपंतांचे आणि सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार !
घाटपांडे काकाना "स्पेशल" धन्यवाद. त्यानी प्रचंड मोठी यादी टंकून दिली आहे ! हे काम चिकाटीचे होते (पण माझी खात्री आहे, पुस्तकांची यादी टंकताना त्यांच्यासारख्या ग्रंथप्रेमीला कष्ट जाणवले नसतील :-) )

आणि हो ....हे मला महितीच नव्हते : :-)

(मूळ लेखक : ओरिसन स्वेट मार्डेन, बट्र्नंड रसेल, सॅम्युएल स्माईल्स)
भावानुवादक : ह. अ. भावे, प्र. रा. अहिरराव, सच्चिदानंद शेवडे व
य. ना. वालावलकर

वस्तुस्थिती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रकाशकांनी (श्री. भावे) माझ्याकडे चार पुस्तके भाषांतरासाठी दिली. त्यांतील जेमतेम दीड पुस्तकांचे मी भाषांतर केले.मला या विषयात काही रस वाटेना. म्हणून ते भाषांतर आणि पुस्तके प्रकाशकांना परत दिली. त्यामुळे १०० तील केवळ एकच पुस्तक माझ्यानावे आहे. या पुस्तकांत अगदी बाळबोध उपदेश आहे. उपक्रमींनी वाचावी अशी ही १०० पुस्तके नव्हेत.त्यांचा वाचकवर्ग वेगळा आहे.

वा!!

खूपच सुंदर. अशी यादी ऑनलाईन उपलब्ध आहे ते. :)

खरे तर वर सांगितल्याप्रमाणे अशी पुस्तकांची यादी वेगळी करून ठेवणे आवश्यक आहे.
.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद!

यातली अनेक पुस्तके लगेच हवीहवीशी वाटली.
परंतु विदेशात पुस्तके पाठवण्याची वरदा बुक्सची काही सोय आहे का?
मला ऑस्ट्रेलियामध्ये हवी आहेत. यासाठी मी त्यांना पत्र धाडले आहेच.

तशी सोय नसल्यास आपणच पुढाकार घेऊन तसे करू शकाल का?
मला व्यक्तिगतरित्या आपण नविन आलेले (ठरवलेल्या विषयावरील) कोणतेही पुस्तक पाठवत राहिलात तरी आवडेल.
आपल्या या मदतीचे स्वरूप आपण व्यवसायात बदलले व त्याबद्दल आकार घेतलात तर जास्त आवडेल!

(कदाचित, यासाठी मी आपल्याला एक क्ष रुपये वर्षभराचे म्हणून पाठवून ठेवू शकेन. किंवा दर महिन्यासही पाठवू शकेन, त्यात पोस्टाच्या खर्चासह जे काय त्यात बसेल, ते पाठवत रहा.)

मला आशा आहे की अनेक उपक्रमींना मराठीतील नवीन/जुनी पुस्तके हवी असतील तसेच अशी सेवा हवी असेल...

-निनाद

सोय व मर्यादा

http://mr.upakram.org/node/512 बघा.
शिपिंगने पाठवले तर दोन महिने लागू शकतात. हवाई मार्गाने पाठवले तर खूपच महाग जाते. पुस्तकाची किंमत कमी व कुरियर शुल्क मोठे. त्यांचे कडे बाहेरील देशातील मागणी खुपच कमी आहे.
मी चार्जेस विचारुन सांगतो.
प्रकाश घाटपांडे

फ्री ऑनलाईन पुस्तके ..

ही एक लिंक सापडली.. बरीच पुस्तके आहेत. अर्थात वेग-वेगळ्या विषयांवरची आहेत. कदाचित उपयोगी पडू शकतील...

जालावरील स्वामित्व हक्क नसलेली पुस्तके

ज्या पुस्तकांवर आता स्वामित्वहक्क कोणाचेही नाहीत अशा अनेक पुस्तकांची सूची व ती सर्व पुस्तके प्रोजेक्ट गुटेन्बर्ग वर आहेत. ती सर्व पुस्तके आपण जालावरून उतरवून घेवू शकतो. माझ्याकडे त्यांच्या पुस्तकांच्या दोन तबकड्या आहेत. जर उमक्रमींपैकी कोणाला त्यात रस असेल तर मी दोन्ही देऊ शकतो. या स्थळावर हा खजिना उतरवून घेण्याची सोय आहे. आपण CD किंवा DVD या माध्यमात ही पुस्तके उतरवून घेऊ शकतो.
या ठिकाणी अक्षरशः हजारोंच्या संख्येने पुस्तके उपलब्ध आहेत. बरीच इंग्लिश मध्ये तर काही इतर भाषांमध्ये आहेत. बरीच पुस्तके केवळ शब्दस्वरूपात (plain vanila TEXT) (हा त्यांचाच शब्द), तर काही HTML स्वरूपात आहेत.
नितीन

हा दुवा उपयोगी पडेल असे वाटते.

ग्रंथसंपदा हा दुवा कदाचित उपयोगी पडेल असे वाटते.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

छान विषय

कितीतरी न पाहिलेली पुस्तके कळली. प्रकाशरावांची यादी तर फारच भारी आहे:-) सर्वांचे आभार.

इथे माझ्याकडची काही पुस्तके देते -

१. प्रतिभा रानडे ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी राजहंस प्रकाशन
२. स. ह. देशपांडे काही आर्थिक: काही सामाजिक मौज प्रकाशन
३. गोविंद तळवलकर नवरोजी ते नेहरू मॅजेस्टिक प्रकाशन
४. दुर्गा भागवत खमंग पॉप्युलर प्रकाशन
४थे पुस्तक हे जुन्या मराठी पदार्थांबद्दलचे औदासिन्य जावे म्हणून लिहीलेल्या पाककृतींचा संग्रह आहे.

 
^ वर