पुस्तके इथेच का मिळू नयेत?

पुस्तके इथेच का मिळू नयेत?

अनेक दुर्मिळ पुस्तकांचे परीक्षण येथे अभ्यासू लेखक वाचक करत असतात. ही पुस्तके अनेकदा सहजतेने मिळत नाहीत. काही भारताबाहेरच्या लोकांना तर ही मिळणे अशक्यच होते. अशावेळी, उपक्रमावर परीक्षण आले तर तेथेच हे पुस्तकही का मिळू नये? उपक्रमाचेच एक 'उपस्थळ' असावे ज्यात ही पुस्तके विकत घेण्याची सुविधा मिळेल. (या साठीची गेटवेची जोडणी फार अवघड नाही, अनुताईंनी/शशांकराव यांनी यावर खुलासा करावा.)
यात नमुना प्रकल्प म्हणून वरदा बुक्सना विचारायला काय हरकत आहे? त्यांच्या पुस्तकांची सारीणी पण इथे देता येईल. त्यांच्याकडे अनेक दुर्मिळ म्हणावेत असे ग्रंथ आहेत. आणी त्यांचे संस्थळ पण नाहीये. तेव्हा त्यांना तंत्र मिळेल नि वाचकांना पुस्तके! वरदा बुक्स असेही पोस्टाने पाठवतातच ते तसेच ठेवून मागणी फक्त उपक्रमाच्या उपस्थळा मार्फत जाईल.

यात मला असे काही फायदे दिसले.
(या शिवायही असणारच आहेत आपणही सुचवा!)

  1. भारताबाहेरील मराठी वाचकांना मराठी पुस्तके उपलब्ध
  2. मराठी वाचकांना मराठी पुस्तके मिळण्याचे हक्काचे ठिकाण
  3. मराठी प्रकाशकांना पुस्तके निर्यात करण्याची एक छोटी का होईना पण संधी
  4. उपक्रमाला हे संस्थळ चालवण्याच्या खर्चा साठी काही पैसे
  5. अनेक देशांमधली महाराष्ट्र मंडळे यात सामील होवून खरेदी करू शकतील.

काय वाटते आपल्याला?

आपला
गुंडोपंत
(घाईघाईत प्रस्ताव टाकला आहे. काही चुका असल्यातर क्षमा करा!)

Comments

उत्तम प्रस्ताव

प्रस्ताव चांगला आहे, उपयोगीही आहे.
पण उपक्रमा सारखी संस्थळे स्वतःला यात गुंतवून घेऊ इच्छीत असतील की नाही याची शंका वाटते. उपक्रमरावांनीच खुलासा केल्यास बरे.
बाकी तपशीलवार योजना बनवण्यास आपण सर्व बोलघेवडे लोक सिद्ध आहोतच.
पुस्तके पोस्टाने पाठवायचीही गरज नाही, परवल-बद्ध (पासवर्ड-प्रोटेक्टेड्) पीडीएफ् फाइल उतरवून घेण्याची सोय केली की झाले. व परवल व्यनि ने पाठवायचा, पैसे मिळाल्यावर.
अर्थात् ह्याकर लोक काय कुठलेही कुलूप तोडतात म्हणे.
आजकालच्या जगात खरी सुरक्षित संचिका असू शकते की नाही याचा खुलासा युयुत्सूंसारख्या ह्याकर तज्ञांनीच करावा.

(पण कायहो, पुस्तके विकत घ्यायची म्हणजे मग आपल्या फुकट्या स्वभावाचे काय होणार?)

- दिगम्भा

उपक्रम

पण उपक्रमा सारखी संस्थळे स्वतःला यात गुंतवून घेऊ इच्छीत असतील की नाही याची शंका वाटते.
माझी खात्री आहे जर, प्रस्ताव योग्य असेल तर अशा प्रकल्पासाठी ही नवीन विचारांची पीढी मागे राहणार नाही!
बाकी ही पासवर्ड-प्रोटेक्टेड्) पीडीएफ् फाइल उतरवून घेण्याची सोय ची आयडिया झकास आहे...!
मला तर आवडली.

(पण मी स्वतः मात्र छान बाईंड केलेली पुस्तकेच वाचणे पसंत करतो...)

आपला
गुंडोपंत

असेच...

प्रस्ताव चांगला आहे, उपयोगीही आहे.

(पुस्तकप्रेमी) एकलव्य

इतकेच?

प्रस्ताव चांगला आहे, उपयोगीही आहे.

इतकेच ???
अजून काही?

आपला
(चक्क एकलव्यांचा फक्त 'पाच शब्दी प्रतिसाद' पाहून चकीत)
गुंडोपंत

आणखी पाच शब्द लिहिले आहेत!

पुस्तके विकत घ्यायला तयार आहे.

(तबकडीप्रेमी) एकलव्य

वा! आता

वा! आता एकदम ऍक्शन पॅक्ड प्रतिसाद!! पण परत पाचच शब्द बरं का!
कुठे आहेत ती पुस्तके नि तबकड्या!?
आपला
गुंडोपंत

पंत

पंत, आपला प्रस्ताव चांगला आहे. पण फुकटे सदस्य यात काड्या घालण्या शिवाय काही करू शकत नाहीत. आपण चर्चा करण्यापेक्षा प्रकल्प सुरू करा. सुरू करताना हा प्रकल्प म्हणजे गाजराची पुंगी आहे असे समजून केल्यास जास्त चांगले पडेल. ज्यांना खरच पटत असेल अथवा सहभागी व्हायचे असेल ते नक्किच मदत करतील. असे विचार अनेक कल्पक उपक्रमींच्या डोक्यात येत असतातच. पण प्रत्यक्षात येत नाहीत. ते बनून राहतात फक्त एक खयाली पुलाव.





मराठीत लिहा. वापरा.

प्रत्यक्षातही येईल!

चाणक्यराव धन्यवाद,
नेहमी प्रमाणेच उत्तम विचार करून प्रतिसाद!
पण
पण फुकटे सदस्य यात काड्या घालण्या शिवाय काही करू शकत नाहीत.
कळले नाही?

आपण चर्चा करण्यापेक्षा प्रकल्प सुरू करा.
नक्कीच आवडेल पण गुंडोपंताना कार्य सुरु करण्या आधी त्याचे सगळे गुणदोष तपासून पहावेत असे वाटते. शिवाय हे कार्य सुरु करण्याची साधने नि सोई सध्या आमच्या कडे नाहीत.

सुरू करताना हा प्रकल्प म्हणजे गाजराची पुंगी आहे असे समजून केल्यास जास्त चांगले पडेल.
अगदी मान्य हो! मनातले बोललात चणक्यराव! अर्थात हा दीर्घ कालीन प्रकल्प असेल. एकदा 'गेटवे आणी प्रकाशकांशी संधान' बांधल्यावर इतर काही करण्यासारखे नाहिचे!

असे विचार अनेक कल्पक उपक्रमींच्या डोक्यात येत असतातच. पण प्रत्यक्षात येत नाहीत. ते बनून राहतात फक्त एक खयाली पुलाव.

हे खयाली पुलावच खरा पुलाव कसा असावा हे सांगतात की नाही? खयालच आला नाही तर पुलाव कुठुन येणार?
येवू देत की कल्पना तर फुकटच येतात! काय फरक पडतो थोडे ब्रेन् स्टॉर्मींग केले तर?
खयाली पुलाव विकणे हा तर गुंडोपंताचा एकेकाळचा धंदा होता!. पण उपक्रमावर 'असण्यात आनंद' मिळतो आहे यामुळे धंदे की बात नच्छो!

मला वाटते पुर्ण आणी "प्रत्यक्षात येवू शकेल असे कालबंधीत व्यवसायाचे कागदावर आरेखन" करून मगच सुरुवात करणे योग्य असेही वाटते.

आपल्याला काय वाटते?
आपला
गुंडोपंत

याच बरोबर

नमस्कार,
वरील कल्पनेसोबतच मला अजून जोड-कल्पना आली की,
याच बरोबर मराठी गाणी, चित्रपट तबकड्या, नाटकांच्या तबकड्यापण मिळू शकतील! जसे की कर्वे याच्या जीवनावरील चित्रपटाचे परिक्षण वाचल्यावर युयुत्सुंना ती तबकडी लगेच विकत घेण्याचे ईच्छा होती पण 'कुठे घेणार'? हा प्रश्न.
याचाच अर्थ - ग्राहक आहेत पण विक्रेता नाही - ही व्यवसाय पोषक परिस्थीती!
याचा फायदा आपण घ्यायला नको का?
मला मान्य आहे की सुरुवात छोटी होईल. पण सुरुवात तर होईल!!

आता आशा आहे गुप्तांच्या आधी 'मराठी पुस्तके विकण्याचा प्रयत्न' करु या आपण ;)

काय म्हणता?
आपला
(खयाली पुलाव विक्रेता)
गुंडोपंत
(ही रसिका डॉट कॉम ला काँपिटीशन होते आहे का?)

बास का!?

आपण आमचे आणि उपक्रमरावांचे खाजगी विरोप-संवाद वाचता की काय ?
नाय न भो! आपल्याला नाय येत ना बाबा ते! आले तर् मग् काय काय प्रतिसाद टाकेल हा गुंड्या!

नीलम ऑडियो व्हीडियो अँड बुक्स फिलाडेल्फियाच्या चालकांना संपर्क साधायला एका परिचितांना सांगितले आहे. बघू काय होते ते.

अरे वा!

तुमचेच वाक्य (यातला पहिला शब्द तुमच्या साठी राखीव) 'ग्रेट माईंडस थिंक अलाइक' ;)

आपला
गुंडोपंत

हम्म!

नीलम वाले पूर्वी पुस्तक विकत असत पण ते त्यानी बंद केले. नंतर पुस्तक पंढरी म्हणून एक संकेतस्थळ होते ते ही आता बंद पडले आहे. मराठीवर्ल्ड् नी ही पुस्तके विकणे बंद् केले आहे. मराठी पुस्तक, मराठीबुक्स्, मराठी ग्रन्थ जत्रा अशी अनेक संकेतस्थळे निघून् का बंद पडली असावीत्?

पुस्त़के फारशी विकली जात नाही हे या सगळ्यामागचे कारण असेल का? गुंडोपत पुस्तक घेतील् यात शंका नाही पण असे किती गुंडोपंत असावेत्?
रसिक अजून् चालू आहे आणि मायबोलीवरही पुस्तके मिळत आहेत. कुणाला मायबोलीवर् किंवा रसिकवर् पुस्तके घेण्याचा अनुभव आहे का?

मायबोली

>बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात मायबोलीला विशेष पारितोषिक मिळाले, ह्याबद्दल अद्याप येथे कुणाचाही प्रतिसाद आला नाही ह्याचे नवल वाटते
मी मायबोलीवर बर्‍याच वर्षांपासून् जातो आणि माझे ते आवडते स्ंकेतस्थळ आहे. पण गेल्या काही वेळेस मी एकटाच मायबोलीबद्दल् इथे लिहिणारा आहे असे आढळले. उपक्रमरावाना ते कितपत रुचेल हे माहीती नाही म्हणून काही लिहिले नाही.

मला ते " Deja Vue" का काय ते इथल्या चर्चा वाचून वाटते आहे. मायबोलीची लोकप्रियता वाढू लागल्यावर ती व्यावसायिक द्रूष्ट्या कशी वाढवता येईल याबद्दल झालेल्या चर्चा अजुनही तिथे असतील. अशाच चर्चा मनोगतावरही झाल्याचे स्मरते.

मी पडलो पक्का भांडवलशहा. त्यामुळे काहीही करून उपक्रमरावानीदेखील व्यावसायिकता आणावी अशा मताचा मी आहे.

खरं आहे

मी पडलो पक्का भांडवलशहा. त्यामुळे काहीही करून उपक्रमरावानीदेखील व्यावसायिकता आणावी अशा मताचा मी आहे.

मला ही भांडवलशाही मते पटतात. पण हे तुमचे विधान मर्यादीत स्वरूपात मान्य! मर्यादीत म्हण्तोय कारण तुम्ही "काहीही करून" असे लिहिले आहे.

असे नसावे कारण प्रत्येकच गोष्ट संपुर्णपणे व्यावसायीकच पाहीली तर मग कशातच काही अर्थ रहात नाही. आणी जगात सगळीकडेच व्यावसायीकता नसते/नसावी. जसे अनिस चे कार्य त्यात व्यावसायीकता नाही/नसावी. अनेक एन जी. ओ. त्यांचा व्यावसायीक हेतु नसतो. पण पैसे येत असतात. त्याचा मार्ग इतरांनी केलेली मदत असे असते.
पण तरीही किमान संस्थळ चालते राहण्याइतके तरी पैसे संस्थळाने मिळवावेत. त्यासाठी काही उपाय योजणे आवश्यक.
मी पुस्तके विकण्यासंबंधी म्हणालो तेंव्हा घाटपांडे साहेबांनी परिक्षण लिहिले होते. हे तसे अभ्यासूंना दुर्मीळ पण न विकले गेलेले पुस्तक त्याक्षणीच घेण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली पण कुठे घेणार हा प्रश्न? शिवाय वरदा बुक्स कडे याची तंत्रक्षमता नाही असेही कळले. मग 'ही जोडी लावणे शक्य झाले तर बरे' असे वाटून हा प्रपंच केला. आणी त्यामुळे अनेक दिवसांपासून मनात असलेल्या हे स्थळ दीर्घकाल कसे चालणार या शंकेचे उत्तरही मिळेल या आशेने.

असो, आपले अजूनही विचार येवू देत. माझे विचार पटण्यासारखे नसतील तर 'का' नाहीत तेही सांगा. अजून कल्पना असतील तर त्याही येथे द्या. चर्चा आवडेल!

आपला
गुंडोपंत

मायबोली, बृहन्महाराष्ट्र मंडळ व प्रमाणपत्र

मायबोली संकेतस्थळ व चालकांचे अभिनंदन

मात्र बृहन्महाराष्ट्र मंडळाने मायबोलीला दिलेले प्रमाणपत्र इंग्रजीत कशासाठी? बृहन्महाराष्ट्र संचालकांना किंवा मायबोलीचालकांना मराठी येत नाही का?

संचालकांना येत असावे, सदस्यांचे माहित नाही.

बृहन्महाराष्ट्र मंडळाने मायबोलीला दिलेले प्रमाणपत्र इंग्रजीत कशासाठी? बृहन्महाराष्ट्र संचालकांना किंवा मायबोलीचालकांना मराठी येत नाही का?

मायबोलीबद्दल माहित नाही, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संचालकांचे माहित नाही परंतु बृममंच्या अनेक सदस्यांना मराठी येत नसावे किंवा त्यात स्वारस्य नसावे. हा विनोद नाही. आमच्या इवल्याशा ममंमध्येही भाषणे इंग्रजीतून करण्याची प्रथा होती. ती मराठीत बदलावी असा प्रस्ताव मांडल्यावर अनेकांची फॅ फॅ उडालेली आठवते. ज्या लोकांना आपल्या भाषेतील ४ शब्द बोलण्यास त्रास होतो त्यांना मराठी वाचणे किती त्रासदायक असेल याचा विचार करा. ;-)

अरे वा!!!

ती मराठीत बदलावी असा प्रस्ताव मांडल्यावर अनेकांची फॅ फॅ उडालेली आठवते . ज्या लोकांना आपल्या भाषेतील ४ शब्द बोलण्यास त्रास होतो त्यांना मराठी वाचणे किती त्रासदायक असेल याचा विचार करा.

म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणसांप्रमाणेच झालं. ;-)

उपक्रमाशिवाय

मला जमेलतसे मी आपल्या शंकांना उत्तर देत आहे.

येथिल पुस्तक विक्री ही या संपुर्ण उपक्रमाचा एक भाग आहे.
त्यामुळे पुस्तके विकणे आणी विकली गेलीच पाहिजेत हा हट्ट नाही.
त्याचा फायदा हा की, दीर्घकालीन योजना बनवणे शक्य आहे.
एखादे संस्थळ जेंव्हा खूप कालावधी पर्यंत एकच कामकरत राहते तेंव्हा ती त्याची ओळख बनु शकते.
अशी ओळख उधार पत्र जालावर वापरायला विश्वास देवू शकते असेही वाटते.
हा विश्वास वाटण्यासाठी उपक्रमाचे 'इंटरॅक्टीव्ह' स्वरूप तुम्ही उल्लेखलेल्या स्थळात बहुदा नसावे.
शिवाय,
सदस्यच पुस्तक परिक्षणे करणार आहेत त्यामुळे 'वाचकांनी वाचकांना सुचवलेले' हे सूत्रही कदाचीत काम करू शकेल.

आपला
गुंडोपंत

धंद्याची गोष्ट

>त्यामुळे पुस्तके विकणे आणी विकली गेलीच पाहिजेत हा हट्ट नाही.

माझ्या मते काहीही विक्री करणार्‍याने असा ह्ट्ट (नव्हे जाणीवपूर्वक प्रयत्न) केला पाहिजे तरच बाजारात टि़कून राहता येईल. वर लिहिलेले तळिराम यांचे काळाच्या अगोदर असण्याचे विचार पटतात.

हा विश्वास वाटण्यासाठी उपक्रमाचे 'इंटरॅक्टीव्ह' स्वरूप तुम्ही उल्लेखलेल्या स्थळात बहुदा नसावे.
हे कारण जास्त अचूक वाटते. सहमत

हम्म!

नीलम वाले पूर्वी पुस्तक विकत असत पण ते त्यानी बंद केले. नंतर पुस्तक पंढरी म्हणून एक संकेतस्थळ होते ते ही आता बंद पडले आहे. मराठीवर्ल्ड् नी ही पुस्तके विकणे बंद् केले आहे. मराठी पुस्तक, मराठीबुक्स्, मराठी ग्रन्थ जत्रा अशी अनेक संकेतस्थळे निघून् का बंद पडली असावीत्?

पुस्त़के फारशी विकली जात नाही हे या सगळ्यामागचे कारण असेल का? गुंडोपत पुस्तक घेतील् यात शंका नाही पण असे किती गुंडोपंत असावेत्?
रसिक अजून् चालू आहे आणि मायबोलीवरही पुस्तके मिळत आहेत. कुणाला मायबोलीवर् किंवा रसिकवर् पुस्तके घेण्याचा अनुभव आहे का?

मायबोलीवर पुस्तके घेण्याचा अनुभव

जीतेन उत्तम शंका आहेत.

अनुभव
मायबोलीवर जेमतेम १०० पुस्तके पण नाहीत.
काय घेणार?
तरी ही त्यातली काही मी घ्यायला गेलो तर साईट हँग झाली
२ प्रयत्न आणी प्रत्येकवेळी १० मिनिटे वाट पाहून नाद सोडला.
नीलम मध्ये पुस्तकेच नाहीत, फक्त ७ संगीत विषयक पर्याय आहेत.
रसिक वर मात्र काही केले नाहिये अजून....पुस्तके मात्र बरीच आहेत तिथे!

उपक्रमाला दुर्मीळ पुस्तके असा हे पर्याय ठेवता येईल... काय वाटते?

आपला
गुंडोपंत

धन्यवाद

अनुभव इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद.

मायबोलीवरील खरेदीचा अनुभव

आज मी स्वतः मायबोलीवर खरेदी केली. मागवलेल्या गोष्टी आल्या की ते कळविनच.
३ गोष्टी मागवल्या
परीची शाळा : २५ $
Play n Learn marathi Toddler -12.99 $
Play n Learn marathi Level 1- 12.99 $
------------------------------
Shipping+handling- 3.0 $
Total 53.98 $

पैसे ऑनलाईन क्रेडीट कार्डने भरले.
ओळखीतल्या काही लहान मुलांना मराठीची ओळख करून् देणारी ही भेट द्यावी म्हणतो.

आवडलेले:
-मला कुठेही गुंडोप्ंतांसारखा हळुपणा जाणवला नाही. संकेतस्थळ फास्ट वाटले
-लगेच अतीशय Professional Invoice विरोपाने आले.
-एकूण सगळी प्रक्रीया सोपी वाट्ली. मला इतर संकेतस्थळांवर खरेदी करण्याचा अनुभव आहे म्हणून असेल् कदाचित.
-१ वस्तू विकत घेताना त्याच्याशी निगडीत् इतर् वस्तुही लगेच् दिसल्या.
-मला प्रवेश करून् माझ्या मागणीची प्रक्रिया (shiping status) कुठपर्यत आली आहे हे कळू शकते.
-त्याच्या कडे नसले तरी तुम्हाला हवे असलेले एखादे पुस्तक मागवून् घेण्याची सोय आहे. ती मागणी केल्यावर् ते पुस्तक शोधून केव्हड्याला पडेल ते मायबोली तुम्हाला कळवेल आणि ते घ्यायचे का नाही ते ऐच्छीक आहे, घेतलेच पाहिजे असे नाही. पण् मी अजून् ही सुविधा वापरलेली नाही.

न आवडलेले:
- नावनोंदणी केल्याशिवाय shipping charges कळत नाहीत्. पण त्यातल्या त्यात् बरीगोष्ट म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्य्ंत (shipping charges पसंत पडले नाहीत तर ) मागणी रद्द करता येते.
-मायबोली/हितगुजवरचे नाव इथे चालत नाही. परत वेगळी नाव नोंदणी करावी लागते.
-नुकत्याच पाहिलेल्या गोष्टी (तुमच्या cart मधे घातल्या नसल्या) तर् लक्षात ठेवल्या जात नाही. Amazon सारखे recently viewed item अशी सोय हवी होती.
-काही गोष्टिंना खूप shipping charges होते तर् काहीना अगदी कमी. मला सुरुवातीला एकदम २५ $ shipping charges होते म्हणून् मी मागणी रद्द करणार होतो. पण एक पुस्तक रद्द केल्यावर् एकदम ते ३ $झाले.

मी हा अनुभव मायबोलीच्या Support ला कळवला आहे. पाहू ते काय म्हणतात.

मायबोलीचे उत्तर

मायबोलीचे उत्तर :
"तुमच्या सुचनांबद्दल धन्यवाद.
-तुम्ही नावनोंदणी केल्याशिवाय तुमचे ठिकाण कळत नाही त्यामुळे पाठवायचा खर्च सांगता येत नाही. तुमची नोंदणी आता झाली असल्यामुळे आता तुम्हाला तो खर्च लगेच बघता येईल.
-प्रत्येक वस्तू ही वेगवेगळ्या ठिकाणाहून् पाठवली जाऊ शकते. तुमचे रहाण्याचे ठिकाण आणि पाठवण्याचे ठिकाण यावरून shipping ची किंमत ठरते. तुम्ही मागवलेले पुस्तक एकतर जड असेल् किंवा भारतातून पाठवले जाणार असेल् त्यामुळे एकदम Airmail चा खर्च त्यात आला असेल. तसेच shipping charges हे टप्प्यानी वाढतात त्यामुळे तुमचे एकूण वजन पुढच्या टप्प्यात गेले असावे. याची दुसरी बाजून् म्हणजे तुम्ही अजून एक्-दोन गोष्टी मागवल्या तरी त्याना जास्तिचा खर्च लागतोच असे नाही. ते सगळे वजनावर् आणि वस्तू कुठुन पाठवली जाते यावर अवलंबून आहे.
- पुन्हा परत् नोंदणी करावी लागली याबद्दल दिलगीर आहोत. खरेदी करताना खरी खाजगी माहिती द्यावी लागते ती सगळ्यानाच हितगुजवर् लिहिताना दिसावी असे सगळ्या ग्राहकाना वाटत नाही . तांत्रिक कारणामुळे सध्या एकच नाव पण अनेक व्यक्तिरेखा हे शक्य नाही म्हणून् ही अडचण आहे आणि ती दूर् करण्याचा प्रयत्न करतो आहोत."

हीच अडचण


प्रत्येक वस्तू ही वेगवेगळ्या ठिकाणाहून् पाठवली जाऊ शकते. तुमचे रहाण्याचे ठिकाण आणि पाठवण्याचे ठिकाण यावरून shipping ची किंमत ठरते. तुम्ही मागवलेले पुस्तक एकतर जड असेल् किंवा भारतातून पाठवले जाणार असेल् त्यामुळे एकदम Airmail चा खर्च त्यात आला असेल. तसेच shipping charges हे टप्प्यानी वाढतात त्यामुळे तुमचे एकूण वजन पुढच्या टप्प्यात गेले असावे. याची दुसरी बाजून् म्हणजे तुम्ही अजून एक्-दोन गोष्टी मागवल्या तरी त्याना जास्तिचा खर्च लागतोच असे नाही. ते सगळे वजनावर् आणि वस्तू कुठुन पाठवली जाते यावर अवलंबून आहे.


हिच अडचण वरदा बुक्सची आहे. चार आण्याची कोंबडी आणी बारा आण्याचा मसाला!
प्रकाश घाटपांडे

तरी ज्यांना हवे आहे ते घेतीलच!

तरीही रुपयाची कोंबडी ज्यांना हवी आहे ते घेतीलच.

वरदानेच का नाही बनवली साईट अजूनही?!
इतकी चर्चा होते आहे त्यांना कळले नाही का? एकदा स्थळ बनवल्यावर नंतर फक्त नवीन पुस्तकांची मु़खपृष्ठ देण्याशिवाय काय करायचे आहे? तिथे सर्व पुस्तके दिसावीत, प्रती असल्यास पाठवताच येतील. शिवाय ऍमेझॉन प्रमाणेच जुनी पुस्तकेही विकता येतील. खपले तर फायदा, नाही खपले तर स्थळाचे मामूली भाडेच तर द्यायचे आहे. शिवाय वरदाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही आहातच उपक्रम नि मनोगतावर! नाही का?
रसीकवरच्या पुस्तकांच्या किमती पहा म्हणजे अंदाज येईलच. "दुर्मीळ पुस्तके" असे स्पेशलायझेशन होईल. काय म्हणता? किंवा रसिक आणी मायाबोली बरोबरच भागी केली तर कसे?

ते सोडा!!!, घाटपांडे साहेब, तुम्हीच का नाही करत हे? मी काय हवे नि काय नको आणी कसे हवे ही मदत(?) करायला तयार आहे! तंत्राची मदत शोधा नक्कीच मिळेल!

(च्यामारी!!! मी तर बाजूच बदलली की राव चर्चेत!?)

आपला
(सल्ला देवून गार करून टाकणारा)
गुंडोपंत

काही बोलायचे नाही !

गुंडोपंत,
पुस्तके किती विकले जातील की नाही ही शंका खरी असावी,त्यामुळेच संपादकीय मंडळ या प्रकरणात लक्ष घालत नाही असे वाटते.खरे तर त्यांनी एकदाच सांगुन टाकावे की आम्हाला साइड बिझीनेस करायचा नाही.आहे त्या परिस्थितीत माहितीदेवाण घेवाणीचे हे संस्थळ उत्तम चालवायचे आहे. (जे सध्या चालतेच आहे) जर तसे ठरले असेल तर मग या सर्व प्रश्नांना,प्रतिसादांना अर्थ उरत नाही .किंवा काही बोलायचे आहे,पण बोलणार नाही.देवळाच्या दारात भक्ती तोलणार नाही.असे असावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर