गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व उपक्रमावरील सदस्यांना हार्दिक शुभेच्छा !
अ. गुढीपाडवा असा साजरा करा !
१. हिंदूंचा नववर्षारंभदिन गुढीपाडवा
२. गुढी उभारण्याची पद्धत
३. धर्मध्वज पूजा-विधी
४. कडुनिंबाचा प्रसाद
५. संवत्सर पूजा
आ. गुढीपाडव्याचे महत्त्व
१. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व
२. गुढीपाडवा व गुढीपाडव्याच्या वेळी वापरण्यात येणार्या वस्तूंचे महत्त्व
३. गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !
४. नवी सृष्टी निर्माण करूया !
५. खरा गुढीपाडवा !
थोडक्यात, पण महत्त्वाचे...
१. गुढीपाडव्याचा भावार्थ
२. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करतांना `माझ्यात गर्व निर्माण होऊ देऊ नका',असा वर मागणे
३. हिंदूंनो, तुमची सिंहगर्जना सर्वांना ऐकवा !
४. शुभेच्छा संदेश !
विशेष माहिती
१. बोधचित्र
२. शुभेच्छापत्र पाठवा
गुढी उभारण्याची पद्धत
गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी. उजवी बाजू म्हणजे जिवाची कार्यरत स्थिती.
पद्धत : अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्त होते.
इ. गुढी आपल्या देहातील सुषुम्नानाडीचे प्रतिनिधित्व करत असल्याने ती जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)
प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्या शक्तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्या चरणी प्रार्थना !
अधिक माहीती व साभार : गुढीपाडवा विशेषांक (मराठी) / गुढीपाडवा विशेषांक (इंग्रजी)
Comments
श्रीखंड
गुढीपाडव्याला श्रीखंड खाणे आवश्यक आहे. वरील चेकलिस्ट मध्ये ते टाकणे आवश्यक आहे असे वाटते.
श्रीखंड खाल्ले नाही तर आम्हाला गुढीपाडवा साजरा केल्यासारखे वाटत नाही.
सर्किटशेठ
पितळेचा तांब्या हा काय प्रकार आहे. तो पितळेचा की तांब्याचा?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
येथील सदस्यांपैकी ज्यांना हव्या असतील त्यांना वर्षप्रतिपदेच्या शुभेच्छा!!
अव्हेर -
वरील लेखाशी आणि इतरांच्या प्रतिक्रियांशी शुभेच्छुक सहमत आहेच असे नाही.
लेख
नमस्कार,
पाडव्याचा हा
लेख माहितीपूर्ण आहे. तसेच मुद्देसूदही आहे.
आपल्या लेखनाच्या शैलीतील बदल हा स्पृहणीय आहे.
या शिवाय ध्वनिचित्रपट देवून मल्टीमिडियाचा वापरही आपण करत आहात हे आवडले.
बाकी कडुनिंबाचा पालाच या वेळी मिळाला नाही. पण काही हरकत नाही;
मी, महीन्यातून एकदा का होईना पण त्याचा रस पीत असतो. :)
आपला
गुंडोपंत
काही शंका
१. हिंदूंचा नववर्षारंभदिन गुढीपाडवा
मग गुढी फक्त महाराष्ट्रातच काउभारली जाते? उर्वरीत भारतात का नाही?
२. गुढी उभारण्याची पद्धत
हिंदू धर्मात कोणतीही पालथी गोष्ट अशूभ मानली जाते मग शुभ मानला जाणारा तांब्या/कलश वर्षाच्या पहील्याच दिवशी पालथा का असावा? (उदा.हिंदू धार्मीक विधी करताना पालथी मांडी घालून बसलेले चालत नाही.)
माझ्या या साध्या सोप्या प्रश्नांची आपल्याकडे उत्तरे असतीलच अशी आशा बाळगतो.
दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे.
-इनोबा म्हणे (inoba.blogspot.com)