वारूणी

मित्रहो(आणि मैत्रिणींनो)
प्राचीन भारतीय इतिहासात ठिकठिकाणे सोमरसाचे उल्लेख येतात. धनंजयाने आधीच्या चर्चेत दिलेले सुभाषितही यातलेच एक.
या सोमरसाचे प्राशन मनुचे पुत्र - मानव करीत दिनुचे पुत्र दानवही करीत आणि तसेच देवही करित असत.
राक्षसांपैकी मात्र सगळेच याचे प्राशन करत नसत, जसे की 'असूर' ज्यांना सूरा प्राशन मान्य नव्हते.

रामा व सीतेने शरयु ओलांडल्यावर वनात प्रवेश करतांना नदी किनारी बसून मांस भक्षण केले व काही दारू प्यायली असाही उल्लेख रामायणात आहेच. (यात बिचारा लक्ष्मण काय करत होता कुणास ठावूक? आशा आहे की त्याला नुसतीच पात्रे विसळायला लावत नसतील आणि थोडीशी दारू यांनी त्यालाही शिल्लक ठेवली असेल!)

राम व सीता क्षत्रीय होते म्हणून त्यांना दारू पीणे वर्ज्य नव्हतेच.
परंतु ब्राह्मणही यज्ञात सोमरस प्राशन करीत असत. म्हणजे थोडक्यात दारू कुणालाच वर्ज्य नव्हती असे म्हणायला हरकत नाही. इतरांची माहीत नाही पण हे पीत होते तर ते पीतच असणार!
या शिवाय अनेक ठिकाणी सोम रस प्राशन करणारे प्रेमी वगैरे दगडात कोरलेली शिल्पेही दिसून येतात.
चरकानेही सोमरस कसा बनवावा याचे विवेचन केले आहे असे म्हणतात. मी स्वतः चरक संहीता कधी वाचलेली नाही. त्यामुले त्यातली सत्यासत्यता कधी तपासता आली नाही.

या सगळ्यातून एक गोष्ट निश्चित पणे लक्षात येते की प्राचीन भारतात जर राजे व सम्राट सोमरस प्राशन करत असतील तर उत्तम प्रतीच्या दारूचे उत्पादन होत असले पाहिजे.

तर
१. हे सोमरस किंवा सूरा बनवण्याचे शास्त्र कुठे लुप्त झाले?
२. केंव्हा लुप्त झाले?
३. इतकी चांगली गोष्ट का लुप्त झाली असावी?
३. जर सोम रस बनवण्याची माहीती असेलच तर ती कोणत्या ग्रंथात आहे?
४. चरक संहीतेत असेल तर मग ती रीत/कृती कुणी येथे देईल काय?
५. चांगल्या सोमरसाची लक्षणे काय?
६. अजून आपल्याला प्राचीन सोमरसा विषयी काही माहीती असेल तर नक्की द्या.

(आवांतर - एक अनुभव, द्राक्षापासून दारू बनते या माफक माहीतीवर मी आमच्या नाशिक ची रसदार मधूर द्राक्षे ' मुरायला घातली' [त्याला आमची ही सडायला घातली म्हणायची ती गोष्ट वेगळी!] त्यात काही साखरही घातली. पण महीना भर वाट पाहूनही त्याची दारू झाली असे काही वाटले नाही. त्याचा इतका भयंकर वास सुटला की आमच्या हीने मी एकदा घरी नाही असे पाहून, ते सगळे मोरीत ओतून दिले. वर "या वयात कसले उद्योग सूचतात" वगैरे वगैरे - सूज्ञास अधिक सांगणे न लगे!

सोमरस बनवण्याच्या कृतीमध्ये आपली काही तरी चुकते आहे हे माझ्या लक्ष्यात आले होते. मग मी आमच्या एका सूत्रधारा मार्फत गंगेच्या वरच्या भागात असलेल्या 'खास पहिल्या धारेच्या ठिकाणी' संधान बांधले. पण त्यांची पद्धत व वापरायची साधने व मिश्रणे पाहून सोमरस न प्यायलेलाच बरा असे वाटायला लागले.

शिवाय त्या 'खास पहिल्या धारेच्या ठिकाणच्या लोकांना' आता आपल्याला 'कांपिटिशन' येतेय की काय अशीही शंका यायला लागली! त्यांची आणि पोलिसांचे समजूत घालता घालता माझ्या नाकी नऊ आले. दारू तेथे पोलिस हे मात्र अगदी सत्य आहे. परत पोलिस मला त्या 'खास पहिल्या धारेच्या ठिकाणी' असलेल्या लोकांचा आतल्या गण-गोताचाच माणूस समजायचे, अणि "काय आजकालचे सुशिक्षित लोक... " असे पालूपद लावायचे.
शेवटी माझ्या एक वकील मित्राने हवालदाराला 'घरच्या घरी स्वतःसाठी दारू बनवून प्यायला कायद्याची ना नाही' हे जरा 'काय द्या च्या भाषेत' समजावले तेंव्हा कुठे ते प्रकरण मिटले! दोन माहीने भलताच त्रास हो!

पण तरी माझी प्राचीन सोमरस कसा असावा कसा बनवावा या माहीतीची तहान काही भागलेली नाही. आशा आहे आपण काही मदत कराल!)

लेखनविषय: दुवे:

Comments

सोमरस!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
बहुदा सोमवारी पिण्याचा रस(कोणत्याही फळाचा) म्हणून सोमरस असे म्हणत असावे. इतर वार पिण्यासाठी निषिद्ध असावेत.(ह.घ्या)

कामाचा

कामाचा
पहिलाच दिवस 'पिवून सुरुवात करण्याची कल्पना' फार उत्तम आहे.
फार आवडली!

आपला
गुंडोपंत

द्राक्षापासून दारू.

(आवांतर - एक अनुभव, द्राक्षापासून दारू बनते या माफक माहीतीवर मी आमच्या नाशिक ची रसदार मधूर द्राक्षे ' मुरायला घातली' [त्याला आमची ही सडायला घातली म्हणायची ती गोष्ट वेगळी!] त्यात काही साखरही घातली. पण महीना भर वाट पाहूनही त्याची दारू झाली असे काही वाटले नाही.--इति गुंडोपत.
द्राक्षापासून दारू कशी बनवायची याची सविस्तर माहिती वाइनमेकिंग डॉट कॉम या स्थळावर आहे. मला वाटते दैनिक सकाळचे एक भावंड दैनिक ऍग्रोवन(Agrowon)ने द्राक्षे पिकवणार्‍या शेतकर्‍यांसाठी एक वारुणी विशेषांक काढला होता. --वाचक्‍नवी

प्राचीन सोमरसा विषयी काही ऐकीव माहीती.

प्राचीन सोमरसा विषयी काही ऐकीव माहीती.

सोमरस म्हणजे दारू नव्हे असे ऐकल्याचे स्मरते आहे. महिन्यातल्या एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट वेळी (बहुधा पौर्णिमेच्या रात्री, पण निश्चित आठवत नाही. क्षमस्व.) एका विशिष्ट झाडाच्या पाल्याचा रस काढून तो एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट प्रमाणात प्राशन केला तरच तो सोमरस असे ऐकले आहे. त्याचे गुण सात्त्विक आणि औषधी असतात असेही ऐकले आहे. तो प्राशन करण्याची विशिष्ट वेळ टळून गेल्यानंतर त्यामध्ये तामसी गुणांचे वर्धन होत असल्याकारणे तो फेकून द्यावा असेसुद्धा ऐकले आहे. सोमरस आणि सुरा हे वेगळे, आणि दोहोंची निर्मिती वेगळ्या पद्धतीने होत असे वाचल्याचेदेखिल स्मरते आहे.

हैयो हैयैयो!

म्हणजे

म्हणजे
आपल्या नीरे सारखे.
उशिरा कडे नीरा प्यायलात तर ती नीरा नसून ताडी असते. आणि मस्त चढते सुद्धा!

तसेच हे सोमरसाचे असावे.
असो, आपली माहीती महत्वाची चांगली वाटली.
पण नक्की प्राचीन 'दारू ' कोणती?

आपला
गुंडोपंत

पहिल्या धारेची

नाशिक /वणी भागातल्या आमच्या बिनतारी मित्राला मी मोहाची (मोहाच्या फुलांपासून बनवलेली) पहिल्या धारेची पेशल आदिवासींनी बनवलेली दारु आणायला सांगितली होती. एक दिवस त्याने एक कॆन बिनतारी सामानासोबत पाठवला. दिसायला अगदी पाण्यासारखी होती. ही काय दारु झाली? आम्ही गप्पा मारत ती घेतली. मग रात्री गार हवेत जे सु ऽऽम चढली.
देव पितात तो सोमरस, राक्षस पितात ती दारु, मानव पितात त्याला मद्यच म्हणावे. कारण तो मर्कटाचा वंशज.
गुंडोपंतांचे सहा मुद्दे दीर्घकाळ मनात रेंगाळत होतेच. आयुर्वेदातील आसवे / आरिष्ट ही मला वाईनच असतात अशी माझी समजूत आहे.
प्रकाश घाटपांडे

सोमरस

म्हणजे दारु नव्हे (म्हणजे ज्यात धान्य किंवा फळे आंबून आल्कोहल तयार होते ते नव्हे) हे निश्चित.

सोम नामक वल्लीस दोन दगडांच्या मधे ठेचून त्यातून निघणारा पातळ दुधाळ रस गाळून सोमयागात वापरतात. त्या कृती वैदिक वाङ्मयात तपशीलवार आहेत, पण सोम म्हणजे नेमकी कुठली वनस्पती याचे उत्तर नाही.

पारशी लोक त्यांच्या यज्ञात होम किंवा हाओम नावाच्या वनस्पतीचा रस वापरतात - तो सोमच असावा असा कयास जवळजवळ नक्की करता येतो. (आवेस्त्यातल्या भाषेत "ह" आणि वैदिक भाषेत "स" एकमेकांच्या ठिकाणी दिसतात. उदा : आवेस्त्यातले अहुर = वेदांतले असुर.) परंतु भारतातल्या पारशांकडूनही त्या वनस्पतीची उपयुक्त माहिती मिळत नाही.

ईराण/मध्य आशिया भागात "हूम" नावाची वनस्पती मिळते (एफेड्रा जातीची), ती होम/सोम असल्याबद्दल काही लोकांना खात्री वाटते, पण याबद्दल एकमत नाही. एफेड्राचे परिणाम ऋग्वेदात सोमाचे जे शरिरावर/मनावर परिणाम होतात, त्यांच्याशी मिळतेजुळते आहेत असे काही लोकांचे मत आहे. सोमरसाच्याबद्दल ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत. त्या सूक्तांत सोमाच्या मुळे होणारे परिणाम जसे दिले आहेत, त्या प्रकारचे तपशीलवार परिणाम करणारी वनस्पती भारतात सापडत नाही.

आवडेल

सोमरसाच्याबद्दल ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत.
शक्य असल्यास यावर अधीक माहीती, उदाहरणे असे विवेचन आवडेल.

त्या सूक्तांत सोमाच्या मुळे होणारे परिणाम जसे दिले आहेत, त्या प्रकारचे तपशीलवार परिणाम करणारी वनस्पती भारतात सापडत नाही.

अशी वनस्पतीच भारतात नाही?
या विधानाला काही संशोधनाचा संदर्भ वगैरे?

सोमरस याशिवाय सूरा/दारू/मद्य म्हणून काही पेय होते की नाही हे पण सांगा.

आपला
गुंडोपंत

ऋग्वेदात-

सोमरसाला आवाहन करणार्‍या ऋचा आढळतात.
सोम किंवा हाओम या पाने नसलेल्या तुरकाटीसम वनस्पतीचा ओल्या फांद्या (ट्विग्ज) घेऊन त्याला (म्हणजे सोमाला) प्रसन्न करण्याच्या ऋचा म्हणत कुटायच्या (अथवा वाटायच्या). त्यात थोडे थोडे बकरीचे दूध मिसळत रहायचे आणि तयार होणारा द्रव बकर्‍याच्या लोकरीने तयार केलेल्या (साडेतीन हात??) लांब (उभ्या बांधलेल्या) धाग्यावरून (ताम्र??) पात्रात सावकाश ओतायचा - असा तपशील सोमरसाच्या कृतीत वाचलेला आठवतो. (बहुतेक संदर्भ - प्रस्तावना : ऋग्वेदाचे मराठी भाषांतर : सिद्धेश्वरशास्त्री चित्राव)
शिवाय त्याचे छायाचित्रही विकीवर आहे. यापेक्षा वेगळे कृष्णधवल छायाचित्र एका पुस्तकात आहे. ते देण्याचा प्रयत्न करीन.

soma or haoma from Wiki commons
soma or haoma from Wiki commons

झ्याक!

हे तर झ्याक काम झालं.
वा विसुनाना, तुम्हाला इतकी माहीती आहे.
तुम्ही बनवून पाहीला आहे का हो कधी हा सोमरस?

'या सारख्या' वनस्पती मी मागे मनमाडजवळ बर्‍याच पाहिल्या होत्या.
बहुतेक अनकाई च्या अंगठ्या डोंगरावर जातांना.
आता परत एकदा जावून मिळवल्या पाहीजेत.
सोमरसाला आवाहन करणार्‍या ऋचा म्हणणारे भटजी पण पैदा होतील त्याचे पण काही नाही.

फक्त बकर्‍याची लोकर कुठून मिळवायची हा प्रश्न उरतोच.
मेंढी वगैरे ठीक... पण "बकर्‍याची लोकर"?
काय भयंकर वास येणार त्याला?
त्या वासापाई तर मी मेलेला म्हणजे त्याचे मटन झाले आहे
असाच बकरा आजवर पसंत करत होतो.

पण ठीक आहे हे पण सही... नसली लोकर तर दाढी तर असेल ना बकर्‍याची ;)

आपला
आशा वादी
गुंडोपंत

बकरा-

'अजापुत्र' (इंग्रजी -सन ऑफ अ गोट ) या अर्थी. मेंढा असाही अर्थ चालेल.


>>वा विसुनाना, तुम्हाला इतकी माहीती आहे.
माहिती म्हणजे काय आहे, (खर्रेखर्रे सांगू का?) आम्ही मदिराप्राशनाचे आपण दिलेले समर्थन खूप पूर्वीच शोधले आहे!! मदिरेला विरोध करणार्‍या कर्मठ लोकांची मते खोडून काडण्यासाठी सोयीचे पडते म्हणून.
आपल्याला काय? महाजनो येन गतः सः पंथः! वैदिक सनातन धर्माचे अध्वर्यु करत होते म्हणून आम्हीसुद्धा सुरापान करतो.
असे बघा, विवेकानंदही तंबाखू वापरत होतेच की नाही............. असो. मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळाले असेलच! ;)

>>तुम्ही बनवून पाहीला आहे का हो कधी हा सोमरस?
नाही हो, हे मनमाडचे माळ वगैरे पायी तुडवणे भारीच अवघड हो!
त्यापेक्षा आपल्याला 'यस पापा' म्हणणार्‍या पादचार्‍याने बनवलेली सकाट देशातील विष-की वारुणी मिळाली की झाले. (:))

हा हा हा!!!

आम्ही मदिराप्राशनाचे आपण दिलेले समर्थन खूप पूर्वीच शोधले आहे!! मदिरेला विरोध करणार्‍या कर्मठ लोकांची मते खोडून काडण्यासाठी सोयीचे पडते म्हणून.

आपण तर जाणते आहात. योगी पुरुष आहात या विषयी आता माझ्या मनात शंकाच उरलेली नाही! :))
आपण ही 'चालणार्‍याची' वाट धरून
जी काही वाटचाल केली आहे ती
वाचून गुंडोपंतांना त्यांचा म्हसोबाच्या जत्रेत हरवलेला लहान पणीचा दोस्तच भेटला की काय असे वाटले. :))))

आपला
जुनाच दोस्त
गुंडोपंत

सुरा

सोमरसाच्या मानाने वेगळी आणि कालमानाने उशिरा निर्माण झालेली दिसते.
हे पहा.

वा

वा वेगळाच दुवा!
वाचतोय.
पण हे प्रकरण अवघड दिसते बनवायला...
च्यामारी वाघा सिंहाचे केस कुठून आणायचे हो?
मागच्या वेळी पोलिस मागे लागले होते आता वनखाते लागायचे! :))

आपला
चिंतीत
गुंडोपंत

सोमरस आणि सुरा

वाजपेय आणि अग्निचयन या दोन्ही प्रकारच्या यज्ञांत सोमरस आणि सुरा यांच्या आहुती देत, यावरून श्री. धनंजय सांगतात त्याप्रमाणे ही दोन पेये वेगळी आहे, हे पटेल. सौत्रामणी यज्ञात या आहुती तर देतातच पण अतिसोमपानाने आजारी झालेल्या इंद्राला अश्विदेव आणि सरस्वती यांनी कसे बरे केले ही कथा इंद्रदेवताक या मंत्रांत सांगतात. यावरून हा यज्ञ अतिपान करून आजारी पडलेल्या यजमानांसाठीच आहे असे दिसते.
ऋग्वेदामधल्या संवादसूक्तात सोमपानाने झिंगलेल्या इंद्राचा संवाद आहे.
यावरून वाटते की सोमरस सुरापेक्षा वेगळे असले तरी प्याल्याने परिणाम सारखाच होत असला पाहिजे.--वाचक्‍नवी

सोमरस

सोमरस म्हणजे उन्मादक पेय नाही. ऋग्वेदात सोमाची स्तुती आध्यात्मिक अनुभूती देणारे, ईश्वराचा साक्षात्कार करून देणारे पेय अशी केली आहे. सोमवल्लीची पाने कुटून सोमरस बनवत असत म्हणे.

विकिपिडियावरून http://en.wikipedia.org/wiki/Soma
It was generally assumed to be hallucinogenic, based on RV 8.48 cited above. But note that this is the only evidence of hallucinogenic properties, in a book full of hymns to Soma. The typical description of Soma is associated with excitation and tapas. Soma is associated with the warrior-god Indra, and appears to have been drunk before battle.

आपला
(विक्याश्रित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

रोमन अक्षरांचा ससेमिरा चुकवण्यासाठी

अपाम सोममम्र्ता अभूमागन्म ज्योतिरविदाम देवान ।
किं नूनमस्मान कर्णवदरातिः किमु धूर्तिरम्र्त मर्त्यस्य ॥
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हे

हे आध्यात्मिक अनुभूती देणारे,
ईश्वराचा साक्षात्कार करून देणारे पेय प्यायचीच इच्छा लागून राहीली आहे हो.
पाहु आता कधी मिळते ते!
आपला
गुंडोपंत

हे म्हणजे हे तर नाही?

असे हे सर्वगुणसंपन्न पेय म्हणजे हे तर नाही?

हा प्रतिसाद या चर्चेतही चालला असता.

बम् भोलेनाथ

सोमरस म्हणजे उन्मादक पेय नाही. ऋग्वेदात सोमाची स्तुती आध्यात्मिक अनुभूती देणारे, ईश्वराचा साक्षात्कार करून देणारे पेय अशी केली आहे.

बम भोलेनाथ ! असे म्हणुन घोटा बंटा चरस् भांग मारणार्‍या लोकांना ईश्वराची अनुभूती येणारच. कुम्भमेळ्यात असे अनेक साधू येतात. अमली पदार्थांचा व्यापार त्या काळात पोलिसांच्या नाकावर टिच्चुन चालतो. धार्मिक अधिष्ठान् आहे ना! उत्तम कांबळे यांचे 'कुंभमेळा साधुंचा कि संधिसाधुंचा' हे पुस्तक यावर आधारलेले आहे.
प्रकाश घाटपांडे

कसे काय?

घोटा बंटा चरस् भांग मारणार्‍या लोकांना ईश्वराची अनुभूती येणारच.
कसे काय? मला का नाही आली मग?
मी तर भांग घेतली होती. महाशिवरात्रीला पंजेरीपण झाली पण आपण म्हणता ती तशी ईश्वराची अनुभूती काही आली नाही.
सगळ्यांनाच येत नाही असे दिसते.

आपणास या अनुभूतीची बरीच माहीती दिसते. आपला अनुभव काय आहे?
मुळात ही ईश्वराची अनुभूती कशी असते हे तर समजावून सांगा!

शंकराला गांजा पसंत आहे की भांग?
याच्या सेवनातून येणारे ईश्वराचे अनुभव कुणी जाणकार माणूस आम्हा गरीबांसोबत वाटू शकेल काय?
(उत्तम कांबळे यांनी यावर पुस्तक लिहिले आहे काय?)

आपला
गुंडोपंत

मराठेशाहीतील वारूणी

मराठेशाहीतील वारूणीबद्दल एक लेख येथे वाचायला मिळाला. खास नाशकाचे उल्लेख असल्याने गुंडोपंतांना लेख आवडेल अशी आशा आहे.

वा

वा नाशिक चे 'ब्राह्मण' दारू पीत असत.
आणी ती पण इतकी त्यांना यबद्दल शासन करायची वेळ आली होती, हे वाचून मनी संतोष जाहला.

अर्थातच नाशकाचे इतिहासाशी व रामायणाशी संबंध पक्के आहेत याची जाणीवच आम्हाला या निमित्ताने झाली.
खुद्द रामाने जेथे वास्तव्य केले तेथल्या
लोकांनी रामाचे अनुकरण करत प्यायली थोडी दारू तर या पुण्याच्या ब्राम्हणांचे काय गेले हो?
नको तिथे नाके खुपसायची सवयच फार या पुणेरी ब्राम्हणांना!
शांतपणे परंपरागत जीवन जगणारी नाशिकची गरीब जनता, उगाच त्यांना किल्ल्यांवर पाठवले!

असो,
यातला धोडप (घोडप नव्हे!) नावाच्या किल्ल्यावर आम्ही जावून आलेलो आहोत. (दारू प्यायलो म्हणून नाही हो!) हा वणी गडाच्या समोरच आहे. या डोंगराला मोठे इंग्रजी यु आकाराचे भोक आहे त्यावरून सहज ओळखता येईल. पण किल्ल्यावर काही नाही हो आता!

आपला
गुंडोपंत

वा

वा! वारुणीशिवाय इतरही लेख वाचनीय आहेत. वाचावे तेवढे थोडेच.--वाचक्नवी

 
^ वर