आपल्यांतल्या लेखकाला/निर्मात्याला जागं करा

आपल्यापैकी बरेचजण "असंभव" ही मालिका पाहत असतील. त्याचा कथाविषय बुद्धीला फारसा पटण्यासारखा नसला तरी त्यांतील व्यक्तिचित्रण व संवाद प्रभावी असल्यामुळे तिचा एकही भाग चुकू न देणारे प्रेक्षक तिला लाभले आहेत. (मी त्यांपैकीच एक).

परंतु अलीकडचे काही भाग माझ्याप्रमाणेच बर्‍याच प्रेक्षकांना निराशाजनक वाटू लागले आहेत. संवयीने व काही बुद्धिमत्तेची चुणूक दाखवणारे संवाद ऐकायला मिळ्तात म्हणून ते "असंभव" पाहत असले तरी 'ष्टोरी' पुढे सरकतच नाही अशी त्यांची भावना झाली आहे. काहींच्या मते मालिका निर्माण करणारांनी मालिकेंत अशी परिस्थिति आणली आहे की तिचा शेवट कसा करावा हे त्यांचे त्यांनाच समजेनासे झाले आहे. कदाचित ते खरे असेल; किंवा शेवट अगोदर ठरलाही असेल.

आपल्यांतील लेखक/निर्माता जागा करण्याची ही संधी आहे.

जर सदर मालिकेचा शेवट अगोदरच ठरला असेल तर तो काय असू शकेल? जर तसे नसेल तर तुम्ही या मालिकेचा शेवट कशा रीतीने कराल?

लेखनविषय: दुवे:

Comments

ष्टोरी काय आहे ?

सांगाल काय ? (हवे तर स्पॉइलर् अलर्ट् द्या. ) अज्ञानाबद्दल माफ करा.

माझं मत..

तिचा एकही भाग चुकू न देणारे प्रेक्षक तिला लाभले आहेत. (मी त्यांपैकीच एक).

मी दूरचित्रवाणीवरील कोणत्याही मालिका पाहात नाही. या मालिका पाहाणे म्हणजे तो मी स्वत:च्या बुद्धीचा अपमान समजतो. माझ्या मते बुद्धी गहाण टाकण्याचाच तो एक प्रकार झाला. उत्तम कथेचा अभाव, उत्तम संगीताचा-पार्श्वसंगीताचा अभाव, दिग्दर्शनाचा अभाव, अभिनयाचा अभाव, ही या मालिकांची वैशिष्ठ्ये म्हणता येतील! महिनेन् महिने पाणी घालून आमटी वाढवत राहण्यासारख्या किंवा मारुतीच्या शेपटीसारख्या अत्यंत बिनडोकपणे या मालिका सुरूच असतात. परंतु जो पर्यंत भोळेभाबडे प्रेक्षक या मालिकंना लाभतात तो पर्यंत 'दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये' ही म्हण अबाधित राहते!

परंतु अलीकडचे काही भाग माझ्याप्रमाणेच बर्‍याच प्रेक्षकांना निराशाजनक वाटू लागले आहेत.
तरी 'ष्टोरी' पुढे सरकतच नाही अशी त्यांची भावना झाली आहे.
काहींच्या मते मालिका निर्माण करणारांनी मालिकेंत अशी परिस्थिति आणली आहे की तिचा शेवट कसा करावा हे त्यांचे त्यांनाच समजेनासे झाले आहे.

हा हा हा, यु सेड इट! :) अहो यात आपण नव्याने काही विचारताय असं मला वाटत नाही. आज बहुतेक सर्व मालिकांची शेवटी हीच परिस्थिती होते. सो, नथिंग ग्रेट अबाऊट असंभव! किंबहुना, असंभवचे एक नियमित प्रेक्षक असूनसुद्धा,

परंतु अलीकडचे काही भाग माझ्याप्रमाणेच बर्‍याच प्रेक्षकांना निराशाजनक वाटू लागले आहेत.
तरी 'ष्टोरी' पुढे सरकतच नाही अशी त्यांची भावना झाली आहे.

हे गार्‍हाणं घेऊन शेवटी आपण इथे आलात/आपल्याला यावे लागले, यातच या मालिकेचे अपयश सिद्ध झाले असे माझे मत आहे! :)

आपल्यांतील लेखक/निर्माता जागा करण्याची ही संधी आहे.

व्यक्तिश: माझ्यापुरतं बोलायचं तर दूरचित्रवाणीवरील मालिका लिहायची/पूर्ण करायची वेळ यावी हा मी माझ्या बुद्धीचा अपमान समजतो! आपण हिला 'संधी' म्हणताय परंतु माझ्या मते कुणावरही इतक्या 'साहित्यिक लाचारीची' वेळ येऊ नये!

अवांतर - ह्या चर्चाप्रस्तावात दूरचित्रवाणीवरील एका फुटकळ मालिकेचा शेवट कसा असावा, असा विषय आहे. संपादक मंडळाला या विषयात उपक्रमाच्या धोरणाप्रमाणे माहिती आणि विचारांची नक्की कोणती देवाणघेवाण अपेक्षित आहे/दिसली आणि त्यांनी हा चर्चाप्रस्ताव इथे राहू दिला हे कळेल का??

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

वाट पाहतो आहे! :)

अवांतर - ह्या चर्चाप्रस्तावात दूरचित्रवाणीवरील एका फुटकळ मालिकेचा शेवट कसा असावा, असा विषय आहे. संपादक मंडळाला या विषयात उपक्रमाच्या धोरणाप्रमाणे माहिती आणि विचारांची नक्की कोणती देवाणघेवाण अपेक्षित आहे/दिसली आणि त्यांनी हा चर्चाप्रस्ताव इथे राहू दिला हे कळेल का??

संपादक मंडळाच्या उत्तराची वाट पाहतो आहे! त्यांनी सवड झाल्यास व जमल्यास(!) उत्तर द्यावे, ही नम्र विनंती!

आपला,
(चातक!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

आधी लोकशाहीचे काय झाले ते सांगा!

काय तात्या?
आधी लोकशाहीचे काय झाले ते सांगा ना...?
इतकी बोंबाबोंब करून शेवटी हुकुमशाहीच यावी का?
आणि ती ही सदैव पारदर्शकते साठीओरडणार्‍या तात्या कडून? किती दुर्दैवी आहे हे...
कधी येणार मिसळपावावर लोकशाही त्याचे काही बोला ना?

त्या बिच्यार्‍या कोर्डेसाहेबांना का त्रास देताय...?
आपला
गुंडोपंत

अप्रस्तुत..

गुंडोपंतांचे प्रश्न कोर्डेसाहेबांनी उपस्थित केलेल्या चर्चेत संपूर्णपणे अप्रस्तुत व असंबद्ध तसेच वैयक्तिक स्वरुपाचे वाटतात! आम्हीही येथे वैयक्तिक स्वरुपात उतरायचे ठरवले तर १) तो उपक्रम प्रशासनाच्या धोरणांचा अपमान केल्यासारखे होईल, जे आम्हाला मंजूर नाही आणि २) दुसरे म्हणजे गुंडोपंतांनाही ते बरेच जड जाईल असे वाटते!

"मिसळपाव हे संकेतस्थळ, आणि त्याचे धोरण" हा सदर चर्चेचा विषय नाही हे गुंडोपंतांना कळू नये याचे आश्चर्य वाटते! असो..

बाय द वे गुंडोपंत,

मिसळपावविषयी काही प्रश्न असतील तर ते कृपया आम्हाला व्य नि ने विचारा, आम्ही आपल्याला चोख उत्तर देण्यास (बांधिल नसलो तरी!) समर्थ आहोत आणि आम्हाला वाटलेच तर उत्तर देऊही! येथे जाहीरप़णे विचारणार असाल तर "मिसळपाववरील धोरणे" असा जाहीर चर्चाविषय इथे मांडा, आम्ही त्याचे आमची इच्छा असल्यास इथेही तुम्हाला अगदी जाहीरपणे योग्य ते उत्तर देण्यास सक्षम आहोत!!

त्या बिच्यार्‍या कोर्डेसाहेबांना का त्रास देताय...?

आपला हा प्रश्न बिनबुडाचा आणि किंचित मूर्खतेकडे किंवा अज्ञानाकडे झुकलेला वाटतो! (चूभूद्याघ्या!)

तसेच उपक्रमाच्या एका सन्माननीय सभासदाला 'बिच्चारा' वगैरे म्हणून उगाच हिणवल्यासारखेही वाटते!

कोर्डॅसाहेबांनी जी चर्चा उपस्थित केली आहे तिला आम्ही आमच्या परिने उत्तर दिले आहे. एवढंच नव्हे, तर आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर कोर्डेसाहेबांनीही जाहीर खुलासा केला आहे (जो आमच्या विचाराधीन आहे,) व तसे आम्हाला व्य नि पाठवून रीतसर कळवलेही आहे! यावरून आम्ही त्यांना काही त्रास देत आहोत असे आम्हाला वाटत नाही, आणि इतर कुणाला तसे वाटल्यास आम्हाला त्या व्यक्तिच्या बुद्धीची दया येऊन तिची समज अंमळ कमी आहे असे आम्ही समजू!

असो,

आपला,
(मिसळपाव विषयी कुठल्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास कुणालाही बांधिल नसलेला परंतु सक्षम असलेला!)

तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

अवांतर - गुंडोपंतांचा प्रतिसाद आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याना दिलेले उत्तर हे जर उपक्रम प्रशासनास सदर चर्चेच्या दृष्टीने विषयांतर वाटले तर प्रशासनाने ते अवश्य उडवून लावावे, ही नम्र विनंती. आम्ही प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करू. हेच लेखन आम्ही गुंडोपंतांना येथे व मिसळपाववर व्य नि ने कळवत आहोत, त्यामुळे ते इथे रहावे अश्यातलाही भाग नाही!

--तात्या अभ्यंकर.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लईच झोंबलं की राव!

हा हा हा!!!!
लईच झोंबलं की राव!
मी आपलं सहज विचारलं बॉ!
आधी तुमी हितं लै बोंब मारली हुती म्हनून म्हनलं,
काय जालं इचारावं!


गुंडोपंतांचे प्रश्न कोर्डेसाहेबांनी उपस्थित केलेल्या चर्चेत संपूर्णपणे अप्रस्तुत व असंबद्ध

आहेतच... मी कधी म्हणालो की ते तसे नाहीत?
१) तो उपक्रम प्रशासनाच्या धोरणांचा अपमान केल्यासारखे होईल, जे आम्हाला मंजूर नाही

तात्या? आता तुम्ही सुद्धा? (डॉ. तुम्ही सुद्धा प्रमाणे वाचावे... ;)) )

हा सदर चर्चेचा विषय नाही हे गुंडोपंतांना कळू नये याचे आश्चर्य वाटते!

कुणाला कशा चे आश्चर्य वाटेल काही सांगता येत नाही बॉ!

आपला हा प्रश्न बिनबुडाचा आणि किंचित मूर्खतेकडे किंवा अज्ञानाकडे झुकलेला वाटतो!
प्रत्येकाचा आपापल्या कुवतीचा भाग असतो. झेपत नसेल तर सोडून द्या!!

आणि इतर कुणाला तसे वाटल्यास आम्हाला त्या व्यक्तिच्या बुद्धीची दया येऊन तिची समज अंमळ कमी आहे असे आम्ही समजू!
चालायचंच... शेवटी आपण जग आपल्या बुद्धीनुसारच पाहतो! काही हरकत नाही!

आम्ही प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करू.

क्या बात है! चक्क आदर वगैरे? सही! आणि प्रशासन या शब्दाचे स्वहस्ते लेखनही!!!
एके काळी "संपादक आणि प्रशासन वगैरेताअम्ही नाही जाणत" असं म्हणणारे ते हेच?

आसं असतं बाबानु! ;))

बाकी, अजुनही आपलाच
गुंडोपंत

चर्चाप्रस्तावाचा उद्देश

अवांतर - ह्या चर्चाप्रस्तावात दूरचित्रवाणीवरील एका फुटकळ मालिकेचा शेवट कसा असावा, असा विषय आहे. संपादक मंडळाला या विषयात उपक्रमाच्या धोरणाप्रमाणे माहिती आणि विचारांची नक्की कोणती देवाणघेवाण अपेक्षित आहे/दिसली आणि त्यांनी हा चर्चाप्रस्ताव इथे राहू दिला हे कळेल का??

काहींना आपणही लेखक / निर्माता व्हावे असे वाटत असते. पण "आपल्याला कथाविषय सुचत नाही" अशी त्यांची अडचण असते. अशांना अर्धवट झालेली मालिका पूर्ण कशी करता येईल किंवा सुमार वाटणारी मालिका दर्जेदार कशी करता येईल याचा विचार करून लेखक / निर्माता होण्याचा प्राथमिक सराव करता येईल. सदर चर्चाप्रस्तावातून हा एक मार्ग (खरे तर exercise) सुचवला आहे. प्रतिसाद देतांना इच्छुक उपक्रमींनी आपल्यांतील सुप्त लेखकाला / निर्मात्याला जागे करावे ही अपेक्षा आहे. काय सांगावे अशा प्रयत्नांतून नवीन ललित लेखक निर्माण होण्याची शक्यता आहे.

 
^ वर