बदलती आर्थिक घडी आणि आपण

अमेरिकेत गेली काही वर्षे वास्तव्य केल्यानंतर या देशाच्या अर्थव्यवस्थेचा परिणाम जाणवायला लागतो. जगण्याची शैली, एकूण रहाणीमान या सगळ्यावर तुमच्या उत्पन्नाबरोबर, क्रयशक्तिबरोबरच आजूबाजूची (आणि एकूण जगातली) आर्थिक स्थितीचाही प्रभाव असणे अटळ आहे, हे वेगळे सांगायला नकोच. अमेरिकेत काय किंवा अन्यत्र कुठेही रहाणार्‍या प्रौढ माणसाला क्वचितच अशा आयुष्याच्या वळणांवरून जायला मिळाले असेल जिथे तुम्हाला आजूबाजूच्या आर्थिक घडीची पर्वा करायची गरज भासली नसेल.

हा विषय आता मी इथे काढण्याचे एक कारण म्हणजे, आजकाल आर्थिक बातम्या या केवळ आर्थिक वर्तमानपत्रांपुरत्या किंवा अर्थव्यवहाराच्या विभागापुरत्या मर्यादित न रहाता, अमेरिकेच्या सर्व आघाडीच्या वृत्तमाध्यमांच्या मुख्य पानावर झळकत आहेत. जेव्हा असे सतत घडत रहाते तेव्हा ते याचे लक्षण आहे की, अर्थव्यवस्था कूस बदलते आहे, पृथ्वीच्या पोटातील टॅक्टॉनिक् प्लेट्स् हलल्यावर ज्याप्रमाणे पृष्ठभागावर त्याचे पडसाद जाणवतात, त्याप्रमाणे , या आर्थिक घडामोडींचे पडसाद येथील लोकाना जाणवत आहेत.

अर्थव्यवस्थेचा "आज" समजून घेण्याकरता थोडे "काल" आणि "परवा-तेरवा" कडे जावे लागणार.

२००७ साली अमेरिकन लोकाना जो नवा शब्द सर्वात जास्त ऐकायला मिळाला तो होता "सब्-प्राईम्". घरकर्जाच्या व्याजदराच्या संदर्भात याचा अर्थ "चालू दरापेक्षा कमी" असा साधारण सांगता येईल. २००२-०३ च्या सुमारास अर्थव्यवस्था त्यापूर्वीच्या मंदीमधून सावरत असल्याने घराच्या किमती त्यावेळी कमी होत्या. यासुमारास अमेरिकेच्या मध्यवर्ती ब्यांकेने व्याजदर खूप खाली आणला होता. हळूहळू सावरणार्‍या अर्थव्यवस्थेमधे लोक हळूहळू पुन्हा घरांच्या बाजारपेठेमधे येत होते. या घरांच्या कर्जामधे मोठा वाटा होता या "सब्-प्राईम्"दराने दिलेल्या कर्जांचा. ही कर्जे ऍडजस्टीबल् रेट् मॉर्टगेज् या तत्वाने दिली गेली होती. अर्थात, तुमचा व्याज दर सुरवातीची ३ ते ५ वर्षे "सब-प्राईम्" असेल आणि नंतर तो बाजारच्या दराप्रमाणे ठरेल. झाले. या प्रकारामुळे घरांची मागणी प्रचंड वढली. कर्जे हवी तशी आणि मामुली भावात मिळू लागली. ती देताना घेणार्‍याला ती परवडणार आहेत की नाही याची पर्वा न करता ती दिली गेली. सन २००३ ते सन २००६ च्या अंतापावेतो पर्यंत अमेरिकेमधे विलक्षण वेगाने घरांच्या किमती गगनाला भिडल्या.

आणि हे व्याजदर मूळपदावर यायला सुरवात झाल्यावर जे व्हायचे ते झाले. लोकांची कर्जे बुडीत खात्यामधे गेली. लक्षावधी लोक रहात्या घराबाहेर पडले. हजारो "सब प्राईम" कर्जांची घरे पुन्हा बाजारात आली.

घरांच्या किमती कोसळल्या. ब्यांकांचे धाबे दणाणले. त्यांच्या गळ्याला तात लागला.

२००३ ते २००७ च्यासुरवातीला जो शेअरबाजार जोरात होता तो कोसळायला लागला. बहुतांश आर्थिक संस्थानी घराच्या बाजारपेठेवर आपले पैसे लावले होते. कर्जे बुडाली तशा ब्यांका बुडाल्या आणि तशा या अर्थिक संस्थासुद्धा ! अमेरिकेतला शेअर बाजार गेले सुमारे दोन-तीन महिने घसरतो आहे. विशेषकरून गेल्या काही आठवड्यात ही घसरगुंडी जोरात झाली.

डॉलर जोरदार घसरला. अमेरिकेच्या मध्यवर्ती ब्यांकेला व्याजदर पुन्हापुन्हा कमी करून आणावा लागला.

वरील दोन्ही कारणानी महागाई वाढली - अशी महागाई जी वाढत्या अर्थव्यवस्थेमधे येते ती नव्हे - तर ढासळत्या अर्थव्यवस्थेतली महागाई. पेट्रोलच्या किमतीनी डोळे पांढरे केले.आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर देश आज उभा आहे. कित्येकांच्या मते तो उंबरठा केव्हाच ओलांडला आहे.

मी वर केलेले विवेचन हे फार जुजबी, संक्षिप्त आहे याची मला जाणीव आहे. उपक्रमावरील लोकानी या माहितीत भर घालावी, जमल्यास तुमच्या आमच्यांकरता काही मार्गदर्शक उपाययोजना सुचवावी या हेतूने हे लिहिले.

काही प्रश्न (जे अनेक लोकांच्या मनात आहेत त्यापैकी काही ) मांडतो.

- २००८ मधे नक्की काय होणार ? हा जो "क्रायसिस्" आहे तो नक्की किती मोठा आहे ?
- चीन/भारता सारख्या देशाला, तेथील लोकाना याचे काय परिणाम भोगावे लागतील असे वाटते ? यातून तिथल्या लोकांचा काही फायदा होईल का ? तोटा कितपत होईल असे वाटते ?
- या घटनांचा तुमच्या किंवा तुमच्या आप्तस्वकीय/स्नेह्यांपैकी कुणाच्या वैयक्तिक आयुष्याला स्पर्श झाला का ?
- यातून काही धडे शिकता येतील का ?

लेखनविषय: दुवे:

Comments

विषय आवडला

- २००८ मधे नक्की काय होणार ? हा जो "क्रायसिस्" आहे तो नक्की किती मोठा आहे ?

वर्तमान पत्रातील आर्थिक बातम्या/विश्लेषण आणि सध्या वाचत असलेले ग्रीनस्पॅनचे पुस्तक ह्यावरुन एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे मार्केट कसं आणि का वळणं घेतं हे कुणालाच समजत/ कळत नाही. ह्या पुर्वीदेखिल अश्या बर्‍याच प्रसंगातुन मार्केट गेले आहे आणि दर वेळेला त्यातुन काहीतरी करुन वर येते आणि त्यामुळेच मार्केट हे अतिशय रेसिलियंट (प्रतिशब्द?) आहे काहीही झाले तरी कधी ना कधी पुन्हा उसळी मारणारच असे वाटते.

कालच डेली शो मध्ये बेअर स्टर्न विषयी दाखवत होते. जीम क्रॅमर नावाचा सी एन् बी सी बरील आरडा ओरडा करणारा वाचाळ विश्लेषक लोकांना बेअर स्टर्न चे शेअर अजिबात विकू नका असे ओरडून सांगत होता. आणि दुसर्‍याच दिवशी त्याचा शेअर ६० डॉलर्स वरुन अवघ्या २ डॉलर्सवर घसरला.. आता कसला म्हणायचा हा तज्ञ विश्लेषक?..थोडक्यात मार्केट आणि का वळणं घेतं हे कुणालाच समजत/ कळत नाही.

- चीन/भारता सारख्या देशाला, तेथील लोकाना याचे काय परिणाम भोगावे लागतील असे वाटते ? यातून तिथल्या लोकांचा काही फायदा होईल का ? तोटा कितपत होईल असे वाटते ?

भारत आणि चीन मधील निर्देशांक देखिल घरता आहेत अश्या बातम्या वाचायला मिळाल्या. दोघांचाही सध्याचा उक्तर्ष बहुतांशी अमेरिकन गिर्‍हाइकांवरच होत असाव आणि त्यामुळेच अमेरिकेला घर घर लागल्याने असे होत असावे.

- या घटनांचा तुमच्या किंवा तुमच्या आप्तस्वकीय/स्नेह्यांपैकी कुणाच्या वैयक्तिक आयुष्याला स्पर्श झाला का ?

कधी नव्हे ते आमचे पैसे ह्या शेअर बाजारात घातले आणि आता बसलो आहोत टाळ कुटत :)

- यातून काही धडे शिकता येतील का ?

कुणाला?

चांगला विषय आहे

विषय चांगला आहे. उद्या (बॉस्टनच्या) अजून लिहायचा प्रयत्न करेन. तो पर्यंत

चीनच्या आर्थिक परीस्थितीबद्दल चीनचे पंतप्रधान (प्रिमियर) वेन यांनी व्यक्त केलेली काळजी पहा. भारतात पण काळजी वाटत आहे.

आपल्या आयुष्यात हे चक्र पूर्ण होऊन आपण परत ग्लोबलपासून लोकल इकॉनॉमी कडे जाणार की काय असे (अतिशयोक्ती असली तरी) वाटतेय!

आणखी एक ...

नवीन यानी अलिकडे चालू केलेल्या एका विषयामधे त्यानी लिन्क् दिली होती त्यातील खालील भाग वाचला. अलिकडच्या काळात वाचलेल्या सर्वात अधिक भीतीदायक विधानांपैकी हे एक, असे मला वाटले :

"Some observers worry that the Fed is taking over the banks' financial risk. But what worries me more is that the move seems trivial compared with the size of the problem: $200 billion may sound like a lot of money, but when you compare it with the size of the markets that are melting down - there are $11 trillion in U.S. mortgages outstanding - it's a drop in the bucket."

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

दि फेस-स्लॅप थिअरी

http://mr.upakram.org/node/1081 या चर्चेत दिलेल्या प्रतिसादातून :

एन् वाय् टाइम्स मध्ये पॉल क्रुगमन यांनी लिहिलेला The face-slap theory हा लेख किंवा इथे वाचता येईल. अमेरिकेतील आर्थिक मंदीचे गांभीर्य स्पष्ट करणारा लेख आहे. हा लेख वाचल्यावर 'वर्स्ट इज येट टू कम' असे वाटले.

हं

१) २००८ मधे नक्की काय होणार ? हा जो "क्रायसिस्" आहे तो नक्की किती मोठा आहे ?

उद्या कोणि पाहीलाय? :-)

२) चीन/भारता सारख्या देशाला, तेथील लोकाना याचे काय परिणाम भोगावे लागतील असे वाटते ?

चीन चा अमेरिकेशी व्यापार भारतापेक्षा जास्त असल्याने त्यांच्यावर नक्कीच विपरीत फरक पडेल.

३) या घटनांचा तुमच्या किंवा तुमच्या आप्तस्वकीय/स्नेह्यांपैकी कुणाच्या वैयक्तिक आयुष्याला स्पर्श झाला का ?

माझा अमेरिकेतील मित्र, घर खुप महाग आहे म्हणुन त्याने घर न घेता, शेयर बाजारात गुंतवले होते. आता घरे स्वस्त होत आहेत पण शेयर मार्केट मधे बरेच पैसे अडकवुन-गमावुन बसला आहे (डाउन पेमेंट वांदा). असे परवा म्हणत होता. [अर्थात अमेरिकेत इतरत्र व भारतात आहेत त्याची घरे पण तरि बे एरीया मधे नाही आहे अजुन]

अजुन एक गोष्ट २००० साली मी भारतात एक म्युच्युअल फंड (पायोनियर का कोठारी इन्फोटेक का असे नाव असलेला त्याचे गेल्या ८ वर्षात ३ बारशी , दोन दत्तकविधाने झाली सध्या त्याचे नाव फ्रॅन्कलीन इंडीया ओपॉर्च्युनीटिज) नवीन फंड होता १०००० रू गुंतवले होते. २००३, २००४ पर्यंत त्याचा भाव ३००० झाला होता. मला बघायचे होते कि पैसे गायब होतात म्हणजे कसे म्हणुन मी ते विकले नव्हते, माझ्या मित्राने ८००० भाव झाला असताना २००१ मधेच विकला होता. असो ४ जाने २००८ ला त्याचा भाव ४१४५३ रु झाला होता. आज आहे २६३८४ रु. हा कोणि दर्दी म्हणेल की ह्याच्या दुप्पट करुन दाखवले असते इ. पण २००० मधे एक फॉर्म भरुन नंतर मी काही केले नाही. मार्केट त्याचा भाव वर खाली करत राहीले. :-) एक खाली व एक वर अशी चक्कर बाजाराने अनुभवली आहे. आता खाली आला तरी बघु काय होते मी विकणार नाही.

रेसेशनप्रुफ लाइफ कसे करावे ह्याबद्दल कोणी मार्गदर्शन करु शकेल काय?

अगदी उद्या पुर्ण इकोनॉमी झोपली, सगळ्यांना शाल-श्रीफळ दिला गेला. तर भारतात परतुन काय बरे करावे? शेत जमीन असलेली बरी का? निदान कंद खाउन... :-)

सब-प्राइम् म्हणजे नक्की काय?

प्रथम माझीही अशीच समजूत होती की सब-प्राइम् म्हणजे कमी दराचे कर्ज. पण गुगलून पहिल्यावर वेगळीच माहिती हाती लागली. खाली दुवा पहावा -
विकीवरील व्याख्या
त्या विकीलेखकाचे असे म्हणणे आहे की स.प्रा. हे व्याजदराला नव्हे तर कर्जदाराला म्हणतात.
[Subprime lending (also known as B-paper, near-prime, or second chance lending) is lending at a higher rate than the prime rate. The term "subprime" refers to the credit status of the borrower (being less than ideal), not the interest rate on the loan itself.]
मुक्तसुनीत हे अमेरिकानिवासी असल्यामुळे व त्यांना या शब्दाचा अधिक जवळून परिचय असल्यामुळे त्यांना मी चुकीचे म्हणू धजत नाही. परंतु आता या शब्दाचा नक्की अर्थ काय हे त्यांनी किंवा अन्य तज्ज्ञाने तपासून खात्रीपूर्वक सांगितल्यास बरे होईल.
आणि अर्थात् विकीवर चूक असल्यास तिथेही सुधारणा करणे आवश्यक आहे म्हणजे आमच्यासारख्यांची पुन्हा दिशाभूल होणार नाही.
- (अज्ञानी)
दिगम्भा

चुकीचे प्रायश्चित्तः
रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्व्व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्व्व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्व्व्रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -रोमन नव्हे देवनागरी -व्व्व्रोमन नव्हे देवनागरी -

माझ्या माहिती प्रमाणे...

...अमेरिकेत कर्ज देताना त्याचा व्याजदर हा कर्ज घेणार्‍याच्या 'क्रेडिट हिस्ट्री'वर अवलंबून असतो. एखाद्याच्या आयुष्यात कर्ज घेण्याचा आणि ते वेळेवर फेडण्याचा इतिहास काय आहे ह्यावर अवलंबुन इथले क्रेडीत ब्युरोज प्रत्येक व्यक्तिला गुण देतात (क्रेडीट् स्कोर). ह्या गुणांवर आधारित तुम्हाला लोन द्यायचे की नाही अथवा दिल्यास काय दराने द्यायचे हे वित्तीय संस्था ठरवात. प्रत्येक वित्तिय संस्थांचे ह्या गुणांवर आधारित क्रायटेरिया असतात. तुमच्या क्रेडीट स्कोरने विशिष्ट आकडा पार केला तर तुम्हाला सर्वात कमी व्याज दराने कर्ज (प्राईम लेंडींग)मिळते. तुमचा स्कोर खराब असेल तर तुम्हाला कर्ज देण्यात संस्थेला जोखिम जास्त असल्याने अधिक व्याज दराने कर्ज (सबप्राईम लेंडींग) दिले जाते. तेव्हा प्राईम आणि सबप्राईम हे कर्ज दात्याचे प्रकार नसून कर्ज द्यायचे प्रकार आहेत.

मला वाटते

> २००८ मधे नक्की काय होणार ? हा जो "क्रायसिस्" आहे तो नक्की किती मोठा आहे ?
क्रायसिस अधिकच वाढेल असे एकंदर तज्ज्ञ लोकांचे म्हणणे आहे. अर्थात दोन्ही बाजूंनी बोलणारे तज्ज्ञ असले तरी क्रायसिस वाढेल असे म्हणणारे जास्त कन्विन्सिंग वाटतात.

> चीन/भारता सारख्या देशाला, तेथील लोकाना याचे काय परिणाम भोगावे लागतील असे वाटते ? यातून तिथल्या लोकांचा काही फायदा होईल का ? तोटा कितपत होईल असे वाटते ?
अमेरिकेतील कंपन्यांवर खर्च कमी करण्याचा दबाव वाढल्याने सेवा क्षेत्रात बहि:स्रोतीकरण (औटसोर्सिंग साठी हा शब्द कुठसा वाचला होता) वाढेल त्याचा भारताला फायदा होईल असे म्हणतात पण ते काही खरे नाही. उलट सेवाक्षेत्र विशेषतः आयटी-आयटीइएस क्षेत्राला याचा सर्वात जास्त फटका बसेल. सेवाक्षेत्र वगळता इतर क्षेत्रांवर मोठ्या बाजारपेठेतील मागणी कमी झाल्याने वाइट परिणाम होईल. शिवाय अमेरिकेच्या प्रभावाने भारतातील अंतर्गत अर्थव्यवस्थाही कोलमडेल की काय अशी भीती आहे. अमेरिकेत मंदी -> भारतातील उद्योग संकटात -> नोकरकपात/पगारकपात -> देशांतर्गत मागणी कमी -> भारतात मंदी असे चक्र असेल असे मला वाटते.

> या घटनांचा तुमच्या किंवा तुमच्या आप्तस्वकीय/स्नेह्यांपैकी कुणाच्या वैयक्तिक आयुष्याला स्पर्श झाला का ?
अजून तरी नाही.

> यातून काही धडे शिकता येतील का ?
व्यक्तिगत पातळीवर आपण काही करू शकतो असे वाटत नाही. पण अनावश्यक खर्च न करणे आणि आर्थिक जोखीम न उचलणे इतके करू शकतो.

उत्तम

विषय. आजच्या न्यूयॉर्क टाईम्समधला हा लेख या संदर्भात एक धावता आढावा/तोंडओळख म्हणून वाचता येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मस्त लेख

मस्त लेख. दुव्या बद्दल धन्यु!

गहाणगठ्ठा हुंड्या

या बाबतीत समजण्यास अत्यंत क्लिष्ट mortgage-backed securities (गहाणगठ्ठा हुंड्या) यांनी केलेला गोंधळ विचारात घेतला पाहिजे. बेअर स्टर्न्स वगैरे संस्था खुद्द "सबप्राईम" कर्जे देत नव्हत्या, मग त्या गोत्यात कशा आल्या?

मुळात हा प्रश्न कोणास यावा की जी कर्जे बुडण्याची शक्यता आहे, ती कर्जे कोणी द्यावी तरी का? जर प्रथम कर्ज देऊ करणार्‍याचीच कर्जाबाबत जोखीम असती तर हा प्रश्न शेवटचा प्रश्न ठरला असता, आणि तशी कर्जे कोणीच देऊ केली नसती. पण झाले असे की प्रथम कर्जदात्यांनी ती कर्जे वसूल करण्याचा हक्क दुसर्‍या बँकेला विकला. पहिल्या कर्जदात्याला लगेच, काही थोड्या नफ्यासह पैसे परत मिळतात. विकत घेणार्‍या बँकेला जोखिमेसकट दीर्घकाळापर्यंत व्याज, मुद्दलफेड मिळते - दोघांना नफाच. ही प्रथाही सामान्य आहे.

पण प्रथितयश बँका बुडण्याची शक्यता असलेली कर्जे आवडीने का घेतील, हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर या गहाण-गठ्ठा हुंड्या. या हुंडीत एकच गृहकर्जाचे गहाणखत नसते. अनेक गहाणखतांचे येणार्‍या रकमेचे उपविभाग करून त्यांचा गठ्ठा करून हे हुंडीखत तयार केले जाई. यात असा फायदा सांगितला जाई, की कुठल्याही एका हुंडीत कुठले एक गहाणकर्ज बुडाले तरी उरलेल्या, न बुडालेल्या, गहाणकर्जातून हुंडीधारकाला उत्पन्न मिळतच राहील. इतकेच काय कुठल्याही बुडालेल्या कर्जाचा तोटा एका बँकेचा राहाणार नसून ते कर्ज ज्या-ज्या हुंड्यांत विभागले गेले आहे, त्या सर्वांनी वाटून नगण्य होईल.

अशा प्रकारच्या गहाणगठ्ठा हुंड्या "सुरक्षित" म्हणून प्रथितयश बँकांनी हिरिरीने विकत घेतल्या. पण प्रत्येक गठ्ठा आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे कुठला गठ्ठा धोक्याचा, कुठला गठ्ठा भरवशाचा हे कळणे अशक्यप्राय झाले. वाटेल ती कर्जे गठ्ठ्यात बांधली तरी बँका विकत घेतात, हे लक्षात येताच प्राथमिक कर्जदात्यांनी वाटेल त्याला कर्जे देण्यास सुरुवात केली. आपल्याकडील हुंड्या किती बेभरवशाच्या आहेत हे बँकांच्या लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता.

कार्यक्षम बाजारपेठेसाठी सुजाण ग्राहक आणि विक्रेते लागतात हे गृहीतक विसरले गेले. ग्राहकाने यातून हा वैयक्तिक बोध घ्यावा : ज्या वस्तूचा दर्जा पारखण्याची आपल्याला जाण नाही, ती वस्तू लोक आपल्याला बहुधा अवाच्यासवा किमतीला विकतील. तशी वस्तू शक्यतोवर विकत घेऊ नये.

व्यावहारीक शहाणपण...

ज्या वस्तूचा दर्जा पारखण्याची आपल्याला जाण नाही, ती वस्तू लोक आपल्याला बहुधा अवाच्यासवा किमतीला विकतील. तशी वस्तू शक्यतोवर विकत घेऊ नये.

आपली गरज काय आहे आणि आपली चैन काय आहे हे समजले तर असे प्रश्न उपस्थित होणार नाही.

गृहकर्ज हा एक भाग आहे इतरही काही बाबी असाव्यात ज्या हळूहळू उलगडत जातील

गरज/चैन/गुंतवणुकीची साधने विकत घेणे

चैन आणि गरज याविषयी तुमचे मत बरोबर आहे. संपणार्‍या/खपणार्‍या उपभोग्य वस्तूंबाबत आपण विकत घेण्या/न घेण्याचा निर्णय या तत्त्वानुसार करू शकतो.

पण गुंतवणुकीचे साधन विकत घेताना चैन/गरज हे सुज्ञ तत्त्व सहजासहजी वापरता येत नाही. रोज-गरजेतून वाचलेला पैसा वापरूनच आपण गुंतवणुकीची साधने विकत घेतो - त्यामुळे गरज नाही हे गृहीतच आहे. (गुंतवणूक ही "चैन" आहे का? याबाबत माझा विचार ठप्प झाला आहे.) त्यामुळे गरज/चैन यापेक्षा वेगळे तत्त्व वापरून खरेदी करावी/न करावी. अधिकाधिक व्याज/कमीतकमी घाटा देणारी गुंतवणूक-वस्तू आपण निवडावी, असे वेगळे तत्त्व अंगीकारावे लागते.

आर्म

यात हे सर्व होण्याचे कारण, "ऍदजस्टेड रेट मॉर्टगेज" अर्थात "आर्म" हा प्रकार देखील आहे. ५ ते सात वर्षे मुद्दल देयचे नाही फक्त व्याज भरा (ते ही कमी दराचे) आणि नंतर मात्र सगळे (मु. + व्या.) भरा. उ.दा. पाच वर्षे एखादा (दरमहा) $१२०० भरत राहील जे घर रेंट करण्यापेक्षा स्वस्त पण नंतर ते एकदम $३००० होणार. ते देणे सर्वांना बाकी सर्व खर्च करून जमत नाहीत. त्यात युटिलीटी (घर गरम करण्याचे विशेष करून) दर प्रचंड वाढलेत.

ह्या वरून जेंव्हा हे सर्व तेजीत होते तेंव्हा एन पी आर वर मुलाखत ऐकली होती. कुणा "तज्ञाला" या वरून काळजीपूर्वक प्रश्न विचारला की (पाचएक वर्षांनंतर) काय होऊ शकेल म्हणून ... तर गुळमुळीत उत्तर दिले होते. आता तेच भय हे सत्य होत आहे.

'रिसेशन इज पॉसिबल'

फेडरल रिजर्व चे प्रमुख बेन बर्नान्के (उच्चाराबद्दल चूभूद्याघ्या) यांनी काल 'रिसेशन इज पॉसिबल' असे बहुतेक पहिल्यांदाच म्हटले आहे. पण वर्षअखेरीपर्यंत पुन्हा परिस्थिती सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बिअर स्टर्न ला वाचवण्यासाठी केलेल्या हस्तक्षेपाचे समर्थनही त्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रॉयटर्सचा दुवा http://www.reuters.com/article/telecomm/idUSN0241545420080403

 
^ वर