कश्मीर सिंहाचे घुमजाव !

पाकीस्तान जेल मधुन सुटलेला कश्मीर सिंह म्हणतोय की तो भारताचा हेर होता! २५ वर्षांनी का होईना पण तो पाकीस्तानी शासनाला उल्लू बनवण्यात तो यशस्वी झाला असा त्याचा अर्थ आहे.
तो असेही म्हणतोय की भारत सरकारने त्याच्या कुटुंबाला कुठलीच मदत केली नाही.
हा इसम एक सामान्य तस्कर होता. त्याचा वापर ही पाकीस्तानची एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची नामी शक्कल असावी.
हे ४ पक्षी >
१.अस्सल भारतीय हेरांचे मनोधैर्य खच्ची करणे.
२. सरब्जीत तसेच अन्य निरपराध भारतीय कैद्यांच्या विश्वासर्ह्तेला तडा देणे
३.सामान्य पाकीस्तानी नागरीकांमधे भारता विषयी द्वेष व्रुध्धींगत करणे
४.आम्ही निरपराध आहोत भारत आम्हाला टरगेट करतो हा कांगावा पाकीस्तानला उघडपणे करता येईल.
भारत सरकारने असे डावपेच ओळखून त्याचा बिमोड करणे आगत्याचे आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

फक्त

मला आधी प्रमाणेच या वादातही पडायचे नाही,
पण
तो असेही म्हणतोय की भारत सरकारने त्याच्या कुटुंबाला कुठलीच मदत केली नाही.

हा मुद्दा धोकादायक आहे असे वाटले परंतु असे अनेकदा अनेकच देशात झाले आहे, होत आहे. अगदी अमेरिकेतही.
कारण तसे करणे (काहीवेळा) सत्ताधीशांसाठी सोईचे असते.

फक्त भारतात भ्रष्टाचारामुळे परिस्थिती अजूनच बिकट होते व कायद्याने मिळू शकणारी मदतही अवघड होवून बसते.
बेपत्ता सैनिकाच्या कुटुंबाला मदत या संदर्भात नक्की काय योजना आहेत हे कुणी सैन्या संबंधित असलेले सांगु शकतील तर आवडेल.

आपला
गुंडोपंत

असेच म्हणतो

या निमित्ताने काश्मिर यांनी (ज्याची चर्चा सहजपणे होत नाहि असा) फार महत्वाचा प्रश्न समोर आणला आहे. मगदी आतंकवादी, गुंड आदी घातक प्रवृत्तीही त्यांच्या हाताखालच्या लोकांच्या कुटुंबियांची पूर्ण काळजी घेतात. त्य भरवशावरच तर ती व्यक्ती एखाद्या कार्यात झोकून देते. जर सरकार हेरांच्या कुटुंबियांना तो परदेशात असताना मदत करत नसेल तर एखाद्याने अश्या अप्पलपोटी प्रशासनासाठी हेरगिरी का करावी? (तेही रु.४०० मधे?)
प्रत्येकाला एक लिमिट असते. या विषयवर बोलायचे नाहि .. गुप्तता हवी म्हणून तुम्ही त्या व्यक्तीची कुटुंबे रस्त्यावर आली तरी बेहत्तर असे म्हणू शकत नाही. सरकारने जर खरच हा विषय असा हाताळाला आसेल तर झाले ते उत्तम झाले
-ऋषिकेश

धोका

कश्मीर सिंह चे वक्तव्य एव्हाना पाकिस्तान सरकारपर्यंत पोचले असेल. त्यामुळे हेरगिरीच्या (खर्‍या खोट्या) आरोपाखाली पाकिस्तानांत बंदिस्त असलेल्या भारतीयांवर अधिकच जुलूम होण्याची शक्यता आहे.

धोका!

३४ वर्षे तुरुंगात असलेल्या माणासाकडून संतुलित, विवेकी, मुत्सद्देगिरीला धरुन उत्तरे मिळणे हे अवघड आहे. तशी अपेक्षा करणे ही तार्किक वाटत नाही. पाकिस्तान देखील अतिरेक्यांना फूस लावून भारतात पाठवायचे आणि पकडले गेले तर हात वर करायचे असे करत आले आहे. ते काहिहि असले तरी कुटुंबाचे झालेले नक्कीच संवेदनशील मनाला चटका लावते.
प्रकाश घाटपांडे

हात वर करणे

माझा लष्करातील एक मित्र कथा सांगतो की हल्लीच त्याला परदेशात अशा काही कामासाठी पाठवले, जे लष्कराच्या अधिकृत धोरणात बसत नाही, पण भारत सरकारला हवे होते.

हा प्रकार घातक हेरगिरी नसून दुसरा काही होता, पण भारतीय लष्करातील अधिकारी त्या देशात त्या कामासाठी जाणे मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने फार वाईट ठरले असते. हेरगिरी नसल्यामुळे त्याने मला त्या परदेशदौर्‍याच्या कथा सांगितल्या (ज्या मी येथे सांगणार नाही - कारण त्यावरून तो देश कुठला, आणि माझा मित्र कोण हे कळणे फार कठिण राहाणार नाही. पण ही कथा अतिसंवेदनशील आणि अतिगुप्त नाही, काळजी नसावी.)

असो. माझ्या मित्रास "अमुक अमुक काम आहे" असे सांगितल्यानंतर हेही सांगितले, की जाणार असशील तर लष्करातून राजिनामा दे (परत आल्यावर परत रुजू हो). आम्हाला वाटत नाही पण चुकून गोत्यात अडकशील तर आम्ही तू आमचा नाही असे सांगू - त्या देशात जाऊन समाजकार्य करायचे तू व्यक्तिशः ठरवले असेल तर असेल - लष्कराचे धोरण याच्या विरुद्ध आहे. या बोलीवर, लष्करातून राजीनामा देऊन तो काही काळासाठी परदेशी गेला.

(या बाबतीत मी त्याला विचारले की बेनिफिट्स [माझ्या मनात कुटुंबाला मिळणार्‍या सवलती होत्या] बद्दल काय. अर्थात तरुण वयात कष्कर सोडून जाणार्‍या अधिकार्‍याइतपतच थोडक्या असत्या. त्या काळात त्याचा पगार कुठलीशी सेवाभावी संस्था भरत होती. मुत्सद्दी गोता झाला असता तर ती सेवाभावी संस्थाही सरकारने खारीज केली असती.

सुदैवाने त्याचे काम मोठ्या जोखमीचे नव्हते, तो त्या कालावधीनंतर तो परत आला, आणि लष्करात रुजू झाला. त्याचे आर्थिक नुकसान झाले नाही.

गुप्तहेरांबाबत असा काही कंत्राटाचा प्रकार असू शकेल असे वाटते. पकडला गेला नाहीस तर कायम आर्थिक मदत करू, पकडला गेल्यास "तू आमचा नाहीस!"

अमेरिकेतही सरकारला काही विशिष्ट लोकांना गुप्तपणे मदत करायची वेळ येते. त्यांचे दुसर्‍या गावात स्थलांतरण करून, त्यांना नवी नावे देऊन, त्याबद्दल सर्व नवी सरकारी कागदपत्रे तयार करून, नवे आयुष्य दिले जाते. मोठ्यामोठ्या गुंडगिरी टोळ्यांविरुद्ध साक्ष देणार्‍यांच्या कुटुंबांसाठी ही सेवा आहे हे सरकार उघडपणे बोलते. (उघडपणे मदत केली तर टोळीतील लोक कुटुंबास ठार मारतील, ही भीती.) गुप्तहेरांच्या कुटुंबांसाठीसुद्धा ही सेवा कार्यरत असेल असे मला वाटते.

राजा, वजीर्, मोहरा आणि प्यादी !!

प्याद्यांचे अस्तीत्च हे बलीदाना करीताच् असते.
प्रसंगी राजाला देखील जिवावर उदार व्हावे लागते.
राजा, ते प्यादी यांचे हे व्यावसायीक धोके आहेत.
त्यांनी या बद्द्ल वैशम्य् वटून् घेणे परीपक्व्तेचे नाही.
देशाचे हीत , या पेक्षा काहीच् महात्वाचे नाही.

आधी लगीन् ..
गड आला पण..
होता जिवा मह्णून...

हे आपले परमोच्च् आदरश आहेत.

त्यांचे स्मरण या प्रसंगी करूया व त्या थोर देश भक्तांना वंदन करूया .

आपण हे ब्लोग्ज् वरील् शब्दांचे फुगे सजवण्याचे चोचले करतोय् ते पुरेसे आहेत् काय् ?
आपली प्रशासकीय व्यवस्था योग्य कारवाई करण्यास काय करीत आहे ?

हा ब्लोग पोस्ट आपली फाजील उत्कंठा आहे की देश प्रेम आहे की बघ्यांची भिती आहे ?

 
^ वर