वृत्तपत्रांचा दर्जा - मतचाचणी अहवाल व निष्कर्ष

प्रस्तावना :
उपक्रमींचा सामुदायिक कल कोणत्या वृत्तपत्राकडे किती आहे हे जाणून घेण्यासाठी १६-०२-०८ च्या चर्चाप्रस्तावाद्वारे वृत्तपत्रांना गुणवत्ताक्रम देण्याचे आवाहन करण्यांत आले होते. मतदान गुप्त रहावे म्हणून गुणवत्ताक्रम व्य. नि. ने कळवावेत अशी विनंति केली होती.

प्रतिसाद :
चर्चाप्रस्तावाची सुमारे ३५० वाचने झाली. त्यावर ८ उपक्रमींकडून १५ प्रतिसाद / उपप्रतिसाद आले. प्रतिसाद देणार्‍यांना व्य. नि. द्वारे मतदानाची पुन्हा विनंति करण्यांत आली. एकूण सहाजणांनी मतदान केले. त्यासाठी काहींना एक-दोन स्मरणपत्रे पाठवावी लागली. अधिक मतदानाच्या अपेक्षेने दिलेली अंतिम तारीख उलटून गेल्यावरही आजपर्यंत वाट पाहिली.

मतदानावरून दिसून आलेली पसंती खालीलप्रमाणे :
१) नवशक्ति : एकाही मतदाराने १ ते ५ पैकी कुठलाही गुणवत्ताक्रम दिलेला नाही. मात्र एका मतदाराने या वृत्तपत्राला वैचारिक प्रामाणिकपणा व वाचकांशी संवाद याबाबतींत ३ रा व संपादकीय व परिपक्वता याबाबतींत ५ वा क्र्मांक दिलेला आहे.
२) महाराष्ट्र टाइम्स : या वृत्तपत्राला पहिला क्रमांक देणारा एक, दुसरा क्रमांक देणारे दोन व पाचवा क्रमांक देणारा एक असे मतदार आहेत. दोन मतदारांनी या वृत्तपत्राला अगदी खालच्या क्रमांकावर टाकले आहे.
३) लोकसत्ता : या वृत्तपत्राला पहिला क्रमांक देणारा एक, दुसरा क्रमांक देणारे तीन व तिसरा क्रमांक देणारे दोन असे मतदार आहेत.
४) सकाळ : यावृत्तपत्राला पहिला क्रमांक देणारे तीन व तिसरा क्रमांक देणारे तीन असे मतदार आहेत.
५) सामना : या वृत्तपत्राला तिसरा क्रमांक देणारा एक, चौथा क्रमांक देणारे दोन व पाचवा क्रमांक देणारे तीन असे मतदार आहेत. मात्र एका मतदाराने या वृत्तपत्राला वैचारिक प्रामाणिकपणा व जालावरील वावर याबाब्तींत पहिला क्रमांक व वाचकांशी संवाद याबाबतींत दुसरा क्रमांक दिला आहे.
६) लोकमत : या वृत्तपत्राला दुसरा क्रमांक देणारा एक, तिसरा क्रमांक देणारा एक व चौथा क्रमांक देणारा एक असे मतदार आहेत.
७) पुढारी : या वृत्तपत्राला चौथा क्रमांक देणारे दोन, व पाचवा क्रमांक देणारा एक असे मतदार आहेत.
८) तरुण भारत : या वृत्तपत्राला पाचवा क्रमांक देणारा एक मतदार आहे.

उपक्रमींच्या संख्येच्या मानाने मतदान अत्यत्यल्प झाले असल्यामुळे वरील मते प्रातिनिधिक म्हणता येणार नाहीत

आपणांस काय वाटते?

Comments

प्रतिसाद

आपणांस काय वाटते?

उपक्रमींच्या संख्येच्या मानाने मतदान अत्यल्प झाले असल्यामुळे वरील मते प्रातिनिधिक म्हणता येणार नाहीत.

असेच वाटते.

लहानपणापासुन सवय असल्याने सकाळवाचन सोयीचे वाटते पण इतर वृत्तपत्रांचा अभ्यास नसल्याने सकाळ चांगला का इतर वृत्तपत्र हे नक्की माहीत नाही. त्यामुळे मी काय मतप्रदर्शन करणार इतर मराठी वृत्तपत्रांबद्दल. तसेही मला वाटते की सध्याच्या काळात पूर्ण विश्वासार्ह असे कोणतेच प्रसारमाध्यम नाही. उलट एकमेकांकडे बोट दाखवत प्रत्येक माध्यम अजुनच बेताल होत आहेत. प्रत्येकाचा काही ना काही अजेंडा असतोच. म्हणुन ह्या मूळ चर्चेत, मतदानात मला सहभागी व्हायचे नव्हते.

मी रेडिफ, सकाळ, अन्य देशातील माध्यमे व इंटरनेट (नॉट नेसेसरी इन दॅट ऑर्डर)येथे बर्‍याच ठिकाणी वेगवेगळी व विषयानुरुप माहिती असेल ती वाचुन, तोलुन मोलुन (घडलेला प्रसंग, आजच्या काळातले संदर्भ व तारतम्य, शक्यतो "विन-विन" तोडगा) समजवुन घेतो.

कोर्डेसाहेब आपल्या श्रमाचे कौतुक वाटते म्हणुन हा प्रतिसाद!!

कौलम सेंटीमिटर >>

जाहीरातीचे दरांची तुलना केल्यास या मत चाचणीची गरज पडली नसती.
अत्यल्प प्रतीसाद सुद्धा हीच गोष्ट अंडर लाईन करीत आहेत.
व्रुत्तपत्रे हा एक धंदा आहे.
खुप कमी भांडवल असेल तरी करण्यास हरकत नाही.
जाहीरात दरां मुळे क्रिकेट्चे भाग्य फळफळ्ले आहे त्याच माळेतील जुने मणी म्ह्णजे व्रुत्त्पत्रे.
जाहीराती,बातम्या छापण्याचे आणि न छापण्याचे असे तिहेरी पीक काढण्यात येते.
मशागत करण्यासाठी डुरक्णारे बैल असणे जरूरी आहे.
न विकल्या गेलेल्या पेपर्ची रद्दी हे शेणखताचे उत्त्पन निश्चित आहेच. !!

चांगला प्रयत्न वाया गेला.

कोर्डे साहेब,
उपक्रमींचा सामुदायिक कल कोणत्या वृत्तपत्राकडे किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नाला दाद दिली पाहिजे.
उपक्रमीच्या संख्येच्या मानाने मतदान अत्यल्प झाले असल्यामुळे वरील मते प्रातिनिधिक म्हणता येणार नाहीत,हेही तितकेच खरे आहे.

त्यासाठी काहींना एक-दोन स्मरणपत्रे पाठवावी लागली. अधिक मतदानाच्या अपेक्षेने दिलेली अंतिम तारीख उलटून गेल्यावरही आजपर्यंत वाट पाहिली.

कोण असतील बरं , ही मोठी माणसं !!! ?

सांगलीच्या गडबडीत, आम्ही तर मतही पाठवू शकलो नाही :( कोर्डे साहेब, लेकीन नर्व्हस नै होणे का ? लिखते रहने का, अपून है ना !!!

 
^ वर