माझे वाड्मयचौर्य

नमस्कार,

उपक्रमावर बरेच उत्साही लेखक आहेत. पण एकमत होणे अवघड जात आहे. म्हणून विचार केला की जर या मान्यवर उपक्रमींचे थोडे थोडे विचार एकत्र करून एक लेख तयार केला तर "स्ट्रींङ थियरी" प्रमाणे सर्व एक होऊन जाऊ. म्हणून याला वाड्मयचौर्य म्हणायचे का नाही ते तुम्हीच ठरवा! खालीले रेषे खालील सर्व वाक्ये ही उपक्रमावर आधी प्रकाशित झालेल्या लेखातील आहेत, प्रतिसादातील नाहीत. फक्त एकच शब्द लिंगवाचक असल्याने बदलला आहे आणि तो वेगळ्या रंगात ठेवला आहे.
___________________________________

खुलासा: खालील लेख हा कोणताही वाद सुरू करण्याच्या हेतूने लिहीलेला नाही. लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखकाचा दावा नाही. वाचकांकडे खाली दिलेल्या मुद्द्यांवर भर टाकण्याजोगे अथवा योग्य माहितीच्या आधारे लेखातील मुद्दे खोडून काढण्यासारखे काही असेल तर ते येथे जरूर द्यावे.

कधी कधी एखादा प्रसंग आपल्या बरोबर झालेला नसतांना सुद्धा तो प्रसंग असा वाटतो की मी ह्या प्रसंगात पहीला सुद्धा होतो, तेच स्थळ, तीच माणसे, तोच विषय, त्यापुढे काय होणार हे सुद्धा समजते त्यावेळी असे वाटते की हे उघड्या डोळयांनी पाहीलेली स्वप्न तर नाही.

आम्ही ज्या प्रकारच्या बातम्या पुण्यात ऐकत आहोत त्यावरुन हा लेख लिहित आहे. विशेषतः तिथल्या तथाकथित विज्ञानवादी आणि देव/अध्यात्मवादींमुळे. तसे पाहिले तर विचार महत्त्वाचा.तो कोणी मांडला याला महत्त्व नाही. स्वतंत्र विचार करावा.कळपात सामील होऊ नये. पूर्वीचे उदाहरण द्यायला गेलं तर बरेच आहेत - यथा, धर्मेन्द्र-हेमा, श्रीदेवी- बोनी कपूर, रवीना टंडन, करिश्मा-संजय कपूर्, ऋचा शर्मा-संजय दत्त्, आमिर खान... अर्थात खूप उदाहरण आहेत, आणि ही "परम्परा" समाजात ही रुतु लागली आहे. जर एखाद्या दिवशी मी माझ्या प्रिय व्यक्ती वर माझे असलेले (काही जणांसाठी नसलेले ) प्रेम व्यक्त करतो व त्यांना ते आवडते तर हा माझा खासगी मामला ह्या मध्ये जे राजकारणी का ?

थोडक्यात स्वतःच्या बाहेर जाऊन किमान थोडेसे पहायचे ठरवले तर विचार घोंगायला लागतात. हा दोष कुणाचा? का फक्त "गो विथ द फ्लो" म्हणत आजूबाजूस दुर्लक्ष करून स्वतःचे बघत पुढे जायचे? सामाजीक स्वास्थ्य टिकवणे हा केवळ एक आदर्श विचार नाही तर त्यात व्यक्तिगत स्वार्थ देखील आहे. काही स्थानिक माणसेही या विकासकांना सामिल आहेत. त्यामुळे काय होणार या नगराचे ही चिंता लागुन राहीली आहे. एकीकडे साम्राज्याची आकांक्षा, परत जायचे नाही असे ठरवूनच आलेल्या ह्या लोकांनी हळूहळू आपले बस्तान अमेरिकेत बसवायला सुरूवात केली.

यातही पिलग्रिमांचे स्थानिक लोकांना ख्रिश्चन करून घेण्याचे प्रयत्न चालूच होते. ध्रुवीकरण हा सध्याच्या समाजात सहजसाध्य होऊ पहाणारा प्रकार होत चालला आहे. अनिवासी भारतीयांबद्द्लचा द्वेष आणि त्याला अहंमन्यतेची फोडणी. `मी आणि माझे घर' ही वृत्ती जोपासणारे समष्टीसाठी काही करतील अशी आशाच करता येत नाही. सर्व संबंधित उपक्रमींनी यावर गंभीरपणे विचार करावा अशी माझी विनंती आहे. समाजजीवनात अश्या अनेक ताणतणावांना सामोरे जावेच लागते आणि विधायक मार्गाने आपण हाही प्रश्न सोडवला पाहिजे असे मला वाटते. आजही गुडोपंतांना त्या तत्वाने ग्रासले होते. काही करण्याची इच्छा रहात नाही. जगापासून वेगळेच झालो आहोत अशी भावना येते. हा विषय स्त्रियांमध्ये अधिक लोकप्रिय राहिला. कारण अचूक ठरलेली भाकिते लक्षात ठेवण्याची मानसिकता व स्तुतीप्रियता ही त्यांच्याकडे अधिक आहे. जरी याचे प्रक्षेपण व्यवस्थित झाले तरी प्रक्षेपणानंतर थोड्याच वेळात त्यात बिघाड निर्माण झाला.

देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली. गेल्या दिड दशकात आर्थिक प्रगती, अणुशक्ती आणि माहिती-तंत्रज्ञानामुळे भारत हा जागतिक नकाशावर झळकू लागला आहे. नवीन गाडी घेतल्यानंतर देवळात जाण्याचीही गरज नाही, दिल्लीतील लोकांनी खास उपाय शोधून काढला आहे. शिवाय रोजगार निर्मितीचा होणार! याच गाडीने कंपनीला मंदीमध्ये देखील तरले होते. थोडक्यात माझी गाडी जी सारखी वळते ती नागरी कर्तव्याकडे. तुम्हाला काय वाटते? ही कितपत सुवार्ता आहे का? हा लोकशाहिचा खेळ कितपत टिकेल? तरीही ते म्हणतात, `आम्ही महाशक्ती होणार !' या रिटेलर्स ना नवीन वातावरणात धंदा कसा चालेल याची कल्पना मर्यादीत प्रमाणात आहे.

आपल्यांत हजरजबाबीपणाचा अभाव असल्यामुळे इतरांच्या बेधडक खोट्या विधानांना आपण तिथल्या तिथे प्रत्युत्तर देऊ शकत नाही व नंतर चरफडत बसतो. हा इतिहास कुठेही नोंदलेला नाही. परंतु मॉक्सम यांनी गेल्या दशकात त्यावर अथक संशोधन केले. बर्‍याच दिवसांनी असे, prejudiced लिखाण वाचले. प्रत्येक अनुभव आधीपेक्षा वेगळा असेल तर जास्त आकर्षक वाटतो. काय लिहावे व काय नाही.... एकच प्रण मत त्यालाच जो विकास करेल महाराष्ट्राचा व देशाचा....या अनुषंगाने होणारी चर्चा अपेक्षित आहे. ही चर्चा आपणासारख्या माहितगार आणि व्यासंगी उपक्रमींमुळे उद्बोधक होईल अशी खात्री वाटते.

Comments

हाहा

भलतेच मनोरंजक 'मोन्ताज्' ! ;-)

आम्ही म्हणींचा संकर करायचो त्याची आठवण झाली . उदा. "कोल्ह्याला देव तारी , त्याला आंबट द्राक्षे कोण मारी !"
मला मागे एका फोरम वर विचारलेला प्रश्न तुम्हाला विचारतो (ह. घ्या !!)

डूड्, डू यू हॅव् अ डे जॉब् ??

उत्तर

डूड्, डू यू हॅव् अ डे जॉब् ??

अर्थातच. आणि माझे काम फक्त आमच्या साहेबालाच नाहीतर तमाम जनतेला पण आवडते... तसे नाहीतर येथे खरडणे परवडेल का? :)

मोंताज

जरा मोंताज विषयी अधिक विस्ताराने माहिती हवी आहे. मला हा प्रकार सुधरायला जरा वेळच लागला.
प्रकाश घाटपांडे

सहमत

या अत्यंत गंभीर विषयावरील लेखाशी सहमत आहे. मराठी अस्मितेचे झेंडे अटकेपार लावण्यासाठी हिंदुपतपातशाहीची लखलखती तलवार सतत परजत रहाणे आजच्या धकाधकीच्या काळात आवश्यकच झाले आहे असे वाटतानाच एकतेच्या नावाखाली राजकारण करणार्‍या राजकारण्यांचा हिंदूंनो जागे व्हा असा संदेश आसमंतात दुमदुमला आणि काय आश्चर्य! यदायदाही धर्मस्य हे केवळ हिंदूपुरते मर्यादित न रहाता ख्रिस्ती, ज्यू आणि जेहोवाही त्यात सामील झाले. अकबर, जोधा आणि ऐश्वर्या अशी व्यक्तिमत्वे एकत्र आल्यावर चित्रपट हा केवळ एक कलाप्रकार न रहाता त्याची मिती अमर्याद पातळीवर जाणिव आणि नेणिवेच्या क्षितीजाला छेद देते कारण फ्रॉईडच्या सिद्धांतानुसार नैराश्य हे सुद्धा एक भासमान सत्य आहे आणि त्याला सामोरे जायचे असेल तर शिवमंदिर असलेल्या ताजमहालात बसून अकबर जोधा बघण्याला पर्याय नसावा.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

अवश्य...

(तुमच्या संस्थेत नोकरी करावी म्हणतो. म्हणजे दिवसभर उपक्रमावर पडीक राहता येईल.)

अवश्य! याहू! I mean - या हो!

रोचक

थोडा वेळ लागला समजायला. परत वाचला.

गंमत वाटली.

प्रतिसादात थोडे एकमत होत आहे का? :-)

गुंतागुंतीचा

लेखनप्रकार, त्यामुळे वाचायला वेळ लागला. गंमत वाटली

राजेंद्रनी त्याच शैलीत एक प्रतिसाद दिला आहे. मला मात्र हा सोपाच प्रतिसाद देणे सुचते आहे.

 
^ वर