उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
यांत्रिकी आरेखक(मेकॅनिकल ड्रॉफ्ट्समन)
विकि
February 29, 2008 - 2:17 pm
यांत्रिकी आरेखक .
यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का?
महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते.
आपला
कॉ.विकि
दुवे:
Comments
शब्द आवडला
मेकॅनिकल ड्रॉफ्ट्समनसाठी यांत्रिकी आरेखक हा शब्द आवडला. फक्त आपण ज्या पद्धतीने वापरत आहात त्यामधे तो शब्द "ड्राफ्टमन" (व्यक्ती) च्या ऐवजी ड्राफ्टर (यंत्राशी) शी सदंधात आहे असे वाटते. आता माहीत नाही, पण मी जेंव्हा इंजिनियरींगला होतो तेंव्हा प्रथम वर्षासाठी हा समान विषय सर्व शाखांना असायचा.
बर्याच पूर्वी टि स्क्वेअर आणि सेट स्क्वेअर्स असायचे नंतर ड्राफ्टर आले आता सर्व संगणकावर ऑटोकॅड सारखे प्रोग्रॅम्स करतात. बाकी आपल्या प्रश्नांची उत्तरे येथे नक्की काय अपेक्षीत आहे ते कळले नाही... म्हणजे "यांत्रिकी आरेखक " समाजातील उपेक्षित भाग आहे का? का त्यांना कमी लेखणारा त्यांच्या आधीच्या काळातील टि स्क्वेअर-सेट स्क्वेअरवर चित्रपट निघाला आहे? का त्यांच्या ऐवजी ऑटोकॅड हे नवीन पिढीला जास्त आकर्षक वाटते अशी आपल्याला काळजी वाटते? :-) (आपल्याला सुज्ञ समजतो पण तरी देखील फॉर द रेकॉर्ड शेवटचे वाक्य ह. घ्या.!)
विकास साहेब
तुम्ही फार छान माहीती दिलीत.
यांत्रिकी आरेखक उपेक्षीत भाग अजिबात नाही. मला एवढेच विचारावयाचे आहे की एखाधा यंत्राचा भाग इमॅजिन करणे म्हणजे ते कश्या प्रकारे ? म्हणजे टॉप ,फ्रण्ट्, साईड ने तो कसा दिसतो. हे कशा प्रकारे ओळखायचे .
उदाहरण द्यावयाचे झाल्यास पुलीज चे देऊ शकतो .पुलीमध्ये हब,आर्म्स .रिम हे भाग येतात कींवा इतर कोणतेही मशीन आपण घेऊ शकयतो , तर भाग सुटे करून ड्रॉंईग पुली न बघता आरेखक काढतात याचा अर्थ ते इमॅजिन करतात .पण कसे?
बाकी ऑटोकॅडविषयी म्हणत असाल तर ऑटॉकॅडने ड्रॉईंग काढणे फार सोपे झाले आहे. वेळ फारच कमी लागतो.पुर्वी हाती ड्रॉईंग काढावयाचे असल्यास बरेच सोपस्कार करावे लागत आता तसे होत नाही.
आता बघयला गेल्यास ऑटोकॅडच्या पुढखॉ अनेक सॉफ्टवेअर आले आहे उदा .प्रोई,कॅम,सॉलीड एज यात तर नुसते क्लीक केल्यास व्यु हजर. डोके जास्त चालवावे लागत नाही.
अगोदर हाती काढल्याशिवाय हे शक्य नाही हे ही तितकेच खरे.
आपला
कॉ.विकि
विषय...
विषय चांगला आहे. पण माहिती नक्की कशासाठी हवी आहे ते कळल्यास जास्त चांगले उत्तर देता येइल.
यांत्रिक आरेखक
यांत्रिकी आरेखक म्हणजे काय?
मेकॅनिकल ड्राफ्टर जो विकास यांनी वर दाखवला आहे. याचा उपयोग समांतर (कागदाला किंवा इतर कुढल्याही ठराविक अंशासाठी, तसेच लंब) रेषा सहजतेने काढण्यासाठी होतो.
टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?
वस्तू वरून, समोरून व बाजूने पाहिल्यास कशी दिसेल याचे चित्रण. (जसे पाण्याचे पिंप वरून वर्तुळाकार तर बाजूने चौकोनाप्रमाणे दिसेल.) यांचा उपयोग म्हणजे त्रिमित वस्तूचे द्विमित कागदावर शास्त्रशुद्ध व संकेतानुरूप चित्रण.
यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो?
वर सांगितल्या प्रकारे.
वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात.
जशी गरज असेल तसे. :) A0 हा A1 च्या दुप्पट व तसेच पुढे. तुम्हाला आरेखन कशाचे करायचे आहे व त्यात किती सविस्तर माहिती द्यायची आहे यावर हे अवलंबून आहे. (आणि अर्थातच वस्तुच्या मोजमापांवर आणि आरेखनाच्या 'प्रमाणावर')
तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का?
प्रश्न कळला नाही. नक्की कशाची माहिती हवी आहे?
महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते.
समस्या किचकट नसेल नियम पाळत आरेखन करत जाणे पुरेसे असावे. याने कल्पना शक्तीला ताण पडत नसावा. (चुका करायला मात्र कल्पनाशक्तीची भरारी लागते.)
तर भाग सुटे करून ड्रॉंईग पुली न बघता आरेखक काढतात याचा अर्थ ते इमॅजिन करतात ..
पुली पाहिली नाही तरी ती नक्की कशी आहे याची पूर्वकल्पना असल्याशिवाय 'काल्पनिक' आरेखन करता येत नाही.
अभियंत्याची भाषा.
ड्रॉंईंग ( आरेखन) ही अभियंत्याची भाषा ( माध्यम ) आहे. अनेक वेळेस तांत्रिक चर्चेच्या वेळेस एखाद्या कागदावर झटपट आरेखन केले असता सगळ्यांनाच समस्येचे आकलन लवकर होते असा माझा अनुभव आहे.
अवांतर : काही लोकांना कागदावर लिहिल्याशिवाय बोलताच येत नाही असाही माझा अनुभव आहे.
बाकी विकी शेठांच्या डोक्यात असे बरेच काही असते हे कौतुकास्पद आहे.