७५ वर्षीय राष्ट्रभक्त पू. भिडेगुरुजी यांना पोलिसांकडून निर्दय मारहाण
सांगली : येथील विविध चित्रपटगृहांत इतिहासद्रोही `जोधा अकबर' हा चित्रपट सुरू होता. तो बंद करण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन केल्यानंतर येथील शिवतीर्थावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व हजारो हिंदु तरुणांमध्ये धर्माभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे ७५ वर्षीय पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री. हणमंतराव पवार यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.
पोलिसांच्या मारहाणीमुळे पू. भिडेगुरुजी जमिनीवर कोसळले.
(सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्या हिंदूंना `पोलिसी खाक्या' दाखवणार्या पोलिसांनी दंगलखोर मुसलमानांना तो कधीतरी दाखवला आहे का ? यावरून पोलिसांना हिंदूंची सनदशीर आंदोलनाची भाषा कळत नाही, हेच सिद्ध होते. हिंदूंनो, धर्मासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या पू. भिडे गुरुजी यांच्यासारख्या परमवंदनीय व्यक्तीवर अधिकाराच्या गुर्मीत हात टाकणार्या या मोगलांच्या वंशजांना अद्दल घडवण्यासाठी संघटित व्हा ! - संपादक) यात जखमी झाल्याने पू. गुरुजींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांच्या मोगलाईचा पश्चिम महाराष्ट्रात निषेध !
ही माहिती श्रीशिवप्रतिष्ठानच्या अन्यत्रच्या कार्यकर्त्यांना कळताच प्रक्षुब्ध बनलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची व्हॅन व शहरातील बसगाड्या फोडल्या. पू. गुरुजींना झालेल्या मारहाणीचे पडसाद सांगली, बेळगाव व कोल्हापूर या जिल्ह्यांसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात उमटले. पोलिसांच्या या मोगलाईचा निषेध सर्वच स्तरांतून व्यक्त झाला व होत आहे.
इस संभाजी भिडे का बहुत चल रहा है । - मग्रूर पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने `मल्टीप्लेक्स' व `त्रिमूर्ती' या दोन चित्रपटगृहांच्या मालकांची भेट घेण्यात आली. त्या वेळी या चित्रपटगृहांच्या मालकांनी इतिहासद्रोही `जोधा अकबर' चित्रपट दाखवणे बंद करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवतीर्थावर जमले. तेथे पू. गुरुजी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. तेव्हा मग्रूर जिल्हा पोलीसप्रमुख श्री. कृष्णप्रकाश आले. ``इस संभाजी भिडे का बहुत चल रहा है ।'', असे म्हणत त्यांनी पोलिसांना लाठीमाराचा आदेश दिला. (ही आहे वयोवृद्धांनाही मान न देणार्या मुजोर पोलिसांची संस्कृती ! अशा पोलिसांना जनतेने कर भरून पोसायचे कशाला ? - संपादक) तेव्हा लगेचच पोलीस त्यांच्यावर तुटून पडले. (एका वंदनीय हिंदुत्ववादी नेत्यावर तुटूनपडणारे धर्मद्रोही पोलीस धर्मक्रांती अपरिहार्य करतात ! - संपादक) या वेळी झालेल्या हल्ल्यात पू. गुरुजींच्या कोपराला व पाठीला जबर मार बसला.
पोलिसांपासून पू. गुरुजींना वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पू. गुरुजी व पोलीस यांच्या मध्ये आडवे पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी पू. गुरुजींसह कार्यकर्त्यांनाही बेदम मारहाण केली. (स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीश पोलिसांच्या क्रौर्याची आठवण करून देणारे स्वातंत्र्योत्तर काळातील काळया कातडीचे ब्रिटीश पोलीस ! हिंदूंनो, धर्माभिमानी हिंदूंवर झालेले हे अत्याचार लक्षात ठेवा ! - संपादक) हे समजताच बाहेर असणार्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या व्हॅनवर हल्ला चढवला. पोलिसांच्या या अघोरी कृत्याची बातमी वार्यासारखी पसरली व या कृत्याच्या विरोधात संपूर्ण सांगलीतील वातावरण पेटले.
वृत्तपत्रांचे छायाचित्रकार, पत्रकार, मानवाधिकार आयोगाचे कार्यकर्ते आणि रुग्ण यांच्यावरही पोलिसांची मर्दुमकी !
पू. गुरुजींसह जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मानवाधिकार आयोग व श्रीशिवप्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी पू. गुरुजींची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्या सर्वांवर लाठीमार केला. (जनतेच्या जिवावर जगणारे पोलीस स्वत:ला जनतेचे मालक समजतात कि काय ? अशा उन्मत्त पोलिसांवर शासन काय कारवाई करणार आहे ? - संपादक) या वेळी वृत्तपत्रांचे छायाचित्रकार, पत्रकार व काही रुग्णांवरही पोलिसांनी अमानुष लाठीमाराची मर्दुमकी गाजवली. याबाबत पत्रकारांशी बोलतांना जिल्हा पोलीसप्रमुख श्री. कृष्णप्रकाश म्हणाले, ``आमच्यावर कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याने प्रत्युत्तर द्यावे लागले.'' (घटना पहाणार्यांनी पोलिसांनी थेट कारवाईसच सुरुवात केल्याचे सांगितले आहे. असे असतांना पोलीस प्रमुखांच्या या वक्तव्यावर कोण विश्वास ठेवणार ? नि:शस्त्र हिंदुत्ववाद्यांवर हल्ला करणार्या उद्दाम पोलिसांनी जनता संतापली, तर काय होते, याबाबतच्या इतिहासातील उदाहरणांचा अभ्यास करणे त्यांच्या हिताचे आहे ! - संपादक)
इस्लामी औलादीच्या जिल्हा पोलीस प्रमुखाला भारताबाहेर घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ! - हणमंतराव पवार
प्रत्यक्ष घटनास्थळी या मारहाणीत जखमी झालेले श्री. हणमंतराव पवार म्हणाले, ``इस्लामी औलादीच्या जिल्हा पोलीस प्रमुखाला भारताबाहेर घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ! ज्या धर्मांध अकबराने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याच्याच उदात्तीकरणाचा प्रयत्न करणारा चित्रपट बंद पाडण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठानने आंदोलन केले होते.''
--------------------------------------------------------------------------------
गृहमंत्र्यांकडे निषेध नोंदवा !
दू.क्र. : (कार्या) (०२२) २२०२ २४०१(३६८७),
(नि) २३६३ ७४९१ फॅक्स : २२०२ ४८७३
--------------------------------------------------------------------------------
साभार : दैनिक सनातन प्रभात
Comments
हिंदूंनो, मुसलमान व्हा!
बरोबर! तेव्हा हिंदूंनो तुम्ही मुसलमान व्हा. त्यामुळे पोलीस तुमच्यावर कार्यवाही करणार नाहीत. दोन पैशाच्या तमाशासाठी लाखोंनी केलेली आंदोलने सफळ होतील.
वा! वा! आपण काश्मिरला कधी जायचे?
सर्व पोलीसांना पाश्चिमात्त्य देशांत धाडू. तिथे वयोवृद्धांना मान देण्याची संस्कृती नाही म्हणतात.
बरोब्बर! हिंदूंनो तुम्हीही मुसलमान व्हा. इस्लामी औलादीच्या जिल्हा पोलीस प्रमुखासोबत पाकिस्तानात हाकलले जा. तिथे आंदोलने करा, जाळपोळ करा, कालांतराने पाकिस्तान आपला होईल.
मुसलमानांनी आपल्या पोराबाळांची नावे हिंदू देवांवरून ठेवण्यास सुरूवात केली का? किती पुरोगामी विचारांचे आहेत ते. नाहीतर आपण? कोणा हिंदूचे नाव रहिम ऐकले आहे काय? मी तर शाहरुख जोशी, आमीर पटवर्धन, सलमान कांबळे अशी नावेही ऐकली नाहीत.
आपला,
राजीव खान.
साहेब, जरा "सनातन भारत" वाचा
असले काही लिहिण्यापूर्वी थोडा विचार करावा.
"सनातन भारत"चे संपादक सेतुसमुद्रम् प्रकल्पाविषयी लिहिताना म्हणतात (२९ फेब्रुवारी, २००८). (संकेतस्थळाचा दुवा मूळ लेखात दिलेला आहे.)
अहो मंत्र्यांची धडगत नाही धर्मक्रांती येईल तेव्हा. अशा प्रतिसादांच्या लेखकांना लक्षात ठेवणार नाहीत असे वाटले की काय?
आणि तुम्हाला काय वाटले, फक्त काँग्रेसवालेच क्रांतीच्या वेळी रडतील?
कर्नाटकातील चिकमंगळूरजवळील दत्तपीठाच्या बाबतीत संपादक (इंग्रजीत) म्हणतात (सप्टेंबर ८, २००७)
Anti-Hindu and Anti- justice BJP-JD Govt. insults Court. – Editor
हिंदूविरोधी आणि न्यायविरोधी भाजप-जद सरकार...
मी दुवे देत राहाण्यापेक्षा तुम्हीच तिथे जाऊन माहिती गोळा करा. अखंड असावे सावधान.
निषेध
आंदोलकांवर केलेला लाठीहल्ला अमानुष होता. प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे. दुसर्याला त्रास होत नाही इतपत मर्यादा पाळून केलेला निषेध योग्यच आहे.
भिडे यांना मारण्यापूर्वी वृद्धत्वाचा तरी आदर राखायचा होता.
मात्र हे आंदोलन एकूणच बिनबुडाचे आहे.
असाच निषेध माझ्याकडूनही...
...
अकबराची क्रूरता !
मात्र हे आंदोलन एकूणच बिनबुडाचे आहे.
अकबराचे मूळ नाव होते जलालुद्दीन महंमद. नावाप्रमाणेच तो `जलाल' (उग्र) होता. अवघ्या तेराव्या वर्षी गादीवर येताच त्याला `श्रेष्ठ' अशा अर्थाचे `अकबर' हे बिरूद चिकटवण्यात आले. हे बिरूद त्याच्या गुणांचे द्योतक नसून पदाचे द्योतक होते; म्हणजे जलालुद्दीनचा थोरपणा पाहून लोकांनी आपण होऊन त्यास `अकबर' (`श्रेष्ठ') म्हटले नव्हते.
नीच, लंपट, दुराचारी आणि हिंदुद्वेष्टा असलेल्या अकबराला `थोर' म्हणणे, हे आपल्या बहुतांश इतिहासतज्ञांचे अज्ञान व स्वार्थ किंवा लबाडी व भेकडपणा आहे. इतिहासतज्ञांच्या या चुका दुरुस्त करण्याऐवजी त्यांना मीठमसाला लावण्याचे काम पैशाला चटावलेली चित्रपटसृष्टी करत आहे. `जोधा अकबर' चित्रपटाला विरोध करण्यासाठी देशभरातील हिंदुत्ववादी संघटना जोरदार आंदोलने करत आहेत; मात्र दुसर्या बाजूला हा चित्रपट पहाण्यासाठी देशभरातील चित्रपटगृहांत गर्दी करणारे व याला मात्र हे आंदोलन एकूणच बिनबुडाचे आहे असे लिहिनारे हिंदूच आहेत. या सर्वांसाठी क्रूरकर्मा अकबराची हिंदुद्वेष्टी कृत्ये लेखक : पुरुषोत्तम नागेश ओक यांच्या `अकबर थोर नव्हताच' या पुस्तकातुन घेतलि आहेत.
अकबराची क्रूरता !
जगातील अनेक देशांना जखडून पिळून काढणार्या इस्लामवाद्यांच्या छळांच्या साखळीत अकबराचे शासन ही एक चपखल कडी होती भारतात शासन केलेल्या सार्याच सुलतान बादशहांचे अत्याचार अन् अकबराची दुष्कृत्ये यांत काहीच फरक नव्हता. ‘Annals and Antiquities of Rajasthan’ (भाग १, पृष्ठ २५९) या ग्रंथाचा लेखक कर्नल जेम्स टॉड याने म्हटले आहे, `वीरोचित जीवन व्यतीत करणार्या क्षत्रियांच्या अनेक पिढ्या अकबराच्या तलवारीने समूळ नष्ट झाल्या. अकबराच्या कारकीर्दीच्या पूर्वीचे त्यांचे वैभव पार नष्ट झाले. शहाबुद्दीन (घोरी), अल्लाउद्दीन (खिल्जी) आदी विध्वंसक नरपिशाचांच्या श्रेणीतच अकबराची गणना होते. अन्य मूर्तीभंजकांप्रमाणेच अकबरानेही रजपुतांचे दैवत एकलिंगजी शंकराच्या अनेक पिंडी फोडून त्यांचे कुराणाच्या प्रवचनकारांकरता ओटे तयार केले.'
-------------------------------------------
मदिरा व मदिराक्षीच्या संयुक्त आवारास `शैतानपुरा' !
अकबराच्या राहत्या महालाजवळ एक कुंटणखाना असे. त्यावर अकबराची स्वत:ची देखरेख असे. त्यासंबंधीचा तपशील अबुल फजलच्या आईने `अकबरी' ग्रंथात पृष्ठ २७६ वर दिला आहे. तो असा, `अकबराने महालासमीपच एक मद्यशाला स्थापन केली होती. तिच्याशी संलग्न एक वेश्यागृहही होते. राज्यातून सतत भरणा होत असलेल्या त्या महिला भांडारात असंख्य वेश्या होत्या. त्यांची गणना करता येत नसे. त्यांतील कोण अजून कुमारी आहे वा कोणाचे कौमार्य कोणी भंग केले, इ. बित्तंबातमी अकबर त्या वेश्यांशी स्वत: बोलून काढून घेई. मदिरा व मदिराक्षींच्या त्या संयुक्त आवारास `शैतानपुरा' म्हणत.' अशा शैतानपुर्याच्या निकट राहून त्या आवाराची पूर्ण देखरेख स्वत:कडे ठेवून त्या अंत:पुरातील सर्व बित्तंबातमी जातीने ठेवणारा अकबर हा स्वत: सैतान होता, हे आपोआप सिद्ध होते.
-------------------------------------------
असे होते अकबराचे सेनानी !
युद्धबंद्यांच्या टोळयाच्या टोळया अकबराच्या अधमखान व पीर महंमद या दोन सेनांनीपुढे जसजशा आणल्या गेल्या, तसतशा त्यांच्या कत्तली केल्या गेल्या. त्या कापलेल्या असंख्य शरिरांतून रक्ताचे पाट वाहू लागले. अशा कत्तली करत असतांना पीर महमंदास तर थट्टा सुचत होती, `अमक्याचे शरीर किती लुसलुशीत आहे किंवा अमक्याचे किती निब्बर आहे' इत्यादी. त्याच्या बीभत्स विनोदांवर जेव्हा काहींनी आक्षेप घेतला, तेव्हा त्याने खवचटपणे उत्तर दिले, ``एका रात्रीत एवढे बंदी ताब्यात आल्यावर सरसहा कत्तलीशिवाय दुसरे काय करणार ?'' एवढेच काय, तर सैय्यद तथा विद्वान शेख हे बिचारे प्रत्यक्ष कुराण हातात घेऊन पीर महमंदला भेट म्हणून द्यायला गेले, तो त्यांचीही इवलीशीसुद्धा गय न करता त्यांनाही सपशेल छाटून टाकण्यात आले, असे बदायुनी व्यथित हृदयाने लिहितो.
-------------------------------------------
रक्ताने माखलेला इतिहास !
संगरूरच्या युद्धानंतर नव्याने काबीज केलेल्या माळवा प्रांताचा सुभेदार म्हणून अधमखानाची नियुक्ती झाली.त्याच्या नावास साजेसा तो अधमच होता. काही अवधीनंतर त्यास बोलावून घेऊन त्याच्या जागी पीर महंमदास नेमण्यात आले. पीर महंमदाने आल्या आल्या बऱ्हाणपूर व बीजागडावर हल्ला केला. बीजागड किल्ल्यातील सर्वांची त्याने सरसहा कत्तल केली. तसेच बऱ्हाणपुरात त्याने हजारो नागरिकांना कैद केले. शिवाय नर्मदा नदीच्या दक्षिण किनार्यावरील अनेक गावे जाळून-पोळून, लुटून, कत्तली व व्यभिचार करून उद्ध्वस्त केली. असे करण्यात पीर महंमदाने चंगीझखानाचाच कित्ता गिरवला असे स्वत: दुष्ट व धर्मांध बदायुनी म्हणतो. त्यावरून पीर महंमदाने केवढा हाहाकार माजवला असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी !
-------------------------------------------
कामांध अकबराचे खरे स्वरूप !
अकबराच्या कामुकतेचे एक उदाहरण बदायुनीच्या मुन्तखांब-उत्त-तवारीखमध्ये नोंदलेले आहे. ते असे की, अकबर मथुरेत असतांना `दिल्लीतील सर्व प्रतिष्ठित, अधिकारी व धनवान कुटुंबे यांच्याशी स्वत:चा लग्नसंबंध करायला हवा', अशी एक कल्पना अकबराला सुचली; म्हणून त्याने सर्व प्रतिष्ठित घराण्यांच्या जनानखान्यांतील सुंदर स्त्रियांचा वेध घेऊन एक लांबलचक सूची तयार करण्यासाठी एक चौकशी टोळी तयार केली. त्यातून त्याला सुगावा लागला की, अब्दुलबासीची पत्नी लावण्यवती आहे. अकबराने असा नियम केला होता की, अकबरास हवीशी वाटणारी स्त्री जर विवाहित असली, तर तिचा विवाहविच्छेद करून तिने अकबराची बटीक झालेच पाहिजे.
-------------------------------------------
इस्लामी बखरकारांचा लबाड हेतू !
अकबराच्या आक्रमक सेनेचा राणी दुर्गावती हिने गोंडवन प्रदेशात जेव्हा धडाडीने प्रतिकार केला तेव्हा ती तर रणांगणांत पडलीच, पण मुसलमानी सैनिकांकडून हाल व बेअब्रू होऊ नये म्हणून शेकडो हिंदु स्त्रियांनी स्वत:ला जाळून घेतले. मात्र राणी दुर्गावतीची बहीण कमलावती आणि पूर्णगडाच्या राजाची कन्या (दुर्गावतीची सून) ह्या दोन्ही घेरल्या जाऊन त्यांना आग्य्रास अकबराच्या जनानखान्यात धाडण्यात आले.धर्मांध मुस्लिम बखरकार मुद्दाम उल्लेख करतो की यद्यपि राणी दुर्गावतीचा पुत्र वीर नारायण विवाहीत होता, तरी त्याची पत्नी (पूर्णगडाची राजकुमारी) कुमारीच होती. विवाहीत स्त्रियांनाही खुशाल कुमारी घोषित केल्याने त्यांच्याशी समागम करण्यात कोणतेही पाप नव्हते, हा इस्लामी बखरकारांचा लबाड हेतू होता. अकबर त्यांच्याकडून असे नोंदवून घ्यायचा की अकबराच्या जनानखान्यात प्रविष्ट होणार्या सर्व कुमारिकाच असत अथवा फार तर रीतसर घटस्फोटित असत. ह्या उद्गाराने असे ध्वनित केले जात असे की सौभाग्यवती स्त्रियांवर अकबर (वा त्याचे सैनिक, दरबारी, अधिकारी इ.) कधी बलात्कार करीत नसे. हे जर खरे असते तर अकबराच्या प्रत्येक विजयाच्या वेळी हिंदु स्त्रिया जोहार का करीत ?
साभार : `अकबर थोर नव्हताच', लेखक : पुरुषोत्तम नागेश ओक ( पु. ना. ओक)
पु. ना. ओक इतिहासकार नाहीतच
ज्या प्रमाणे अकबर थोर नव्हता त्याप्रमाणे पु. ना. ओकही इतिहासकार नाहीत. तद्वत त्यांच्या विचारांनी आणि लेखनाने सूज्ञ प्रभावित होतात असा माझा अनुभव नाहीच.
ज्या स्त्रियांबद्दल आपण इतके पोटतिडकीने लिहिले आहे त्या स्त्रियांवर हिंदूंनी केलेले हजारो वर्षांपासूनचे अत्याचार पुरेसे आहेत. जर नावेच ठेवायची झाली तर खालील लोकांनाही बेधडक* नावे ठेवता येतील
पुरेसे आहे का अजून हवे? ज्या संस्कृतीत स्वतःच्या बायकोलाच अशी वागणूक दिली जाते तेथे अकबराने इतर स्त्रियांना अशी वागणूक दिली तर नवल ते काय?
ज्या संस्कृतीला, थोरल्या राजांचा मोठेपणा दाखवण्यासाठी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेविषयी "खास"** कथा आणि पोवाडे रचावेशे वाटतात ती संस्कृती परक्या स्त्रियांना तशीच वागणूक देत असे हे सिद्ध होते.
* तत्कालिन संस्कृती, इतिहास, काल यांचा कोणताही विचार न करता उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे करणे सहज सोपे असते.
** सदर प्रसंग घडलाच नाही असे बर्याच इतिहासकारांचे मत पडते.
तुम्ही सुद्धा काही तरी करा की मग
ज्या स्त्रियांबद्दल आपण इतके पोटतिडकीने लिहिले आहे त्या स्त्रियांवर हिंदूंनी केलेले हजारो वर्षांपासूनचे अत्याचार पुरेसे आहेत. जर नावेच ठेवायची झाली तर खालील लोकांनाही बेधडक* नावे ठेवता येतील
तुम्ही सुद्धा काही तरी करा की मग
डोळ्यांवर झापडे ओढली
डोळ्यांवर झापडे ओढली की दुसर्यांनी काही केलेले दिसत नाही. आपली आणि आपल्या सहकार्यांची अशीच परिस्थिती आहे. भडक विधाने करून लोकांना भडकवणे, खोटेनाटे प्रचार करणे, एखाद्या क्षुल्लक चित्रपटासाठी आपल्याच वयोवृद्ध सहकार्यांना बळी करणे... आणि त्याचे खापर इतरांवर फोडणे...आपला करावा तेवढा निषेध थोडा आहे.
राहिला प्रश्न माझा, तर मला करण्यासारखी बरीच कामे मी करते. ती करताना कोणा धर्माला शिव्या घालणे, कोणाला जाहिर याची-त्याची औलाद म्हणणे यांची गरज पडलेली नाही. त्यात कधी कोणा बस-गाड्यांची जाळपोळ केलेली मला आठवत नाही आणि अशा विध्वंसक प्रवृत्तीची किव वाटते.
हे वाचा
ज्या प्रमाणे अकबर थोर नव्हता त्याप्रमाणे पु. ना. ओकही इतिहासकार नाहीत. तद्वत त्यांच्या विचारांनी आणि लेखनाने सूज्ञ प्रभावित होतात असा माझा अनुभव नाहीच.
हे वाचा : http://en.wikipedia.org/wiki/Purushottam_Nagesh_Oak
विकीचे कसले दाखले देताय?
त्यावर आम्हीच हौशे-गवशे लिहितो. :))
त्यावर आम्हीच हौशे-गवशे लिहितो.
विकीचे कसले दाखले देताय?
त्यावर आम्हीच हौशे-गवशे लिहितो. :))
म्हणजे तुम्ही खोटे लिहीता :((((
म्हणजे तुम्ही खोटे लिहीता :((((
म्हणजे तुम्ही खोटे लिहीता :((((
म्हणजे तुम्ही खोटे लिहीता :((((
तरी देखिल तुमच्या साठी खालील लिंक देतो आहे.
http://home.freeuk.com/tajmahal/19Author.htm
खोटे नाही
स्वतःच्या समजूतीप्रमाणे लिहितो. तेव्हा आपल्यासारख्या समजूतीच्या लेखकाने लिहिलेला लेख पु. ना. ओकांना या राष्ट्राचा सर्वश्रेष्ठ इतिहासकार गणत असेल तर नवल नाही.
म्हणजे हेही तसेच का ?
माझे विकिपीडियावरील लेखनः
अलेक्झांडर द ग्रेट (अपूर्ण)
मंगोलियाचा इतिहास
कंबोडियाचा इतिहास
ग्रीसचा इतिहास
इराणचा इतिहास (भविष्यकालीन योजना) ;-)
याखेरीज अप्सरा, सरस्वती महाल ग्रंथालय, जिजाबाई वगैरे वगैरे वगैरे.
म्हणजे हेही तसेच का ?
हो
अगदी तसेच. मी कोणाला त्यावर विश्वास ठेवा म्हणून सांगितलेले नाही, मी माझ्या समजूतीप्रमाणे लिहिते. गोष्ट आपल्या लक्षात आली असेलच. नसल्यास विचारात घ्या.
पान तसे ठीक वाटले
ओक यांचे भाषण मी लहानपणी ऐकले आहे. तेजोमहल वगैरे, मजा वाटली. मला वाटते की ते मी बघितलेले सर्वप्रथम प्रकाशचित्रात्मक भाषण होते (स्लाईड शो).
विकी दुव्यावरून असे कळले की ओक यांनी सिद्ध केले आहे की इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे हिंदूधर्माचे पंथ आहेत. हे त्यावेळच्या त्यांच्या भाषणातले आठवत नाही.
हिंदू पंथांमधला झगडा आहे तर हा सगळा. अकबर हा एका हिंदू पंथातला राजा होता, जोधा ही एक काल्पनिक हिंदू स्त्री होती.
हंऽ
कल्पनाविलासासारखा सुरक्षित शरीरसंबंध नाही. कारण काल्पनिक स्त्रीशी विवाह करून जनसंख्या वाढत नाही, अशी माझी कल्पना आहे. (नाहीतर माझ्या कॉलेज-वर्षांतली हजारो मुले कुठेतरी नांदत आहेत - पोरांनो, येऊन बापाच्या पाया पडा पाहू!)
अशा प्रकारे जोधा-अकबर हा चित्रपट हा जनसंख्यावृद्धी रोखण्याचे छुपे उद्दिष्ट साधू बघत आहे. म्हणजे संजय गांधीचे काम. झोडा त्याला, चालू द्या गुर्जी!
इस्लाम हिंदू पंथच
तुमचा प्रतिसाद मस्तच आहे. त्यात भर म्हणून आणखी आठवले.
कल्की अवतार होऊन गेला यावर मध्यंतरी एकांनी "संशोधन" करून पुस्तक लिहिले होते. सदर लेखकाच्या मते मोहम्मद पैगंबर हेच कल्की.
तेव्हा हिंदू पंथांतलाच झगडा आहे यावर शिक्कामोर्तब
ओकांनी नंतर राम हा रोममधला राजा होता असेही सिद्ध केल्याचे आठवते.
इंटरेष्टींग
ओकांनी नंतर राम हा रोममधला राजा होता असेही सिद्ध केल्याचे आठवते.
मग रामनवमीला सकाळी पिझ्झा आणि संध्याकाळी पास्ता करायला हरकत नाही. :)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
आदरणीय कै. पु. ना. ओक यांच्याबद्दल अनुद्गार निषेधार्ह आहेत.
1 . आदरणीय कै. पु. ना. ओक यांच्याबद्दल अनुद्गार निषेधार्ह आहेत. विहीरीची खोली मोजण्यासाठी दोरी त्याहून मोठी असावी लागते.
२. क्रूरकर्मा अकबर याचा पुळका येणे, हे उथळ अभ्यासाचे लक्षण... येथे उपस्थित कोणाच्या घरातील स्त्रीला जर एखाद्याने कुंटणखान्यात ओढले तर त्याच्या समर्थनासाठी तो उभा राहील का? हिंदूंवरील अत्याचाराचा इतिहास उलट अर्थाने दाखवला तरी स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करू पहाणारे हिंदूच त्याच्या रक्षणार्थ गळा काढतील, याची गोवारीकर
आणि अन्य मंडळींना खात्री आहे. (गोवारीकर यांनी चित्रपटातील केवळ ३० टक्के भागच खरा असल्याचे कबूल केले आहे.)
याउलट मुसलमानांच्या तत्त्वाच्या विरुद्ध एक ओळ जरी छापली तरी दंगा होईल. हिंदू सहिष्णु आहेत म्हणून त्यांच्या भावनांवर चर्चा
करायला व निर्णय द्यायला लोक तयार असतात. नाहीतर सोनियाजींची काँग्रेस `दा विन्सी कोड'
वर अनेक राज्यांत सत्वर बंदी आणू शकते. तस्लिमा नसरीन यांना माफी मागायला लावू शकते,
तीच `गांधींची' काँग्रेस हिंदूंची शांततामय `उपोषणे' (हे उपोषण होते, तोडफोड नव्हे! ती
मारहाणीनंतर उमटलेली प्रतिक्रिया!) जालियवाला बागच्या जनरल डायरप्रमाणे हल्ले करून
मोडण्यात धन्यता मानते. ही हिंदूंच्या पराभूत व संभमित मानसिकतेची परीणती आहे. असे
नपुंसक हिंदू दहशतवाद्यांच्या हातून मरण्याच्या लायकीच आहेत.
३. पोलिसांची मग्रुरी - भारतीय लोकशाहीचे धिंडवडे: कायदा सर्वांना समान असतो, तर कृष्णप्रकाश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार का ?
अनुद्गार?
तांबेसाहेब,
मग राम खरोखरीच रोममध्ये होता असे मानायचे का? आणि हे मानले नाही तर यात अनुद्गार कसा होतो?
बाकी अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळाच दिसत होता तसेच तुम्हालाही बाकीचे लोक काय म्हणत आहेत ते न दिसता फक्त आपले म्हणणे पुढे कसे रेटायचे तेच दिसते.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
एक छान बोलके स्पष्टीकरण
कल्की अवतार होऊन गेला यावर मध्यंतरी एकांनी "संशोधन" करून पुस्तक लिहिले होते. सदर लेखकाच्या मते मोहम्मद पैगंबर हेच कल्की.
वाचता येत नसेल तर खालील झकीर नाईकांची चित्रफित अवश्य बघा. :-)
अवश्य बघा
अवश्य बघा
अवश्य बघा
साभार : http://www.geocities.com/jairama1/kaaba.htm
मजकूर संपादित. प्रतिसाद लिहिताना सदस्यांवर व्यक्तिगत टिप्पणी करू नये. व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद कृपया, त्या त्या सदस्याच्या खरडवहीत लिहावे. - संपादन मंडळ.
खेद
प्रियालीताई,
आपल्या प्रतिसादात -- कधी नव्हे तो -- आक्रस्ताळेपणा अधिक वाटतो.
कारणे -
(१) अकबर क्रूरकर्मा होता किंवा नव्हता याचे खंडन येथे अधिक संयुक्तिक ठरेल. त्याविषयी काहीही उल्लेख नाही.
(२) हिंदूंनी स्त्रियांवर केलेले अत्याचार दिल्याने (एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारणे) मुस्लिम अत्याचारांची तीव्रता कशी कमी होऊ शकते?
(३) हिंदू अत्याचाराची आपण येथे दिलेली उदाहरणे गैरलागू आहेत. व्यक्तिगत पातळीवर थोर इतिहास/पुराणपुरुषांनी केलेले हे प्रमाद आहेत. मुस्लिम अत्याचारांची ताब्यांनी दिलेल्या उदाहरणांची जातकुळी वेगळी आहे.
(४) शिवाजी महाराजांचे दिलेले उदाहरण त्या मानाने तुलनेला अधिक जवळचे आहे. मात्र त्यावरून काढलेला निष्कर्ष एकांगी वाटतो. मध्ययुगीन कालात दुर्दैवाने स्त्रियांना लुटणे ही सर्वमान्य प्रथाच होती. महाराजांनी त्यापलिकडे जाऊन काही आदर्श घालून दिला. (कल्याणच्या सुभेदाराची घटना खरी असो वा नसो... महाराजांच्या चारित्र्याची शिफारस आलमगीरही करताना दिसतो. )
(इतिहासकालीन) एकलव्य
हरकत नाही
(१) अकबर क्रूरकर्मा होता किंवा नव्हता याचे खंडन येथे अधिक संयुक्तिक ठरेल. त्याविषयी काहीही उल्लेख नाही.
क्रूरकर्मांची नोंदच करायची झाली तर तत्कालीन कोणत्याही राजांना वगळता येत नाही. एकाचा क्रूरपणा दुसर्यापेक्षा अंमळ कमी इतकेच. मुख्य म्हणजे पु. ना. ओकांसारख्या व्यक्तीने केलेल्या आरोपांचे खंडण करण्याची गरज वाटत नाही. तेवढा फुकटा वेळही देणे सध्या शक्य नाही, त्याबद्दल क्षमस्व! त्याहूनही, इथे शिवाजी महाराज आणि अकबर यांची तुलना माझ्या मनात नाही हे ही खरे किंवा अकबराला मोठेपणा देण्याचाही विचार नाही, परंतु एखाद्या चित्रपटाने जर देशात हल्लकल्लोळ माजवण्याचा कट होत असेल तर मला ते योग्य वाटत नाही. सदर मंडळी रामाने सीतेला वनवासात धाडले असा प्रसंग एखाद्या चित्रपटात दाखवला म्हणून हे वाल्मिकि रामायणात नाही, हे खोटे आहे असे म्हणून रस्त्यावर उतरून निषेध करतील काय?
इथे एक गोष्ट आठवली, माझे काही उत्तर भारतीय हिंदू मित्र पेशव्यांना लुटारू म्हणत. याचा मला अतिशय राग येत असे. त्यावर त्यांची कुरघोडी अशी होती की काय केले अटकेपार झेंडे लावून? आमचे प्रदेश बेचिराख केले, आमचे वाडे लुटले, आमच्या कत्तली केल्या आणि परत गेले. होता दम अंगात तर करायचे होते उत्तरेवर राज्य. बसवायची होती घडी. लुटारूच होते मराठे. यात खर्या-खोट्याचा भाग वेगळा ठेवला तरी असे दिसेल की प्रत्येक समाजाची एक समजूत असते. आपण जे पाहतो आणि आपल्याला जे शिकवले तेच आपल्याला सत्य वाटत राहते.
सध्या यावर अधिक येथे वाचता येईल.
(२) हिंदूंनी स्त्रियांवर केलेले अत्याचार दिल्याने (एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारणे) मुस्लिम अत्याचारांची तीव्रता कशी कमी होऊ शकते?
अजिबात होऊ शकत नाही परंतु याच न्यायाने ते आंदोलने करतात म्हणून आम्हीही करतो आणि जाळपोळही करू हे योग्य आहे काय? एकाने गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार हे तर इथेही चालले आहे आणि मला दोहोंबद्दल प्रेम नाही.
हिंदू राजांचा इतिहास लिहून ठेवलेला नाही किंवा खोट्या संस्कृतीच्या भलामणीपायी तो बदलला गेला म्हणजे ते पुरूषोत्तम पुतळे होते असे म्हणायचे आहे काय? आणि नसल्यास, आपल्या पायाखाली काय जळते आहे हे पाहिल्याखेरीज बसगाड्यांची जाळपोळ करणे सयुक्तिक आहे काय?
(३) हिंदू अत्याचाराची आपण येथे दिलेली उदाहरणे गैरलागू आहेत. व्यक्तिगत पातळीवर थोर इतिहास/पुराणपुरुषांनी केलेले हे प्रमाद आहेत. मुस्लिम अत्याचारांची ताब्यांनी दिलेल्या उदाहरणांची जातकुळी वेगळी आहे.
का बुवा? गैरलागू का? या पुराणपुरूषांना आजही पुरुषोत्तम मानून त्यांची पूजा करताना ते गैरलागू नसतात, त्यांची उदाहरणे कशी गैरलागू होतात? असेच "सो कॉल्ड" अत्याचार मौर्य राजांचेही आहेत. (म्हणूनच तांब्यांना विचारले की अधिक उदाहरणे हवीत का? पण ती शोधून देण्यास थोडा वेळ लागेल. कारण आपला इतिहास आपण आपल्याला हवा तसा आणि हवा तेवढाच लिहिला आहे.) तिथे आपण म्हणतो की बौद्ध धर्माचा प्रचार व्हावा म्हणून बौद्ध इतिहासकारांनी खोटेनाटे लिहिले. प्रकार असा आहे की आपल्यावर शेकले की कांगावा करण्याची आपल्याला सवय झाली आहे.
(४) शिवाजी महाराजांचे दिलेले उदाहरण त्या मानाने तुलनेला अधिक जवळचे आहे. मात्र त्यावरून काढलेला निष्कर्ष एकांगी वाटतो. मध्ययुगीन कालात दुर्दैवाने स्त्रियांना लुटणे ही सर्वमान्य प्रथाच होती. महाराजांनी त्यापलिकडे जाऊन काही आदर्श घालून दिला.
दिला ना, संभाजी राजांनी, पेशव्यांनी तो पाळला का? व्यक्ती म्हणून शिवाजीराजांची तुलना मी अकबराशी करत नाही पण तेच राजे अकबराला पुण्यश्लोक म्हणून गेले आहेत.
---
असो, असे भडक लेख छापणार्या, भावना भडकावणार्या आणि विध्वंसक वृत्ती बाळगणार्या लेखांपेक्षा तुम्हाला माझा प्रतिसाद आक्रस्ताळी वाटला याचा खेद वाटला.
लै भारी !!!
सदर मंडळी रामाने सीतेला वनवासात धाडले असा प्रसंग एखाद्या चित्रपटात दाखवला म्हणून हे वाल्मिकि रामायणात नाही, हे खोटे आहे असे म्हणून रस्त्यावर उतरून निषेध करतील काय?
हाहाहा:))))) करतील, करतील याचाही निषेध करतील.
अकबराने कत्तली केल्या असतील कारण शत्रूची कत्तल करणे याला तत्कालीन संस्कृती योग्य मानत होती, त्याला जर कोणी २१ व्या शतकाच्या कानशीवर घासत असेल तर निदान मला पटत नाही. (उद्या महाराजांनी गनिमी काव्यापेक्षा गांधीजींसारखे सत्याग्रह करायला हवे होते असे म्हणणे योग्य राहिल काय?).
सहमत.
बाकी मुद्यांचेही कौतुक आहेच !!!! :)
शेजवलकर/पानिपत -आठवण
इथे एक गोष्ट आठवली, माझे काही उत्तर भारतीय हिंदू मित्र पेशव्यांना लुटारू म्हणत. ... लुटारूच होते मराठे.
माझ्या माहितीप्रमाणे राघोबादादा पेशवे अटकेपार गेले होते, त्यांच्या सैन्याने लूट केलेली असू शकते. यावर उलट बोलायचेच तर विचारता येईल की उत्तर भारतीयांच्या त्या वेळच्या राजांच्या अंगात तेव्हा दम नव्हता म्हणून ना पहिल्याप्रथम परकीय अंमल आला? असो. हे झाले अंतर्गत बखेडे. पण एक प्रश्न यावरून विचारावासा वाटला - मराठी सैन्याला परक्या मुलुखात स्थानिकांच्या मदतीशिवाय किती दिवस आणि कसे राहता आले असते? पण ते तसे राहिले असते तर काही चांगला फरक दिसला असता असे मानायला जागा आहे.
शेजवलकर हे प्रसिद्ध इतिहासकार समजले जातात. शेजवलकरांच्या "पानिपत" पुस्तकात वरच्या उदाहरणाच्या अगदी उलटा अनुभव दिलेला आहे. त्यांना बंगालमधून एक वयस्कर माणूस भेटायला आला होता, आणि म्हणाला की मराठे आमच्यापर्यंत का येऊन का राहिले नाहीत? त्या माणसाने पुढे म्हटले की मराठे जिथे जिथे गेले तो तो भाग नंतरही भारतात राहिला असे काहीसे वाचल्याचे आठवते. ( ही आठवण जरा विस्कळित असल्याने चुकीची असू शकते , आत्ता संदर्भासाठी पुस्तक माझ्याकडे येथे नाही, कोणाकडे असल्यास पुस्तकाच्या शेवटच्या साधारण भागातली ही आठवण येथे द्यावी अशी विनंती).
यात खर्या-खोट्याचा भाग वेगळा ठेवला तरी असे दिसेल की प्रत्येक समाजाची एक समजूत असते. आपण जे पाहतो आणि आपल्याला जे शिकवले तेच आपल्याला सत्य वाटत राहते.
हे खरे.
मूठभर लोक
शकते हे जरा गुळमुळीत होते. सैन्य जेथे जाते तेथे लूट करतच जाते. प्रत्येक सैन्याची पद्धत वेगळी असते. बरेचदा मागावर येणार्या शत्रूपासून सुटका व्हावी म्हणून प्रदेश, शेते आगी लावून बेचिराख करणे. त्यांना पाणी मिळू नये म्हणून विहिरींत विष घालणे असे प्रयोग केले जातात. सैन्याला लागणारी शिबंदी कोणी वाहून नेत नाही. (येथे मोठ्याप्रमाणावरील सैन्य गणले आहे, गनिमी काव्याने लढणार्या टोळ्या नाही) ती आजूबाजूंच्या गावांकडून वसुल होते आणि जर कोणी म्हणत असेल की केवळ परकीय सैन्ये असे करत आणि पेशवे त्यातील नव्हेत तर ते योग्य नाही. असो, पण यात भरडली जाणारी जनता नेहमीच दुर्दैवी असते.
पेशव्यांना लुटारू म्हटले की आपल्याला बरे वाटत नाही कारण आपल्या मातीचा इतिहास त्यांच्याशी जोडलेला आहे पण जे भरडले त्यांच्या भावनाही खर्या असू शकतात.
जेव्हा मूठभर लोक जेते बनण्यासाठी परमुलखात जातात तेव्हा ते फितुरीने लोकांना वळवून घेतात नाहीतर क्रौर्याने अंमल बसवतात हेच जगाच्या इतिहासात दिसते. याव्यतिरिक्त दुसरे पर्याय दिसत नाहीत. आजचा काळ आणि सामाजिक मूल्ये यात ही बाब बसत नसली तरी ऐतिहासिक काळात ते योग्य गणता यावे.
मराठ्यांना यापैकी काही करणे शक्य झाले नाही का तो त्यांचा हेतूच नव्हता याबाबत मला विशेष माहिती नाही.
म्हणजे काय? मला कळले नाही. विस्ताराने सांगता येईल का? मराठे पाकिस्तान आणि बांग्लादेशाच्या बाजूने गेले नाही म्हणून तो भाग भारतापासून फुटला असे म्हणायचे आहे का?
----
अवांतरः उत्तर भारतीयांच्या अंगात दम नव्हता वगैरे हे माझे वादावादीचे मुद्दे आहेत. म्हणजे आपल्यावर आलेले आक्रमण परतवून लावण्यासाठी यापेक्षा सडेतोड मुद्दे मिळणार नाहीत. यावरही त्यांच्याकडे उत्तर असे की शेकडो वर्षे सततच्या आक्रमणांतून आम्ही सावरलोच नाही, आणिही काही होते -मला जरा विसर पडला आहे आठवले की कळवते.
संदर्भ दिला
एक खुलासा - मराठ्यांचे कौतुक करायला वरचा परिच्छेद लिहीला नव्हता. म्हणून प्रियालीताईंच्या प्रतिसादातील अनुभवामुळे आठवलेला संदर्भ सांगितला. शिवाय त्यांनी लिहीलेला अनुभव काही नवीनही नव्हता - पंडित नेहरूंनीही शिवाजीमहाराजांना असे काही उलटसुलट संबोधिले आहे असे ऐकीवात होते. इतिहास नक्की काय सांगतो ते दुर्दैवाने आपण नीट वाचत नाही/वाचायला मिळतही नाही. मध्येच एक दोन बिंदू दिसतात, त्यावरून आपण मधली रेषा जोडायचा प्रयत्न करतो. त्यामुळे असे होणार. आणि प्रत्येक समाज स्वतःला शहाणे ठरवत दुसर्याला मूर्ख ठरवणार. असो.
बाकी शेजवलकरांचे पुस्तक वाचले तर त्यांनी अत्यंत कष्टाने मिळवलेले नकाशे त्यात आहेत. आत्ता पुस्तक माझ्याकडे नाही, नाहीतर मी संदर्भ नीट दिला असता. त्यांच्या पुस्तकातील संदर्भ मला वाटते फाळणीच्या संदर्भात/ समाजाच्या आहे. लक्षद्वीप, अंदमान, निकोबारचा संबंध नाही. सिक्कीमचे मला माहिती नाही - पण - शेजवलकरांचे पुस्तक मिळाल्यास जरूर नजरेखालून घाला.
शेजवलकर
शेजवलकरांनी त्यांच्या पुस्तकात मराठे हे हिंदूस्थानातील इतर राज्यकर्त्यांपेक्षा कमी अत्याचारी होते. मात्र भूतकाळात झालेल्या काही धोरणात्मक चुका, धरसोडीची वृत्ती यामुळे पानिपत युद्धाच्या काळात उत्तर हिंदूस्थानातील इतर राज्यकर्ते त्यांच्या मदतीला आले नाहीत असे म्हटले आहे.
शेजवलकरांचे पुस्तक फारच अप्रतिम आहे.
वर दिलेला परिच्छेद तिथे असेलही कदाचित. पण पुस्तकाची भाषा १९६० सालच्या आसपासची आहे. त्यातुलनेत माझी मराठी बरीच भ्रष्ट झाल्याने त्या पुस्तकातील संदर्भ तपासणे थोडे अवघड जात आहे. काही मिळाले तर देता येईल.
-- आजानुकर्ण
शेजवलकरांचे मत
-- आजानुकर्ण
राघो भरारीची अटक
राघो भरारीने अटकेला भरारी मारली ती अटक हीच ना?
हेच सांगायचे होते.
हे वाक्य शेजवलकरच काय कोणीही मराठी माणूस म्हणेल. त्यासाठी इतिहासाची विशेष गरज नाही. मराठी असण्याचे प्रेम पुरेसे आहे. मलाही ते आहे.
असो, यात चढ वरचढ किंवा शेजवलकरांना काही म्हणण्याचा हेतू नाही. त्यांचा अभ्यास कधीही श्रेष्ठ. मूळ मुद्दा असा होता की
आपण डोळ्यांना झापडे लावून जे शिकवले जाते ते शिकतो. सारासार विचार करण्याकडे दुर्लक्ष करतो.
धन्यवाद
सर्व परिच्छेद लिहील्याबद्दल धन्यवाद. मराठ्यांविषयी लोकांचे समज असेही आहेत हेही कळावे म्हणून हा संदर्भ दिला होता.
लूट
माझ्या माहितीप्रमाणे राघोबादादा पेशवे अटकेपार गेले होते, त्यांच्या सैन्याने लूट केलेली असू शकते.
शिवाजीमहाराजांनीही सुरत दोनदा लुटली होती. मला वाटते इतिहासात लूट न केलेले सैन्य/राजा मिळणे कठीणच.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
सहमत
सहमत आहे. आणि याबद्दल वैषम्य वाटण्याचेही कारण नाही. ही त्याकाळची पद्धतच होती. मुद्दा हा की हे जर अकबराने केले असेल तर त्यालाही हाच न्याय लावण्यास हरकत नसावी.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
ओक यांचा विपर्यास
पु. ना. ओकांनी अनेक वेळा इतिहासाचा विपर्यास केलेला आहे. सध्या एक उदाहरण देत आहे. आइना-ए-अकबरी मधील मुळ मजकूर असा आहे:
गुगल बुक्स वर उपल्ब्ध असलेली मुळ प्रत:
The Ain i Akbari By Abū al-Faz̤l ibn Mubārak, Henry Blochmann, Henry Sullivan Jarrett
ओकः
मदिरा व मदिराक्षीच्या संयुक्त आवारास `शैतानपुरा' !
अकबराच्या राहत्या महालाजवळ एक कुंटणखाना असे. त्यावर अकबराची स्वत:ची देखरेख असे. त्यासंबंधीचा तपशील अबुल फजलच्या आईने `अकबरी' ग्रंथात पृष्ठ २७६ वर दिला आहे. तो असा, `अकबराने महालासमीपच एक मद्यशाला स्थापन केली होती. तिच्याशी संलग्न एक वेश्यागृहही होते. राज्यातून सतत भरणा होत असलेल्या त्या महिला भांडारात असंख्य वेश्या होत्या. त्यांची गणना करता येत नसे. त्यांतील कोण अजून कुमारी आहे वा कोणाचे कौमार्य कोणी भंग केले, इ. बित्तंबातमी अकबर त्या वेश्यांशी स्वत: बोलून काढून घेई. मदिरा व मदिराक्षींच्या त्या संयुक्त आवारास `शैतानपुरा' म्हणत.' अशा शैतानपुर्याच्या निकट राहून त्या आवाराची पूर्ण देखरेख स्वत:कडे ठेवून त्या अंत:पुरातील सर्व बित्तंबातमी जातीने ठेवणारा अकबर हा स्वत: सैतान होता, हे आपोआप सिद्ध होते.
आणि टॉड बाबत एका अन्य आंग्ल इतिहासकाराचे मत खाली देत आहे:
"Tod requires to be read with caution. His style is loose and careless, ,and at times his statements are contradictory. Some of his assertions of fact are demonstrably erroneous"
श्री. तांबे: अकबराचा प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहीलेल्या पत्रात आदराने उल्लेख केलेला आहे याचे स्मरण नित्य राहू द्यावे.
चर्चा विधायक अंगाने पुढे नेण्यास उपक्रमी समर्थ आहेतच.
भा. इतिहास-संशोधनातील घोडचुका
वरील संदर्भ भारतीय इतिहास-संशोधनातील घोडचुका- पु. ना. ओक- पृ. क्र. १३२ वरही आहे.तांबे चर्चा टाकून गेले आणि आपण पुस्तके उचकत आहोत. पु. ना. ओकांचे लेखन नीव्वळ मुस्लीम विरोधी वाटते, त्यांचे विचार वाचुन कोणत्याही हिंदूस आनंद होईल,अभिमान वाटावा असे लेखन नक्कीच आहे. :)
तांब्यांच्या लेखनाचा संग्रह केला तर पु. ना. ओक यांचे लेखन कोणते, आणि गणेश तांबे यांचे लेखन कोणते.......हे ठरवायला पुन्हा संशोधन करावे लागेल !!! :)
अकबर दिसायला किती कुरुप होता, दरबारात ताडी पिऊन बोलता बोलता कसा झोपायचा, हे वाचायला मला मात्र मजा येत आहे !!!!
त्रिवार निषेध
फोटोत दिसत असलेल्या वृद्धाला (म्हणजे माराहाण न करता अटक करता आली असती असे व्यक्तीमत्व दिसले) मारहाण् केली गेली असेल तर निषेध.
पण त्याहून मोठा निषेध, बरीच विधायक कामे अजुन करायची सोडून, असले फडतुस प्रश्रावर आंदोलने करुन प्रसिद्धी मिळवणार्या लोकांचा. बारावीची परिक्षा सुरु, तमाम सांगलीकरांची गैरसोय व विशेषता ज्यांचे रोजगारावर पोट आहे व रस्त्यावर काम करुन (फेरीवाले इ.) कमाई होते त्यांचे नुकसान होते. पोलीस खाते, कायदा, सुव्यवस्था, न्यायालये, वैद्यकिय सुविधा यांच्यावर विनाकारण ताण येतो हे समजत नाही का भिडेगुरुजी व त्यांच्या अनुयायांना? चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात दावा करू शकले असते हे आंदोलक. पण ते खुप काम आहे ना, दंगा, आरडाओरड करणे प्रसिद्धी मिळवणे हाच तर हेतु असावा ही दाट शंका.
असो अश्या लोकांचा निषेध करायची संधी दिल्याबद्दल मुळ चर्चाप्रस्तावकाचे आभार.
निषेध, सहमत !!!
कलाकृतीच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणा-या भिडेगुरुजी आणि त्यांचे समर्थकांनी ज्या गुंडगिरीची आश्रय घेतला, पोलिसांच्या गाड्या फोडल्या, दुकानांवर दगडफेक केली, पोलिसांना सळो की पळो करुन सोडले, १२ वीच्या परिक्षा चालु असतांना विद्यार्थी,पालकांच्या,सामान्य माणसाच्या मनात दहशत पसरवली, शांतता भंग केली त्या भिडेगुरुजी समर्थित आंदोलनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो.
शांततेच्या मार्गाने निषेध न नोंदवणार्यांना,पोलिसांनी याच नव्हे तर अशाच निमित्ताने रस्त्यावर उतरणा-या कोणत्याही धर्माच्या आंदोलकांना असे ठोकून काढले पाहिजे की, पुढे कधी अशा कृत्यासाठी कोणीही दगड उचलला तर त्याला चड्डीत सू - शी झाली पाहिजे.
बातमी नीट वाचलेली नाहि वाटत
कलाकृतीच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणा-या भिडेगुरुजी आणि त्यांचे समर्थकांनी ज्या गुंडगिरीची आश्रय घेतला, पोलिसांच्या गाड्या फोडल्या, दुकानांवर दगडफेक केली, पोलिसांना सळो की पळो करुन सोडले, १२ वीच्या परिक्षा चालु असतांना विद्यार्थी,पालकांच्या,सामान्य माणसाच्या मनात दहशत पसरवली, शांतता भंग केली त्या भिडेगुरुजी समर्थित आंदोलनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो.
बातमी नीट वाचलेली नाहि वाटत ,`जोधा अकबर' हा चित्रपट सुरू होता. तो बंद करण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन चालु होते, पू. गुरुजींना पोलिसांनी मारल्या नंतर हा प्रकार घडला आहे.
चड्डीत सू - शी झाली पाहिजे.
रस्ते घान झाल्यावर तुम्हालाच त्रास होईल साफसफाईचा (ह.घ्या)
सनदशीर मार्ग..हाहाहा:))))
तो बंद करण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन चालु होते,
हाहाहा:)))))
सनदशीर मार्गाने दगडफेक करीत होते असेच ना !!!
केवळ आपल्या बातमीवरुन आम्ही असे म्हणत नाही. काही दैनिकातल्या बातम्या आम्हीही चाळल्या.
चित्रपट बंद करा म्हणनारे हे गुरुजी कोण ? ( अख्ख्या भारतातल्या प्रेक्षकांना काही वाटत नाही. ) खरे तर या वयात गुरुजींनी अशा गोष्टींना सामोरे जायलाच नको ? आणि गेलेच तर लाठ्या, काठ्या खाल्ल्यावर त्यांच्या समर्थंकांनी बोंबा मारु नये असे आम्हाला वाटते.
पोलिसांना काहीच उद्योग नव्हता म्हणुन तर त्यांनी लाठीमार केला नाही ना ? जे झाले ते योग्यच झाले असे वाटते.
रस्ते घान झाल्यावर तुम्हालाच त्रास होईल साफसफाईचा (ह.घ्या)
रस्त्यावर येऊन गुंडागर्दी करणार्यांची धुलाई झाल्यावर, कोणत्याही धार्मि़क गुंडाची भविष्यात दगड घेतांना केवळ पोलिसांच्या आठवणींनी सू- शी झाली तर ती आम्ही आनंदाने साफ करु......!!!! (ह. घेतले आहे. )
संत गाडगेबाबांचा शिष्य
प्रा.डॉ.
बातमी नीट वाचलेली नाहि वाटत
बातमी नीट वाचलेली नाहि वाटत ,`जोधा अकबर' हा चित्रपट सुरू होता. तो बंद करण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन चालु होते, पू. गुरुजींना पोलिसांनी मारल्या नंतर हा प्रकार घडला आहे.
प्रतिक्रिया !
मारहाण - नेमके काय घडले हे सांगता येईल काय? पोलिसांना ही जनक्षोभाची काळजी असतेच.
वृद्धत्वाचे भांडवल - अमान्य
झूंडशाही - अमान्य
भडकावणे - अमान्य
सनदशीर निषेध असेल तर मान्य.
पोलिस अशा बाबतीत स्वतःहुन् हल्ला करीत नाहीत, मात्र ते प्रतिकार करतात. असे माझे निरिक्षण आहे. हिंसक जमावाला काबूत आणण्यासाठी केलेली कृति ही अमानुष म्हणुन गणली जाते. पोलिसांची दोन्ही बाजुने गोची होते. केले तर का केले? केले नाही तर का केले नाही?
प्रकाश घाटपांडे
गृहमंत्र्यांचा फोन नंबर दिला आहे
मारहाण - नेमके काय घडले हे सांगता येईल काय? पोलिसांना ही जनक्षोभाची काळजी असतेच.
पोलीसांचा फोन नंबर मिळाला कि देईल तुम्हाला आपणही त्यांना विचारु शकता.
नाहि तर आपल्या गृहमंत्र्यांचा फोन नंबर दिला आहे त्यांना विचारु शकता.
गृह मंत्र्यांचे वक्तव्य
गृहमंत्री आर आर यांची पोलिसांना मार्गदर्शनपर तसेच इतर भाषणे मी ऐकली आहेत. पुण्याचे पोलिस कमिशनर श्री जयंत उमराणीकर लिखित पोलिस सुधारणा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळि ते बोलत होते. त्यात पोलिसांच्या गोचीवर त्यांनी नेमके पणाने बोट ठेवले होते.तेच मी मांडले आहे. कृष्णप्रकाश हे तरुण व तडफदार पोलिस अधिक्षक आहेत. पण मॉब सायकॉलॉजी हे गणीत इतके विचित्र असते कि कदाचित सुरुवातीला पोलिस उपनिरिक्षकाला जी मॉबने मारहाण केली तो मॉब मेंटालिटी चा भाग होता. त्यावेळी त्यांनी जर पडते घेतले असते तर कदाचित पुढचा अनर्थ टळला असता.
वयोवृद्ध माणसाला बसलेला मार यागोष्टीचे समर्थन कुणीही करणार नाही. पण विश्लेषण मात्र जरुर केले जाते.त्यातील अपरिहार्यता लक्षात घेतली तर ती बाब क्षम्य मानण्याकडे कल जातो.
भाकित- त्यांची बदली होईल पण थोडी उशीरा. साईड ब्रांच देतील सीआयडी/ एस आर पी एफ/ डी जी प्रशासन कार्यालय/ लाचलुचपत/तुरुंग अशा ठीकाणी . नंतर ते ही संवेदनाहीन बनत जातील.
प्रकाश घाटपांडे
या विषयाबाबत
या विषयाबाबत अधिक येथेही वाचता येईल. ;)
-- आजानुकर्ण
एक तुच्छ प्रश्न
या सर्वांचे मूळ जोधा-अकबर चित्रपट हा आशुतोष गोवारीकर या मराठी माणसाने काढलेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एका मराठी माणसाने मेहनत आणि कौशल्य यांच्या जोरावर सफलता मिळवली याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. त्याविरूद्ध आंदोलने करताना मराठी अस्मिता वगैरे कुठे जाते?
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
गोवारीकर!!! आता गुपीत समजले
असे दिसून येते की मराठी लोकच नाटकांतून हिंदुत्वाची क्रूर चेष्टा करत असतात.
(याबद्दल दुवा)
यात एकतरी अ-मराठी नाटक आहे काय?
१. देव करी लव्ह
२. यदा-कदाचित
३. सदा सर्वदा
४. वस्त्रहरण
५. देवा, आदी कोकणात येवा
(एक तरी अ-मराठी नाटक दिसते का?)
जोधा-अकबर मराठी माणसाने बनवला कळले म्हणून आता अर्थ लागला.
भिडे गुरुजींना बेदम मारणार्या पोलिसाचा फोटो:
(आता बघून घ्या, लवकरच काढला जाईल, असे मला वाटते.)
या बाबतीत युवक प्रेमाने पोलिसाच्या गळ्यात गळा घालत आहे "माझ्या गळा, तुझ्या गळा, बांधू मोत्याच्या माळा". पोलिसाला इतकेही समजू नये? मुसलमानांत असा प्रेमळ कायदेशीर निषेध करत नसावेत. (वेगवेगळ्या हातांचे हिशोब मला नीट लागत नाहीत, पण फोटोही मी काढला नाही आणि तो कातरणाराही मी नाही.)
या संदर्भात संकेतस्थळाचे संपादक म्हणतात :
हिंदू जनजागृती समितीने आजवर चालवलेली सर्व आंदोलने कायदेशीर आहेत. ...पोलीस अशीच कारवाई मुसलमानांविरुद्ध घेतील काय? तसे केल्यास मुसलमान पोलीस स्टेशनास आग लावतील.)
त्यामुळेच की काय या (जोधाविरोधी) आंदोलनात पोलीस स्टेशनाला आग लावली गेली.
यापुढे पोलिसांनी हिंदूंविषयी हेच जाणून घ्यावे.
पोलिसांनी आगीत स्टेशन भस्मसात होऊ दिले असते, तर आपण त्यांचे छुपे हिंदूप्रेम आहे असे मानूनही घेतले असते. पण फोटोत एक निर्लज्ज शिपाई बादली घेऊन आग विझवायचा हिंदूविरोधी पाकिस्तानधार्जिणा प्रयत्न करत आहे.
इतर फोटो टाकायचे राहिले वाटते
इतर फोटो टाकायचे राहिले वाटते
अधिक फोटो : प.भिडे गुरूजी
अधिक फोटो : अचलपुर दंगल
ये हाथ
पहिल्या चित्रातील हातांची सांगड घाला असा प्रश्न तर्कक्रीडा म्हणून द्यायला हवा. :)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
काय साध्य होते आहे?
जोधा अकबर इथे अमेरिकेत पाहिला. खरे सांगायचे तर मला तो एक करमणूक म्हणून बराच आवडला (बर्याच दिवसांनी मैत्रिणींबरोबर पिटात बसून चित्रपट बघण्यातला आनंद काही वेगळाच, म्हणून जरा जास्तीच आवडला!). पण एवढ्या साडेतीन तासाच्या काळात अकबर कसा श्रेष्ठ होता, एकपत्नीव्रती होता, क्रूर नव्हता असे काही चुकूनही वाटले नाही. बरेच लोक माझ्याप्रमाणेच असतील. तेही काही अकबराविषयी मते एकदम पालटून घरी परत गेले असे वाटले नाही. बरे चित्रपटात सत्याचा विपर्यास केलेला असू शकतो का? असू शकतो. त्याच्या हिंदू बायकोचे नाव जोधा नव्हतेच असेही म्हटलेले वाचले. तेव्हा तेथूनच सुरूवात आहे. पण आशुतोष गोवारीकरचा लगानही सत्यावर आधारित थोडाच होता?
असल्या बंदी घालण्यामुळे फक्त कुतुहल वाढते, लोक उघडपणे बोलायच्या ऐवजी चोरून बोलतील / बघतील एवढेच होईल. आपल्याला नजिकचा इतिहास काय सांगतो? रश्दीच्या satanic verses वर अशी बंदी आणली होती, त्यानंतर सलमान रश्दीचे वाचणारे लोक आहेतच. तस्लिमा नसरिन तिच्या वादग्रस्त लिखाणामुळे आजही बांगलादेश सोडून राहत आहे, पण तिची पुस्तके अनेक भारतीय भाषांमध्ये वाचली जातात - ती काय इथल्या मुसलमानांना दिसत नाहीत असे थोडेच आहे?
एकंदरीत अशी आंदोलने/बंदी उपयुक्त नसतात. त्याने नुकसान, वाद आणि तेढ याखेरीज काही फारसे हाती लागत नाही. तसेच तुम्हाला अभिप्रेत असलेली जागृती आणि लोकांना एकत्र करणेही होत नाही. उलट तुम्ही अमूक म्हणता ना, मग मी उलटेच करणार असा हेकट स्वभाव वाढीला लागतो. हे टाळायचे असले तर तुमची भाषा ही सूज्ञपणाचीच असली पाहिजे. तुमच्या लेखातल्या संपादकांनी लिहीलेले " कॄष्णकुमार" हा "इस्लामी औलादीचा" पोलिस हे कसे ते कळले नाही.
आपले मत शांततेने मांडत असताना श्री. भिडे यांना मारहाण झाली असली तर ते चुकीचेच आहे, आणि ते करणार्या पोलिसांना शिक्षाही झाली पाहिजे. पण त्याचबरोबर एका चित्रपटावर बंदी आणणे योग्य नाही असे वाटते. शिवाय चित्रपट बंद पाडायला जेवढे लोक गेले होते ते सर्व लोक नक्की कशाने प्रेरित झाले होते? चित्रपट त्यांनी पाहिला आहे का? पाहिला असल्यास, तो का पाहिला? आणि नसल्यास, चित्रपट न पाहता त्यात काय आहे हे त्यांना कसे कळले?
हे जोधा अकबरसारखे चित्रपट क्षुल्लक आहेत, कधीतरी पहायला आवडतात, पण तरी करमणुकीचे एक साधन यापलिकडे ते काही संदर्भग्रंथ नसतात. कायद्याचे राज्य असले तर असले हजार चित्रपट येतील आणि जातील, पण लोकांची रोजची कामे बंद पडणार नाहीत. बंदी आणून आपण नक्की कोणाला वेठीला धरतो आहोत याचा जरूर विचार व्हावा. भारतीय इतिहासाची खरोखरच फिकीर असल्यास पहिल्याप्रथम सगळ्या भारतीय भाषांमधील लिहीलेली प्राचीन पुस्तके, कागदपत्रे एकत्र करण्याचे/ त्याला पैशाचे पाठबळ देण्याचे/ एखाद्या कॉलेजमध्ये त्यासाठी संशोधनपर पदे तयार करायला लावणे अशी कामे हाती घ्यावी अशी सुचवणी करते. तसेच, हिंदूंची जागृती आज मुख्यत्वे करण्याची गरज असली तर ती त्यांच्या मनातील जातीपाती दूर करण्यात आहे.
सहमत
'शेम' वाचल्यानंतर रश्दी हा एक अत्यंत टुकार लेखक आहे,
मी ग्राउंड बिनिथ हर फीट वाचले (सुदैवाने ग्रंथालयातले, पैसे वाचले.) वाचल्यानंतर या माणसाला इतके डोक्यावर का घेतले आहे असा प्रश्न पडला.
भिडेगुरुजींमुळे (हे जे कोणी असतील ते - आपण तर नाव नाय बॉ ऐकले!)
मीही नाही ऐकले.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.