७५ वर्षीय राष्ट्रभक्त पू. भिडेगुरुजी यांना पोलिसांकडून निर्दय मारहाण
सांगली : येथील विविध चित्रपटगृहांत इतिहासद्रोही `जोधा अकबर' हा चित्रपट सुरू होता. तो बंद करण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन केल्यानंतर येथील शिवतीर्थावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व हजारो हिंदु तरुणांमध्ये धर्माभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे ७५ वर्षीय पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री. हणमंतराव पवार यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.
पोलिसांच्या मारहाणीमुळे पू. भिडेगुरुजी जमिनीवर कोसळले.
(सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्या हिंदूंना `पोलिसी खाक्या' दाखवणार्या पोलिसांनी दंगलखोर मुसलमानांना तो कधीतरी दाखवला आहे का ? यावरून पोलिसांना हिंदूंची सनदशीर आंदोलनाची भाषा कळत नाही, हेच सिद्ध होते. हिंदूंनो, धर्मासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या पू. भिडे गुरुजी यांच्यासारख्या परमवंदनीय व्यक्तीवर अधिकाराच्या गुर्मीत हात टाकणार्या या मोगलांच्या वंशजांना अद्दल घडवण्यासाठी संघटित व्हा ! - संपादक) यात जखमी झाल्याने पू. गुरुजींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांच्या मोगलाईचा पश्चिम महाराष्ट्रात निषेध !
ही माहिती श्रीशिवप्रतिष्ठानच्या अन्यत्रच्या कार्यकर्त्यांना कळताच प्रक्षुब्ध बनलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची व्हॅन व शहरातील बसगाड्या फोडल्या. पू. गुरुजींना झालेल्या मारहाणीचे पडसाद सांगली, बेळगाव व कोल्हापूर या जिल्ह्यांसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात उमटले. पोलिसांच्या या मोगलाईचा निषेध सर्वच स्तरांतून व्यक्त झाला व होत आहे.
इस संभाजी भिडे का बहुत चल रहा है । - मग्रूर पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने `मल्टीप्लेक्स' व `त्रिमूर्ती' या दोन चित्रपटगृहांच्या मालकांची भेट घेण्यात आली. त्या वेळी या चित्रपटगृहांच्या मालकांनी इतिहासद्रोही `जोधा अकबर' चित्रपट दाखवणे बंद करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवतीर्थावर जमले. तेथे पू. गुरुजी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. तेव्हा मग्रूर जिल्हा पोलीसप्रमुख श्री. कृष्णप्रकाश आले. ``इस संभाजी भिडे का बहुत चल रहा है ।'', असे म्हणत त्यांनी पोलिसांना लाठीमाराचा आदेश दिला. (ही आहे वयोवृद्धांनाही मान न देणार्या मुजोर पोलिसांची संस्कृती ! अशा पोलिसांना जनतेने कर भरून पोसायचे कशाला ? - संपादक) तेव्हा लगेचच पोलीस त्यांच्यावर तुटून पडले. (एका वंदनीय हिंदुत्ववादी नेत्यावर तुटूनपडणारे धर्मद्रोही पोलीस धर्मक्रांती अपरिहार्य करतात ! - संपादक) या वेळी झालेल्या हल्ल्यात पू. गुरुजींच्या कोपराला व पाठीला जबर मार बसला.
पोलिसांपासून पू. गुरुजींना वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पू. गुरुजी व पोलीस यांच्या मध्ये आडवे पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी पू. गुरुजींसह कार्यकर्त्यांनाही बेदम मारहाण केली. (स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीश पोलिसांच्या क्रौर्याची आठवण करून देणारे स्वातंत्र्योत्तर काळातील काळया कातडीचे ब्रिटीश पोलीस ! हिंदूंनो, धर्माभिमानी हिंदूंवर झालेले हे अत्याचार लक्षात ठेवा ! - संपादक) हे समजताच बाहेर असणार्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या व्हॅनवर हल्ला चढवला. पोलिसांच्या या अघोरी कृत्याची बातमी वार्यासारखी पसरली व या कृत्याच्या विरोधात संपूर्ण सांगलीतील वातावरण पेटले.
वृत्तपत्रांचे छायाचित्रकार, पत्रकार, मानवाधिकार आयोगाचे कार्यकर्ते आणि रुग्ण यांच्यावरही पोलिसांची मर्दुमकी !
पू. गुरुजींसह जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मानवाधिकार आयोग व श्रीशिवप्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी पू. गुरुजींची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्या सर्वांवर लाठीमार केला. (जनतेच्या जिवावर जगणारे पोलीस स्वत:ला जनतेचे मालक समजतात कि काय ? अशा उन्मत्त पोलिसांवर शासन काय कारवाई करणार आहे ? - संपादक) या वेळी वृत्तपत्रांचे छायाचित्रकार, पत्रकार व काही रुग्णांवरही पोलिसांनी अमानुष लाठीमाराची मर्दुमकी गाजवली. याबाबत पत्रकारांशी बोलतांना जिल्हा पोलीसप्रमुख श्री. कृष्णप्रकाश म्हणाले, ``आमच्यावर कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याने प्रत्युत्तर द्यावे लागले.'' (घटना पहाणार्यांनी पोलिसांनी थेट कारवाईसच सुरुवात केल्याचे सांगितले आहे. असे असतांना पोलीस प्रमुखांच्या या वक्तव्यावर कोण विश्वास ठेवणार ? नि:शस्त्र हिंदुत्ववाद्यांवर हल्ला करणार्या उद्दाम पोलिसांनी जनता संतापली, तर काय होते, याबाबतच्या इतिहासातील उदाहरणांचा अभ्यास करणे त्यांच्या हिताचे आहे ! - संपादक)
इस्लामी औलादीच्या जिल्हा पोलीस प्रमुखाला भारताबाहेर घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ! - हणमंतराव पवार
प्रत्यक्ष घटनास्थळी या मारहाणीत जखमी झालेले श्री. हणमंतराव पवार म्हणाले, ``इस्लामी औलादीच्या जिल्हा पोलीस प्रमुखाला भारताबाहेर घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ! ज्या धर्मांध अकबराने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याच्याच उदात्तीकरणाचा प्रयत्न करणारा चित्रपट बंद पाडण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठानने आंदोलन केले होते.''
--------------------------------------------------------------------------------
गृहमंत्र्यांकडे निषेध नोंदवा !
दू.क्र. : (कार्या) (०२२) २२०२ २४०१(३६८७),
(नि) २३६३ ७४९१ फॅक्स : २२०२ ४८७३
--------------------------------------------------------------------------------
साभार : दैनिक सनातन प्रभात
Comments
एक प्रस्ताव
हा चर्चाप्रस्ताव आधीप्रमाणेच ठेसन न घेता चालला आहे असे दिसते. तरी पन्नास धावा पूर्ण करण्यासाठी सलमान रश्दीवर उपचर्चा सुरू करावी.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
मला एक कळत नाही,
चित्रपटांना ही लोकं इतके महत्व का देतात? टाईमपास म्हणून पहायचा, आणि सोडून द्यायचे. कुणाचीही मनाची पाटी इतकी कोरी नसते की एक चित्रपट पाहून लगेच मते बदलतील ! मी पाहीला जोधा अकबर. आवडला. गोवारीकरांनी मेहनत घेतली आहे हे दिसते. जेवढे शक्य आहे तेवढे संशोधनही त्यांनी केलेले आहे असे एका मुलाखतीत वाचले. मुळात जो काळ चित्रित केला आहे, त्याबद्दल् इतिहासात थेट माहीती नाही आहे. तर तेथे त्यांनी थोडे स्वातंत्र्य घेतले तर काय बिघडले?
बेसिकली मी चित्रपट हा कधीच इतका महत्वाचा मानत नाही की तो अगदी जीवन-मरणाचा प्रश्न व्हावा..मनोरंजनाचे एक साधन बस्.. विरोध करण्याचे कारणच नाही कळले. हे भिडे गुरूजी बरेच आदरणीय व्यक्तीमत्व आहे असे वाचले. कोणीही असले तरी वृद्धांवर हल्ला वगैरे बरे वाटत नाही. पण टाळी एका हाताने वाजत नाही. आणि पोलिसांचे नाव बदनाम असले तरी उगीच उठून कुणावर ( आणि ते पण वृद्धांवर) हल्ला करतील असे वाटत नाही..
ही लोकं चित्रपटांवर बहीष्कार वगैरे गोष्टींमधे स्वताचा वेळ का घालवतात? समाजावर होणारे परिणाम तर् वेगळीच बाब झाली. त्याचा विचार करताना दिसत नाहीत ही लोकं. बारावीची महत्वाची परिक्षा ई. वर लिहीलेल्या बाबींचा विचार का नाही करत ही माणसं? शिवाय बाकी बर्याच गोष्टी आहेत आंदोलनं करायला.. चित्रपट हा काय मुद्दा आहे का? वर लिहील्याप्रमाणे न्यायालयामधे केस दाखल करता आली असती. काय ते पुरावे शोधून निर्णय घेता आला असता.. समाज इतका प्रक्षोभक का होतो लगेच ?
सुखी आहात
मला एक कळत नाही,
एकच? सुखी आहात. मला तर काहीच कळत नाहिये :)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
:)))
खरंय.. काही वेळाने मला पण तसेच वाटेल बहुधा!
मला म्हणायचे आहे...
काही टंकायाचे आहे पण टंकणार नाही, संगणकाच्या मॉनिटरवरती, भक्ती तोलणार नाही इ इ (शेवटची तान आहे) || असे ही चर्चा वाचताना दिवसभर म्हणत बसलो होतो :-) . पण आता चुप रहा भी न जाये अशी अवस्था झालेली आहे म्हणून माझे मुद्दे टंकतोच - काही मूळ चर्चेला प्रतिसाद तर काही प्रतिसादांवरून चालू असलेल्या उपचर्चांना प्रतिसाद आहेत. नेहेमी प्रमाणे हे मला वाटणारे माझे माझ्यापुरते विचार आहेत:
आता परत एक मूळ लेखकाला प्रश्नः आपण हे सर्व प्रामाणिकपणे हिंदू जागृती आणि हिंदू संघटनासाठी करत असाल असे वाटते. तर मला सांगा असले वागून आणि लिहून हिंदू जाग्रूती किती झाली आणि हिंदू संघटन किती झाले? मला वाटते झाला असला तर उलटाच परीणाम झाला असेल... फार तर फार आपला आंधळा अहंकार सुखावला गेला असेल. म्हणून म्हणतो की, करता येण्यासारख्या बर्याच विधायक गोष्टी आहेत ज्या हिंदूसंघटन म्हणून पण आपण करू शकाल. अर्थात त्या करणे मोर्चा करण्याइतके अथवा चिडून भडक लिहीण्या इतके सोपे नाही. आणि असे दिसतयं की आपल्याला सोप्या गोष्टी करण्यातच रस आहे.
अकबर परकीय?
हे बरंय हो! म्हणजे आक्रमण करून आले आणि पिढ्यान् पिढ्या इथेच राहिले तरी ते परकीय. म्हणजे अकबराचा जन्म भारतातला पण...अरेरे! तो भाग आता पाकिस्तानात नाही का? तो जगला वाढला इथेच. त्याचा परागंदा बापही इथेच राहण्याच्या फिकिरीत होता असे शाळेत तरी शिकवले होते बॉ! पण तरीही ते परकीय.
हुश्श! अमेरिकेत भारतीय आक्रमण करून जात नाहीत. नाहीतर त्यांच्या पिढ्या नागरिकत्व मिळूनही परकीयच राहायच्या.
(स्वकीय) राजीव अब्दुल खान.
परकीय प्रतिक
आदावर्ज खानसाहीब,
आपण माझे विधान कसे संदर्भहीन बदललेत ते पहा: मी काय म्हणालो तर, "कारण काही असले तरी तो परकीय आक्रमणाचे प्रतिक होता आणि त्याने परकीय मोघली सत्तेचे बस्तान भारतात बसवले इतकेच मी समजतो." . आणि अर्थातच त्या आधी मी असेही म्हणले होते की, " नेहेमी प्रमाणे हे मला वाटणारे माझे माझ्यापुरते विचार आहेत." ते आपल्याला पटले पाहीजेत असे काही नाही...आपण म्हणता की अकबराला "परकीय" म्हणालो.
आता परत आपण मला प्रश्न विचारलातच म्हणून माझे स्वकीय-परकीय संदर्भातील मला वाटणार्या विचारांवरीलउत्तर:
भारतावर जी अनेक ऐतिहासीक आक्रमणे झाली त्यात साम्राज्यविस्तार आणि संपत्तीची लूट ही प्रमुख कारणे असायची... जो पर्यंत इस्लामिक आक्रमणे झाली नाहीत तो पर्यंत. पुर्वीच्या आक्रमणात कधी स्थानीक श्रद्धांवर हल्ला झाला नाही. देवळे पाडली गेली नाहीत, बळजबरीने धर्मांतरे केली गेली नाहीत...पण इस्लाम च्या नावाखाली जो मध्यपुर्वेतून हल्ला सर्वत्रच झाला तोच स्थानीक संकृतींवर झाला, बळजबरीने धर्मांतरे हा त्याचा आधार होता आणि तो कधीच गेला नाही. अर्थात यातील अकबराने "पॉलिसी" म्हणून काही केले का हे माहीत नाही पण "पॉलिसी" म्हणून त्यावर बंदी घातल्याचे पण माहीत नाही. पण त्याबद्दल मी काही अकबराला नावे ठेवत नाही. त्याने मुत्सद्दीपणे स्वतःचे म्हणजे मोघलांचे साम्राज्य हे तयार केले आणि ते विस्तारण्यासाठी राजकीय चातुर्याने "हिंदू नेटीव्हां"ची मदत घेतली . तरीसुद्धा तो परकीय सत्तेचे प्रतिकच होता. पुढे त्याचा पणतू औरंगजेब हा तर काय अजून हुमायूनपासूची पाचवी पिढी - जन्म दाहोद, गुजरात आणि मृत्यू औरंगाबाद, महाराष्ट्र. पण संपूर्ण साम्राज्य हे स्थानिक भारतीय संस्कृतीच्या विरोधातीलच कारण त्याने "हिंदुस्थान" हा त्याचा देश समजण्यापेक्षा साम्राज्य समजले होते. हे भारतातच नाही तर जिथे जिथे हे आक्रमक गेले तिथे घडत गेले. तुम्हाला आत्ताचे इराणी मित्र-मैत्रिणी असले तर त्यांच्याशी बोला. आजही ते मुसलमान झाले असले तरी त्यांच्यावर आक्रमणे केलेल्यांच्या नावाने कशी बोटे मोडतात आणि पर्शियन संस्कृती आता मृतावस्थेत असली तरी त्याचे गोडवे गात नवरोज म्हणजेच कसा आमचा नववर्षदिन सांगत साजरा करतात.
आता अमेरिकेबाबत: काय गंमत आहे बघा, बॉबी जिंदाल - मुरब्बी राजकारणी (आणि खर्या अर्थाने इंप्रेसिव्ह), मूळ पंजाबी हिंदू. आजही भारतीय पद्धतीने घरात वातावरण (माहीती आहे म्हणून सांगतोय) पण महतकांक्षा असल्याने धर्मांतर केले (अर्थात तसे तो बोलणार नाही). लुइझियानामधे जाउन इतरांना टिळे लावले नाहीत की फेटे घातले नाहीत.. आपणच म्हणाल्याप्रमाणे, "अमेरिकेत भारतीय आक्रमण करून जात नाहीत." पुढे मी हे देखील म्हणतो की नुसते आक्रमणे करून जात नाहीत हा भाग नाही आहे तर सांस्कृतिक आक्रमणे करत देखील नाहीत... स्वतःची संस्कृती पाळतात आणि इतरांच्या संस्कृतीचा पण आनंद घेतात. आणि खर्या अर्थाने ज्या देशात जातात तिथल्या मातिशी प्रामाणिकपणे राहतात.मग ते अमेरिकाच कशाला? ग्रेट ब्रिटन असेल, कॅरेबिअन्स मधले असतील, साउथ आणि इतर अफ्रिकन देशातील असतील आणि अर्थातच मॉरिशस मधले असतील..
पण मोघल हे पिढ्यान् पिढ्या आक्रमक राहीले - साम्राज्यासाठी आणि संस्कृतीसाठी. म्हणून ते परकीयच आणि त्यांच्यामधील एक अकबर हा कितीही राज्यकर्ता म्हणून "उडदा माजी काळे गोरे" मधला "गोरा" असला तरी परकीय सत्तेचे प्रतिकच होता.
बरोबर
पण मोघल हे पिढ्यान् पिढ्या आक्रमक राहीले - साम्राज्यासाठी आणि संस्कृतीसाठी. म्हणून ते परकीयच आणि त्यांच्यामधील एक अकबर हा कितीही राज्यकर्ता म्हणून "उडदा माजी काळे गोरे" मधला "गोरा" असला तरी परकीय सत्तेचे प्रतिकच होता.
सहमत् आहे. आणि म्हणूनच अश्यांचा उदोउदो करणे मला स्वाभिमान नसल्या सारखे वाटते.
-- लिखाळ.
भारतीय अकबर
अकबर हा भारतीयच. अकबराचे भारतीय इतिहासातील मोठे सकारात्मक योगदान आहे.
अवांतर - आणि औरंगजेबही भारतीयच. इतकेच नव्हे तर शहाजहानच्या पार्श्वभूमीवर पाहता साम्राज्याला आलमगीराचीच सक्त आवश्यकता होती.
थोडक्यात संदर्भ आणि कारणमीमांसा
औरंगजेबाविषयीचे माझे मत पर्सनल आहे. शहाजहान/जहांगीर यांनी (मुघल) साम्राज्य विस्तार/भरभक्कम यासाठी फारसे काही केले नाही. ताजमहाल, नाचगाणी (हे ही सारे चांगलेच) यांत दौलत ओतली जात होती. कंजूष, हिशेबी, धूर्त (आणि क्रूरही) अशा शासनकर्त्याची मुघल साम्राज्याला नक्कीच गरज होती.
(स्पष्टीकरण देण्याच्या भूमिकेविषयी टग्यादादांचा आदर्श मानणारा) एकलव्य
सिटीबँकेला पंडीतांची गरज असेल म्हणजे अमेरिकेला ते हवेत असे नाही
कंजूष, हिशेबी, धूर्त (आणि क्रूरही) अशा शासनकर्त्याची मुघल साम्राज्याला नक्कीच गरज होती.
मुघल साम्राज्याला गरज होती असे म्हणालात तर ते ठिक आहे. आता सिटीबँकेला पंडीतांची गरज आहे कारण कोणीतरी पैसे वाचवायला हवेत आणि नोकर्या कमी करून बँक वाचवायला हवी. पण म्हणून पंडीतांची अमेरिकेला गरज आहे म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही (अगदी जरी सिटीबँकेचा अमेरिकन अर्थकारणात वाटा असला तरी). तेंव्हा त्यांची भारताला गरज आहे असे मला वाटत नाही...
हे वाचलं का ? भिडे गुरुजींचा धडा....
चित्रलेखातला हा लेखही वाचून काढावा !!!
सहमत
सहमत आहे. आपापल्या सोयीचा इतिहास. आपल्या सोयीची असेल कि प्रतिकात्मक आणि गैरसोयीची असेल कि अपवादात्मक. वर्तमानाचे आकलन होत नाही इतिहासाचे काय होणार?
प्रकाश घाटपांडे
गणेश तांबेंचा निषेध!
गणेश तांबे, प.पू. सं. भिडेगुरुजी, हिंदु जागृती मंच आणि शिवप्रतिष्ठानचा निषेध म्हणून प्रत्येकाने लवकरात लवकर चित्रपटगृहात जाऊन 'जोधा अकबर' बघावा. अकबराला पुण्यश्लोक म्हणणार्या शिवाजीचाही निषेध! पंचाहत्तराव्या वर्षी जोधा अकबर पाहणार्या भिडेगुरुजींचा पोलिसांनी केलेला सत्कार पुरेसा नाही. --वाचक्नवी