तर्कक्रीडा:६१:बुद्धिमत्ता चाचणी

या वेळची बुद्धिमत्ता परीक्षेची प्रश्नपत्रिका खूपच अवघड होती.अधिकृत निकाल लागण्या पूर्वीच काही जणांना कुणकुण लागली की ऋतुपर्ण गर्ग हा विद्यार्थी या परीक्षेत पहिला आला आहे.ते अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी गेले.ऋतुपर्णाला काहीच कल्पना नव्हती.
"तुला या परीक्षेत किती गुण मिळतील?" स्वतःला पत्रकार समजणार्‍या एकाने विचारले.
आपल्या संभाव्य गुणांविषयी ऋतुपर्णाने पुढील चार विधाने केली:

१.माझे गुण ५० पेक्षा अधिक असतील पण ८० पेक्षा अधिक असणार नाहीत.
२. माझे गुण जर ३ च्या पूर्ण पटीत असले तर ते ५० ते ५९ या दहा संख्यांपैकीच असतील.
३.माझी गुणसंख्या जर ४ ने विभाज्य नसेल (म्हणजे ४ ची पूर्णपट नसेल ) तर ती ६० ते ६९ या पैकीच असणार.
४.माझे गुण जर ६ च्या पूर्ण पटीत नसतील तर ते ७० ते ७९ या दहा संख्यां पैकीच असतील

.
दुसर्‍याच दिवशी निकाल प्रसिद्ध झाला.ऋतुपर्ण काही पहिला आला नाही; पण त्याने केलेली चारही विधाने सत्य ठरली.
तर ऋतुपर्णाला किती गुण मिळाले?

लेखनविषय: दुवे:

Comments

व्यनि

पाठवला आहे.

टीप : स्वतःच्या गुणांबद्दल इतका आत्मविश्वास असणार्‍यास मी (परीक्षक असतो तर्) १०० गुण दिले असते!

व्य. नि उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. अभिजित यांनी ऋतुपर्णचे गुण अचूक ओळखले आहेत.
ते लिहितातः "रितुपर्ण गर्ग हे नाव त्याच्या आडनावाला योग्य वाटते. हिंदी भाषकांमधे ऋ वापरत नाहीत. ऋतुपर्णच्या वडीलांनी मराठी मुलीशी लग्न केले असेल तर गोष्ट वेगळी. "....अभिजित.
.हे खरे असावे काय?...यनावाला.

नाही!

कोड्यामध्ये कुठेही ऋतुपर्ण हा हिंदी भाषक आहे असे म्हटलेले नाही. शिवाय त्याची सर्व विधाने मराठीतच लिहिलेली असल्याने तो मराठी भाषक आहे असेच म्हणता येईल. ऋषी कपूर हीरो असताना उच्चार जरी रिषी असा करत असले तरी मराठी पेपरात नगिना चित्रपटाबद्दल लिहिताना ऋषी असेच लिहित होते. त्यामुळे ऋतुपर्ण हे योग्यच आहे.

-- आजानुकर्ण

गर्ग आडनाव?

गर्ग आडनाव मराठी लोकांमध्ये नसावे म्हणून आपला तर्क केला की तो हिंदीभाषक असावा...

अभिजित...

बुद्धिमता चाचणी: व्य. नि. उत्तरे.

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. मुक्तसुनीत आणि श्री. सुनील यांची उत्तरे आली. दोघांचीही उत्तरे बरोबर आहेत.मात्र या दोघांनी उत्तराची कारणमीमांसा दिलेली नाही. ताळा करून चारही विधाने सत्य ठरतात हे दाखवले आहे,

बुद्धिमत्त...व्य.नि. उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
या कोड्याचे श्री.धनंजय यांनी पाठविलेले उत्तर अचूक आहे. तसेच उत्तर कसे काढले याची परिपूर्ण अशी कारणमीमांसा लिहिली आहे.

बुद्धिमत्ता चाचणी ...उत्तरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
*श्री. अमित कुलकर्णी प्रत्येक कोड्याचे उत्तर आवर्जून पाठवतात. तसेच या कोड्याचेही अचूक उत्तर त्यांनी पाठविले आहे. रीतही दिली आहे.
**श्री.विनायक यांनी पाठविलेले उत्तरही बरोबर आहे.
***श्री. महेश हतोळकर यांनी एक अचूक उत्तर पाठविले आहे. मात्र त्यांनी आणखी एक पर्यायी उत्तर दिले आहे त्यांत चूक आहे हे त्यांच्या नजरेतून निसटले.

बुद्धिमत्ता चाचणी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. दिगम्भा यांनी ऋतुपर्ण गर्गचे गुण अचूक ओळखले आहेत.तसेच विधान क्र.१ अनावश्यक आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.

व्यनि. उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. वाचक्नवी यांनी ऋतुपर्णाचे गुण शोधलेच आहेत. तसेच ते निश्चित करण्याच्या दोन भिन्न रीती दिल्या आहेत.

ऋतुपर्ण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अदिती यांनी पाठविलेले उत्तरः--
"ऋतुपर्णाला ७६ गुण मिळाले कारण तिन्ही कसोट्यांवर उतरू शकणारी नॉक आऊट विनर संख्या फक्त तीच आहे."

--अदिती


...........उत्तर बरोबर आहे.

 
^ वर