आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट भाग -२

आपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट - भाग २

पहिल्या भागाला ५० प्रतिसाद प्रतिसाद झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भरघोस प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

असेच नवनवीन चित्रपटांबद्दल येवू द्या...
----------------------------------------------
आपण सगळेच चित्रपट बघत असतो. काही जण अधून मधून तर काही अगदी नियमीतपणे.
आपण कोणते चित्रपट येव्हढ्यात पाहिले आहेत?
या यादीत
अगदी सगळे चालतील फ्रेंच, इटालियन, स्पॅनीश, इंग्रजी, हिंदी, मराठी, तामीळ...
डॉक्युमेंटरीज, आर्ट फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, फिचर फिल्म्स आणि अगदी ऍडल्ट सिनेमे सुद्धा! ;)

मात्र या चर्चेत नुसते चित्रपटाचे नाव देवू नका, त्या चित्रपटात काय आवडले/नावडले तेही द्या.
चित्रपट पाहिल्यावर काय वाटले, भावले, पटले न पटले व तसे का वाटले हे दिलेत तर बहारच!
शिवाय चित्रपटाचे संक्षिप्त कथानक दिले तर फार उत्तम. मात्र सस्पेन्स असेल तर शेवट देवू नका हे सांगणे नलगे!

या चर्चेच्या निमित्ताने आपल्याला माहीत नसलेल्या भाषांमधील जागतिक चित्रपटांची ओळख व्हावी ही अपेक्षा आहे.
(त्यामुळे अति गाजलेले हिंदी, मराठी, इंग्रजी सिनेमे यात आले नाहीत तरी चालतील असे वाटते.)

आपला
गुंडोपंत

Comments

सहमत

एकूण तुमची पहाण्याची क्षमता पाहून तुम्हाला सलाम करतो
सहमत आहे.
ही चर्चा त्यांनाच प्रदान करून टाकली पाहिजे.
आपला
गुंडोपंत

स्टोरी अनडन

इराणी सिनेमा स्टोरी अनडन पाहिलाय का कुणी...

-निनाद

आमेली पूलां

निनाद यांची एकाहून एक सुरेख परीक्षणे वाचून मागच्या वर्षी पाहिलेला द फॅब्युलस डेस्टीनी ऑफ आमेली पूलां हा फ्रेंच चित्रपट आठवला. कथा अगदी साधी, एका साध्या मुलीची. आमेली पूलां. तिचे जगावेगळे छंद, लाजाळू स्वभाव. नंतर एक प्रेमकथा. यात इतक्या छोट्या छोट्या गमती आहेत की सांगत बसण्यात मजा नाही. बघायलाच हव्यात.

हा सबटायटलसकट बघितलात तरी आवाज ठेवा. यातले फ्रेंच इतके गोड आहे की मरायच्या आधी ही भाषा शिकणे अपरिहार्य आहे असे वाटते.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सहमत

मस्तच आहे हा चित्रपट. नेहमीपेक्षा खूपच वेगळा गंमतीदार चित्रपट आहे.

यात इतक्या छोट्या छोट्या गमती आहेत की सांगत बसण्यात मजा नाही. बघायलाच हव्यात.

अमेली सॉकरची मॅच सुरु असताना छतावर रेडिओ लावुन कॉमेंट्री ऐकत अगदी मोक्याच्या क्षणांना टी.व्ही. च्या अँटेनाची वायर खेचत कुणाला तरी धडा शिकवते ती धमाल आठवली!!

 
^ वर