विरोध....... दिवस !!!!!!!

आजचा दिवस संपला, पण नेहमी प्रमाणे काही प्रश्न मनामध्ये ठेऊनच.

मला वाटत १९९४ पासून डे चे खुळ आपल्या समाजामध्ये आले, दुरचित्रवाहीनी संख्या वाढू लागली व तस तसे हे डे.

खरं तर मला हे चित्र-विचित्र डे खुप आवडतात, ह्यामुळे मी माझ्या मनातील गोष्ट / विचार माझ्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करु शकतो अथवा त्या दिवसाचा आनंद घेऊ शकतो पण हे शिवसेना , भाजपा तथा इतर पार्टी विभाग मध्येच कोठे येतो ? व का येतो ?

जर एखाद्या दिवशी मी माझ्या प्रिय व्यक्ती वर माझे असलेले (काही जणांसाठी नसलेले ) प्रेम व्यक्त करतो व त्यांना ते आवडते तर हा माझा खासगी मामला ह्या मध्ये जे राजकारणी का ?

मागच्या आठवड्यामध्येच शनिवारी माझ्या मानलेल्या भाचीचा फोन आला (वय वर्ष १२) ती मला चॉकलेट डे विषयी सांगत होती व मला घेऊन येण्यासाठी आग्रह धरत होती , तीला माहित आहे की मी जेव्हा ही घरी येईन तेव्हा तीचे आवडते चॉकलेट मी घेऊन येणारच. पण त्या मुलीला त्या दिवसाचे अप्रुप वाटत होते व तीला सोमवारी शाळेत जाऊन आपल्या मैत्रीणींना सांगायचे होते की मामा काय घेऊन आला, मला चॉकलेट घेऊन जाणे आवडते त्याप्रमाणे मी घेऊन देखील गेलो, तेथे ती खुश व मुले खुष ह्यासाठी मी खुष. ह्यामध्ये ही राजकीय व्यक्ती कोठून आली ?

आज, माझ्या काही मैत्रीणी व एकादी खास मैत्रीण तीच्या साठी मी एक फुल घेऊन गेलो त्यात तीला आनंद आहे व ती खुष आहे व म्हणून मी खुष आहे तर ह्यामध्ये हे राजकारणी कोठून आले.

ह्यांना सांगणारे / धमकवणारे कोणी तरी हवे आहे हो, हिदुत्व रक्षण करण्याची गरजच नाही आहे. हिदुत्व रक्षणासाठी स्वतः हिदुत्व सक्षम आहे... हा हजारो साल पुराना धर्म ह्या देशाचा आत्मा आहे हिदुत्व, हा कोणी डे मुळे ना रसातळाला जाईल ना वर आकाशी भीडेल.
शिवसेनेला जर सत्ताच हवी आहे तर मार्ग जरा वेगळा हवा.. मोदी प्रमाणे .. विकासाचा नारा द्या काम करा... लोकांना दाखवा की तुम्ही काम केले ...ते व्हा मते व मग कुठेतरी सत्ता असा डे विरोध करुन अथवा भैय्या लोकांना भिती दाखवून मते मिळणार नाहीत की सत्ता मिळणार नाही.

तुम्ही आम्ही सामान्य माणसे आम्हाला खुष होण्यासाठी एक पल , एक क्षण काफी आहे हो.... पण ह्या राजकारणी लोकाना खुष होण्यासाठी शेकडो लोकांना त्रास द्यावा लागतो, रोज कोठे ना कोठे तरी हंगामा करावा लागतो कारण बातमी महत्वाची व बातमी मध्ये राहणे महत्वाचे जेव्हा हे बातमी मध्ये आले तेव्हा ते खुष व जेव्हा नाही आले तेव्हा परत शकडो जनतेला त्रास.

काय लिहावे व काय नाही.... एकच प्रण मत त्यालाच जो विकास करेल महाराष्ट्राचा व देशाचा....
जो दंगा करेल, नाहक आपल्या अस्तीत्वासाठी लाखो लोकांना त्रास देईल त्याला कधीच मत नाही ....

आम्हाला आमचा देश हवा आहे, महाराष्ट्र हा आमच्या गर्वाचा विषय आहे नक्की पण ज्या महाराष्ट्रामध्ये ज्याकाळी फक्त मराठी लोकच राहतील तेव्हा तो महाराष्ट्र देशातील सर्वात मागासलेला व विकासापासून दुर असलेला राष्ट्र असेल...

विरोध आहे माझ्या राजकारणाच्या प्रत्येक विरोधाला..... विरोध आहे माझा देश सोडून आपला विचार करण्याच्या वृतीला !!!

लेखनविषय: दुवे:

Comments

आवडला!

राज साहेब,

आपला लेख/विचार आवडले, पटण्यासारखेच आहेत.

एकच फक्त माझ्याकडून निदान माझ्यापुरता बदल (सगळच मान्य झाले तर काय मजा!):

जर एखाद्या दिवशी मी माझ्या प्रिय व्यक्ती वर माझे असलेले (काही जणांसाठी नसलेले ) प्रेम व्यक्त करतो व त्यांना ते आवडते तर हा माझा खासगी मामला ह्या मध्ये जे राजकारणी का ?

यात राजकारणी जसे नकोत तसे हॉलमार्क आणि इतर मार्केटींग कंपन्यांची "पिअर प्रेशर्स" पण नकोत. या सर्व दिवसांना मी "हॉलमार्क डेज्" म्हणतो. आता या वर्षी अमेरिकेतील गंमत पहा: ब्ल्यू नाईल या मोठ्या हिर्‍यांच्या कंपनीचा स्टॉक कालच खाली गेला. कारण ख्रिसमस वगैरे (हॉलीडे सिझन) मधे लोकांनी जास्त विकत घेतले नाही (आर्थिक मंदीची भिती). मग त्यांना कल्पना असल्याने या कंपनीने आणि त्याबरोबर इतर कंपन्यांनी व्हॅलेंटाईन डेज् ना हिर्‍याच्या गोष्टी सेल वर ठेवून "सटल प्रेशर" जनतेवर आणायचा प्रयत्न केला. आता मी हिंदूत्ववादी असल्याने, असल्या प्रेशर मधे मी येत नाही ते सोडा :) त्यावर येथील माध्यमात पण थोडी का होईना टिका ऐकायला आली.

व्हॅलेंटाईन असो नाहीतर रक्षाबंधन-दसरा-दिवाळी-पाडवा-भाऊबीज - काहीही...प्रश्न आपण स्वतःच्या आणि आपल्या आप्तांच्या आनंदासाठी आणि आनंद लुटण्यासाठी करतोय का "लोक काय म्हणतील" अथवा "दुकानातील सेल पाहून" कुठल्यातरी प्रेशर मधे करतोय हा प्रश्न आहे.

जेंव्हा असला मार्केटींगचा तमाशा वाढतो तेंव्हा कुठल्यान् कुठल्यातरी शक्ती त्याच्या विरोधात जातात. त्यात राजकारण्यांनी जाण्यापेक्षा समाजकारण्यांनी केवळ समाजहीत (धर्म वगैरे नाही) म्हणून विरोध करावा मग त्यात व्हॅलेंटाईन डे मधील अतिरेकी मार्केटींग येईल, पाठीला पॉलीश करून दांडीया खेळायला जाऊन होणारे गर्भपात आणि इतर सामाजीक समस्या येतील आणि अजून बरेच काही, इतकेच म्हणावेसे वाटते.

+१

अहमत.

लेबल पाहून प्रेम व्यक्त होऊ नये ह्या मताचा मी देखील आहे व बाकी आपल्या मताची सहमत.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

कोण हे मोदी?

हिदुत्व रक्षण करण्याची गरजच नाही आहे. हिदुत्व रक्षणासाठी स्वतः हिदुत्व सक्षम आहे... हा हजारो साल पुराना धर्म ह्या देशाचा आत्मा आहे हिदुत्व, हा कोणी डे मुळे ना रसातळाला जाईल ना वर आकाशी भीडेल.
मोदी प्रमाणे .. विकासाचा नारा द्या काम करा... लोकांना दाखवा की तुम्ही काम केले ...तेव्हा मते व मग कुठेतरी सत्ता असा डे विरोध करुन अथवा भैय्या लोकांना भिती दाखवून मते मिळणार नाहीत की सत्ता मिळणार नाही.

राज,आपण ज्या मोदींचा दाखला दिला आहे त्या मोदींनी तरी यापेक्षा वेगळे काय केले होते? हिंदूत्वाच्या नावाखाली किती मुस्लीमांची कत्तल झाली,किती मुस्लीम स्त्रीयांची अब्रू लूटली गेली हे आपण विसरला आहात काय? भैय्यांनी महाराष्ट्रात किती गर्दी केली होती ती आपल्याला जाणवली नसेल कदाचित,पण भाई-भाई म्हणून आमच्या संस्कृतीवर यांनी किती आक्रमण केले आहे हे आमचे आम्हालाच माहित.कमीत कमी राजकीय फायद्याकरिता आपल्याच बांधवांची गोध्रा कांड घडवून हत्या करणार्‍यांपेक्षा तरी शिवसेना-मनसे लाख पटीने चांगली.

मोदी

मी मोदीचा दाखला फक्त विकासासाठी दिला आहे दंगा करा असे म्हणालो नाही, मोदीने काय केले हे मला माहीत नाही पण २००३ ते २००७ गुजरातची प्रगती व विकास पाहता मी वरील उल्लेख केला होता.

राज
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

कोण हे मोदी?

हिदुत्व रक्षण करण्याची गरजच नाही आहे. हिदुत्व रक्षणासाठी स्वतः हिदुत्व सक्षम आहे... हा हजारो साल पुराना धर्म ह्या देशाचा आत्मा आहे हिदुत्व, हा कोणी डे मुळे ना रसातळाला जाईल ना वर आकाशी भीडेल.
मोदी प्रमाणे .. विकासाचा नारा द्या काम करा... लोकांना दाखवा की तुम्ही काम केले ...तेव्हा मते व मग कुठेतरी सत्ता असा डे विरोध करुन अथवा भैय्या लोकांना भिती दाखवून मते मिळणार नाहीत की सत्ता मिळणार नाही.

राज,आपण ज्या मोदींचा दाखला दिला आहे त्या मोदींनी तरी यापेक्षा वेगळे काय केले होते? हिंदूत्वाच्या नावाखाली किती मुस्लीमांची कत्तल झाली,किती मुस्लीम स्त्रीयांची अब्रू लूटली गेली हे आपण विसरला आहात काय? भैय्यांनी महाराष्ट्रात किती गर्दी केली होती ती आपल्याला जाणवली नसेल कदाचित,पण भाई-भाई म्हणून आमच्या संस्कृतीवर यांनी किती आक्रमण केले आहे हे आमचे आम्हालाच माहित.कमीत कमी राजकीय फायद्याकरिता आपल्याच बांधवांची गोध्रा कांड घडवून हत्या करणार्‍यांपेक्षा तरी शिवसेना-मनसे लाख पटीने चांगली.

छ्या! आता "रात्रीच" साजर्‍या केल्या जाव्यात

दिवसच दिवस... दिवस साजरे करून ठरवून वगैरे कंटाळा आला आता.
आता "रात्रीच" साजर्‍या केल्या जाव्यात असे वाटते. असेही इतके वेगवेगळे दिवस् झाले आहेत विचारू नका.

आपला
गुंडोपंत

नवरात्र

आता "रात्रीच" साजर्‍या केल्या जाव्यात असे वाटते. असेही इतके वेगवेगळे दिवस् झाले आहेत विचारू नका.

नवरात्र आहे की. पण त्यात आलेल्या भिबत्स प्रकाराला माझा विरोध आहे. चांगले आनंदाने होत असेल तर होउद्यात! नाहीतर रात्रींनंतर दिवस "येण्या" ऐवजी "जाणे " असले अयोग्य प्रकार नको त्या वयात होतात.

व्हॅलेंटाइन डे और पूनम की रात...

दिल तो पागल है आठवत नाही का? माधुरी मामींना कोणीतरी सांगते की व्हॅलेंटाईन "डे" हा पौर्णीमेच्या "रात्री" आला तर आपल्याला हवा असलेला साथीदार मिळतो!

सहमत वजा १

महाराष्ट्र हा आमच्या गर्वाचा विषय आहे नक्की पण ज्या महाराष्ट्रामध्ये ज्याकाळी फक्त मराठी लोकच राहतील तेव्हा तो महाराष्ट्र देशातील सर्वात मागासलेला व विकासापासून दुर असलेला राष्ट्र असेल...

हे वाक्य विषयाला सोडून आणि अनावश्यक वाटले. महाराष्ट्रात फक्त मराठी लोक राहतील असे आता होणे नाही त्यामुळे अशी तद्दन राजकीय आणि अनाठायी विधाने लेखात नसती तर चालले असते.

इतर मुद्द्यांसाठी विकासशी सहमत.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

विकासापासून दुर कसे बॉ ?

राजे,
चर्चेचा विषय चांगला आहे. पण,
महाराष्ट्र हा आमच्या गर्वाचा विषय आहे नक्की पण ज्या महाराष्ट्रामध्ये ज्याकाळी फक्त मराठी लोकच राहतील तेव्हा तो महाराष्ट्र देशातील सर्वात मागासलेला व विकासापासून दुर असलेला राष्ट्र असेल...

पण,
समजा महाराष्ट्रात सगळीकडे मराठी भाषिक राहत आहेत अशी कल्पना केली, तर महाराष्ट्र सर्वात मागासलेला राहण्याची कोणती कारणे असतील बरं ?

पटले

जर एखाद्या दिवशी मी माझ्या प्रिय व्यक्ती वर माझे असलेले (काही जणांसाठी नसलेले ) प्रेम व्यक्त करतो व त्यांना ते आवडते तर हा माझा खासगी मामला ह्या मध्ये जे राजकारणी का ?

पटले!
पण संधी तेथे राजकारणी...
-निनाद

सहमत

सहमत आहे. व्हॅलेंटाइन डेला शिवसेनेचा विरोध, पण मनसेची मान्यता आहे. जसा वारा वाहील तशी भूमिका (भूमिका हा खरे तर फार मोठा शब्द झाला, प्रचार म्हणा हवे तर.) बदलणार्‍या आपल्या राजकारण्यांना फक्त कोलीत हवे असते. मग ते धर्माचे असो, प्रांताचे वा संस्कृतीचे. यात फायदा होतो त्यांचा आणि बळी जातात निरपराध माणसे. नंतर माफीनामा जाहीर करून काय उपयोग? ही परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही.

वी ऑल गेट द वॉर वी डिझर्व.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

रेड्यांची झुंज

यात फायदा होतो त्यांचा आणि बळी जातात निरपराध माणसे. नंतर माफीनामा जाहीर करून काय उपयोग? ही परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही.

होय. दोन रेड्यांच्या टकरीत नुकसान होते ते शेतकर्‍याच्या जमीनीचे. परस्परांच्या झुंजीते दमुन जातील. मरुन जातील पण शेतकर्‍याच्या नुकसान त्याला उघड्या डोळ्यांनी बघावे लागते. जर प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला तर न जाणो परस्परांवर धाउन जाणारे रेडे शेतकर्‍यावरच धाऊन जायचे.
प्रकाश घाटपांडे

कुणी थांबत नाही

विरोध करून कुणी थांबत नसते.
ज्याला जे करायचे असते ते लोक ते करून मोकळेच होतात.

आमच्या कॉलेज मध्ये मुलं गुलाब घेऊन फिरायची. मग तीच पोरं हॉलमार्क चे दुकान फोडायला पुधे असायची.

शिवानी

^ वर