तुम्ही इंटरनेटवर सुरक्षित कसे राहता?

काल, म्हणजे १२ फेब्रुवारी २००८ रोजी "सेफर इंटरनेट डे" साजरा झाला. इंटरनेटचे उपयोग आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही घराघरात आणि गल्लोगल्ली इंटरनेटचा प्रवेश झाला आहे. चांगल्या सोयी आणि उपयोगांबरोबरच इंटरनेट मुळे बरेच धोके होऊ शकतात. योग्य माहितीचा अभाव या एकाच कारणामुळे बरेच लोक याला बळी पडतात. व्हायरस इन्फेक्शन पासून ते गंभीर सायबर गुन्ह्यांपर्यंत कोणत्याही स्वरूपाचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात.

या चर्चेचा उद्देश या धोक्यांची चर्चा करणे, जमल्यास अधिक तांत्रिक माहिती चर्चेतून गोळा करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही या धोक्यांपासून वाचण्यासाठी काय करता आणि दुसर्‍यांना काय सल्ले देऊ शकता हे जाणून घेण्याचा आहे.

Comments

काय करतो

शक्यतो (१) आर्.एस्.एस्. फिडस वाचतो, मूळ पाने चाळणे टाळतो., (२) ट्रॅक मी नॉट, (३) झोन अलार्म वगैरे वापरतो, (४) पॉप-अप ब्लॉकर आहेतच, शिवाय जाहिराती चाळणे टाळतो.

ट्रॅक मी नॉट, झोन अलार्म

>> (२) ट्रॅक मी नॉट, (३) झोन अलार्म वगैरे वापरतो

यांचा उपयोग कसा होतो आणि कसा करायचा याविषयी काही माहिती देऊ शकाल का?

उपयोग

ट्रॅक मी नॉट हे फायरफॉक्सचे एक्सटेंशन आहे. शोधयंत्रे तुमच्या शोधांच्या नोंदी ठेवतात त्यांना गुंगारा देण्यासाठी यामधून खोट्या विचारण्या केल्या जातात. यामुळे तुम्ही केलले खरे शोध त्यात मिसळून जातात.
झोन अलार्म फायरवॉल आहे. तुमच्या संगणकाला येणारी प्रत्येक विचारणा आणि तुमच्या संगणकाकडून जाणारी प्रत्येक विचारणा याद्वारे नियंत्रित केली जाते. तसेच एखादी अनोळखी प्रक्रिया सुरू होत असेल तर तुम्हाला तसा संदेश येतो आणि तुम्ही त्या प्रक्रियेला परवानगी द्यायची की नाही हे ठरवू शकता.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

धन्यवाद

धन्यवाद, राजेंद्र!

ट्रॅक मी नॉट.. व्हाय?

शोधाच्या नोंदी गुप्त ठेवण्यात काय फायदा आहे? शेवटी त्याचा उपयोग तुमच्यावर जाहिरातींचा मारा कसा व्हावा यासाठीच होणार आहे ना? मग निदान मी केलेल्या शोधांचा पॅटर्न वापरुन तरी मला जाहीराती दाखव बाबा असे म्हंटले तर काय हरकत आहे?
खोट्या विचारणा मिसळल्याने भलत्याच जाहिराती आल्या तर? ;)
-कोलबेर

ऑनलाईन व्हॅलेंटाइन डे कार्ड आणि एफ बी आय वॉर्नींग

मथळ्यावरून वाटले तरी, या प्रतिसादाचा उपक्रमावर इतरत्र चाललेल्या चर्चेशी काही संबंध नाही! :-)

खालील दुवा पहा:

Online Valentine cards may contain Internet worm, FBI warns

म्हणून कोणतेही ऑनलाईन व्हॅलेंटाईन कार्ड तुर्तास पाठवू नका अथवा स्विकारू नका असे सांगावेसे वाटते.

मी वापरत असलेले काही उपाय

- नॉर्टन् ऍन्टीव्हायरस
- नॉर्टन् फायरवॉल्
- ऍन्टी स्पाय वेअर्
-रजिस्ट्रि क्लीनर
-पॉप् अप ब्लॉकर
- सिमॅंटेक् चे (नाव विसरलो. हे एक्स्पायर् झालेय्.)

माझे उपाय

मी झोन अलार्म आणि एव्हीजी अँटी स्पायवेअर वापरत होतो. पण व्हिस्टा यांच्यामुळे खूप हळू चालते असे लक्षात आले.
सध्या वापरतो आहे :
कोमोडो फायरवॉल
स्पायबॉट अँटीस्पायवेअर
अव्हिरा अँटीव्हिर
सीक्लीनर

याशिवाय विंडोजचे वेळोवेळी येत असलेले सिक्युरिटी अपडेट (कालच व्हिस्टासाठी बरेच आले आहेत), तसेच इतर सॉफ्टवेअरचेही अपडेट करणे आवश्यक आहे. तुमच्या संगणकाला कुठले अपडेट हवे आहेत हे कळण्यासाठी सिक्युनिया हा चांगला मार्ग उपलब्ध आहे.

अडोब वापरणार्‍यांनी नुकतेच प्रकाशित झालेले काही अपडेट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे असे त्या कंपनीने आवाहन केले आहे.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

व्हिस्ता

मी अलिकडे व्हिस्ता वापरून बघण्याचा प्रयत्न केला. रॅम् २ गिग् पेक्षा कमी असेल तर वापरू नये असे मला सुचवावेसे वाटते. मी ती काढली आणि एक्स् पी टाकली...

रॅम

सहमत आहे. म्हणूनच मी व्हिस्ता घेण्याआधी २ जी रॅम घेतली. तरीही व्हिस्ता सुरू होताना आणि बंद होताना खूप वेळ घेत होते. सर्व ट्रिक्स (अनावश्यक सर्व्हिस बंद करणे किंवा स्टार्ट अप प्रोग्राम कमी करणे वगैरे)ही करून पाहिल्या. मग एका ठिकाणी काही सॉफ्टवेअर व्हिस्ताशी कंपॅटिबल नाहीत असे कळाले. झोन अलार्म त्यात होते. हे काढल्यापासून वेगात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

व्हिस्ता

मायक्रोसॉफ्टचे गोपनीय विरोप उघड झाल्यापासून याखेरीज व्हिस्ताच्या बर्‍याच अडचणी असल्याचे समजते. मुख्यतः इंटेलला सूट देण्यासाठी व्हिस्टामध्ये बर्‍याच तडजोडी करण्यात आल्या. हे सर्व पाहिल्यावर तुमचा मार्ग योग्य आहे असे वाटते.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

मीही...

मॅक वापरतो आणि सर्वसाधारण काळजी घेतो. बाकी "अडव्हान्स" प्रकाराची माहितीच नाही.

ते काही म्हणा, पण...

आणि कुठेही क्लिक करताना तो दुवा आधी नीट निरखून घेतो. (क्लिक करणे हे एखादी वस्तू तोंडात टाकण्यासारखे आहे. तेवढेच गांभीर्य आवश्यक आहे.)

ते काही म्हणा, पण : यू हॅव नो प्रायवसी ! गेट ओव्हर इट ! :'-) ह घ्या.!

सहीच

झकास!

सहीच टोला!

आपला
गुंडोपंत

क्लिक करणे

>> क्लिक करणे हे एखादी वस्तू तोंडात टाकण्यासारखे आहे. तेवढेच गांभीर्य आवश्यक आहे.

मस्त वाक्य आहे. आवडले :)

छोट्यांसाठी..

क्लिक करणे हे एखादी वस्तू तोंडात टाकण्यासारखे आहे. तेवढेच गांभीर्य आवश्यक आहे.

हं..! आजच्या नव्या संगणक सॅव्ही पिढीला हेच वाक्य ,
" एखादी वस्तू तोंडात टाकणे हे कुठेही क्लिक करण्यासारखे आहे. तेवढेच गांभिर्य आवश्यक आहे"
असे थोडेसे फेरबदल करुन देखिल वापरता येईल :)

जगी

"जगी नेट रक्षीत
असा कोण आहे?"

काहीही केले तरी
मी तू आणि कुणीच येथे कधीच सुरक्षीत राहु शकत नाही हेच सत्य आहे...

किमान एफ बी आय, सि आय ए तरी तुम्हाला कुठे तरी स्कॅन करतेच करतच असते.
नुसती अल जझिरा ला भेट द्या, की तुम्ही आलातच खास विभागात!

आपला
गुंडोपंत

दुसरा काही पर्याय?

समजा सुरक्षीत नाही पण कमी असुरक्षीत राहणे ही च सुरक्शीतता मानणे. नाही जम्लं तर आरक्षीत रहता येईल काय?
प्रकाश घाटपांडे

नाव पत्ता देत नाही

वरील सर्व (झोन् अलार्म वगैरे) वापरतोच शिवाय नाव पत्ता शक्यतो देत नाही. दिलेच तर एक खोटे ठरवून ठेवले आहे तेच देतो.

शिवाय बर्‍याच ठिकाणी द्यायला अकाउंट्स सुरु करायला लागणारा एमेल वेगळा ठेवला आहे. त्यामुळे माझा वैयक्तिक पत्ता जरा वेगळा राहतो. (असे मला वाटते, भ्रमही असेल. पण कचरा तरी येत नाही.)

-निनाद

ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून वावरत नाही

माझ्या खाजगी संगणकावरही मी व्यवस्थापक (ऍडमिनिस्ट्रेटर) म्हणून रोज वावरत नाही, फक्त काही विशेष काम असल्यास तसे लॉगिन करतो. नाहीतर मूलभूत प्रणाली न बदलू शकणारा सामान्य वापरणारा म्हणून लॉगिन करतो.

घरात आणि घराबाहेर

घरात संगणकावर विंडोज वापरत असाल तर चांगल्या प्रतीचा विषाणूरोधक आणि शक्य झाल्यास चांगल्यापैकी पर्सनल फायरवॉल असावी. क्लिक करण्याविषयी सर्किट म्हणतात ते खरे आहे. याशिवाय शक्य तेथे फायरफॉक्स न्याहाळक वापरल्याने काही प्रमाणात सुरक्षित राहता येऊ शकते.
सायबर कॅफेत जाताना मात्र फारच दक्ष राहणे आवश्यक. महत्त्वाचे आंतरजालीय व्यवहार उदा. बँकिग, क्रेडीट कार्ड संबंधित व्यवहार अश्या ठिकाणातून करू नयेत. आजकाल बर्‍याच सायबर कॅफेत चांगले विषाणूरोधक असतात आणि ते अद्ययावत असतात पण माहिती नसलेल्या किंवा कुप्रसिद्ध असलेल्या सायबर कॅफेमध्ये न जाणेच चांगले.

 
^ वर