जनतेला मतदानाच्या संदर्भात विशेष अधिकार देणारे घटनेतील ४९ वे कलम !
जनतेला मतदानाच्या संदर्भात विशेष अधिकार देणारे घटनेतील ४९ वे कलम !
भारतीय नागरिकांना घटनेमध्ये मतदानाचा एक विशेष अधिकार आहे. घटनेच्या ४९ व्या कलमानुसार एखादी व्यक्ती मतदानकेंद्रावर जाऊ शकते, स्वत:ची ओळख देऊन बोटावर खूण करून घेऊ शकते. एवढी प्रक्रिया करूनही नंतर कोणालाही मत द्यायचे नसल्याचे नागरिक तेथील निर्वाचन अधिकाऱ्याला सांगू शकतो, अशी तरतूद आहे. अशा विशेषाधिकाराने वापरलेल्या मतालाही विशेष महत्त्व आहे.
एखाद्या प्रभागात उमेदवार जेवढ्या मतांच्या फरकाने जिंकतो, तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त मते जनतेने वापरलेल्या विशेषाधिकाराची असतील, तर तेथील निवडणूकच रद्द ठरते व त्या ठिकाणी नव्याने निवडणूक घ्यावी लागते. उदा. एखाद्या प्रभागामध्ये समजा एखादा उमेदवार जर १२३ मतांनी जिंकला व त्या प्रभागामध्ये ४९ व्या कलमानुसार नागरिकांनी वापरलेल्या विशेषाधिकारातील मते १२३ पेक्षा जास्त असतील, तर तेथील निवडणूकच रद्द ठरते.
एवढेच नव्हे, तर त्या प्रभागासाठी निवडणूक लढवलेले उमेदवार फेरनिवडणूक लढवू शकत नाही; कारण जनतेने त्यांना विशेषाधिकाराखाली नाकारलेले असते. एवढ्या महत्त्वाचे हे कलम व हा विशेषाधिकार देशातील एकाही सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्याने जनतेला शिकवला नाही. तसेच घटनेतील ही महत्त्वपूर्ण तरतूद निवडणूक आयोगाने जनतेसमोर अद्याप का उघड केली नाही, हेही आश्चर्यच आहे.
घटनेतील या तरतुदीमुळे राजकीय पक्षांना फटका बसल्यास ते चांगल्या उमेदवारांसाठी प्रयत्न करतील व पयार्याने गुन्हेगार लोकप्रतिनिधींवर अंकुश बसेल. हा मतदानाचा सर्वांत चांगला पर्याय आहे व त्याचा सगळीकडे प्रचार झाला पाहिजे. भारतातील भ्रष्टाचारी राजकीय पक्षांच्या विरोधात हे एक हत्यार होऊ शकेल. मतदार हे हत्यार वापरून त्यांचे सामर्थ्य दाखवू शकतात. मतदारांनी निवडणुकांच्या वेळी ही संधी दवडू नये. `मतदान करा किंवा मतदान न करण्यासाठी मतदान करा (विशेषाधिकाराचे मत)', हा संदेश सर्वत्र पसरवावा जेणेकरून भारतीय नागरिक राष्ट्रच्या रक्षणासाठी या अधिकाराचा वापर करू शकतील. लोकहो, तुमच्या मतदानाचा अधिकार देशाच्या भल्यासाठीच वापरा !
Comments
धन्यवाद
महत्वाची माहिती सांगितलीत... या अधिकाराचा वापर व्हायला हवा...
वास्तव
याची माहिती येथील सकाळ मध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी आली होती. असे मत देउ इच्छिणार्या लोकांनी यंत्रावर बटन नसल्याने एक विहित फॉर्म भरुन द्यावयाचा आहे असे नमूद होते. मतदानच्या दिवशी काही लोकांनी मागणी केली असता निवडणुक अधिकार्यांनी आम्ही पण वर्तमानपत्रातच वाचले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्यांना तसा फॉर्म उपलब्ध करुन दिला नव्हता. यंत्रातच "वरील पैकी कोणीही नाही" असे बटन करुन देणे अवघड होते काय?
प्रकाश घाटपांडे
स्वानूभव
ही तक्रार मी बर्याच ठिकाणी ऐकली. पण माझा स्वतःचा अनूभव वेगळा आहे. दहिसरला माझ्या निवडणूक केंद्रावर मी स्वतः ह्या फॉर्म ची मागणी केली. सुरवातीचे काहि क्षण टाळाटाळ झाली पण मागे लाईन खोळंबल्याने "साहेब दाबा ना बटण, एकाने काय होतंय" वगैरे बोलूनहि झालं.. पण मी मतदान केले आहे अशी संगणकत नोंद होती परंतू मी प्रत्यक्षात मत दिले नसल्याने त्यांचे तक्ते "टॅली" होणार नाहित या भीतीने का होईना १५ मिनिटांनी मला तो फॉर्म मिळाला. व मी मला यातील कोणताही उमेदवार लायक वाटत नाहि असे "मत" दिले. :))
हा प्रश्न तर मलाहि पडला होता. जर यंत्रात ते बटण दिले तर खरी मजा येईल ;)
-ऋषिकेश
अंमलबजावणी
कोणालाही मत द्यायचे नाही असे बटण असेल तरच ह्या कलमाला अर्थ आहे. अन्यथा 'गुप्त मतदान' ह्या तरतुदीला देखिल काहीही अर्थ राहणार नाही. कारण एखाद्याला जर हा 'फॉर्म' वेगळा मागावा लागत असेल तर अर्थातच त्या व्यक्तिचे मत अवघ्या केंद्रामध्ये उघड झाले आहे.