खंडीत आंतर्जाल प्रवाह (इंट्रनेट ट्रॅफिक)

आत्ताच एनपीआरवर ऐकले आणि नंतर येथे पाहीले की इजिप्तचय भागात भूमध्यसमुद्रात दोन केबल्स खंडीत झाल्याने मध्यपूर्वेत जास्त आणि भारतात ५०% इंट्रनेट स्थगीत/खंडीत झाले होते.

हे कशामुळे झाले यावर इजिप्तसरकार म्हणत आहे की वातावरणामुळे! कुणाला काही जास्त माहीती समजल्यास येथे लिहा. तसेच भारतवासी उपक्रमींनी त्याना जर काही अनुभव आला असल्यास कळवा!

Comments

सोपा मार्ग

हा अतिरेक्यांचा सोपा मार्ग ठरू शकेल का?
कोण जातो या केबल्स ची राखण करायला? आणि कुठे कुठे करणार?

एक व्यवस्थितपणे आखणी केलेले अभियान 'जगाचा संपर्क' सहजतेने खंडीत करू शकेल असे दिसते आहे...
या विचाराने परत अस्व्स्थता...
आपला
गुंडोपंत

जहाजाच्या नांगरामुळे, क्षमतेवर परिणाम

"An anchoring ship off Egypt's Alexandria coast damaged Indian-owned FLAG cable and also SEA-ME-WE on Wednesday morning" असे कळले. बर्‍याच भारतीय आयटी कंपन्यांना याचा त्रास झाला/होत आहे. बर्‍याच कंपन्यांमध्ये "क्रिटिकल आउटेज" च्या मेल्स आल्या आहेत. संपर्क खंडित झाला नसला तरी, वाहतूक दुसर्‍या मार्गानी वळवावी लागल्याने क्षमता कमी झाली आहे. भारतातून अमेरिका आणि युरोपात जाणार्‍या वाहतुकीवर हा परिणाम झाला आहे.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

 
^ वर