अरूण गांधी, ज्यू समाज, वॉशिंग्टन पोस्ट - काही प्रश्न
आज रीडीफमधे बातमी वाचली, "Anti-Jews'remarks: Gandhi's grandson resigns". थोडक्यात वृत्तांत असा आहे की अरूण मणीलाल गांधी यांनी स्वत:च चालू केलेल्या "एम के गांधी इन्स्टीट्यूट फॉर नॉन व्हॉयलन्स" या १७ वर्षे जुन्या संस्थेतून त्यांनाच राजीनामा दिला. कारण असे झाले की, "वॉशिंग्टन पोस्ट"च्या "ऑन फेथ" या ब्लॉगमधे "Jewish Identity Can't Depend on Violence". त्यातील सुरवात खाली लिहीतो, संपूर्ण लेख दुव्यावर वाचा
Jewish identity in the past has been locked into the holocaust experience -- a German burden that the Jews have not been able to shed. It is a very good example of a community can overplay a historic experience to the point that it begins to repulse friends. The holocaust was the result of the warped mind of an individual who was able to influence his followers into doing something dreadful. But, it seems to me the Jews today not only want the Germans to feel guilty but the whole world must regret what happened to the Jews. The world did feel sorry for the episode but when an individual or a nation refuses to forgive and move on the regret turns into anger.
बाकी सर्व ब्लॉग वाचून तमाम ज्यूंचे असे म्हणणे पडले की त्यात प्रत्येक ज्यूच्या हृदयात हिंसा आहे असे लेखकाला (अरूण गांधींना) म्हणायचे आहे. बरीच टिका झाली. वॉशिंग्टन पोस्टने आणि स्वतः अरूण गांधींनी माफी मागितली आणि नंतर स्वतःच चालू केलेल्या सेवाभावी संस्थेतून राजीनामाही दिला...
हा सर्व प्रकार बघताना आणि त्यावर नंतर नीट शोध घेताना काही गोष्टी जाणवल्या /प्रश्न पडले ज्या / जे मी उपक्रमींच्या नजरेसमोर आणून् देतो आणि आपल्याला हे सर्व पाहून काय वाटते ते या चर्चेसंदर्भातील प्रतिसादात व्यक्त करावे अशी विनंती करतो:
- अरूण गांधींचे उपरोल्लेखीत लेखन वाचून जास्तीत जास्त धोरणात्मक चुकीने (पॉलीटीकली इनकरेक्ट) वाटावे असे लिहीले आहे. तरी देखील विचार स्वातंत्र्याचा अतिरेक असलेल्या या देशात, एखाद्या व्यक्तिने स्वतःचे विचार मांडले तर त्याला विचारांनी तोंड देण्या ऐवजी इतकी प्रखरता कशी काय? बरं वॉशिंग्टन पोस्ट सारखे वर्तमान पत्र त्यावर माफी कसे काय मागते? स्वतःच्याच संस्थेतून राजीनामा देण्याइतका हा मोठा गुन्हा आहे का? यात विचार स्वातंत्र्य् टिकले आहे का? का अरूण गांधींच्या हातून घोर पातक घडले असे आपल्याला वाटते आणि जे काही नंतर घडले त्यात काही चूक नाही असे?
- गुगल न्यूजमधे या बातमीचा शोध घेतला तेंव्हा काय जाणवले की ही एक रीडीफ सोडल्यास कुठल्याच भारतीय वृत्तपत्राने "कव्हर" केलेली नाही. एरव्ही अरूण गांधींच्या नावाने उदो उदो झालेला असताना या बाबतीत चिडीचूप का? कुठलीच बाजू कशी घेत नाहीत?
- वॉशिंग्टन पोस्ट पासून ते युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर, जेथे त्यांच्या संस्थेचे अस्तित्व आहे तिथपर्यंत सर्वत्र त्यांची ओळख काय तर गांधीजींचे पाचवे नातू. हे काय त्यांचे कमवलेले "क्वालीफिकेशन" आहे का? त्यामुळे कुठल्याही विषयावर बोलण्याचा त्यांना हक्क होतो का? (हा जनरल प्रश्न आहे, त्यांचे विचार स्वातंत्र्य मला मान्य आहे. एखादा विचार आवडला नाही तर वाद घालायला आवडेल, पण स्वातंत्र्य घालवायला आवडणार नाही).
- आता याहूनही एक महत्वाचा प्रश्न - भारतीय म्हणून आणि जे कोणी स्वतःला कुठल्याही प्रकारचे हिंदू समजतात त्यांच्यासाठी: याच वॉशिंग्टन पोस्टच्या "ऑन फेथ" ब्लॉग मधे इतर सर्व धर्माचे लेखन हे त्या त्या धर्मीयांनी केले आहे आणि त्यात काही चूक नाही. अरूण गांधींचे वाचताना खाली "मोर ऑन हिंदू" असा दुवा येतो. जणू काही म्हणजे त्यांचे लेखन "हिंदू श्रद्धेवर (फेथ)" आहे. पण तसे काहीच नाही. मग केवळ ते स्वतःला हिंदू समजतात म्हणून का?
ह्याच भागात "हिंदू श्रद्धा/तत्वज्ञान" यावर लिहीलेय कोणी तर युनिव्हर्सीटी ऑफ शिकॅगो मधील प्राध्यापिका वेंडी डॉनीगर (Wendy Doniger) यांनी. या वेंडी बाईंनी अनेक दिवे स्वत:च्या हिंदू धर्माच्या "इंटरप्रिटेशन" बद्दल लावून झाले आहेत. त्यांनी इतरत्र काय लिहीले आहे ते वाचण्यासाठी (वेळ असल्यास!) इन्फिनिटी फाउंडेशनच्या राजीव म्हल्होत्रांचे "वेंडीज् चाईल्ड सिन्ड्रोम" वाचा, म्हणजे कळेल... पण या वेंडी बाईंचे त्यांच्या "वॉशिंग्टन पोस्ट वरील ऑन फेथ ब्लॉगवर" गोड गोड लिहीत हळूच काय लिहीले आहे त्याची खाली उर्धृत केलेल्या वाक्यांची झलक पहा:
When Hindus round up the usual suspects, there are several possible culprits, and Hinduism has embraced them all at one time or another, in one sect or another: god, the devil, fate, and it’s your own damn fault. Let’s consider them one by one.As for god, many of the Hindu gods create evil out of their own inadequacy; indeed, there are myths in which the god, stricken with the pollution that results from adultery or murder, is rescued by his human worshippers, who willingly take the sin upon themselves forever after in order to free the god to return to the divine work that is essential for human thriving. On the other hand, there are also myths in which unredeemed sinners (murderers, blasphemers, what have you) accidentally commit an act of worship (overhearing a sacred text being recited, or lighting a lamp only in order to rob a temple, or blasphemously calling out the name of god when they trip and fall down), and are saved at their death by this one unconsciously pious act. And then there is the argument of plenitude: the gods at the time of creation realize that, in order for the universe to be perfect, it must have everything in it, and that must include the deaths of children, the suffering of the innocent, and all the rest.
कुठल्याही गोष्टी विनासंदर्भ (आउट ऑफ कॉन्टेक्स्ट) देयच्या.... विचार करा असे काही ज्यूंच्या, ख्रिश्चनांच्या, मुस्लीमांच्या संदर्भात त्या धर्माची नसून या बाईने लिहीले असते तर काय झाले असते...असे कोणी म्हणू शकेल की काय बिघडले? त्यानी काय फरक पडतोय? आणि ते काही अंशी खरे देखील आहे. हिंदू असल्यामुळे आणि तसेच अमेरिकेत जास्त राहील्यामुळे असेल कदाचीत पण असले विचारस्वातंत्र्य देखील आणि त्याला विरोध करणे मला मान्य आहे. पण ह्याच गोष्टी जेंव्हा पुस्तक म्हणून छापल्या जातात, ते ही या उदाहरणात, युनिव्हर्सीटी ऑफ शिकॅगोच्या प्राध्यापिकेकडून आणि ते देखील कुणाचाच विरोध म्हणून नाही तर वैचारीक स्वातंत्र्याचा मान राखत पण सभ्यतेने वादविवादही न करता, तेंव्हा त्याच पुस्तकाचा पुढे "स्कॉलरली" संदर्भ होतो, ज्याच्या चष्म्यातून उद्या आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना पाहीले जाते, एक वेगळीच ओळख, जे आपण कदाचीत नसू देखील, तशी जगापुढे होते...तुम्हाला या बाबत काय वाटते?
लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.लिखाणात १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
Comments
थोडा खुलासा
४. आता याहूनही एक महत्वाचा प्रश्न - भारतीय म्हणून आणि जे कोणी स्वतःला कुठल्याही प्रकारचे हिंदू समजतात त्यांच्यासाठी: याच वॉशिंग्टन पोस्टच्या "ऑन फेथ" ब्लॉग मधे इतर सर्व धर्माचे लेखन हे त्या त्या धर्मीयांनी केले आहे आणि त्यात काही चूक नाही. अरूण गांधींचे वाचताना खाली "मोर ऑन हिंदू" असा दुवा येतो. जणू काही म्हणजे त्यांचे लेखन "हिंदू श्रद्धेवर (फेथ)" आहे. पण तसे काहीच नाही. मग केवळ ते स्वतःला हिंदू समजतात म्हणून का?
विकासराव, तुमचा थोडा गैरसमज होतोय. असे दिसतेय की त्या संकेतस्थळावर कुठलाही लेखक बघा तो लेखक ज्या धर्माचा आहे त्याच्या धर्माचा दुवा येतो त्या लेखकाचा लेखा खाली.
उदा. ह्याच संकेत स्थळावर Abdulaziz A. Sachedina (इस्लाम धर्माचे लेखक) त्यांचा हा लेख बघा व लेखाच्या शेवटी दुवा बघा "मोर पोस्ट अबाउट इस्लाम" तसेच "मोर पोस्ट अबाउट बुद्धीस्ट, ख्रिश्चन....
आता तसे "मोर पोस्ट अबाउट हिंदू " असे लिहायला हरकत नाही. :-)
पण ठीक आहे ना? जास्त गडबड वाटत नाही.
छे
असल्या गोष्टीवरून राजिनामा कशाला द्यायचा?
हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल/असावा.
आणि या ज्युं ना जरा खुट्ट झालं की लगेच धर्म बुडण्याची उबळच येते आणि त्यांच्या भावना दुखावल्या जातात. मुसलमानांपेक्षा ते आजिबातच वेगळे नाहीयेत.
त्यापेक्षा या मुळमूळीत गांध्याने जरा कणखरपणा दाखवून द्यायला हवा होता. झाला वाद तर झाला. घेवू पाहून च्यायला!
पण तो पडला गांधी... काही पटेल किंवा सावरकर नव्हे!
त्यामुळे यापेक्षा वेगळी अपेक्षा आपण करणे गैर आहे. नशीब झालेल्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून तो कोणत्यातरी सिनेगॉगात जावून चपला सांभाळत बसत नाहीये!
बाकी त्या वेंडीला मात्र धरून एकदा चापटाळायला पाहीजे हे मात्र खरे! ते भांडारकर इंस्टीट्युटवर हल्ला करणारे भाडोत्री कुठे गेले आता केळे खायला?
आपला
गुंडोपंत
धार्मिक आणि भाषण/लेखन स्वातंत्र्य
असे काही वाचल्यानंतर वाटते की धार्मिक आणि भाषण-लेखन स्वातंत्र्य फक्त भारतातच आहे. ब्राम्हणांनी क्षत्रियांवर आणि शूद्रांवर केलेल्या, जर्मनांच्या पासंगालाही पुरणार नाहीत अशा, अत्याचारांचे नगारे गेली शंभर वर्षे वाजवले जात आहेत आणि ते तसेच अजूनही काही शतके वाजवू देण्याचे स्वातंत्र्य भारतीयांना आहे, हे आपले परमभाग्य आहे. याचा उल्लेख कुणाच्या लिखाणात आलाच, तर मला नाही वाटत, त्याला राजीनामा द्यावा लागेल.--वाचक्नवी
एक शक्यता
ब्राम्हणांनी क्षत्रियांवर आणि शूद्रांवर केलेल्या, जर्मनांच्या पासंगालाही पुरणार नाहीत अशा, अत्याचारांचे नगारे गेली शंभर वर्षे वाजवले जात आहेत आणि ते तसेच अजूनही काही शतके वाजवू देण्याचे स्वातंत्र्य भारतीयांना आहे, हे आपले परमभाग्य आहे.
या भारतीय नगार्यांमधून ब्राह्मणांविषयी जे काही वाजवले जात आहे त्यावरून हिटलरचीही काहीतरी बाजू असली पाहिजे व त्याच्या क्रौर्याच्या कथांमध्ये बराचशी अतिशयोक्ति असली पाहिजे अशी शंका येते.
हे तर इथे पण होतं
२ आठवड्यांपुर्वी एका निवेदिकेला "गोल्फ चॅनल" वरून फायर करण्यात आलं का तर तिने टायगर वूड बद्द्ल "lynch him in a back alley" असा उल्लेख केला.
खुद्द टायगरने (जो स्वःत ब्लॅक आहे) त्याच्यावर अजिबात आक्षेप् घेतला नाही आणि अतिशय ह्. घे. ती निवेदिका त्याची चांगली मैत्रिण होती.
पण एका ब्लॅक पुढार्याने त्याचा फार गाजावाजा केला आणि विनाकारण तिला तिची नोकरी सोडावी लागली.
हे म्हणजे स्वःताची जुनी जखम भरत आलेली असताना उगाच काहितरी निमित्ताने तिला टोकरायचं आणि लक्ष वेधून् घ्यायचं.
मला अ.गांधीचं लिखाण पटलं. ज्युं नी पण क्षमा केली पाहिजे. इतर जग किती दिवस अपराधी भावनेने जगत राहील?
पटले!
इतर जग किती दिवस अपराधी भावनेने जगत राहील?
पटले. आपण नाही इंग्रजांना क्षमा केली? रामाने रावणाला केली तशी! जपान्यांनी अमेरिकेला ऍटम बॉम्ब टाकल्याबाद्दल माफी मागायला लावून क्षमा केली. तसे ज्यूंनी करायला काही हरकत नाही. एका माणसाचे अपराध किती दिवस उगाळायचे?
पण पुष्कळदा काय असते तर तो सबंध समाज त्या एकाच घटनेचे भांडवल करून जगत असतो. येशूला वधस्तंभावर चढवले नसते आणि त्याचे पुनरुत्थान झाले नसते तर ख्रिश्चन धर्म टिकला असता? बाबरी मशीद पाडली नसती तर तथाकथित 'धर्मनिरपेक्ष' पक्ष तरले असते? कुठल्याही वेगळ्या विचारसरणीच्या माणसाला तो आय. एस. आय., आर. एस. एस. वगैरेचा चा हस्तक किंवा मूलतत्त्ववादी आहे असे म्हणून त्याचे तोंड बंद करायची आपली सेक्युलर संस्कृती आहे. काही नाही जमले तर त्याची कामकाजाची पद्धत आम्हाला आवडत नाही असे म्हणून एखाद्या अधिकार्याची बदली करायला लावायची किंवा त्याला राजीनामा द्यायला लावायचा ही आपली राजकीय विकृत प्रवृत्ती आहे. --वाचक्नवी