जगातील सर्वोत्कृष्ठ १०० चित्रपट

काही वर्षांपूर्वी "Time Magazine"ने जगातील सर्वोत्कृष्ठ १०० चित्रपटांची सूची जाहीर केली अशी बातमी वाचली. त्यामध्ये भारतीय चित्रपटांपैकी फक्त प्यासा आहे असे वाचल्याचे आठवते. काही अधिक माहिती मिळेल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

अपू ट्रिलॉजी

टाइम मासिकाच्या यादीत सत्यजित रे यांच्या अपू ट्रिलॉजीचाही (पाथेर पांचाली, अपराजितो, ओपूर शंशार) समावेश होता.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

शिवाय

मणिरत्नमचा नायकन पण दिसतोय :),.. यादी बद्दल् आभार.. रहिलेले बघायच्या लिस्ट मधे टाकतो ;)

-ऋषिकेश

खरे तर

खरे तर १०० हा आकडा फारच कमी वाटतो त्यामुळे बर्‍याच सुंदर चित्रपटांना यातून वगळावे लागले आहे.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

अशाच काही याद्या...

अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटची यादी येथे, तर ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटची यादी येथे पाहता येईल. आय. एम. डी. बी.च्या यादीपेक्षा (ज्या वाचकांच्या मतांप्रमाणे ठरत असल्याने काही अनपेक्षित चित्रपटही वरच्या क्रमांकावर येतात), या अधिक विश्वासार्ह वाटतात.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

माझं मत..

माझ्या मते ज्या यादीत 'गोलमाल' हे नांव नाही ती जगातील सर्वोत्कृष्ठ १०० चित्रपटांची यादी असूच शकत नाही! मला व्यक्तिश: या बाबतीत टाईम मॅगझिनची कीव कराविशी वाटते!

धन्यवाद!

आपला,
(उत्पल दत्त प्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर