उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
उपक्रमची तबकडी
भास्कर केन्डे
January 12, 2008 - 3:54 am
उपक्रमवर बरेच चांगले लेखन होत आहे. परंतू उपक्रमचा विदाशय (डाटाबेस) जर खूप मोठा नसेल तर काही दिवसांनी येथील लेखन कुठेतरी हलवले जाईल अथवा बॅक-अप (मराठी शब्द?) जर जाळाला न जोडलेले (ऑफलाईन) ठेवले गेले तर आपणाला दिसणार सुद्धा नाही. मनोगतवरच्या २००५ च्या लेखनाची कोणीतरी तबकडी केल्याचे आठवते. पण ती मला मिळाली नाही. त्यावर माझे तसेच मला हवे असलेले इतर असे खूप लेखण मला अद्याप मिळू शकलेले नाही. कोणी मिळवून दिले तर आभारी राहीन. तसेच गुगलवर ठेवलेले मनोगतचे संचित पण अता सापडत नाहिये. (ते सुद्धा कोणाला माहित असल्यास सांगावे).
आता पुन्हा उपक्रमवरील लेखनाची सुद्धा तीच वेळ येणार नाही याची खबरदारी म्हणून येथल्या साहित्याची तबकडी मिळवावी म्हणतो. आहे का कोणाकडे? अथवा ती कशी करावी यावर कोणी मार्गदर्शन करील काय?
दुवे:
Comments
खरे आहे
१) जसे काही संगीत संकेस्थळावर आपल्या हव्या तश्या गाण्यांच्या प्लेलिस्ट करता येतात. तसे इथे काही चर्चा विषय, लेख एका फोल्डर(पोतडीत??) मधे साठवता येतील का?
२) तसेच असे काही प्लग-इन आहे का की ठरावीक मुदतीचा विदा आपल्या संगणकावर उतरवून घेता येईल व इथे जसे न्याहळकातुन बघू शकतो तसे आपल्या संगणकावर (ऑफलाईन) बघता येइल.
३) "निवडक २००७" असा एखादा संच/फोल्डर (ऑनलाईन) बनवता येइल का? (तसेच पुढे दरवर्षी)
असे केले तर?
लेख इतरत्र हलवण्यापेक्षा संकेतस्थळाच्या स्मरणशक्तीमध्ये( मेमरी किंवा वेबस्पेस) वाढ केल्यास उत्तम.याकरीता लागणारा अतिरीक्त अर्थपुरवठा देणग्यांद्वारे गोळा करता येऊ शकतो.(विकीप्रमाणे)
इतर मार्ग असल्यास सुचवावा.
प्रतिसाद
स्वतंत्र लेख/ कविता ह्या बरोबरच काही 'प्रतिसाद' सुद्धा बर्याचदा रंजक असतात. विदागाराला अपघात वगैरे गोष्टी घडतात तेव्हा सगळ्यात मोठा बळी जातो तो ह्या प्रतिसादरुपी लेखनाचा. मूळ लेख/कविता/साहित्य आजकाल बहुतेक सर्वजणच आपापल्या ब्लॉग्ज् वर साठवून ठेवत असल्याने इथून गेले तरी तिथे उपलब्ध असते पण आलेले प्रतिसाद मात्र कायमचेच जातात. त्यासाठी काही उपाय योजना करता येऊ शकते का?
सहमत
कोलबेर यांच्याशी सहमत...अनेकदा मुख्य लेखापेक्षा प्रतिसाद अधिक रंजक व माहितीपुर्ण असतात.या अशा माहितीचा साठा करण्याकरीता अतिरीक्त स्मरणशक्तीची गरज आहे किंवा फिडद्वारे मुख्य लेखाबरोबरच प्रतिसादही साठवून ठेवता येईल अशी सोय हवी.ब्लॉगर मधील ब्लॉगकरीता अशा प्रकारची सोय उपलब्ध आहे.याप्रमाणेच उपक्रम मधे अशी सोय उपलब्ध व्हायला हवी.
(प्रयोगशील) -इनोबा
सोपे उपाय
>> गुगलवर ठेवलेले मनोगतचे संचित पण अता सापडत नाहिये.
गुगलवरील संचित हे काही ठराविक काळापुरतेच उपलब्ध असते. त्यावर अवलंबून राहू नये. एखादेच पान साठवून ठेवायचे असेल तर टू रीड सारखी सेवा वापरावी.
http://toread.cc
>> येथल्या साहित्याची तबकडी मिळवावी म्हणतो.
त्यासाठी एच टी ट्रेक सारखी सुविधा वापरावी. हे सॉफ्टवेअर येथून उतरवून घ्यावे.
http://tinyurl.com/4glea
>> आहे का कोणाकडे?
मी उपक्रमाचे उदाहरण येथे उपलब्ध करून दिले आहे.
http://saraswaticlasses.net/manogat/upakram.zip
>> अथवा ती कशी करावी यावर कोणी मार्गदर्शन करील काय?
अधिक माहिती येथे वाचा.
http://tinyurl.com/2vvo74
धन्यवाद आणि विस्टा
वा वा वा! शंतनु तुम्ही लई झ्याक माहिती दिलीत :) अतिशय धन्यवाद!!
एक शंका: यात कोणत्याही इएक्सइ च्या डिस्क्रिप्शन मधे विस्टालिहिलेले नाहि. तर विस्टा असल्यास कोणते वेगळे वर्जन आहे काय?
बेष्ट!
बेष्ट!!!
आपला
गुंडोपंत
फायरफॉक्सचे स्क्रेपबुक एक्स्टिंशन
>>> येथल्या साहित्याची तबकडी मिळवावी म्हणतो.
>> त्यासाठी एच टी ट्रेक सारखी सुविधा वापरावी. हे सॉफ्टवेअर येथून उतरवून घ्यावे.
आता तर हे अधिकच सुलभ झाले आहे. फायरफॉक्सचे स्क्रेपबुक हे एक्स्टिंशन वापरून हे सर्व करता येते.
टुल्स मेन्युजवळ स्क्रेपबुक म्हणून जो नवीन मेनू दिसू लागेल त्यात "कॅप्चर पेज ऍज" असा पर्याय निवडावा व किती पाने उतरवून घ्यायची आहेत त्याची "डेप्थ" द्यावी.