डृपलसंबंधी मदत हवी आहे

मी एक संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहिलेले संकेतस्थळ बनवू इच्छीत आहे.त्यासाठी डोमेन व वेबस्पेस ही घेतली आहे.मी हे संकेतस्थळ डृपल या प्रणालीचा वापर करुन बनवत आहे पण मला पीएचपीचे अथवा डृपलचे फारसे ज्ञान नाही यामुळे काहि अडचणी येत आहेत.आपण काही मदत करु शकत असल्यास मला विरोपाद्वारे अथवा याच चर्चासत्रात प्रतिसाद द्या.
शिवाय डृपलचा वापर कसा करावा या करीता संपुर्णपणे मराठीत असलेले संकेतस्थळ बनवण्याचा मानस आहे.इच्छूकांनी संपर्क साधावा.

प्रमुख अडचणी:
१)गमभन टंकलेखन प्रणालीचा वापर कसा करावा?
२)साधी व सुबक थीम कशी बनवता येईल(मिसळपाव.कॉम सारखी)
३)डृपल मराठीकरण(पीओ फाईल)
४)मराठी फॉन्टला मदत करणारा WYSIWYG editor कसा बनवावा?(मिसळपाव किंवा उपक्रम प्रमाणे)

विरोपाचा पत्ता: vinayak.anivase(at)yahoo(dot)com

लेखनविषय: दुवे:

Comments

संपर्क करा !!!

विनायकराव,
उपक्रमवर तर माहिती मिळेलच पण आमचे आणि आपले मित्र तात्या, अधिक माहिती देऊ शकतील असे वाटते. किंवा नीलकांत संस्थळाची निर्मिती करण्यात तरबेज आहे. म्हणजे तज्न आहे तेव्हा त्यांची मदत होऊ शकेल असे वाटते.
आपण मराठी संकेतस्थळ काढत आहात तेव्हा आश्चर्य आणि आनंद वाटत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.

डॉक्टरसाहेब आपल्याला आश्चर्य वाटावे हेच तर आमचे दूर्दैव आहे.आमच्या मनाचा थांग आम्ही कुणाला लागू देत नाही हीच आमची चूक.

बाकी तात्यांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी निलकांतचे नाव सुचवले,निलकांत मदत करण्यास तयार आहे पण मला वाटते तो सध्या कामात व्यस्त असावा.मी माझा भ्रमणध्वनी क्र. त्याला देऊन् ठेवला आहे,शिवाय आम्ही दोघेही पुण्याचे असल्याने प्रत्यक्ष भेटून अडचणी सोडवता येतील,पण अजूनही बरेचसे लोक असे आहेत ज्यांना या प्रकारच्या मदतीची गरज आहे त्यांनाही या निमित्ताने मदत मिळेल.

(मराठीप्रेमी) -इनोबा

अभिनंदन

अभिनंदन विनायकराव!

वेगवेगळ्या विषयावरच्या चांगल्या मराठी संकेतस्थळांची गरज आज आहे. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

बाकी व्य. नि. पाठवत आहे.

आपला,
(आनंदी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

धन्यवाद!

तुमचा विरोप मिळाला...प्रतिसाद पाठवला आहे.धन्यवाद!

शुभेच्छा !!

नवीन संकेतस्थळासाठी शुभेच्छा!!

मी स्वतः डृपलतज्ञ नसल्यामुळे त्याबाबतीत माझी मदत शून्य!

शुभेच्छा अमूल्य आहेत

सुन्या...शुभेच्छा अमूल्य आहेत.
शून्याला स्वतःची किंमत नसली तरी तो ज्या संख्येत मिसळतो त्या संख्येची किंमत वाढवतो,हे लक्षात ठेव.

(डिजीटल) -इनोबा

संगणकाची माहिती मराठीत

आजच निलकांतचा माझ्या ऑर्कुट खात्यावर निरोप आला,मराठीतून संगणक आणि संगणक प्रणालींविषयीची माहिती देण्यार्‍या संस्थळाची निर्मीती करण्याची त्याचीही इच्छा आहे.मिसळपाव डॉट कॉम या संस्थळाची डेव्हलपमेंट(मराठी शब्द?) निलकांत यानेच केलेली आहे.
आपल्यापैकी कोणाची अशा प्रकारच्या कामात योगदान करायची इच्छा असल्यास संपर्क करावा.

(ज्ञानोपासक) -इनोबा

शुभेच्छा

केशव
विनायकराव,
तुमच्या सन्केत स्थळ निर्मिती प्रकल्पाला माझ्या हार्दिक शुभेच्छा ! बघतो काही मदत करता आली तर.
केशव.

डृपलसंबंधी माहिती

या संदर्भात आपणास येथे माहिती मिळेल से वाटते.
येथे खाली क्लिक करा.

डृपलसंबंधीच्या माहिती करिता येथे क्लिक करा

धन्यवाद!

तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!...पण युनिसरस्वती टंकलेखक आणि मराठी भाषांतर माझ्याकडे आहे.मला गमभन टंकलेखक कसा वापरावा व थीम(मराठी शब्द?) कशी बनवावी याबद्दल माहिती हवी आहे.थीम बद्दलची माहितीपुस्तीका डृपलवर उपलब्ध आहे पण ती खुपच त्रोटक वाटली.

 
^ वर