मृत्युदंड रद्द करावा काय?

जागतिक पातळीवर न्यायप्रक्रियेंत मृत्युदंड रद्द करावा म्हणून काही विचारवंतांचे प्रयत्न चालू आहेत व आपल्याकडील काही विचारवंतही तसा प्रयत्न करीत आहेत हे आपणांस ठाऊक असेलच. तो का रद्द करावा यासाठी खालील कारणे दिली जातात.

 • १) शिक्षा अमलांत आणल्यावर एखाद्या आरोपीला चुकून मृत्युदंड दिला गेल्याचे आढळून आल्यास ती चूक सुधारणे नंतर शक्य होत नाही.
 • २) आरोपीला मृत्युदंड देऊन त्याने ज्या व्यक्तीची हत्त्या केलेली असते ती व्यक्ति परत येत नाही.
 • ३) मृत्युदंडाची तरतूद असून व तो देऊनसुद्धा मनुष्यहत्त्येच्या गुन्ह्यांत घट झालेली आढळत नाही. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर मृत्युदंड असूनही सदोष मनुष्यहत्त्यांचे प्रमाण कमी होत नाही.
 • वरील मुद्द्यांचा प्रतिवाद खालीलप्रमाणे करता येईल.

  मुद्दा क्रमांक (१)
  आरोपीच्या मृत्युदंडावर अखेरचे शिक्कामोर्तब होण्यापूर्वी तिच्या अनिवार्यतेविषयी सर्व अंगांनी खात्री केली जाते. आरोपीला आपली बाजू मांडण्याची अनेक वेळा संधि मिळते. असे असतांना मृत्युदंड देण्यांत चूक होण्याची शक्यता कितपत आहे?

  मुद्दा क्रमांक (२)
  आरोपीला मृत्युदंड देऊन ज्या व्यक्तीच्या बाबतींत गुन्हा घडलेला असतो ती मृत व्यक्ति परत येत नाही हे खरे असले तरी समाजांत योग्य तो संदेश पसरून संभाव्य गुन्हेगारांना जरब बसते.

  मुद्दा क्रमांक (३)
  मृत्युदंड गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने परिणामकारक ठरत नाही याचे मुख्य कारण म्हणजे त्या तरतुदीचा वापर पुरेशा प्रमाणांत होत नाही.

  त्याशिवाय मृत्युदंड रद्द करण्याचे औदार्य दाखवण्याइतके आपण अजूनही एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्थिरावलेलो नाही. नवोदित राष्ट्राच्या आयुष्यांत (स्थिरस्थावर व्हायला) साठ वर्षांचा काळ म्हणजे काहीच नाही. त्यांतही दहशतवाद्यांचे व शत्रुराष्ट्रांचे आपल्याला अस्थिर करण्याचे प्रयत्न अविरत चालू आहेत. त्यांत नेतेमंडळीच नाही तर हजारोंच्या संख्येने निष्पाप नागरिकही जिवानिशी मारले जात आहेत. अशा परिस्थितींत दहशतवाद्यांना व या देशांतील त्यांच्या साथीदारांना जरब बसवण्याचा व राष्ट्रविघातक कारवायांपासून परावृत्त करण्याचा मृत्युदंड हाच एक मार्ग आहे व तो रद्द केल्यास राष्ट्र म्हणून आपले अस्तित्वच धोक्यांत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत्युदंड रद्द करण्याचा विचार आपल्याला अजून कमीतकमी शंभर वर्षे तरी करता येणार नाही.

  आपणास काय वाटते?

  लेखनविषय: दुवे:

  Comments

  मृत्युदण्ड

  कोरडे साहेब,
  शेवटचा पैरा अगदी माझ्या मनातलं बोललांत... माझे मत मृत्युदण्ड समाप्त करण्याच्या विरोधात आहे...
  http://sureshchiplunkar.blogspot.com

  तरतुद असावी

  मृत्युदंडाची तरतुद असणे आणि त्याचा वापर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या मते मृत्युदंडाची तरतुद ही असावीच असावी. आणि सध्या जसे केवळ "रेअरेस्ट ऑफ रेअर्" केस मधे म्रूत्युदंड ठोठावला जातो ते योग्य वाटते

  +१

  +१

  मरेपर्यंत फाशी

  मरे पर्यंत फाशी. यातील मरेपर्यंत या शब्दाचे मह्त्व कुठला तरी कैदी फाशी दिले तरी मेला नव्हत्ता. फाशी देणे ही तांत्रिक क्रिया फक्त केली होती. त्याचा फायदा वकीला ने घेतला व त्याला वाचवला अशी ऐकीव हकिगत आहे. त्यानंतर मरेपर्यंत हा शब्दाची तरतूद झाली असे म्हणतात. यात खरे किति खोटे किती माहीत नाही.
  असेही काही लोक असतील की मृत्युदंड हा दंड नसून मान्यता प्राप्त सुविधा आहे असे मानणारा. इष्टापत्ती. हाराकिरी, मानवी बाँब या गोष्टी काय दर्शवतात?

  प्रकाश घाटपांडे

  मरेपर्यंत फाशी - एक प्रसंग

  कुठेतरी वाचलेला प्रसंग या शब्दप्रयोगातून आठवला तो असा

  रशियात राजसत्तेविरुद्ध लढा सुरू असताना राजाच्या सेवकांनी विरोधकांच्या एका महत्त्वाच्या माणसाला पकडले. तपासणीनंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशी देताना सुदैवाने दोर तुटल्याने तो बचावला. अशी घटना घडल्यास अश्या व्यक्तीस ईश्वरी संरक्षण आहे त्याला मारू नये असा लोकांत प्रवाद होता. असा प्रसंग घडल्याचे जेंव्हा राजाच्या सेवकांनी राजास सांगितले तेंव्हा त्याला सोडून द्यावे लागणार हे जाणून राजाचा साहजिकच अपेक्षाभंग झाला. पण राजाने विचारले, असे झाल्यावर तो काय म्हणाला? तेंव्हा "बघा, या लोकांना एक साधा दोरही बनवता येत नाही" हे आरोपीने लोकांना उद्देशून म्हटलेले वाक्य सेवकांनी राजाला सांगितले. दुसर्‍या दिवशी त्याच्या विधानाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याच्या निमित्ताने त्याला पुन्हा फाशी दिली! यावेळी मात्र त्याला दैवाने हात दिला नाही.

  आपला
  (स्मरणशील) वासुदेव

  ~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
  "असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

  हेच म्हणतो

  तरतूद असायलाच हवी. त्याने कायद्याचा जरब बसेल. मात्र शि़क्षा देताना "रेअरेस्ट ऑफ रेअर्"आसा भयंकर गुन्हा असेल तरच ती दिली जावी.

  कोर्डे साहेबांच्या या चांगल्या विषयावर वेळात वेळ काढून प्रतिसाद टाकला होता. कुठे गेला कळत नाही. उपक्रमरावांनी उडवण्याजोगे सुद्धा त्यात काही अ़क्षेपार्ह काही नव्हते. काही कळत नाय बॉ!
  आठवले, अफजल गुरुच्या शिक्षेबद्दल लिहिले होते. मग तेवढी एक ओळच का नाही उडवली? त्या अपराधाबद्दल सरळ प्रतिसादालाच "फाशी"?

  आपला,
  (चक्रावलेला) भास्कर
  आम्ही येथे वसतो.

  मलाही असेच वाटते

  आसपास घडत असलेल्या काही गुन्ह्यांचे स्वरुप इतके भेसूर आहे की ते करणार्‍या व्यक्तींना समाजातून नाहीसे करणे हेच योग्य आहे असे वाटते. मृत्यूदंडाची अंमलबजावणी पुरेशा प्रमाणात (?) होत नाही म्हणून समाजातल्या गुन्हेगारांना त्याची जरब बसत नाही, हे पटते.
  सन्जोप राव

  डेथ वॉच

   
  ^ वर