उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
वाऱ्यावरती घेत लकेरी - या गाण्याबद्द्ल माहिती हवी आहे
कल्याणी_कुलकर्णी
January 4, 2008 - 1:59 pm
वाऱ्यावरती घेत लकेरी
गात चालल्या जललहरी
हे गाणे कुठल्या सीडीवर/ कॅसेटवर उपलब्ध असेल तर त्याबद्द्ल सांगा. हे गाणे मी बऱ्याच वर्षांपूर्वी रेडिओवर ऐकले होते. गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायिका अनुक्रमे रमेश अणावकर, दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर आहेत.
दुवे:
Comments
माहिती
हे गाणे माझ्याकडे आहे. पुण्यात अलूरकर म्युझिक हाउस यांच्याकडून रेकॉर्ड करून मिळाले होते. मी सध्या पुण्यात नसल्याने आपल्याला लगेच देऊ शकत नाही.जुलै नंतर ईमेल ने पाठवू शकेन.
------------------------------------------------
कृपया खिडकीतून पत्रं टाकू नयेत.आमटीत पडतात.चव बिघडते.
धन्यवाद
माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद. आलूरकरांकडे चौकशी करून गाणे मिळते का बघेन नाहितर तुम्हाला माझा ईमेल कळवेन. पुन्हा एकदा धन्यवाद.
सही आवडली
मनिमाऊंची सही झकास वाटली . काय म्हणता मंडळी ! :-)
+१
फक्कड आहे ;)
सही सही आहेच...
कृपया खिडकीतून पत्रं टाकू नयेत.आमटीत पडतात.चव बिघडते.
माझा सल्ला - खिडकीखाली बसून जेवू नये !!
या वरून आठवलेला एक (फालतू) विनोद -
एक बाई आणि कॉल सेंटर मधील तंत्रज्ञ यांतील संवाद -
बाई : माझ्या कॉम्पुटर वरून मी प्रिन्ट-आऊट काढू शकत नाही.
तंत्रज्ञ : Are you working under Windows ?
बाई : नाही नाही. माझे टेबल दरवाज्याजवळ आहे. पण तुम्ही म्हणता ते खरे आहे. तो सोम्या खिडकीखाली बसतो आणि तो प्रिन्ट-आऊट काढू शकतो!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
इथे
हे गाणे इथे आहे.