२००७ - तुम्हाला काय आठवतेय?

नमस्कार,

२००७ साल संपायला आता आठवड्याहून कमी वेळ उरला आहे. त्यामुळे दरवर्षी सर्व माध्यमात पार पाडणारी औपचारीकता आपण येथे पण पार पाडू. फरक इतकाच आहे की प्रसिद्धी माध्यमे त्यांना हव्या असलेल्या गोष्टींचे सिंहवलोकन करतात येथे आपल्याला आठवतात त्या आणि सांगाव्याशा वाटणार्‍या गोष्टींचे सिंहावलोकन करूया. राजकीय, सामाजीक, आर्थीक,उद्योगधंद्यातील, शास्त्रीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आणि काही विशेष सांगण्याजोग्या असल्यास व्यक्तिगतही....अशा कुठल्याही घटना - २००७ सालातील येथे सांगूया.

मी सुरवात करत आहे - जशा आठवतील तशा - कालानुरूप अथवा विशेष महत्वानुसार क्रमवारी न करता खाली काही घटना लिहीत आहे. आपण पण यात भर घाला अशी विनंती!

  1. भारतात बरीच प्रसिद्धी मिळालेली आणि अमेरीकेतपण बर्‍यापैकी प्रसिद्धीस पावलेली - सुनीता विल्यम्स आणि तिचे लांबलेले आणि यशस्वी झालेले अंतराळभ्रमण
  2. गोर आणि आयपीसीसीच्या वतीने राजेंद्र पचौरींना मिळालेला नोबेल शांतता पुरस्कार आणि त्या अनुषंगाने परत ऐरणीवर आलेला वातावरण बदलाचा विषय.
  3. अमेरिकेत तुर्तास ढासळलेली अर्थव्यवस्था आणि काही अंशी फुटलेला स्थावर मालमत्तेचा बुडबुडा
  4. भारताची सुदृढ होत असलेली (मी येथे "तुर्तास" म्हणू इच्छीत नाही!) अर्थव्यवस्था पण स्थावर मालमत्तेचा काळजी करावी असा अवाजवी फुगणारा फुगा
  5. काश्मिरमधे (निदान प्रसिद्धीसयेत नसल्यामुळे असेल पण) दिसत असलेली शांतता
  6. इराक मधे थोडीफार येत असलेली शांतता
  7. मध्यपूर्वेतपण इस्रायल-पॅलेस्टाईनमधे येत असलेली शांतता - बर्‍याच वर्षांनी बेथलहेम या ख्रिस्ताच्या जन्मगावी प्रवासी ख्रिसमसनिमित्ताने जाऊ शकले.
  8. रशियाने रोवलेला अंटार्टीकाच्या तळाशी झेंडा - ज्यात पुढील काही दशकांची चढाओढ (नैसर्गीक संपत्तीसाधनांसाठी) दिसत आहे.
  9. भारतातील दिडशहाण्या मेडीयाला चूक ठरवण्याचा मायावतीने रचलेला पाया आणि मोदींनी केलेला कळस
  10. महाराष्ट्रात मात्र - "लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार", अशीच कुठल्याही थोड्याफार जाणिवेने वागणार्‍या नागरीकास वाटणारी अवस्था....
लेखनविषय: दुवे:

Comments

भारतीय शेअर बाजार!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
विकासजी आपण नोंदवलेल्या जागतिक महत्वाच्या घटनांबरोबरच ह्या काही भारता विषयीच्या घटना
१) भारतीय शेअर बाजारात आलेली तेजी. मुंबई शेअर बाजाराच्या(बीएसई-सेन्सेक्स) सुचकांकाने २०००० चा टप्पा पार केला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या(एनएसई-निफ्टी) सुचकांकाने ६००० चा टप्पा पार केला.
२)पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात भीमसेनजींचे दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा गायन.
३)२०-२० च्या जागतिक क्रिकेट सामन्यात भारत अजिंक्य.

वैयक्तिक घटना: महाजालावरच्या माझ्या लेखांची शतकपूर्ती.

समान वैयक्तिक

उपक्रम व आपण एकत्र आलो. दिग्गज लोकांशी रोज होणारी भेट.

जागतीक अविस्मरणीय

२९ जुलै २००७ रोजी त्या खेळाडुंनी आपल्या देशवासीयांच्या आयुष्यात दुर्मीळ असा खराखुरा आनंदाचा क्षण आणला.

राह्यलेले अल्पस्वल्प

विकासराव आणि देवकाकानी जवळजवळ सर्व काही (माझ्या दृष्टीने ) महत्वाचे सांगितलेच. अजून काही अशा गोष्टी आठवतात ज्यांचा कुठेतरी व्यक्तिगत पातळीवर स्पर्श झालाय्.

-- श्री. पु. भागवत गेले. अगदी शेवटच्या काही आठवड्यांपर्यंत त्यांची प्रकृती चांगली राहिली होती. ज्या व्यक्तिला कधी पाहिले नव्हते आणि व्यक्तिगत ओळख होण्याची कसली शक्यता नव्हती तिच्या जाण्याने घरचे कुणीतरी गेल्यासारखे वाटले.

-- भारताची क्रिकेट विश्वचषकातली नामुष्की. मला आठवतेय् , आम्ही मित्र सामना पाहात होतो आणि भारताची नौकाडुबी चालली होती. "या दारुण पराभवाच्या निमित्ताने तरी इतर खेळांकडे लोकांचे आणि सरकारचे लक्ष जाईल" असा आशावाद मी व्यक्त केला आणि इतके जोडे खाल्ले !

-- पाकिस्तानातील आणिबाणी , राजकीय गोंधळ , हिंसाचाराचा आगडोंब , मुशर्रफ यांचा नवा चेहरा , त्यांचे नवनवे डाव.

नंदिग्राम

आम्हाला या गोष्टी आठवतात...

  1. नंदिग्राम
  2. कर्नाटकातले सत्तेचे खेळ
  3. कलामांना तोडीस तोड राष्ट्रपती पदाचा उमेदवार न मिळता एका मराठी स्त्रीला मिळालेला सोनियाचा आशिर्वाद...
  4. सचिनची बहरलेली खेळी
  5. पवारांची त्यांच्या मित्राला भेट
  6. पुणे मनपा मधले सत्तांतर आणि त्यासाठीचा जमलेला पुणे पॅटर्न जो अनेकांना सर्वत्र हवा आहे.




हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

पुणे पॅटर्न ?

कलमाडी वाईट पडले इतके माहित होते. हा "पुणे पॅटर्न " काय सांगाल का ?

मला एकच महत्वाची गोष्ट

मला आपल्यासारखे सुज्ञ, सजग, विवेकी, व्यवहारी, सुसंवादी उपक्रमी मित्र मिळाले . आभासी असूनही जिवंत वास्तवी वाटणारे मित्र मिळाले याला केवळ महाराष्ट्र पोलिस बिनतारी संदेश विभाग जबाबदार आहे. ( म्हणजे माझी अकाली स्वेच्छानिवृत्ती ) याची जाणीव मला २००७ ने करुन दिली. किरण बेदींची स्वेच्छानिवृत्ती आजच जवळची वाटली.(मंजूर झाल्यामुळे). तरीही किरण बेदींनी स्वेच्छानिवृत्ती घेउ नये असे मला मनापासून वाटते. दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदा पेक्षा पडद्यामागचे (साईड ब्रांच) संशोधन व विकास हे भविष्यकालीन दृष्ट्या , सामाजिक हिताचे व महत्वाचे वाटते. शेवटच्या दिवशी स्वेच्छानिवृत्ती मागे घेण्याची तरतूद आहे.
(स्वेच्छाप्रवृत्त)
प्रकाश घाटपांडे

बेनझीर भुत्तोंचा मृत्यू

२००७ च्या अखेरीस घडून आला हे ही आठवणीत राहिल.

धक्कादायक बातमी.

बेनझीर भुत्तोंचा मृत्यू
धक्कादायक बातमी, आठवणीत राहील अशीच.

+१

खरच धक्कादायक!

काळजी वाटावी अशि बातमी

बेन्झिरची हत्या ही जशी धक्कादायक बातमी आहे तशीच येणार्‍या वर्षासाठी, भारतासाठी काळजी करायला लावणारी बातमी आहे. आशा आहे की आपले राजकारणी आणि चाणक्यपुरीतील बाबू यावर गांभिर्याने आणि सक्रीय विचार करत असतील...

अपेक्षीत धक्का

वाईट वाटले. पण हा धक्का अपेक्षीत आहे. पाकिस्तानात हे असे होत राहणारच. आता फक्त पुढचा नंबर कोणाचा आणि अमेरिकेचा हल्ला कधी हेच काय ते पहायचे.





हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

हल्ला

अमेरिकेचा हल्ला कधी हेच काय ते पहायचे.
पुढची निदान दहा वर्षे तरी अमेरिकेने कुठल्याही देशावर हल्ला करू नये अशी (वेडी?) आशा बाळगावीशी वाटते.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

काळजी नसावी...

पुढची निदान दहा वर्षे तरी अमेरिकेने कुठल्याही देशावर हल्ला करू नये अशी (वेडी?) आशा बाळगावीशी वाटते.

पाकीस्तान तयार करण्याचे पितृत्व हे भारताचे आहे (कुणाला व्यक्तिगत नावे नाहीत सामाजीक - मानसीक वस्तुस्थिती इतक्याच अर्थाने) आणि हा प्रश्न भारताला घेऊनच सोडवावा लागेल. त्यामुळे जो पर्यंतर भारत कुठलीही प्रतिक्रीया देत नाही आणि जो पर्यंत भारत आणि चीन हे अशा अमेरीकन आक्रमणाला परवानगी देत नाही तो पर्यंत काही होणार नाही. याचा अर्थ मी पाकीस्तान हा भारताचा भाग व्हावा (पुन्हा अखंड भारत) असे म्हणत नाही आहे हे कृपया ल़क्षात घ्यावे! युद्ध ही केवळ एक शक्यता असते, बाकी बरेच प्रकार असू शकतात ज्यात अजिबात हिंसा न करून अथवा कमितकमी हिंसा करूनपण कुशल नेतृत्व गोष्टि घडवून आणू शकते. पण आज तसे नेतृत्व भारताकडे नाही असे वाटते.

सहमत

अमेरिका पाकिस्तानमध्ये येणार नाही याच्याशी सहमत आहे. याला तुम्ही दिलेली कारणे आहेतच. अजून एक महत्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये तेलसाठे नाहीत. पण आखाती देशांमधील अजून एखाद्या देशात बुशसाहेब जाणार नाहीत याची हमी कुणी घ्यायची?
तुम्ही म्हणता तसे नेतृत्व भारताकडे नाही. पण या घडीला अशा नेतृत्वाची जास्त गरज अमेरिकेला आहे असे वाटते.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

तेलसाठे, नेतृत्व वगैरे...

अजून एक महत्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये तेलसाठे नाहीत.

मुद्द्याची गोष्ट बोललात! अमेरिकेस निदान आत्तातरी विकतची दुखणी नको असावीत... पण मुलभूत स्वभाव हा आक्रमक (ऍग्रेसिव्ह) असल्याने त्यांना गुमान बसवत नाही असे वाटते. तसे पहाल तर क्लिंटनचा काळ हा बर्‍यापैकी शांत काळ होता. (तरीही कोसोव्हो मधे जाणे, जाता-येता टपलीत मारल्यासारखे नो फ्लाय झोनमधे इराकमधे बाँब टाकणे चालायचे - इंपिचमेंटच्या काळात तर उगाचच सद्दामला मार खावा लागला...) . पण जेंव्हा बूश रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले आणि ़ काँडोलिझा राईसचे कन्व्हेशनमधे भाषण ऐकले तेंव्हाच वाटले की काहीतरी कुरापती काढून हे युद्ध करणारच...

अवांतरः अमेरिका जवळून अनुभवत असताना मला कायम वसिष्ठांशी ब्रम्हर्षी होण्यासाठी स्पर्धा करणार्‍या विश्वामित्राची आठवण होते. ब्रम्हर्षीपद मिळवण्यासाठि एकीकडे भलते कष्ट घेतले दुसरीकडे हरीश्चंद्रासारख्या राजाला उगाच छळले, शेवटी वसिष्ठाला मारयाला निघण्यापर्यंत मजल गेली पण जेंव्हा वसिष्ठांच्या तोंडूनच स्वतःबद्दलची आणि स्वतःच्या तेजाबद्दलची स्तुती ऐकली, तेंव्हा स्वतःचीच लाज वाटून वसिष्ठांच्या पाया पडले. अहंकार गळून पडला आणि वसिष्ठांनी त्यांना "उठ ब्रम्हर्षी" म्हणून उठवले... थोडक्यात अहंकार नसणे ही ब्रम्हर्षीपदाची प्रिरीक्विझीट ते पाळत नव्हते...ही गोष्ट वन टू वन कॉरसपाँडंस नी घेयची नाही पण भावार्थ म्हणून घेयची. जगात लोकांनी चांगले म्हणायला हवे, लिडर म्हणायला हवे पण त्यासाठी तसे संबंध, वृत्ती, आत्मियता मात्र दाखवायची नाही (इतरांचे वाईटच दाखवत हिंडायचे..) असा हा प्रकार. तरी देखील असे वाटते की या अमेरिका रूपी विश्वामित्राचा अहंकार कमी होईल, ब्रम्हर्षी पण होतील (आणि ते सगळ्यांसाठी हितावहपण ठरेल) पण त्यांना तशी दिशा दाखवू शकणारा वसिष्ठ म्हणावा असा एकही समर्थ देश या जगात आजतरी अस्तित्वात नाही...

वैयक्तिक पातळीवर

आर्थिक/ राजकिय घडामोडींकडे लक्ष असते, पण त्यापेक्षा जे वैयक्तिक पातळीवर जाणवले -

१. दोन नवीन मराठी संकेतस्थळांची सुरूवात आणि आपल्यापेक्षा कितीतरी अधिक जग पाहिलेले (आणि बुद्धीमान :-), आणि मराठी) लोक जगात आहेत याची (पुन्हा) झालेली जाणीव! (आणि या अशा माध्यमांतून किती आणि काय शक्य आहे त्याची मिळालेली झलक)
२. महाराष्ट्राला अजूनही कितीतरी सामाजिक, आर्थिक सुधारणांची गरज आहे याची झालेली जाणीव -शहरांची सर्वांच्या डोळ्यादेखत होत असणारी धूळधाण
३. जागतिक आर्थिक बदलांमुळे भारतीय कुटुंबव्यवस्थेवर होणारे बरेवाईट परिणाम
४. ऋतुस्वाभाविक स्थानिक भाजीपाला/फळे खा हा अमेरिकेत होणारा प्रचार आणि पर्यावरणवादी अमेरिकनांनी त्याचा स्वतःच्या आयुष्यात केलेला स्वीकार
५. जगभर येत असलेले पूर आणि त्यामुळे होत असलेली हानी, आणि लोकांना आपापल्या राहत्या जागा सोडून जायला भाग पाडणारी परिस्थिती
६. कॅलिफोर्नियातील जंगलात लागलेल्या आगी आणि त्यातली वित्तहानी

यादी

बरेच मुद्दे आहेत. जेवढे आठवतात ते असे.
१. राष्ट्राध्यक्ष म्हणून बुश यांचे अजून एक वर्ष आहे ही जाणीव.
२. २०-२० मध्ये भारताचा अनपेक्षित विजय.
३. पर्यावरणाचा सर्व बाजूंनी होणारा र्‍हास.
४. जगाच्या पडद्यावर भारताचे वाढते महत्व.

आत्ताच कळालेली भुत्तो यांच्या हत्येची बातमी फारच धक्कादायक आहे.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

आम्हाला हे उगाच आठवतंय !!!

वरील आठवणी फार मोठ्या आहेत. आम्हाला हे उगाच आठवतंय !!!

१) -नोगताच्या मालकाची मग्रूरी मोडून उपक्रम आणि मिसळपाव,माझे शब्द या संकेतस्थळांची निर्मिती.
२)शुद्धलेखन नियम बदलण्याची आणि इतर भाषेतील शब्द स्विकारण्याची अ.भा.सा.मं तयारी.
३)भारतीय क्रिकेट संघाचा विश्वकप करंडकमधील दारुण पराभव.
४)ऑनलाईन दिवाळीचा एक फसलेला अंक
५) संकेतस्थळावर इ-मित्रांच्या भेटी.
६)गुजरातेत मोदी आणि महाराष्ट्रात नारायणाचे वाया गेलेले अस्त्र
७)गाढवाच्या लग्नवाल्या सावळ्याचे निधन
८)ओंगळवाण्या लेखनाबद्दल वाचकांची अभिरुची संपन्न करण्यासाठी केलेले प्रयत्न
९)सहाव्या वेतन आयोगाची घोषणा
१०)शहरात आणि ग्रामीण भागातील वाढलेले वीज भारनियमन.
११) यनावाला सरांचे कठीण कोडे
१२)उपक्रम आणि मिसळपाववर वाचायला मिळालेले काही अप्रतिम लेख.

३१ डिसेंबर पर्यंत जसे आठवेल तसे लिहिणार आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून काही

उठसूठ् मोदींच्या नावाने शंख करणार्‍या तथाकथित सेक्युलर भारतीय लोकांना मलेशियामधील २००७ मधल्या ह्या दोन घटना माहिती नसतील, असे मानणे कठीण जाईल, कारण त्यांना इतरस्त्र भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे.

* हिंदूरफ ह्या हिंदूंच्या संघटनेच्या अत्यंत शांततेने चाललेल्या आंदोलनावर कुआलालंपूरमध्ये पोलिसांचा लाठीमार, अनेक जणांना अटक. त्यांच्या नेत्यांवर देशद्रोहापाचा आरोप ठेवण्यात आला. (नंतर तो मागे घेण्यात आला, पण तरीही काही प्रमुख नेत्यांवर क्रिमिनल गुन्हे दखलपात्र केले आहेत).

* सुबाशिनी राजसिंघम ह्या हिंदू स्त्रीने तिच्या नवर्‍यावर अत्त्युच्च कोर्टात दाखल केलेल्या फिर्यादीचा निकाल लागला. २००२ साली तिचे लग्न झाले तेव्हा नवराही हिंदूच होता. पण मग गेल्या वर्षी त्याने धर्म बदलला, व तो मुस्लिम झाला. ह्या आघाताने सुबाशिनीने आत्महत्या करण्याचा विफळ प्रयत्न केला. त्या दरम्यान तिच्या नवर्‍याने त्यांच्या मोठया मुलाचे (जो तेव्हा तीन वर्षांचा होता) , तिच्या अपरोक्ष धर्मांतर केले. सदर केस सुबाशिनीने ह्यासाठी केली होती, की तिच्या नवर्‍याने आता त्यांच्या धाकट्या मुलाचेही (जबरदस्तीने) धर्मांतर करू नये. नवर्‍याच्या म्हणण्यानुसार अशा परिस्थितीत शरिया लागू आहे. अत्युच्च कोर्टाचा आजचा निकाल गोंधळाचा आहे, पण ते हे स्पष्ट म्हणते की अशा परिस्थितीत शरिया लागू आहे!

ह्या एका वर्षात हा तथाकथित मॉडरेट समजला जाणारा देश झपाट्याने धर्मांधतेकडे वाटचाल करू लागला आहे.

धर्मांध

प्रदिप साहेब,
धर्मांधची व्याख्या सांगाल का जरा? माझ्या माहिती प्रमाणे जगात दोनच धर्मनिरपेक्ष राष्ट्रे आहेत. जर एखादे राष्ट्र धर्माचा पुरस्कार करत असेल तर त्या राष्ट्रातल्या लोकांना धर्मांध कसे म्हणता येईल?
भारतात फक्त हिंदुत्ववादी पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना धर्मांध म्हणले जाते.





हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

धर्मांध

जर एखादे राष्ट्र धर्माचा पुरस्कार करत असेल तर त्या राष्ट्रातल्या लोकांना धर्मांध कसे म्हणता येईल?

पण आतापर्यंततरी हा देश उघडपणे कुठल्याही धर्माचा पुरस्कार करत नव्हता. सर्व वंश व सर्व धर्म येथे समान आहेत, असे त्यांचे क्रीड (मराठी शब्द?) आहे.

काँग्रेस

देशाचे तर लांबच आहे. आपल्या इथेच बघा. आपल्या इथले राजकिय पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात. पण प्रत्यक्षात मात्र धर्मासोबतच जातीपातीचे राजकारण अगदी मुत्सद्दीपणे खेळले जाते. पण प्रचार काय? धर्मनिरपेक्ष, आम आदमी आणि ....
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की, जर एखादे राष्ट्र एका धर्माचा पुरस्कार करत असेल तर तिथे धार्मिक समानता (त्यांनी अथवा आपण) आहे असे म्हणणे हास्यास्पद आहे.
धर्माचा पुरस्कार करणे अजिबात चुकीचे नाही. धर्माचा पुरस्कार हा विचारांचा पुरस्कार आहे. जर बहुसंख्य लोकांना काही विचार-तत्वे पटत असतील तर त्यात चुक ते काय?





हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

तुरळक

गुजरात मध्ये झालेल्या हिंसेंच्या व्याप्तीसमोर वरील दोन घटना म्हणजे अगदीच तुरळक म्हणाव्या लागतील!
(मॉडरेट) कोलबेर

नांदी

गुजरातेतल्या दंगली अत्यंत वाईट होत्या ह्याबद्दल वाद नाही. (त्या कशापासून सुरू झाल्या ह्याबद्दल मात्र आहे).

ह्या दोन घटनांपैकी पहिल्या घटनेत कसलीही दंगल घडण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. कारण आंदोलक नि:शस्त्र होते. दुसरी घटना अत्यंत गंभीर आहे कारण एका फटकार्‍यात तेथे पिढ्यान् पिढ्या राहत असलेल्या सर्व अल्पसंख्याकांच्या जीवनावर त्याचे दीर्घ
परिणाम होणार आहेत.

दंगलीच झाल्या म्हणजे काही दखल घेण्यासारखे होते, असे मानणे चुकिचे आहे. आणि हाच (माझ्या मते, चुकीचा) निकष लावायचा म्हटला तर काश्मीरमधून जे हजारो पंडित परागंदा केले गेले, तेही 'तुरळक' असेच म्हणावे लागेल. त्यातील 'थोडे काही' मारले गेले, तेव्ढ्यापुरती शारिरीक बळजबरी (violence) झाली खरी, पण बाकीचे बिच्चारे जीव घेऊन पळाले, 'दंगल' म्हणावी अशी झाली नाही!

दखल

दखल घेऊ नये असे अजिबात म्हणणे नाही. पण गुजरातच्या पार्श्वभुमीवर ह्या दोनही घटना अत्यंत तुरळक आहेत इतकेच. गर्भवतीचे महिलेचे पोट चिरणे, जिवंत जाळून टाकणे ह्या घटनांसमोर लाठीमार वगैरे तुरळकच ठरतो. (गुजरात हिंसेची तुलनाच करायची असेल तर माझ्यामते अफ्रिकेतील 'डारफुर' वगैरे घटनांशी करता येईल)
स्वतंत्रपणे अर्थातच ह्या घटनांची नोंद घेतलीच पाहीजे, पण 'मोदींच्या नावाने शंख करणार्‍यांना' हा उल्लेख अनावश्यक वाटला.

मॉडरेट

सांगायचा मुद्दा एवढाच आहे की, जर एखादे राष्ट्र एका धर्माचा पुरस्कार करत असेल तर तिथे धार्मिक समानता (त्यांनी अथवा आपण) आहे असे म्हणणे हास्यास्पद आहे.

मान्य. पण जगात त्या देशाची आतापर्यंतची इमेज 'मॉडरेट (मुस्लिम) राज्यकर्ते' अशी आहे. आता तो बुरखा फाटला हे दिसणे न दिसणे आपापल्यावर.

 
^ वर