संस्कृतची भीती

शाळेत असताना संस्कृतची भीती वाटायची शिकायला. त्याच कारणाने ५० गुणांचा अभ्यासक्रम मान्य केला. पण आज सुद्धा संस्कृत शिकण्याची इच्छा आहे. त्यासाठी काय करावे? संस्कृत शिकण्याचा साधा सरळ असा मार्ग आहे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

आहे ना

संस्कृत धातु शब्द रुपावली नावाचं एक छोटस पुस्तक आहे. ते मिळवा. त्यारतून बरचसं शिकायला मिळेल तुम्हाला.

पल्लवी

मला सुध्दा

मला सुध्दा संस्कृत शिकायचेय. शाळेत असतांना ५० गुणांसाठी देव , माला शाला आणि काही सुभाषीतं पाठ करण्यापलीकडे गाडी गेलीच नाही. आता मात्र संस्कृत शिकण्याची इच्छा आहे.

पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत शिकवल्या जातं असं ऐकून आहे. अधिक चौकशी करायची आहे. बघुया काय होतंय ते. येथे मात्र जसं शक्य होईल तसं शिकायला मिळालं म्हणजे लय झ्याक होईल बघा .

नीलकांत

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

इतरही काही विषयांच्या परीक्षा घेते तेच काय?

इंग्रजी/पाणिनी

इंग्रजीच्याही घ्यायचे वाटते.

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रात "पाणिनी संस्कृत पाठशाला" नावाने इच्छुकांना विनामूल्य संस्कृत शिकवणारी एक संस्था होती. महाराष्ट्रातही तिचे अस्तित्व आहे की नाही ते माहीत नाही

संस्कृतदीपिका

पण आज सुद्धा संस्कृत शिकण्याची इच्छा आहे. त्यासाठी काय करावे?

संस्कृतदीपिका नावाचे एक सं॰ स्थ॰ सांगलीच्या ज्ञानदीप इन्फोटेकने बनवले आहे. तिथे बरीच प्राथमिक माहिती मराठीतून मिळू शकेल.

त्यांचेच मायमराठी हे सं॰ स्थ॰ ही वाचनीय आहे.

संस्कृत शिकायचंय म्हणजे नक्की काय शिकायचंय?

मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो की संस्कृत शिकायचंय म्हणजे नक्की काय शिकायचंय?
संस्कृत लिहिता वाचता आपल्याला येतं. देव -वन-मालाझा सगळा व्याकरणाचा भाग झाला. व्याकरण आणि भाषेतील मूलभूत शब्दसंच वापरता आला की भाषा मोडकीतोडकी वापरता येते.
संस्कृत संभाषण शिकायचं असेल् तर टिमवि तर्फे कार्यशाळा आणि शिबिरं आयोजित करण्यात येतात.
व्याकरणाचा वापर करून संस्कृत भाषेचा योग्य वापर करून लिहायचं-वाचायचं असेल् तर मी मदत करू इच्छिते. अर्थात प्रशासकांच्या पूर्वसंमतीने आणि माझा स्वत।चा अनियमितपणा गृहित करून ही वल्गना करते आहे.
माझं संस्कृत चांगलं होतं. जर कोणाला माझी मदत घ्यावीशी वाटली तर कृपया मला विपत्र पाठवा किंवा जीमेल वर मेल करा. माझा जीमेल् पत्ता बर्‍याच मनोगती मंडळींना ठाऊक असेल किंवा इकडे तिकडे चौकशी केल्यास मिळू शकेल. सार्वजनिक ठिकाणी खाजगी मेल पत्ता देता येत नाही याबद्दल खेद आहे..
--(मास्तरीण)अदिती

उपक्रम

व्याकरणाचा वापर करून संस्कृत भाषेचा योग्य वापर करून लिहायचं-वाचायचं असेल् तर मी मदत करू इच्छिते.

तसाच एखादा उपक्रम घ्या की हाती मग!
~ तो ~

संस्कृत शिकायचंय ? भेटा--

मला आवडलेली सुन्दर अशी संस्कृतची भीती घालवणारी साइट...
संस्कृत शिकण्याचा साधा सरळ असा ' ऑन लाइन' मार्ग.
शिकण्यास गम्मत येइल. विवेचन सोप्या इंग्रजीमध्ये आहे.

http://www.chitrapurmath.net/sanskrit/step-by-step.htm

फाडफाड संस्कृत..;)

१५ मिनिटांत फाडफाड संस्कृत लिहायला-बोलायला शिकायचंय?

भेटा किंवा लिहा,

प्राध्यापक 'तात्या चाटे',
ठाणे!

;))

तात्या.

 
^ वर