नवव्या स्थानी सिंह राशीत् स्थानी मंगळ गुरु आणि राहू

माझ्या पत्नीच्या कुंडलीत् नवव्या स्थानी सिंह राशीत मंगळ गुरू आणि राहू आहेत. या युती चे कोणते परिणाम् होतात्?
तीचे धनू लग्न असून् रास् मेष आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

मेष पत्नी आणि वृषभ पती

मेष पत्नी आणि वृषभ पती असल्यास काय घडेल?
असल्यास म्हणजे आमच्या दोघांच्या त्याच राशी आहेत.
म्हणजे मी वृषभ आणि पत्नी मेष!!
काय करावे आणि काय करू नये :-) ?

भविष्यावर उपाय

१)शरद उपाध्यांचे भविष्य रंजन किंवा अन्य कार्यक्रम पहा.
२) अन्यथा उपक्रमावरील आमचे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... भाग १ ची "प्रकरणे" वाचा.
३) धोंडोपंताच्या ब्लॉगला विझिट मारा

प्रकाश घाटपांडे

आता

आता काय सांगणार?
पत्नीच्या पुढाकार घेण्याच्या स्वभावाचा फायदा घ्या व गोष्टी घडवून आणत जा.
कामे पुर्ण करणे मात्र तुम्हीच स्वतः करून घेत जा.
आपला कष्टाळू स्वभाव हे सावरून घेईलच.
पत्नीचे स्पष्ट बोलणे मनावर घेवू नका... मथितार्थ समजून घ्या, त्याचा उपयोग होईल.
बाकी आपण सांगितलेल्या ग्रहस्थितीवरून सांगणे हे फार काही शक्य नाही.
(सांगता येईल, पण ते योग्य असेल की नाही हे माहीत नाही.)

तसेच या गोष्टींची चर्चा आपण अशी उघड का करू इच्छीता हे ही कळले नाही?

आपला
गुंडोपंत

मेष पत्नी आणि वृषभ पती

म्हणजे एक एडका आणि दुसरा बैलोबा. दोघांनाही शिंगे असतात. - भांडण झालं की एकमेकांवर उगारणार.

बैलोबा खूर उधळत, माती उडवत हल्ला बोलणार तर एडका आपलं डोकं आपटवून घेणार पण मारामारीला उत आला की एडका उंच सुळक्यावर जाणार. बैलोबांना ते शक्य नाही.

आपला,
(समस्त-प्राणीगण ज्योतीषी) राजीव.

हलकेच घ्या हो!

ईडलिंबू

कोणाच्या पोटात दुखल्यास आमच्याकडे ईडलिंबू /गळलिंबू खाऊ घालतात. तसे ते एरवी खायला सुद्धा हरक नसावी.

टीप: येथे "पोटात दुखणे" हे कोणाचे आपल्यापेक्षा चांगले चालले असल्याने डोळ्यात खुपण्यातले नव्हे.

आपला,
(साफ पोटावाला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

ईडलिंबू

'ईडलिंबू' चा वाक्प्रयोग जाहिर माध्यमांत "तरूण तुर्क..." मधे केलेला आठवतो आहे. त्यानंतर ऐकला नाहि :)
-ऋषिकेश

अमेरिकेतील लेमन

अमेरिकेत मिळणारे जाड सालाचे थोडेसे लांबेडके पिवळे "लेमन" हे ईडलिंबू, का गदडलिंबू आहे असे मला कोणीतरी सांगितले. याचे लोणचे वर्षभर मुरत नाही :-(

आता असे मला कोणी सांगितले ते आठवले पाहिजे. म्हणजे स्मृतीचा ताळा लावता येईल.

http://www.floracafe.com/images/fruit26.jpg

लेमन का लाईम?

अमेरिकेत मिळणारे जाड सालाचे थोडेसे लांबेडके पिवळे "लेमन" हे ईडलिंबू, का गदडलिंबू आहे असे मला कोणीतरी सांगितले.

आणि मी हिरव्या रंगाचे लाईम मिळते त्याला ईडलिंबू समजते (मला कोणी सांगितलं नाही, माझाच जावईशोध) कारण लहानपणी पुस्तकात ईडलिंबाचा रंग हिरवा दाखवला होता. :))

ईडलिंबू

आणि मी हिरव्या रंगाचे लाईम मिळते त्याला ईडलिंबू समजते (मला कोणी सांगितलं नाही, माझाच जावईशोध) कारण लहानपणी पुस्तकात ईडलिंबाचा रंग हिरवा दाखवला होता. :))

खरे आहे. आमच्या सोंड्यात (शेताचे नांव ) संत्र्याची बाग होती. त्यात एक ईडलिंबाचे झाड (मोठे झुडूप) होते. त्याला लागलेली ईडलिंबे ही हिरवीच असायची.
आता जावईशोध मधील जावई (जामात) हा दहावा ग्रह आहे. अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित पण आहे.
अवांतर- ईडलिंबू आणि ज्योतिष याचा बादरायण का होईना संबंध लावलाच कि नाही?

प्रकाश घाटपांडे

मेषपात्र

अशा 'वर' गेलेल्या एडक्यास 'उन्मेष' म्हणावं काय?

माझी हरकत नाही हो आणि त्या उन्मेषच्या हातातील चषकाला, पेल्याला, ग्लासाला, कपाला, कॉफीमगला मेषपात्र म्हणत जावे.

नवम् स्थानातील गुरु,मंगळ,राहू.

श्री. सोनार,
हा तपशील ढोबळ स्वरूपाचा आहे. नवम् स्थानातील ग्रहांचे अंश तसेच अन्य ग्रहांचे दृष्टियोग तपासण्यासाठी संपुर्ण कुडली स्प्ष्टग्रहासह दिली पाहिजे.
दिलेला सतपशील् तसा ढोबळ स्वरूपाचा आहे. त्यावरून कोणत्याही प्रकारचे निश्चित विधान करणे शक्य नाही.

 
^ वर