विमा (इंन्शुरन्स्)

माझ्या कंपनीमधे अगदी अलिकडे तर्फे स्वास्थ्य आणि जीवनविषयक पूरक विम्याबद्दल (supplemental health and life insurance ) माहिती देण्यात आली. मला त्याबद्दल काही प्रश्न पडले होते. या निमित्ताने विम्याबद्दलच्या बर्‍या-वाईट गोष्टींची चर्चा इथे होऊ शकेल.

"एफ्लॅक" च्या "स्वास्थ्य-विषयक विम्यातील प्रकार :

१. व्यक्तिगत अपघात :

पूर्ण कुटुम्बाचा वार्षिक हप्ता : सुमारे $३६५.
कव्हरेज् : (मराठी शब्द ?) : रुग्णालयाच्या भेटी, रुग्णालयातील भरती , रुग्णालयातील वास्तव्य, ICU मधील वास्तव्य , नंतरच्या भेटी या सगळ्याचे मिळून सुमारे $२५०० (प्रत्येक व्यक्तिमागे)

२. रुग्णालयासंबंधीचा विमा : (क्र. १ आणि यातील फरक म्हणजे याच्यात अपघाताखेरीज इतर शस्त्रक्रिया आणि आजार येतात. )

पूर्ण कुटुम्बाचा वार्षिक हप्ता : सुमारे $८००.
कव्हरेज् : (मराठी शब्द ?) : रुग्णालयाच्या भेटी, रुग्णालयातील भरती , रुग्णालयातील वास्तव्य, ICU मधील वास्तव्य , नंतरच्या भेटी या सगळ्याचे मिळून सुमारे $२५०० (प्रत्येक व्यक्तिमागे)

३. कर्करोगविषयक :

पूर्ण कुटुम्बाचा वार्षिक हप्ता : सुमारे $४००.
कव्हरेज् : (मराठी शब्द ?) : रुग्णालयाच्या भेटी, रुग्णालयातील भरती , रुग्णालयातील वास्तव्य, ICU मधील वास्तव्य , नंतरच्या भेटी या सगळ्याचे मिळून सुमारे $१०,०००(प्रत्येक व्यक्तिमागे)

४. कर्करोगाखेरीज इतर रोगविषयक :

पूर्ण कुटुम्बाचा वार्षिक हप्ता : सुमारे $४००.
कव्हरेज् : (मराठी शब्द ?) : रुग्णालयाच्या भेटी, रुग्णालयातील भरती , रुग्णालयातील वास्तव्य, ICU मधील वास्तव्य , नंतरच्या भेटी या सगळ्याचे मिळून सुमारे $१०,०००(प्रत्येक व्यक्तिमागे)

"ऍफ्लॅक"चा जीवन-विमा आहे. त्याबद्दल मला माहिती नाही.

जीवन-विम्यामधे २ प्रकार दिसत आहेत.

१. टर्म लाईफ : विम्याचा महिन्याचा/वर्षाचा हप्ता भरा. त्याच्यातील एकही पैसा परत मिळणार नाही.
२. फुल-लाइफ : विम्याचा महिन्याचा हप्ता भरा ; साधारण १५ वर्षानी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा परतावा मिळेल.

मी "मेट्-लाईफ" आणि "न्यूयॉर्क लाईफ" बद्द्लची माहिती काढली. दोन्हीचे "भाव" साधारण सारखे आहेत :

१. टर्म् लाईफ :
महिन्याचा हप्ता : सुमारे $६०.
कव्हरेज् : दहा लाख डॉलर्स्

२. फुल लाईफ :
महिन्याचा हप्ता : सुमारे $२७५.
कव्हरेज् : पाच लाख डॉलर्स्

मी वरीलपैकी केवळ टर्म लाईफ घेतलेले आहे. बाकी प्रकारच्या विम्याबद्द्ल विचार करत आहे. याबद्द्लचे तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल.

माझे आतापर्यंतचे विचार आणि काही प्रश्न :

१. तुम्हाला तुमच्या कंपनीतर्फे शॉर्ट टर्म, लॉन्ग टर्म डिसेबिलीटी तर असतेच . मग ही "एफ्लॅक"ची भानगड का ? तर कारण ते लोक नगद रक्कम देतात. तुमच्या त्या त्या आजारात/अपघातात तुम्हाला नक्की किती पैसे मिळणार हे नक्की ठरलेले असते. नो क्वेश्चन्स् आस्कड् . तुमच्या कुटुम्बातील कुणालाही काही झाले तरी हे पैसे मिळतात.

२. फुल-लाईफ ही चोर-गिरी वाटते. हप्ता खूप मोठा आहे. थोडी आकडेमोड केली तर मिळणारा परतावा काही फार मोठा नाही. पण मला वाटते, हे माहित असूनही माझ्यासारखे बुद्दू लोक त्याकडे जातात कारण गुंतवणुकीतील त्याना काही कळत नाही. आणि कुठेतरी शिस्तबद्ध रीत्या पैसे वाचवणे हा उद्देश असतो.

३. भारतातील विम्याबद्द्लची परिस्थिती काय ? आता खाजगीकरणानंतर काही नवे चांगले पर्याय उपलब्ध आहेत का ? की LIC हाच सगळ्यात चांगला पर्याय आहे ?

लेखनविषय: दुवे:

Comments

कव्हरेज् = जोखिम

उत्तम विषय!
पन फार माहिती नाहिये मलाही यातली..
शिवाय आप्ल्या कंपन्या अमेरिकन आहेत त्यामुळेही ...

कव्हरेज् = जोखिम
(आयुर्विम्यात तरी हाच शब्द वापरल जातो)

आपला
गुंडोपंत

भारतातील ...

भारतातील कंपन्यांबद्द्ल लिहिलेत तरी हवे आहे.

फुल लाईफ विम्याबाबत सहमत

टर्म लाईफ घेऊन (आणि फुल लाईफ न घेऊन) योग्य निर्णय घेतलात. फुल लाईफ विमा फार अपवादात्मक व्यक्तीला उपयोगी पडतो. टर्म लाईफ विमा सुद्धा त्यांनीच घ्यावा, ज्यांच्यावर कोणी असहाय कुटुंब आश्रित आहे (लहान मुले, स्वतःची आमदनी नसणारा/री जोडीदार, स्वतःचे पैसे नसलेले आईबाप, वगैरे. किंवा या कौटुंबिकांना स्वतःची आमदनी आहे, त्यांना तुमची कर्जबद्ध मालमत्ता, घर वगैरे, तुमच्या अचानक मृत्यूनंतर वापरण्यासाठी हवी आहे.)
नाहीतर तोच विम्याचा हप्ता चांगल्या गुंतवणुकीत घालणे हेच फायद्याचे.

काही लोकांच्या नोकर्‍या दीर्घ मुदतीच्या नसतात. काही लोक "स्वतंत्र कंत्राटदार" असतात. त्यांना नोकरीतून विमा मिळत नाही. जे कुटुंबाचे एकमेव आधार असतात, ज्यांना लहान मुले असतात, त्यांना कंपनीकडून मिळणारा विमा पुरेसा नसतो. आपल्या संभाव्य अपघातानंतर/मृत्यूनंतर कितपत पैसे लागतील हा नीट विचार करावा, आणि जो भाग नोकरीतून मिळत नाही, तो बाहेरून विमा घेऊन तयार ठेवावा.

धन्यवाद

>> नाहीतर तोच विम्याचा हप्ता चांगल्या गुंतवणुकीत घालणे हेच फायद्याचे.

माझ्या एका मित्राने फुल लाइफ घेण्यामागची कारणीमीमांसा दिली की अरे, मला गुंतवणुकीत काही समजत नाही; आणि नुसते डीपॉझिट् (सीडी) काढून काय फायदा ? वगैरे वगैरे .... मलाही शेअर्समधले काही कळते असे नाहीच ; पण त्यासाठी फुल लाइफ हा उपाय मला योग्य वाटला नाही. असो.

स्वास्थ्य आणि जीवनविषयक पूरक विम्याबद्दल (supplemental health and life insurance ) विचार करकरूनही काहीही अर्थ दिसला नाही...

मला वाटते ए आय् जी चा टर्म लाईफ घेतला तर हप्त्याचे पैसे शेवटी (म्हणजे सुमारे १५ वर्षानी) परत मिळतात...

अजुन थोडेसे

इथे बरेच जण "हुशार" ह्या वर्गात गणले जातात. त्यामुळे होल लाईफ पेक्षा टर्म लाइफ ते देखील रिड्यूसींग टर्म लाइफ किती उत्तम आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

मुक्तसुनीत तुमच्या मित्राला होल लाइफ पॉलीसी मधे चार्जेस किति जातात व पैसे किति गुंतवले जातात व रिटर्न्स किती मिळतात व जर का डायव्हर्सीफाइड म्युच्युअल फंडात एस आय पी केले तर काय होईल ह्याचे त्रैराशीक करुन दाखवले तर त्याला देखील पटेल.

हा दुवा द्या त्याला - इंश्युरन्स व (धनवृद्धी )गुंतवणूक हे वेगवेगळे समजावे व हाताळावे.( जरा का स्वतःचा चांगला फायदा करून घ्यायचा असेल तर. )

डबल मेडिकल इंश्युरन्स टाळलेला उत्तम.


गांधीजींचे आत्मचरित्र वाचताना कळले की द. अफ्रिकेत एक इंश्युरन्स एजंट त्यांच्या मागे लागला होता. :-) स्वतः गांधीजींना इंश्युरन्स हा प्रकार पसंत नव्हता.

गणणे

पुर्वी मला 'गणणे ' हा शब्द गणना(जनगणना) सारखे वाटायचे. पण मला दुसरा अर्थ माहीत नव्हता . पण माझ्या मुलीने जेव्हा म्हटले कि बाबा तू जरा गणलेलाच आहेस. तेव्हा माझ्या टाळक्यात प्रकाश पडला.
सर्किट घाटपांडे

मला वाटायचे की

मला वाटायचे की हा शब्द 'गंडलेला' असा आहे.
गुजराथी मध्ये गांडा म्हणजे वेडा याचा काही तरी अपभ्रंश होवून आला असावा
असा माझा (गैर?) समज होता/आहे

आपला
गुंडोपंत (वा!! आता नावाचा काय रेफरंस लागतोय!)

धन्यवाद

धन्यवाद सहजराव..हा दुवा खुपच माहितीपूर्ण निघाला.

अभिजित...

 
^ वर