संस्कृत

जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध भाषांमध्ये संस्कृत भाषेची गणना होते. महाकाव्ये, नाटके, सुभाषिते हे वेगवेगळे साहित्यप्रकार आणि आध्यात्मापासून राजनीतीपर्यंत आणि तत्त्वज्ञानापासून अर्थशास्त्रापर्यंत अनेक विषयांवर संस्कृत भाषेत लेखन झाले आहे. भारतीय भाषांवर संस्कृतचा प्रभाव वादातीत आहे. संस्कृत भाषाप्रेमींसाठी आणि संस्कृत भाषेची अधिक माहिती घेऊ इच्छिणार्‍यांसाठी हा समुदाय आहे.

तुम्ही कसा सहभाग घेऊ शकता?

  • संस्कृतभाषेशी संबंधित विषयांवर लेख लिहून
  • चर्चेत भाग सहभागी घेऊन
  • शंका/अडचणी विचारून
  • आपल्याला माहिती असल्यास इतरांच्या शंकांचे समाधान करून

संस्कृत भाषाप्रेमींचे आणि संस्कृत भाषेची अधिक माहिती घेऊ इच्छिणार्‍यांचे स्वागत आहे!

संस्कृतचे मारेकरी

एकदा आम्ही आपल्या संस्कृत वर्गात निरोप समारंभाला प्रमुख पाहुणे कोण बोलवायचे याची आपसांत चर्चा करत होतो.

एक विशेष विभक्ती उपयोग

आम्हाला विभक्ती चे उपयोग शिकवताना ज्या वेळी रुच् धातुचा उपयोग करायची वेळ
आली तेव्हा मान्य गुरुवर्य श्री. जगदीश इंदलकर यांनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितले.

माझे आवडते सुभाषित

सुखस्य दु:खस्य कोऽपि न दाता
परो ददाति इति कुबुद्धिरेषा ।
अहं करोमीति वृथाभिमान:
स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोक: ।।

शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृतमधून निबंध सुलभलेखन.

(एक विनम्र सूचना - प्रस्तुत लेख संस्कृत विद्वज्जनांसाठी नाही).

दरवर्षी आयईएस संस्कृत केंद्र संस्कृत शिक्षकांसाठी वर्ग घेते ज्यात संस्कृत विषयात

एक संस्कृत एकांकिका

नमस्कार मंडळी,
मुंबईत ठाणे येथे नवरात्रीनिमित्त शारदोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात उद्या म्हणजे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी, शनिवारी रुईया महाविद्यालयातर्फे एक संस्कृत एकांकिका सादर केली जाणार आहे.

गीत मेघदूत ..२

II स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी प्रसन्न II

गीत मेधदूत ..१

राम राम मंडळी,

तसिमन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।

जैन साहित्यातील विश्वाकार - भाग ३ (अंतिम)

पहिल्या दोन भागांतच जवळपास सगळे सांगितले आहे. आणखी खूप सांगण्यासारखे नाही. प्रश्न "विश्व" ह्या गोष्टीचा नसून भाषेचा आहे, हीच ह्यातली गोम.

जैन साहित्यातील विश्वाकार - भाग २

आता जैन दर्शनाऐवजी "झेन" दर्शनाचा विचार करणार आहोत. दोघांचा संबंध काय? खूप दाट संबंध नसेल. पण दोन्हींचा जन्म एकाच संस्कृतीतला आहे.

जैन साहित्यातील विश्वाकार - भाग १

जैन वाङ्मयात जी विश्वाची संरचना सांगितली आहे ती थक्क करणारी आहे. ते समुद्र, ती द्वीपे, आकाश, पाताळ, ह्यांबद्दल वाचताना माणूस अक्षरशः हरवून जातो. पण ह्या सर्वांवर कळस म्हणजे विश्वाच्या एकूण आकाराबद्दलची कल्पना.

वर्णमाला- शेवट

आधीच्या लेखात आवाहन केल्याप्रमाणे वर्णमालेबाहेरचे वर्ण शोधण्याचे कुतुहल एकाही वाचकाला वाटल्याचे दिसले नाही. असो, चालायचेच!

आषाढस्य प्रथम दिवसे..

II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

राम राम मडळी,

वर्णमाला (स्वर)

काही तांत्रिक कारणांमुळे हा भाग उपक्रमावर आणायला बराच वेळ लागला, त्याबद्दल क्षमस्व!

बौद्ध साहित्यातील नावे!

मिलिंद, राहुल अशी दोनतीन नावे भारतात बुद्धधर्माचा सर्वत्र प्रसार होता तेव्हापासून प्रचारात आलेली आहेत, हे आपल्याला माहित असते.

ग्रंथ- उपलब्ध / अनुपलब्ध

नमस्कार मंडळी,

वर्णमाला- व्यंजने

गेल्या भागात आपण क् ते स् हे वर्ण पाहिले. त्यांच्यापुढील वर्णांचे उच्चारक याप्रमाणे-
य्- तालव्य
र्, ळ्- मूर्धन्य
ल्- दन्त्य
व्- दन्तोष्ठ्य
ह्- glottis.

दुहेरी अर्थाचे सुभाषित

कॉलेजात असताना राहुल सांकृत्यायन यांच्या संस्कृत वेच्यांच्या संग्रहात बिज्जका (म्हणजे विजया) ह्या कवयित्रीची एक कविता मी वाचली होती. नीट आठवत नाही, आणि विभक्तीप्रत्यय आणि "चालवणं" वगैरे रामो राजमणिः च्या पलिकडे येत नाही.

वर्णमाला- उच्चारक्रिया

या भागात काही तांत्रिक संज्ञा इंग्रजी भाषेत लिहिल्या आहेत, या संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द शोधण्याचे काम सुरू आहे.

वर्णमाला- (समज- गैरसमज)

काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आहे हा. एकदा एका व्यक्तीने मला असा प्रश्न विचारला की 'इतर भाषा शिकताना संस्कृतचा काय फायदा होतो?' तेव्हा मी संस्कृत साहित्याची विद्यार्थिनी होते. भाषाशास्त्राशी मात्र अद्याप ओळख व्हायची होती.

दशरूपक

स्वप्नवासवदत्तम वरील लेखांत नाट्याचे १० प्रकार असतात असा उल्लेख मी केला होता व काही वाचकांनी ते १० प्रकार कोणते असे विचारले होते. त्यांचे कुतुहल आणखी थोडे चाळवण्यासाठी त्या १० प्रकारांची जुजबी माहिती येथे देते आहे.

स्वप्नवासवदत्तम्- मला आवडलेले

मी या नाटकाकडे पाहते ती नाटककाराची कलाकृती या दृष्टीकोनातून. त्यामुळे वासवदत्ता, उदयन, पद्मावती या पात्रांइतकेच भासाने नाट्यरचनेसाठी वापरलेले devices देखिल मला फार आवडतात.

स्वप्नवासवदत्तम्- कथानक

भासाने उदयनकथेवर २ नाटके लिहिली. त्यापैकी पहिले 'प्रतिज्ञायौगंधरायण' आणि दुसरे 'स्वप्नवासवदत्तम'. 'प्रतिज्ञायौगंधरायण' जिथे संपते त्याच्या काही काळानंतर 'स्वप्नवासवदत्तम'चे कथानक उलगडते.

स्वप्नवासवदत्तम्- लेखकपरिचय

संस्कृत नाटके म्हटली की तोंडात पहिले नाव येते ते कालिदासाचे. एक कालिदास सोडता इतर संस्कृत नाटककारांची नावे फारच कमी जणांना माहित असतात. कदाचित संगीत नाटके पाहिलेल्या पिढीला भास, शूद्रक, विशाखदत्त वगैरे नावे माहित असतील.

संस्कृत भाषेतील शिव्या..

राम राम मंडळी,

संस्कृत भाषेत फारश्या शिव्या नाहीतच, आणि असल्याच तर त्यात फारसा जोर नाही असे आम्ही ऐकून आहोत. समोरचा माणूस शिवी दिल्यावर जर अस्वस्थ झाला नाही तर त्या शिवीत फारसा जोर नव्हता, असे मानले जाते.

श्लोक

शिवाकान्त शम्भो शशाङ्कार्धमौले
महेशान् शुलिन् जटाजूटधारिन् ।
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप्
प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप ॥

शिवाकान्त म्हणजे पार्वतीचा पती,
शंभो... शं म्हणजे कल्याण करणारा,

संस्कृतची भीती

शाळेत असताना संस्कृतची भीती वाटायची शिकायला. त्याच कारणाने ५० गुणांचा अभ्यासक्रम मान्य केला. पण आज सुद्धा संस्कृत शिकण्याची इच्छा आहे. त्यासाठी काय करावे? संस्कृत शिकण्याचा साधा सरळ असा मार्ग आहे का?

Syndicate content