ज्योतिषी उपभोक्ता संरक्षण कायद्यात बसतात का?
वाचक हो,
आधीच स्पष्ट करतो, मला कायद्या च्या कलमां बद्दल काहीच माहीत नाही.
प्रकाश घाटपांडे साहेबांच्या "ज्योतिषा कड़े जाण्यापूर्वी" ही समस्त शृंखला वाचून काढ़ली. त्यांचे अध्ययन आणि अभ्यास खरंच वाखाणण्या सारखं आहे. त्यांनी आपल्या एका लेखात लिहीले आहे कि "जेव्हां मनुष्य परिस्थितिमुळे खचून जातो, तेव्हां तो ज्योतिषा कड़े वळतो, आणि ह्या "प्रोसेस" मधे त्याचा खिसा चांगलाच हल्का होऊन बसतो", तेव्हां हा प्रश्न मनात उदभवला कि ह्याच परिस्थितित मनुष्य डॉक्टर कडे पण जातो.. पण मग त्याचा अन्दाज चुकला किंवा इस्पितळ कड़ून काही चूक झाली तर त्याला उपभोक्ता संरक्षण कायद्या खाली कोर्टात नेता येते... मग ज्योतिष सुद्धा आपल्या यजमाना कड़ून चांगलेच पैसे मोजतो मग त्यावर पण उपभोक्ता संरक्षण कायदा बसतो का?
(१) ज्योतिषाचे भाकित चुकले तर "उपभोक्ता" चे पैसे तर वाया गेले.
(२) पैसे घेऊन "सेवा" देणे हा तर सरळ-सरळ "उपभोक्ता-सेवादार" चा मामला आहे कि नाही?
(३) डॉक्टर, इस्पितळ, शाळा-कालेज, टेलीफ़ोन, वीज आदींप्रमाणे ज्योतिष पण ह्या कायद्यात आहेत काय?
(४) समजा आहेत तर ते यजमानाला दानाची "पावती" देतात का?
(५) आणि समजा कायद्यात बसत नाहीत, तर कां नाहीत?
बहुधा मराठीत मला मुद्दा नीटपणे मांडता आला नाही... तरी ह्या मुद्द्या वर विचार जाणून घेण्याची इच्छा आहे...
सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com
Comments
उपभोक्ता संरक्षण कायद्या
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. सुरेश चिपळूणकर यांनी उपस्थित केलेला मुद्दा अगदी योग्य आहे. ज्योतिषी जाहीरात करतात. ज्योतिष हे शास्त्र आहे असे सांगतात. अपॉइंटमेंट देतात. फी घेतात. म्हणजे हा व्यवसाय आहे. ते व्यवसाय कर (प्रोफेशनल टॅक्स) ही भरत असतील. तेव्हा हा व्यवसाय उपभोक्ता संरक्षण कायद्याखाली येत असलाच पाहिजे. मात्र कुणीतरी खटला भरणे आवश्यक आहे. असे झाले तर ज्योतिषांची दुकाने बंद हो ऊन लोकांची फसवणूक थांबेल. तथाकथित'वास्तुशास्त्रा' विषयी सुद्धा तसेच घडेल.
पण जाहिरातीत "करमणुकीसाठी" असे म्हटल्यास चालते ना
अशा प्रकारे ज्योतिष (किंवा बाकी भविष्यवर्तक सल्लागारी) सांगणारे आपली जाहिरात अमेरिकेत तरी करतात. त्यामुळे ते या ग्राहक संरक्षण कायद्याखाली तेव्हाच येतात, जेव्हा तुम्ही सांगू शकाल की "त्यांनी करमणूक विकली नाही".
बरोबर
तरीदेखील माझ्या माहितीनुसार अमेरिकेतील याबाबत वेगवेगळ्या स्टेटचे वेगळे कायदे आहेत. काही स्टेट मध्ये ज्योतिषाच्या व्यवसायाला बंदी आहे. पण एक मराठी माणूस(पुण्यातला) एम्बसी मधील राहतो ,एका स्टेट मध्ये जेथे हा व्यवसाय करता येत नाही ,पण व्यवसाय दुसर्या स्टेट मध्ये करतो.
भाग १ प्रकरण ५ मध्ये प्रश्न क्र ६१ मध्ये 'अमेरिकेत स्मूमससलद येथे फलज्योतिषाचे कॉलेज आहे.` अधोरेखीत ठीकाणी Lewellyn असे वाचावे. युनिकोड रुपांतर करताना सदर चूक झाली आहे. अशा अन्य चुका वाचकांनी कृपया निदर्शनास आणून द्याव्यात.
उपक्रमपंतांना विनंती सदर बदल करावा.
प्रकाश घाटपांडे
सुरेश चिपळूणकरांना उत्तरे
आपल्या प्रश्नक्रमांकनुसार
जातक तसे समजत नाही. माझ्या मनोगतात ज्योतिषी आणी जातक यांचे नातेसंबंधाबद्दल लिहिले आहे. तसेच विविध प्रश्नात भाकित चुकले तरी जातक कसा समाधानी असतो ते उधृत केले आहे
अद्याप ज्योतिषी आणी जातक यांचे नाते सेवादाता व उपभोक्ता असे नाही. पण पुण्यात लॉजेस घेउन काही दिवस मुक्काम ठोकुन नंतर जाणारे ज्योतिषीच किति तरी आहेत. दैनिक सकाळच्या छोट्या जाहिरातीतील मजकुर मी अनेक वर्षे वाचतो आहे. १०१ % ग्यारंटी. १५ दिवसात निकाल्. इकडे तिकडे भटकू नका . पुण्यात बसेरा लॉजवर ए ए ॠषी नामक ज्योतिषाचा पैशाच्या देवघेवीवरुन खुन झाला होता असे पुर्वी पेपरात वाचल्याचे स्मरते. लोकप्रतिनिधी पण जंतेची शेवाच करतात ना? त्याच शेवामुल्य आपन् किती मोजतो आहोत हे तर उघड आहे.
ज्योतिष या कायद्यात बसत नाही. उद्या बसवले तरी काही फरक पडणार नाही. पळवाटा आहेतच.
अजिबात देत नाहीत. अहो स्टँपपेपर सुद्धा बोगस निघाले. स्पेशालिस्ट डोक्टर, पानटपरीवाला कुठे पावती देतो? डोनेशन्स , बिल्डर ला दिलेला २ नंबरचा पैसा यांची कुठे त्या हेडची पावती असते. कितितरी असे व्यवसाय आहे त्याची पावती नसते.
मुळात ज्योतिष हा कायदेशीर व्यवसाय होउ शकतो का? सेवा या क्षेत्रात काय मोडते याचे कायदेशीर अन्वयार्थ खुपच किचकट आहेत असे ग्राहक न्यायालयाचे न्यायमुर्ती कै. प्रतापराव बेहेरे यांनी एका भाषणात सांगितले होते.
शासन अनेक गोष्टींना सेवाक्षेत्राच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. पण ज्योतिष हे धर्माचे अंग आहे म्हणले कि झाले. सध्या ज्यो. शरद उपाध्ये हे ज्योतिषातुन मनोरंजन करतात. त्याचा करमणुक कर आपण भरतोच.
अवांतर - बघा ज्योतिषांना सुटकेची टीप देउन ठेवली कि नाही?
प्रकाश घाटपांडे
शेकलं की कळेल
ते उपभोक्ता कायदा वगैरे सोडा हो...
जरा शनी ने शेकलं की कळेलच तुम्हालाही काय काय करता येते ते...
त्या शनीच्या फेर्यात भले भले गारद होतात.
बाकी गुरुपालट झाला २६ तारखेला... कसा वाटतो आहे?
आपला
गुंडोपंत
गारद नको गर्क व्हा
ज्योतिषशास्त्रिय दृष्ट्या मुलांसाठी नाही पण प्रौढांना त्याचा उपयोग नक्की होईल.
गुरु- Master of at least One. तात्विक, सात्विक. विद्वत्तापुर्ण. प्रबंधास उत्तम
बुध- Jack of all trade खेळकर. संवादी. हजर जबाबी . विनोदी प्रवासवर्णन इथे (virtuala tour) या अर्थाने घ्यावा. निबंधास उत्तम
अवांतर- सिंह रास ही धाडसी असल्याने व तिला गुरु पाचवा येत असल्याने " बौद्धिक क्षेत्रातील" धाडसी गुंतवणुक करायला उत्तम. अगदी "बौद्धिक सट्टा" म्हटल तरी उत्तम. ख-या अर्थाने सर्कीटपणा करण्यास काहीच हरकत नाही
( चिकित्सकातला ज्योतिषी)
प्रकाश घाटपांडे