उपक्रम.. मराठीतून व्यक्त होण्याचा!

'नील वेबर' ह्यांनी आजच्या महाराष्ट्र टाईम्सच्या मुंटा पुरवणीत लिहिलेला वरील शीर्षकाचा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. तो इथे वाचता येईल.
उपक्रमवर असलेल्या विविध सोयी आणि इथे हाताळले जाणारे विविध विषय ह्यांवर ह्या लेखात प्रकाश टाकला आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

दुव्याबद्दल धन्यवाद्...

अरे वा!

छानच! धन्यवाद, प्रमोदराव....
सन्जोप राव

धन्यवाद!

ह्या बातमीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! नील वेबर आणि मटा चमू यांनाही धन्यवाद!

सर्वांचे अभिनंदन

सर्वांचे अभिनंदन. उपक्रमवर इतका छान लेख दिल्याबद्दल नील वेबर आणि मटाचे धन्यवाद. मराठीतील फारशी शब्दांवरील चर्चेत उपलब्ध वेळेत अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न राहील. शक्य होईल तसे तज्ज्ञ मंडळीची मदत घेतच असतो. अधिक सक्रिय सहभागासाठी तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करण्याचे प्रयत्न करता येतील. पण बहुधा सारीच तज्ज्ञ मंडळी ही इंटरनेटकुशल नसतात, हा मोठा अडसर आहे.

प्रमोदराव, हा बातमीदुवा इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

चित्तरंजन

देवसाहेब,

देवसाहेब,

मटाचा दुवा इथे दिल्याबद्दल आपले आभार..

परंतु मटाच्या बातमीतील खालील वाक्याशी मी काहिसा सहमत नाही!

तसं या साइटला कोणत्याच विषयाची अॅलजीर् नाही. त्यामुळे प्रवासवर्णनापासून गणितापर्यंत आणि साहित्यापासून अर्थव्यवहारापर्यंत कोणताही विषय वाचायला मिळतो.

उपक्रमाला 'काव्य' या साहित्यप्रकाराची ऍलर्जी आहे, हे बहुधा मटाला माहीत नाही!

असो, पण उपक्रमाचे एवढे एक वैगुण्य वगळता एक उपक्रमी या नात्याने मटातील बातमी वाचून मलाही खूप आनंद वाटला. उपक्रमाला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा!

तात्या अभ्यंकर.

वैगुण्य:)

प्रिय विसोबा, काढायचे असल्यास कशातही वैगुण्य काढता येते. काव्यासाठी, कथेसाठी मनोगत (मायबोलीही आहे बरं का) आहेच ना. माझ्या मते, इथे माहिती आणि विचारांची देवाणघेवाण होत राहावी, हेच उत्तम.
चित्तरंजन

जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

प्रिय चित्तोबा,

प्रिय विसोबा, काढायचे असल्यास कशातही वैगुण्य काढता येते.

अगदी खरे! पण 'काव्य' या साहित्यप्रकाराला संपूर्ण बंदी असणे, त्याच्याकरता वेगळा विभाग नसणे, ही माझ्यामते उपक्रमाची ठळक वैगुण्ये म्हणता येतील! ही वैगुण्ये काढायचीच आहेत म्हणून काढलेली नाहीत!

उपक्रमाच्या मुखपृष्ठावर 'जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!' ही ओळ लिहिलेली आहे. ही ओळदेखील एका काव्यामधलीच आहे!

'काव्य' या साहित्यप्रकाराला संपूर्णपणे बंदी असलेल्या उपक्रमाला त्याच्या मुखपृष्ठावर एका काव्यामधलीच ओळ कशी काय चालते, हा एक गहन प्रश्न आहे! मराठी भाषेतून चांगले विचार मांडण्याकरता उपक्रम हे एक व्यासपीठ आहे अशी आमची धारणा आहे. परंतु येथे 'काव्य' या साहित्यप्रकाराला असलेली बंदी पाहून काव्याच्या माध्यमातून उत्तम विचार मांडता येत नाहीत असा काहीसा उपक्रमाचा गैरसमज झालेला दिसतो!

माझ्या मते, इथे माहिती आणि विचारांची देवाणघेवाण होत राहावी, हेच उत्तम.

उत्तम!

इथे काही भरभरून ललितलेखन, व्यक्तिचित्रे लिहायच्या विचारात होतो. पण इथे ललितसाहित्यापेक्षा (कथा, कादंबर्‍या, व्यक्तिचित्रं, काव्य) फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाणच अपेक्षित दिसते आहे! उपक्रम प्रशासनाचाही अद्याप काहीही प्रतिसाद न आल्यामुळे त्यांचेही हेच मत दिसते आहे! हरकत नाही! आम्ही इथे माहिती आणि विचारांची देवाणघेवाण वाचू.

काळ खूप भराभर बदलतो आहे. उपक्रमालाच साजेसे दुसरे एखादे लोकशाहीवादी प्रशासन असलेले, तसेच जेथे माहिती आणि विचारांची देवाणघेवाण, मराठी कथा, कादंबर्‍या, आणि हो, मराठीतलं उत्तम काव्यसुद्धा, जिथे आनंदाने नांदू शकेल, मोकळा श्वास घेऊ शकेल, असे एखादे दुसरे संकेतस्थळ निघायची आम्ही वाट पाहू! आज मनोगत, मायबोली, उपक्रम यासारखी संकेतस्थळं आहेत ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे असं एखादं आमच्या स्वप्नातलं संकेतस्थळ एकेदिवशी निश्चितच निघेल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही त्या क्षणाची वाट पाहू!

मटामध्ये झालेल्या कौतुकाकरता उपक्रमाचे पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन!

तात्या.

अभिनंदन

ही बातमी इतक्या लवकर मटात येईल असे वाटले नव्हते, मटाचे आभार आणि उपक्रमचे अभिनंदन.

लोकप्रीय

उपक्रमाबद्दल म.टा. मध्ये वाचून छान वाटलं. अल्पावधीतच या साईटने लोकप्रीयता मिळवली.

पल्लवी

अवांतर

तुम्हाला लोकप्रिय/लोकप्रियता असे म्हणायचे आहे का?

मटाचा दुवा

उपक्रमाबद्दल म.टा. मध्ये वाचून छान वाटलं. उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा!

उपक्रम.... मराठीतून व्यक्त होणयाचा!

म.टा. वाचून आजच सदस्य झाले आहे, वेबर याना धान्यवाद.

प्रकाटाआ

क्षमस्व :)

मी पण...

मी आजच "उपक्रम"चे सदस्यत्व घेतले. मनोगतवरील जुन्या मंडळींना इथे पाहून आनंद वाटला.

:)

उपक्रमाच्या प्रगतीला ह्या निमित्ताने शुभेच्छा!

अभिनंदन

उपक्रमात सहभागी सर्वांचे अभिनंदन!

अभिनंदन!

उपक्रम असाच भक्कम होऊ दे!

पण हा नील वेबर कोण आहे? नावाने तरी तो मराठी असेल असं वाटलं नाही. त्यानी हे सुंदर वृत्त लिहिलं आणि हा प्रश्न तेवढा महत्वाचा नाही, पण एकदम् कुतुहल वाटलं.

खिरे

असेच..

उपक्रमाचे अभिनंदन ..त्याचबरोबर 'नील वेबर' कोण ह्याचे कुतुहल!

नील वेबर!

माझ्या अंदाजाप्रमाणे(फक्त अंदाज बरं का!) मनोगतावरील 'नीलहंस उर्फ ॐकार' हेच मटा मधे नील वेबर ह्या नावाने लिखाण करत असावे!इथे उपक्रमवर असलेले 'ॐकार' आणि मनोगतावरील 'ॐकार' हे एकच आहेत काय हे तेच सांगू शकतील.

हा हा!

अदांज चुकला हो!
मनोगतावरचा नीलहंस म्हणजे मी . मनोगतावरचा ॐकार म्हणजे ॐकार कर्‍हाडे. मी ॐकार जोशी.
परंतु मी कोणत्याही वृत्तपत्रात कोणताही स्तंभ लिहीत नाही.

अभिनंदन

उपक्राचे अभिनंदन !
या बातमी नंतर सदस्य आणि पाहुणे वाढले आहेत असे मला ही वाटले.
अशीच भरभराट होवो.
--लिखाळ.

आता मी सुद्धा उपक्रम् चा सदस्स्य झालेलो आहे

म.टा. मधे बातमी वाचालि आणि मी सुद्धा या उपक्रमामधे सहभागी झालो.

" उपक्रम् " लोकप्रियते च्या शिखरावर् आरुद् होवो.

मरातठी असे अमुची मायबोलि , आता ती नेट भाशा ही असे.

धन्यवाद्

मलाही आनंद झाला ?

ललितलेखन, व्यक्तिचित्रे, कविता, नसली तरी (कधी तरी तेही असेल)गळ्याशप्पथ घेऊन सांगतो,मटातील बातमी वाचून मलाही खूप-खूप आनंद वाटला. उपक्रमाला माझ्या खूप-खूप शुभेच्छा!

 
^ वर