इंडेक्स फंड्स

गेल्या सहा सात वर्षांमध्ये प्रथमच मुहूर्ताच्या सौद्याला मुंबई शेअर बाजाराचा संवेदी निर्देशांक खाली आला.

गेल्या वर्षभरातील विविध म्युच्युअल फंडांचे परतावे पाहिले तर इंडेक्स फंडांनी दिलेला ४३.११ टक्के हा परतावा इक्विटी डायव्हर्सिफाईड फंडांइतकाच (४३.९२ टक्के) आहे. याशिवाय हा परतावा मोजताना फंडांचा खर्च प्रमाण(एक्स्पेन्स रेशो), प्रवेश-कर (एंट्री लोड) विचारात घेतला जात नाही.* (संदर्भः व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईन)

इक्विटी डायव्हर्सिफाईड फंडांचा प्रवेश-कर (सर्वसाधारणपणे २.२५ टक्के) व खर्च प्रमाण (१.५ टक्क्यांपेक्षा जास्त) हे इंडेक्स फंडांच्या प्रवेश करापेक्षा (जास्तीत जास्त १.२५, कमीतकमी ०.३३) व खर्च प्रमाण (१.२५ टक्क्यांपेक्षा कमी) फारच जास्त असल्याने हे पैसे गुंतवणूकदारांच्या पैशातूनच वसूल केले जातात व तुलनेने परतावा कमी होतो.

याशिवाय कोणताही फंड मॅनेजर प्रत्येक वर्षी इंडेक्सला हरवू शकत नाही. गेल्या पाच वर्षातील इक्विटी डायव्हर्सिफाईड फंडांचे परतावे पाहिले तर कोणत्याही एकाच फंडाने प्रत्येक वर्षी सेन्सेक्स निर्देशांकाला हरवलेले नाही. सर्वोत्तम परतावा देणारा फंड हा दरवर्षी वेगळा आहे. मात्र प्रत्येक वर्षी या फंडातून त्या फंडामध्ये बेडूक-उडी मारणे खर्चिक असते. (२.२५ टक्के प्रवेश कर!)

या पार्श्वभूमीवर "अकार्यक्षम" रीतीने चालवल्या जाणार्‍या इंडेक्स फंडांमध्ये - पर्यायाने थेट सेन्सेक्स किंवा निफ्टीमध्ये गुंतवणूक करणे शहाणपणाचे आहे. उगाच आपल्या पैशातून फंड मॅनेजरच्या घरची चूल पेटवण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या घरची चूल पेटेल हे पाहणे शहाण्या गुंतवणूकदाराचे लक्षण नाही का?

तुम्हाला काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

हो

जगभरचे विद्वान हेच सांगतात. जुनी कॉन्सेप्ट आहे.

असो ज्या पानावरून हे चित्र टाकलेस तिथे हाच फरक "पाच वर्ष" असा बघीतलास तर फरक १०% इक्विटी डायव्हर्सिफाईड च्या पारड्यात आहे... त्यामुळे.......

गुंतवणूकीचे सगळेच मार्ग वेगवेगळ्या वेळी व प्रमाणात बघायला पाहीजे!

:-)

पाच वर्षे.

पाच वर्षे गृहीत धरून डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडांचा परतावा ५२ टक्के व इंडेक्स फंडांचा ४२ टक्के आहे.

मात्र हे दोन्ही रिटर्न्स हे कॅटेगरी रिटर्न्स आहेत. कोणत्याही एका विशिष्ट फंडाचे नाहीत.

गुंतवणूकदार गुंतवणूक करताना विशिष्ट फंडात गुंतवणूक करत असतो. गेल्या पाच वर्षाचाही इतिहास पाहिला तर इक्विटी डायव्हर्सिफाईड कॅटेगरीतील कोणत्याही अमुकतमुक फंडाने "प्रत्येक वर्षी" सेन्सेक्स ला हरवलेले नाही.

याऊलट इंडेक्स फंड हे विशिष्ट इंडेक्सला ट्रॅक करत असतात हे ध्यानात घेतले की इक्विटी इंडेक्स कॅटेगरीचे रिटर्न्स व इंडेक्स चे रिटर्न्स यामध्ये १ टक्क्यापेक्षा जास्त ट्रॅकिंग एरर येऊ नये. त्यामुळे इंडेक्स फंड्स अधिक चांगले .

मात्र अनेक "तज्ञांचे" मत असे की भारतातील इंडेक्सेस या अशास्त्रीय आहेत व डायव्हर्सिफिकेशन ऐवजी बाजाराचा कल लक्षात घेऊन बनवलेल्या आहेत. त्यामुळे "युनिटेक" सारखा शेअरही निफ्टीमध्ये समाविष्ट होऊ शकतो.

मात्र फंड मॅनेजरचे पूर्वग्रह व त्या पदावरील व्यक्तीच्या निर्णयामध्ये होणार्‍या चुकांचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात हे पाहता वरील दोष लक्षात घेतला तरी गुंतवणूकदारांच्या दृष्टीने इंडेक्स फंड्स हे योग्य आहेत असे वाटते.


आम्हाला येथे भेट द्या.

निर्धोक गुंतवणूक

इंडेक्स फंड (निर्देशांक फंड?) ही एक निर्धोक गुंतवणूक आहे. एकतर निर्देशांकात वाढ होणार हे देशातील औद्योगिक प्रगतीचे लक्षण आहे.
त्यामुळे सर्वसाधारण गुंतवणूकदार पण यातील गुंतवणूक संबंधी आपले आडाखे बांधू शकतो. जे इतर फंडाबाबत अभ्यासाची किंवा मार्गदर्शकांची आवश्यकता पडते
ह्या गुंतवणूक विषयी गुंतवणूकदार स्वतंत्र पणे निर्णय घेऊ शकतो. हा एक फायदा आहे.

फंडातील गुंतवणूक खर्च किमान राहतो हे लेखातील मत आहेच. तो एक फायदा आहे.
गुंतवणूकदाराची गुंतवणूक निर्देशांकाप्रमाणे वाढणार आहे. यात फंड मॅनेजरच्या कौशल्याचा प्रभाव कमी असणार आहे व फंड मॅनेजरला एखाद्या निर्देशांकापेक्षा जास्त परतावा देण्याची शर्यत नसल्यामुळे ही गुंतवणूक निर्धोक वाटते.

निर्धोक नाही

इंडेक्स फंडातील गुंतवणूक निर्धोक नक्कीच नाही. शेवटी ती गुंतवणूक शेअर्समध्येच असते. मात्र खर्च तुलनेने कमी.
उदा. निफ्टी बेंचमार्क एक्स्चेंज ट्रेडेड इंडेक्स फंड घेतला तर त्याचा खर्च ०.३३ टक्के इतका नाममात्र आहे.


आम्हाला येथे भेट द्या.

चांगला विषय

अजानुकर्ण,

आपण असा महत्वाचा विषय येथे चर्चेस घेऊन आमच्या सारख्या या विषयातील ढ माणसाला फार मौलिक मदत करत आहात. आणखी माहिती येऊ द्या.

मला शेअर्स, फंडस या सारख्या विषयावर अगदी सुरुवातीपासून ( अ आ इ ई) माहिती हवी आहे. तेव्हा इन्हेस्तमेंट फॊर डमीज असे काही पुस्तक आहे का? आपण कोठून सुरुवात करायला सांगाल?

आपला,
(ढ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

वा हेच

वा!
हेच म्हणतो मी!
मलाही हवी आहे. मागे अभिजीत म्हणाला होता की, कर्ण किहितो आहे त्यावर - तसा लेख आला... पण लेख तसा छोटा आहे नि नव्या लोकांसाठी खुलासेवारही नाही.

तेंव्हा हे मागणे मनावर घेवून एक चांगला लेख (माला) येवू देत हीच विनंती.
किंवा 'नेमकेपणाने' दुवे दिलेस तरी चालतील...

आपला
गुंडोपंत

 
^ वर