सल्ला धा

प्रेम ही कोमल भावना आहे हे तर आपण जाणतोच.
प्रेमात माणुस् केव्हा व कसा पडतो. प्रेम नकळत होते का ? प्रेमाचे मानसशास्र ,ज्योतिषशास्र आपल्यालापैकी किती जणांना माहीत आहे.
एखाद्या सुंदर तरुणीसमोर आपले प्रेम कसे व्यक्त करावे ?
समजा - एक तरुणी आहे जी दररोज एका मैदानात फिरायला येते एक तरुण तिला दररोज बघतोय . ही तरुणी सलग तीन वर्षे त्या मैदानात ठराविक वेळेला ती एका वयस्कर महीले बरोबर फिरायला येतेय. त्या तरुणाची नेमकी तीच वेळ आहे फिरायची . ती एक दिवस फिरायला नाही आली की त्याला चुकल्या सारखे वाटते याचा अर्थ काय?
त्याचे तिच्यावर प्रेम बसले असेल ?तिला विचारायला तो घाबरत असेल किंवा दररोज दिसणारी माणसे नाही दिसली की चुकल्यासारखे वाटते तसे त्याला वाटत असेल.
त्याचे तिच्यावर प्रेम बसले असेल तर त्याने काय करावे?
याबाबत सल्ला,माहीती धा? या विषयावर टिका व विनोद करू नये ही विनंती.

व्यक्तिगत- केवळ कुतूहल म्हणून मी हे प्रश्न केले आहेत. आपण प्रश्नांची उत्तरे द्याल अशी आशा. आणि हो मी तर आजन्म ब्रम्हचारी आहे हे विसरू नका ?
आपला
कॉ.विकि

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रेम बसले असेल

प्रेम बसले असेल तर त्याने प्रेमाला ऊठवावे, आंघोळ घालावी, तेल लावून भांग पाडावा व पावडर लावून बालवाडीत पाठवावे.

(प्रेमळ) आजानुकर्ण


आम्हाला येथे भेट द्या.

विनोद करू नका

कृपया सल्ला धा विनोद करू नका ही विनंती.
आपला
कॉ.विकि

हेच ते, हेच ते!

आजानुकर्ण, तुम्ही हिंदू धर्माचे दुराभिमानी आहात, व भा. ज. प. चे समर्थक आहात, ह्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही.

कॉ(लेजकुमार) विकींची मूळ स्टोरी बघा किती धर्मनिरपेक्ष होती ती! 'तो' ला धर्म नाही, 'ती' लाही नाही. 'ती'च्या पेहरावाचा वगैरे काहीही उल्लेख नाही. कदाचित ती रोज तेथे सलवार-खमीस घालून येत असेल, कदाचित पाचवारी अथवा अगदी नउवारी साडी नेसून येत असेल? मग पुढे जाऊन एकदा 'तो' निरखून बघेल तर काय, अहो गळ्यात चक्क मंगळसूत्र! किंवा ती रोज तेथे बुरख्यात येत असेल. मग एकदा 'अरे, ती तर आपल्या जिवलग मित्राची बायको!' असे लक्षात् आल्यावर 'तो' 'मिली खाक मे मुहब्बत' म्हणायला मोकळा!

तर असे हे सर्व ध. नि. वातावरण, मग प्रेमही ध. नि. च असणार्, हे उघड आहे. पण तुम्न्ही पडलात त्या मोदींचे भक्त. तुम्ही त्या ध. नि. प्रेमाला हिंदू मुलामा चढवलात. कसा? अहो, तुम्ही त्याला चक्क बालवाडीत पाठवलेत! तुम्ही सर्वसाधारणप्रमाणे ध. नि. असतात, तर 'त्याला बालवाडीत/ मदरशात' पाठवावेत, असे म्हटले असतेत. किंवा सोनियांच्या कॉंग्रेसचे समर्थक असतात, तर देशातल्या अल्पसंख्याकांचा मनाचा विचार करून 'त्याला मदरशात पाठवावे' असे लिहीले असतेत!

विचारलेल्या प्रश्नाची टिंगल केल्याचे दु:ख अगदी थोडे, पण हा जो भा. ज. प. व मोदींनी प्रभावित हिंदू धर्माचा छुपा प्रचार तुम्ही केलात, त्याचे दु:ख मलातरी जास्त झालेले आहे.

तेव्हा आता तुम्न्ही माझ्याप्रमाणेच ह्या पापाचे क्षालन करणे जरूर आहे. कालच कॉ(लेजकुमार) विकींनी जे निर्वाळे दिले, त्याने प्रेरित होऊन मी एका झटक्यात सुमारांचे ('सोनियाभक्त कुमार' हे बिरूद जरा लांबलचक वाटते म्हणून हा शॉर्टफॉर्म, बरं का) गेल्या पंधरवड्यातले अग्रलेख वाचून काढले. त्यामुळे मीही आता सोनियांच्या ध. नि. त्वाचा साक्षात्कार होऊन पावलेला आहे. आता सुरू करा सुमारांचे अग्रलेख वाचणे!

-सो.ध. नि.तेने भारावलेला प्रदीप

परत टिका

प्रदीप राव सल्ला धा .मागच्या चर्चेच्या उल्लेख करू नका . तुम्हाला सोनिया गांधींची स्तुती रूचली नाही वाटत.खुप जळफळाट झालेला दिसतोय. आणि कॉलेजकुमार न लिहीता कॉम्रेड विकि असा उल्लेख करावा ही नम्र विनंती. कृपया व्यक्तिगत पातळीवर उतरू नका आम्ही ही उतरू शकतो हे लक्षात ठेवा.संपादन मंडळाने प्रदीपला सांगावे प्रदीपबाळ असे वागू नकोस .
आपला
कॉ.विकि

कुतुहल

व्यक्तिगत- केवळ कुतूहल म्हणून मी हे प्रश्न केले आहेत. आपण प्रश्नांची उत्तरे द्याल अशी आशा. आणि हो मी तर आजन्म ब्रम्हचारी आहे हे विसरू नका ?

http://www.misalpav.com/node/112#comment-1473
हा प्रतिसाद बघा

प्रकाश घाटपांडे

व्हेन् इन् डाउट् ...

काय करायचे ते सांगणे नलगे सूज्ञांप्रती...

सल्ल्यासाठीची अडचण कळली नाही

१. तो तरुण आजन्म ब्रह्मचारी असेल, आणि त्याचे प्रेम वैषयिक असेल, तर याविषयी आचार्य अत्र्यांनी एका नाटकात चर्चा केली आहे. नाटक विनोदी असले, तरी विनोदावेगळा अर्थही काढता येतो.

२. तो तरुण आजन्म ब्रह्मचारी असेल/नसेल आणि बसलेले प्रेम विशुद्ध (वैषयिक नाही असे) असेल, तर तशा प्रकारचा संबंध बहुतेक समाजात मैत्रीच्या चौकटीत बसवला जातो. या चौकटीत व्यक्ती तितक्या प्रकृती मावू शकतात. यास त्या तरुणीची संमती आणि आवडनिवड अर्थातच महत्त्वाची आहे.

३. तो तरुण आजन्म ब्रह्मचारी नसेल आणि प्रेम वैषयिक असेल तर त्या तरुणीशी तसा संबंध वाढवण्याचे समाजात रूढ मार्ग आहेत - तेही व्यक्ती तितक्या प्रकृती असे वेगवेगळे आहेत. यासही त्या तरुणीची संमती आणि आवडनिवड अर्थातच महत्त्वाची आहे. त्यामुळे इतक्या कमी माहितीच्या भांडवलावर सल्ला देणे कठिण आहे. इतकेच काय, त्या तरुणा/तरुणीच्या मनाची, वागण्याची जडणघडण माहीत नसता दिलेला कुठलाही सल्ला अप्रस्तुत आहे.

ज्या बाबतीत सल्ला द्यावा ती अडचण काय हा प्रश्न मला पडला आहे - या प्रसंगात समाजात चालेल अशा वागणुकीची कमाल चौकट आणि रूढ मार्ग त्या तरुणाला माहीत नाहीत काय?

वा धनंजय साहेब

प्रतिसाद लिहावा तर तुमच्या सारखा .प्रतिसाद आवडला. हरीक मानसशास्रीय चर्चा आहे हे तुम्ही ओळखलेले दिसतय त्याबद्दल आपल्याला धन्यवाद.
मला हेच म्हणायच की जर त्या तरुणाचे त्या तरूणीवर प्रेम बसले असेल तर तीन वर्षे झाली तरी तो तिला विचारत का नाही. आणि याबाबतची कारणे मी वरती लिहीलेलीच आहेत. यावर आपले मत आपण सांगावे ही विनंती.
आणि हो आजन्म ब्रम्हचारी मी आहे.
आपला
कॉ.विकि

कारण

जर त्या तरुणाचे त्या तरूणीवर प्रेम बसले असेल तर तीन वर्षे झाली तरी तो तिला विचारत का नाही...

एक कारण असं असू शकतं की "तो" कॉमी असेल आणि ती "फंडू" (फंडामेंटल हिंदू), नाहीतर उलटे ती कॉमी आणि तो "फंडू"! :-) अशा परीस्थितीत एकतर त्या मुलाने पक्ष बदलावा किंवा प्रपंच पक्षातीत ठेवावा! दुसरे करणे कदीही चांगले, प्रपंचात राजकारण नसलेले उत्तम!

बाकी "प्रेम" या गोष्टीवर सुधीर मोघ्यांची कविता आठवते (फक्त काहीच ओळी लिहीत आहे)

दाटून आलेल्या संध्याकाळी अवचीत सोनेरी उन्ह पडतं
तसच काहीस पाऊल न वाजवता आपाल्या आयुष्यात प्रेम येतं
...

प्रेमाच्या सफलविफलतेला खरं तरं इथ काहीच महत्व नसतं
इथल्या जय-पराजयात फक्त एकच गहीरं सार्थक असतं
मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं
खुळ्या सोनेरी उन्हासारख आयुष्यात प्रेम यावं लागतं

अजुन एक अनाहूत सल्ला: आपण टंक लेखन करत असताना जर d आणि नंतर ya टंकले तर "द्या" असे दिसेल जे "सल्ला धा" पेक्षा "सल्ला द्या" असे वाचता येईल.

सल्ला

कॉम्रेड साहेब अन प्रेमाच्या गप्पा? (ह. घ्या.)

चकटफू सल्ला द्यायला आपल्या बा चे काय जातेय म्हणून हा उपद्व्याप....

प्रेम नकळत होते का ?
---खरे उत्तर अद्याप अज्ञात आहे. कारण ज्यांना झाले नाही त्यांना माहित नाही व ज्यांना खरे-खुरे झाले ते कोणीही शुद्धित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवणे चूक आहे.

एखाद्या सुंदर तरुणीसमोर आपले प्रेम कसे व्यक्त करावे ?
--- याचे अनेकानेक मार्ग आहेत. सर्वांत चांगला व हिंदी चित्रपटासारखी स्वतःची कथा करून घ्यायची नसेल तर एखाद्या प्रसन्न वेळेला स्वष्ट बोलावे. आपल्याला या अशा बोलण्याचा चिकार अनुभव आहे. एका पढडीतली उत्तरे असतात. त्यातील आपल्या अनुभवातले सांगतो... "अत्ताच तसा कही विचार नाही" अशा प्रकारातले असेल तर होकार आहे असे समजू शकता. "हे काहीतरीच काय बोलतोस, माझे तर तिकडे ते आहे" वगैरे म्हणजे तुम्ही दुसरा प्रोजेक्ट हाती घ्यावा. सरळ होकार असेल तर तो तुम्हाला कळेलच आणि जर तिला नकार देता येत नसेल पण ती त्सा चेहर्‍यावर दाखवत असेल तर कॉमन-सेन्स वापरावा. लक्षात घ्या की यात व्यक्ति परत्वे तसेच स्थान परत्वे अनेक फरक असू शकतात.
एक मात्र नक्की.... काय आहे ते बोलून टाकावे. जास्त वेळ वाया घलवू नये.

त्याचे तिच्यावर प्रेम बसले असेल ?तिला विचारायला तो घाबरत असेल किंवा दररोज दिसणारी माणसे नाही दिसली की चुकल्यासारखे वाटते तसे त्याला वाटत असेल?
--- कोणतेही कारण असू शकते.

आपला,
(अनुभवी) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

प्रेम

आम्ही तिच्यावरील प्रेमापोटी
दारु सोडली, अहो सिगारेट सुद्धा सोडली
पण "ती" ने मात्र आमच्यासाठी काहीच 'सोडल' नाही
मग एक दिवस आम्हीच 'ती' ला सोडली
( कुठेतरी अंधुक आठवणारी चारोळी)
प्रकाश घाटपांडे

पाचोळी

चला आता पाचोळी हा नवा काव्यप्रकार लोकप्रिय व्हायला काहीच अडचण नाही. पहिल्या चार ओळींनी हवेत न्यायचे आनी पाचव्या ओळीतून दानकन जमीनीवर आणायचे!
खेळताना रंग बाई चोळी चा चोळीचा
अन फाटला गं काना माझ्या पाचोळीचा
प्रकाश घाटपांडे

आजन्म ब्रह्मचारी

प्रत्येक अविवाहित पुरुषाला लग्न होईपर्यंत आजन्म ब्रह्मचारीच समजतात. तेव्हा आजन्म ब्रह्मचारी असण्याचे काय कौतुक?-वाचक्‍नवी

हे गाणे पहा

जरा मोठे आहे पण प्रेमकथाच आहे...

हे गाणे

प्रेम म्हणजे काय या विषयावर हे सिरीयस गाणे पहा. विनोद नाही

(गंभीर) आजानुकर्ण


आम्हाला येथे भेट द्या.

अजुन कोणिच सल्ला ,मार्गदर्शन केलेले नाही.

कृपया प्रेम या विषयाबाबत कोणितरी मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपला
कॉ.विकि

त्याचं असं आहे..

त्याचं असं आहे.. प्रेमावर बरंच संशोधन झालं आहे, मानसशास्त्रीय वगैरे. पण या प्रेमाच्या ९ तर्‍हा आहेत म्हणे. प्रेम कसं व्यक्त करावं, वाढवावं वगैरे बद्दल मार्गदर्शक साहित्य ही मुबलक असावे. अर्थात अश्या वाचीव माहितीच्या 'खर्‍या' (?!!!) प्रेमात कितपत उपयोग होतो याबद्दल साशंक आहे.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

प्रेम व्यक्त् करायचा सल्ला.

विकी, मी नवीन् आहे, साइटचे नियम तितकेसे माहीत नाहीत. संभाळून घ्या.
पहिले काही दिवस त्या मुलीच्या बरोबर येणार्या वयस्कर् स्त्री कडे जास्त लक्ष द्या. विश करा. मग् ती ही हसेल् काही दिवसांनी. मग दिवाळी, नव वरषदिन् असे विश् करा. मग् वॅलेण्टाईन् डे येतोच् आहे. त्या दिवशी संध्याकाळी फकत्
खास् हसू तिच्या साठी द्या. विश् न करता. दुसर्या दिवशी तिला म्हणा काय् आज् काल् विश् करतात ना! माझा नाही बुवा विश्वास. ती विचारेल् का बरे?
मग् तुमच्या तपश्चर्येची माहिती तिला द्या. हसली तर तुमचे काम् झालेच्.

Ashwini Khadilkar

 
^ वर